३५० वा शिवप्रताप दिन

Submitted by अमोलराजे माने on 23 November, 2009 - 03:34

आज दिनांक २४ नोव्हेंबर २००९ रोजी प्रतापगडावर ३५० वा शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे, त्या निमीत्ताने केलेलं अफझलखानाचा वध व त्यावर चाललेल राजकारण यांच अवलोकन.

शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करुन त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या ५००० मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या २२००० सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.

"मि मेलोतरी चालेल पण आदीलशाही सैन्याला लोळवा" असा आदेश देणा-या महाराजांची थोरवि कोणत्या शब्दात सांगायची? एवध्या मोठ्या यशाने महाराज हुरळुन गेले नाहीत! कोणताही आनंदोत्सव साजरा न करता ते पुन्हा घोड्याव स्वार झाले आणी वाइला पोहोचले. तेथुन सैन्याची जमवाजमव करुन पन्हाळ्यापर्यंतचा सर्व परिसर मुक्त केला. यशाने हुरळुन न जानारे महाराज खरे कर्मयोगी होते. आम्हा महाराष्ट्रीयनांचे भाग्य थोर म्हणुन महाराज महाराष्ट्रात जन्मले. आदर्श सेनापती, आदर्श राजकारणी आणी खरे कर्मयोगी, प्रतापसुर्य शिवराय हेच महाराष्ट्रीय तरुणांचे खरे दैवत आहेत. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात!
शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावे ॥
इहलोकीं परलोकीं राहावे । कीर्तिरूपें ॥॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥॥

अफझलखानाच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करुन त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
परंतु एका पकिस्तानी नागरीकाने "हजरत मोहम्मद अफझलखान मेमोरियल सोसायटी" नावाचा ट्र्स्ट स्थापन करुन अफझलखानाचे उद्दात्तिकरण केले आहे. जिथ पुर्वी फक्त थडग होत तिथं अफजलखानाचा दर्गा उभारुन त्याला संत पदी बसवल, तसेच तिथे दर वर्षी उरुस भरवायला सुरुवात केली.

प्रतापगडावर अफझलखानाच्या कबरीभोवती उभारलेली बेकायदा बांधकामे भुईसपाट करावीत, अशी याचिका प्रतापगड उत्सव समितीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. तिची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने ही बांधकामे तोडण्याचा आदेश राज्यशासनाला दिला. त्यासाठी ३० जून २००९ पर्यंत मुदत देण्यात आली. २२ सप्टेंबर २००९ या दिवशी शासनाने उच्च न्यायालयात केलेल्या अर्जात कबरीभोवती उभी राहिलेली बेकायदा बांधकामे ही १९६० पूर्वी करण्यात आली असल्याचा दावा केला. `वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये अस्तित्वात आला. त्यामुळे ही बांधकामे त्या नियमात मोडत नाहीत. अफझलखानाची कबर ही महाराष्ट्रातील `पवित्र वास्तू' आहे. ही बेकायदा बांधकामे पाडली, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न उभा राहील. ही बांधकामे न तोडता ती नियमित करा. तिथे शासकीय कार्यालये चालू करू', असेही या याचिकेत म्हटले आहे.
या अर्जावर न्यायमूर्ती जे.एन्. पटेल यांनी शासनाची खरडपट्टीच केली. `११ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीत अफझलखान मेमोरियल ट्रस्टने जमीन हडप करून उभारलेली बेकायदा बांधकामे ही १९६० पूर्वी उभी राहिली आहेत, याचे पुरावे आहेत का ? ही बांधकामे वनसंवर्धन कायद्याखाली येत नाहीत, असा अहवाल वनाधिकार्‍यांनी दिला आहे का ?', असे प्रश्‍न न्यायमूर्तींनी उपस्थित केले. तेव्हा शासकीय अधिवक्‍त्या ज्योती पवार यांनी तसे पुरावे नसल्याचे सांगताच न्यायमूतीं पटेल यांनी हा अर्ज फेटाळून लावत शासनाला तडाखा दिला.
मुठ्भर मतांसठी अफझलखानाच्या कबरीच उद्दात्तिकरण मान्य करायच व दुसरीकडे प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच स्मारक व भवानी मातेच्या मंदीराकडे दुर्लक्ष करण्याची सवयच सरकारला लागली आहे. शिवाय त्याचा कुणी विरोध केला तर निर्लज्जपणे त्याला जतियवादी ठरवले जाते.
ज्यादीवशी प्रतापगडावर अफझलखानाच्या कबरीभोवती उभारलेली बेकायदा बांधकामे भुईसपाट केरुन अफझलखानाची कबर उघड्यावर पडेल तेंव्हाच खरा शिवप्रतापदीन साजरा होइल.

Afzalkhanacha vadh,Afzal khanacha vadh,Afzalkhana vadh,Afzalkhan vadh,Afzalkhan vadh,Afzal khan vadh,Afzalkhan shivaji vadh,Afzal khan shivaji vadh

गुलमोहर: