पादुका (हझल)

Submitted by मिल्या on 13 November, 2009 - 02:27

हिला गझल म्हणण्यापेक्षा हझल म्हणणे जास्त संयुक्तिक होईल

कसे ठकविले जगास सार्‍या नको गर्व हा फुका
नशीब बेणे कधीतरी लावेल तुलाही थुका

खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका

जगण्यामध्ये आताशा कसलाच समन्वय नसे
म्हैस पाहिली टीव्हीवरती नाव जिचे नाजुका

पैशापुढे न झुकतो कधिही स्वाभिमान आमुचा
त्यासाठी तर आणा भरुनी डॉलरने संदुका

नवल काय जर तोंडघशी पडलास काल तू पुन्हा
गेलास घ्यायला उंटाच्या टिंब टिंब (...) चा मुका

जेवण तयार श्रेष्ठी तरिही करेनात वाटणी
किती दिवस उपवास सोसला अता लागल्या भुका

भेकड नेते का दिल्लीचे पाय सदा चाटती?
मायमराठी पुजते आता हिंदीच्या पादुका Sad

गुलमोहर: 

मस्त!!!
खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका>> आवड्या!

फक्त मला लयीत पुटपुटता येत नाहीये >>मग पुटपुटू नको. मोठ्याने गा Happy

अगं शक्य आहे.. लय सुधारायला अजून वाव आहे ह्यात

साधारण ८ ८ ८ ३ असे वाच Happy

खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका

हाहाहाहा!!!!!!!!! Happy

सही गझल!!!!!!!