आशिया आणि ओबामा!

Submitted by लालू on 21 November, 2009 - 09:27

ओबामाची नुकतीच संपलेली आशिया भेट, त्याचा उद्देश, आशियातील चीनच्या रोलबद्दल केलेली वक्तव्ये याबद्दल प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा चालू आहे. चीनहे भारत पाकिस्तान संबधात हस्तक्षेप करावा असे थेट विधान केले नसले तरी तसा अर्थ त्यातून निघू शकतो. स्टेटमेन्ट असे आहे-

The two sides welcomed all efforts conducive to peace, stability and development in South Asia. They support the efforts of Afghanistan and Pakistan to fight terrorism, maintain domestic stability and achieve sustainable economic and social development, and support the improvement and growth of relations between India and Pakistan. The two sides are ready to strengthen communication, dialogue and cooperation on issues related to South Asia and work together to promote peace, stability and development in that region.

भारतात याबद्दल प्रतिक्रिया उमटल्याचे वाचले. मटामधला अमेरिकेचे चीनविषयी बदललेले धोरण याबद्दलचा अग्रलेख वाचला, त्याची लिन्क खाली देत आहे.

मटामधील अग्रलेख
ओबामांची शरणागती!
विश्लेषण बरोबर वाटते. दुसरा अर्धा भाग बराच "आशावादी" आहे.

इथल्या वृत्तपत्रांनीही भारताच्या चिंतेची दखल घेतली.
perceived U.S. missteps concern India

पंतप्रधान सिंगही अमेरिका भेटीला येत आहेत. गेल्या वर्षभरात काही समीकरणे बदलली आहेत का, कशी, त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात यावर मते मांडायची असल्यास इथे लिहिता येतील. वरचे दोन्ही लेख जरुर वाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच डिनरमधे ते गेट क्रॅशर्स आले होते ना?? चॅनलवाले घसा फोडून बोम्बलत होते.

ते हेडलीचे काय झाले ते पण लिहा ना प्लीज..

पहिली लिन्क वाचली, ती जुनी आहे आणि त्यात फारसे काही नाही. दुसरी वाचत आहे. एक पान वाचून झाले. न्यूजवीकमधलीही इन्टरेस्टिन्ग वाटली.
>>भारतात आफ्रिकेतुन शिक्षणासाठि विद्यार्थि येतात, हे प्रमाण वाढवले पाहिजे
हे मला पटले नाही, रिस्की आहे. लिहिते त्याबद्दल.

नंदिनी, हो. माहीत असते असे जाता येते तर आम्हीही गेलो असतो. Happy

सायो, उदय त्याचा इथे काय संबंध??

संबंध काहीही नाही. ३बूच्या लांबलचक पोस्टला उद्देशून लिहिलं होतं मी.(अर्थातच) आणि तुझा असा प्रश्न येईल हेही लिहिण्या आधीच ओळखून होते.
तुमच्या चर्चेत बाधा आणण्याचा उद्देश नाही. तेव्हा चालू द्या.

काल ओबामांनी West Point मध्ये अफगाण-पाकिस्तान वरील अमेरिकेची भुमिका आणि योजना मांडली.

प्रमुख मुद्धे:
१. अफगाणमध्ये तालिबान आणि अ‍ॅल्-कैडाच्या कारवाया रोकण्यासाठी पुढल्या वर्षी कुमक (३०,०००) पाठवणे.
२. जुलै २०११ पर्यंत अमेरिकन सैन्य माघारी बोलवणे. या ट्रांझिशनमध्ये, अफगाणमध्ये स्वायतत्ता येण्याकरिता कार्झाइ शासनाला होईल ती मदत करणे.
३. अतिरेक्यांचं "सेफ हेवन" पाकिस्तान आणि अफगाण-पाकिस्तान सीमेवर आहे. त्याचा बंदोबस्त पाकिस्तानच्या मदतीने करणे.

वरील मुध्यांपैकी, फक्त पहिला मुद्धा सहज शक्य होईल असे वाटते. उरलेल्या दोनांत बरेच "ग्रे एरीआज" आहेत आणि त्यावर अजुनतरी काहि ठोस उपाय नाही. दोन्ही देशातील (अफगाण, पाकिस्तान) गव्हर्नमेन्ट्स नावासाठी आहेत; त्यांना अनुक्रमे tribal chiefs आणि मिलिटरीचा सपोर्ट नाही. ओबामा टीम त्यांना कसे हँडल करते यावर सगळे यश अवलंबून आहे.

खाली दिलेला हा लेख या स्ट्रॅटेजीवर टीका करणारा आहे.
This will not end well

आणि हा त्याच्या बाजूने-
Afghan Strategy

कोणताही आधी वाचलात तरी चालेल. Happy

राज, पहिल्या मुद्द्यातला आकडा फक्त लढाऊ कुमक झाली, त्याला सपोर्ट म्हणून बाकी नॉन कॉम्बॅट कामे असलेले खूप लोक जातील. त्यांचाही खर्च.

"अतिरेक्यांचं "सेफ हेवन" पाकिस्तान आणि अफगाण-पाकिस्तान सीमेवर आहे" हे गृहित धरलेलं आहे. त्यांच्यापासून अमेरिकेला धोका आहे हे सुद्धा गृहित धरलं आहे. तसं असेलही. (बर्‍याच लोकांना वाटतं त्यांचा धोका नाही.) त्यांना शोधून काढावं लागेल. जुलै २०११ हे माघारी जाणार असतील तर तोवर ते गप्प बसू शकतील आणि नंतर पुन्हा कारवाया सुरु करु शकतील किंवा दुसर्‍या देशांत जातील.

युद्ध सुरु होऊन ८ वर्षं झाली, एवढ्या काळात ते सरकार स्वायत्त झाले नाही तर येत्या १-२ वर्षांत कितीसा फरक पडणार? खरोखरच फरक पडावा वाटत असेल तर एवढ्या लवकर तिथून बाहेर पडता येणार नाही. नाहीतर आत्ताच बाहेर पडावे (इराकमधूनही). १-२ वर्षं पैसा, जीव खर्च करुन काहीच हाती लागणार नाही त्यापेक्षा. २०१२ ला पुन्हा इलेक्शन आहेत तेव्हा काही माघारी येतील २०११ मध्ये. Happy
पहिल्या लेखात बरेचसे शंकांचे मुद्दे कव्हर झाले आहेत.

अमेरिकेच्या या भुमिकेवर भारताची प्रतिक्रिया कुठेही वाचनात आली नाही. याचा साइड इफेक्ट म्हणुन तालिबान-अलकैडा च्या कारवाया काश्मीर मध्ये वाढु शकतील आणि भारतासाठी ती एक मोठी डोकेदुखी होउन बसेल, असे वाटते.

प्रतिक्रियेने काहि फरक पडणार नाहि.
इथुन पुढे ओबामा दह्शत वादावर सॉफ्ट झाल्या मुळे दहशतवाद वाढणार आहे.
इथुन पुढे तलिबान सारखे बाहेरच्या देशातिल दह्शतवादि व त्यांचे भारतातले अनुयायि
भारताचि डोके दुखि होणार हे निस्चित.
कश्मिर गेल्यातच जमा आहे .
पुढिल ५० वर्शात आता आसाम केरळ वाचवला तरि पुष्कळ.

हे बघा http://beta.thehindu.com/news/national/article59726.ece
"----India on Thursday hoped the international community was prepared for a long haul in the region." ह्याचा अर्थ भारताला अमेरिकेने लवकर पुल आउट करु नये असे वाटते असा घ्यायचा का ?
हे लेटेस्ट http://www.nytimes.com/2009/12/04/world/asia/04drones.html?hp
बलुचिस्तानात हल्ले करण्याचि "परवानगि" मागत हेत. पन पब्लिक असन्तोष खुप हे. ह्येन्नि आपले कार्यक्षेत्र वाढवले तर पब्लिक रिअ‍ॅक्शन वाइटच असेल.

अफगाणिस्तानात युद्ध सुरु करण्यापूर्वी बुश सरकारने भारताला विनंती केली होती तेव्हा भारताने सैन्य पाठवायला नकार दिला. तेव्हा आता तुम्ही तिथून गेलात तर आम्हाला प्रॉब्लेम होईल असं कसं म्हणणार म्हणून ते 'इन्टरनॅशनल कम्युनिटी' वगैरे.. Happy म्हणजे सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेऊ.

ते ड्रोन अ‍ॅटॅक पूर्वीपासून चालू आहेत. तिथे निष्पाप नागरिकांचा जीव जातो अशी ओरड मागेही झाली होती. ते ड्रोन लोकवस्ती असलेल्या भागात गेले होते. त्याच भागातल्या अतिरेक्यांच्या कारवाया कमी करण्यासाठी पाकिस्तानला मदत दिली होती. ते नुसते पैसे घेतात आणि काही करत नाहीत.

भारताने आता उठसुठ अमेरिका आणि 'इन्टरनॅशनल कम्युनिटी' कडे हात पसरणे सोडुन दिले पाहीजे. If you want to be in big boys league then you should act like one. इस्रायल सारखा ठीपक्याएव्हढा देश अतिरेक्यांशी कसा सामना करतो हे शिकण्यासारखे आहे.

<<भारताने आता उठसुठ अमेरिका आणि 'इन्टरनॅशनल कम्युनिटी' कडे हात पसरणे सोडुन दिले पाहीजे.>>
माझ्या मते भारत 'हात पसरत' नाहीये. भारत अमेरिका दोघांनाहि अतिरेकी लोक नकोत.

अमेरिकेची पद्धत रानटी. असंस्कृत, दोन हजार वर्षांपूर्वीची. दे दणाद्दण हाणामारी!

भारताची अहिंसक, अधिक सुसंस्कृत व अत्यंत pragmatic. त्यांच्या साठी रस्ते, रुग्णालये, शिक्षणसंस्था इ. बांधून त्यांचे मन वळवणे. त्यांची खरी दु:खे दूर करणे. त्यांना दाखवून देणे की भारताने जसे अमेरिका किंवा रशिया यांच्या गोटात न जाता, स्वतःची उन्नति स्वतः केली तसे तुम्ही करू शकता.

पण उगाच ओबामाला कशाला नावे ठेवायची? तुझ्या पद्धतीने तू काम कर, माझ्या पद्धतीने मी. कुठून तरी अतिरेकीपणा थांबल्याशी कारण. तुझ्या कार्यात तुला यश मिळाले तरी चांगलेच होईल, फक्त मला तुझे धोरण पटत नाही, म्हणून मी तुझ्यात सामील होणार नाही.

शिक्षण हाच आजच्या जगात सर्वात प्रभावी मार्ग आहे. अशिक्षित असल्याने चुकीच्या मार्गाने लोक जातात. भारतात लोक खूप शिकले म्हणून भारताची लोकशाही भरभराटीला आली. पाकीस्तानी तसेच राहिले.

<<जुलै २०११ हे माघारी जाणार असतील तर तोवर ते गप्प बसू शकतील आणि नंतर पुन्हा कारवाया सुरु करु शकतील किंवा दुसर्‍या देशांत जातील.>>

अर्थातच. अमेरिकेच्या असल्या कृत्रिम वेळापत्रकाचा नि त्यांचा काय संबंध? दोघेहि जंगली. मोठ्या जनावराचा त्रास असेल तर बिचारे काही वेळ उपाशी बसतील, ते जनावर गेले की परत आपले नेहेमीचे काम सुरु. म्हणूनच भारताची पद्धत यशस्वी होण्याची शक्यता अधिक.

<<इस्रायल सारखा ठीपक्याएव्हढा देश >>
त्या देशाला अमेरिका जोडा. भारताच्या अडीचपट मोठा काळा डाग होईल तो जगाच्या नकाशावर.

>>भारताची अहिंसक, अधिक सुसंस्कृत व अत्यंत pragmatic. <<
थोडक्यात भारताने "गांधीगीरी" करायची असं तुम्हाला म्हणायचं आहे का? Happy
पार्लमेंटवर हल्ला झाला, थोडी धरपकड झाली, गुन्हेगाराला शिक्षा होउनसुद्धा अजुन फासावर चढवले नाही; ही आमची सहिष्णुता. म्हणजे अतिरेकी दुसरा हल्ला करायला मोकळे...
मुंबईवर हल्ला, परत तीच परिस्थिती. ठोस पुरावे असुनसुद्धा कारवाई नाही. तुम्ही कसाबला पोसा वा फाशी ध्या, अतिरेक्यांना त्याचे काहीही सुख-दुख नाही. पुढील हल्ल्याकरता त्यांनी शेकडो कसाब तयार केलेले आहेत.

>>शिक्षण हाच आजच्या जगात सर्वात प्रभावी मार्ग आहे. अशिक्षित असल्याने चुकीच्या मार्गाने लोक जातात. <<
माझाही सुरुवातीला असा समज होता, पण तो सपशेल फोल ठरला. ९/११ मध्ये सामील झालेले आणि त्यानंतर पकडले गेलेले अतिरेकी उच्चशिक्षीत होते. लंडन, दिल्ली, मुंबई हल्ल्याचे सुत्रधार उच्चशिक्षीत आहेत. इतकेच नाही तर अल्-कैडाचा म्होरक्या ओसामाने देखील कॉलेजचं तोंड पाहीलेलं आहे. या सगळ्यांवर शिक्षणापेक्षा रॅडीकल इस्लामिज्मचा पगडा जास्त आहे/होता.

<<इस्रायल सारखा ठीपक्याएव्हढा देश >>त्या देशाला अमेरिका जोडा. <<
इस्रायलला अमेरिकेचा पाठींबा आहे यात काहीही संदेह नाही. परंतु इस्लामीक राष्ट्रांच्या कोंडाळ्यात असुनसुद्धा, तेथील अतिरेक्यांशी ज्या धैर्याने ते सामना करताहेत ते निश्चित कौतुकास्पद आहे. मला हेच म्हणायचं होतं.

