...सुगन्धा...

Submitted by गीतरुप on 23 November, 2009 - 11:01

माझी पहिली वृत्त बद्ध रचना

वृत्त भुजंगप्रयात
गण - लगागा लगागा लगागा लगागा

नभी चांदण्यांची नवी रात होती
तुझ्या संग प्रीती फुलोरात होती||१||

मनी पारिजाता अशी जागधुंदी
दिवाणी निशाही भुलाव्यात होती||२||

जणू मोगरा सांडला अंग अंगा
सखी ही समोरी सुगंधाच होती||३||

तिचा श्वास श्वासात झंकारलेला
जणू मारव्याची पहा रात होती||४||

कसे थोपवू मी क्षणांना ,पळांना
उद्याची घडी का समीपास होती||५||

गीतरुप ११/२०/२००९

गुलमोहर: 

गझल म्हणता येईल का ही शंका आहे.

नभी चांदण्यांची नवी रात होती
तुझ्या संग प्रीती फुलोरात होती

इथे अलामतीचा गोंधळ वाटतो आहे.

शेवटच्या शेरात पण काफिया चुकला आहे.
कुणी मार्गदर्शन केल्यास उत्तम..!

मात्र कविता म्हणून सुंदरच आहे.