सात बारा... !!!!

Submitted by अज्ञात on 6 December, 2009 - 22:43

सरली पळे उलटली पाने
शांत जाहली राने,
मुकेच मिटले वादळ अवचित
कुठे कोण ना जाणे

विरली छाया ठसे उमटले
जखमांचे व्रण झाले,
घोंघावे अवती भवताली
मेघ झरूनी गेले

उन्मळलेले कसे रुजावे.. ?
रुसले पक्षी रावे,
शीळ एक ना कुजबुजही वा
फसले किंचित दावे

सात स्वरांचे झाले बारा
विकृत सोबत आले,
राग जन्मले नवे नव्हाळे
अवघडले अन वारे

.................अज्ञात
७/१२/२००९

गुलमोहर: 

मस्तच कल्पना अज्ञातजी.
ओह...आजची तारीख कवितेची प्रेरणा आहे तर.... Happy

Happy

२६/११ वर सगळेच,
बोलतात नको तेवढे.
मिठाची गुळनी घेत
कांही गिळतात आवढे.

७/१२ च्या उतार्‍याला,
राजकारणा पुरता थारा.
कितीही झाल्या घोषणा,
उतारा झाला नाही कोरा.