ये ना

Submitted by पल्ली जुनी on 9 December, 2009 - 11:38

आधी प्रकाशित झालेली कविता ह्या ठिकाणी http://www.maayboli.com/node/8460

अगं तुझी आठवण आली,
की हवेची झुळुक आली?
मला दूर घेऊन गेली,
तालावरचा ठेका झाली.
उरातला थेंब ओल्या पावसाचा
झाकोळ भरल्या गच्च नभाचा
देहावरती फिरुन आला
ऋतु तुझ्या आठवांचा.
काळजातला स्पर्शचिरा
थरथर शहारा श्वासांचा
अजुनी ताजा तुझा मोगरा
गंधलेला स्वच्छ फुलोरा.
ये ना,
ये ना एकदा फिरुनी पुन्हा
किती साहु थरार वाट पाहण्याचा?
दाराशी अजुनी रेंगाळतो गे,
क्षण टिपणारा स्वप्नथवा....

गुलमोहर: 

त्या आय डी चा नोड मला त्रासदायक होता म्हणुन तो कन्व्हर्ट नाही करत. कुणाला हसु येइल पण .... न्युमरॉलॉजी चा घोळ आहे

असं होय, बर. Happy अंक चांगला होता की! १४३८ ची बेरीज ७ येते. इनोव्हेटिव्ह आणि व्हिजनरी... Happy

आणि नवीन आयडीने जुनेच साहित्य टाकले तर त्रास कसा काय कमी होणार? Light 1