शर्मिला
सैन्य पाठवायला भारताने नकार दिला))))) भारत हा सैन्य पाठवुच शकत नव्हता कारण १५ कोटी भारतिय मुसलमान .त्यांचा इराक व अफगणिस्तान सैन्य पाठवायला विरोध होता आणि राहणार.
त्या मुळे दह्शत वाद विरोधि युध्दात भारत हा अमेरिकीच्या काहिहि उपयोगि पडु शकत नाहि.त्या पेक्षा
पकिस्तान जास्त चांगलि भुमिका वठवु शकतो नव्हे वठवत आहे.(स्वात खोर्‍यात) त्या मुळे अमेरिका
हि चिन व पकिस्तान ला झुकति भुमिका देत असणार

राज
अतिरेकि हे उच्च शिक्षित आहेत.
हे अगदि बरोबर आहे ग्लासगो मधे स्फोट करणारा भारतिय अतिरेकि मुसलमान हा शास्त्रज्ञ होता .
डॉनियल पर्ल चे मुंडके उडवणारा उमर शेख हा ब्रिटिश सस्कुल ऑफ इकॉनोमिक्स चा विद्यार्थि होता.

भारतिय दहशत्वादि संघटना सिमि हि अशिच उच्च शिक्षित लोकांचि संघटना आहे.
भारतिय इस्लामि दहशत्वादि तरि सर्व शिक्षित लोक च आहेत.

<<थोडक्यात भारताने "गांधीगीरी" करायची असं तुम्हाला म्हणायचं आहे का? >>
गांधीगीरी मला माहित नाही. पण "१५ कोटी भारतिय मुसलमान" हा राजकारणातला एक अतिशय मोठा भाग असल्याने भारताचे बरेच नुकसान होत आहे यात शंका नाही.

शिक्षण घेतलेले 'काही' लोक अतिरेकी असतात, पण म्हणून गरीब नि अशिक्षित असलेल्या जास्त लोकांना साध्या शिक्षणापासून वंचित ठेवणे बरोबर नाही. भारतात नाही का, हिंदू अतिरेकी आहेतच म्हणतात, पण बाकीचे जे जास्त प्रमाणावर आहेत ते चांगलेच नाही का?

माझे म्हणणे असे की परदेशात आपले सैनिक मरायला पाठवण्यात काहीच अर्थ नाही. पण जर काहि करायचेच तर विधायक करावे. याला खर्च किती येतो माहित नाही, पण आशा आहे की अमेरिकेसारखे स्वतःला गहाण टाकून युद्ध लढवण्याचा खेळ खेळण्यापेक्षा, शहाणपणाने थोडासा खर्च करायला हरकत नाही, अशीच भारताची भूमिका असेल. .

परदेशात आपले सैनिक पाठवण्यास काहि अर्थ नाहि)))) झक्कि अहो मग काय त्यांनि आपल्यावर हल्ला
करे पर्‍यंत गप्प बसायचे काय. बुश ने वॉर ओन टेरर दह्शत्वाद्यांच्या दारात नेले म्हणुन तर अमेरिका वाचलि नाहि तर आपल्या कडे दर २ महिन्याला स्फोट आहेच कि

हेडलिवर मुम्बै हल्ल्यात सहभाग असल्याचे आरोपपत्र दाखल केले -
http://www.nytimes.com/2009/12/08/world/asia/08terror.html?hp
म्हन्जे पाकिस्तानि भुमिबरोबरच अमेरिकन भुमिवरुनसुध्दा भारताविरुध्द कारवाया होतात असे मानले पाहिजे.

हे वाचा-
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2009/12/10/AR200912...
इथले लोक अफगाणिस्तानात चालले होते म्हणे अमेरिकेशीच लढायला. असे लोक जिथे आहेत तिथून कुठूनही कारवाया होऊ शकतात.

>>भारताची अहिंसक, अधिक सुसंस्कृत व अत्यंत pragmatic. त्यांच्या साठी रस्ते, रुग्णालये, >>शिक्षणसंस्था इ. बांधून त्यांचे मन वळवणे. त्यांची खरी दु:खे दूर करणे.

त्यासाठी आधी तिथे जाता तरी आले पाहिजे ना? युद्धाला जाणारे ही नंतरची कामे स्वतःकडेच घेतात. Halliburton वगैरे. Happy

त्यासाठी आधी तिथे जाता तरी आले पाहिजे ना? युद्धाला जाणारे ही नंतरची कामे स्वतःकडेच घेतात. Halliburton वगैरे. स्मित>>:)

Pages