दातांच्या समस्या

Submitted by हसरी on 12 November, 2009 - 00:08

दातांचा खुप त्रास होतो आहे कोणती ही ट्णक पदाथ खाता येत नाही (उदा.खारीक) शिवाय दोन वेळा ब्रश करुन दातांची व तोंडाची स्वच्छता राखुन हा त्रास होतो दंतवौदयांकडे जाउन काही उपयोग नाहि तसेच मिठ आणि लिंबु हा घरचा प्रयोग चालु आहे आणि मध्येच सगळया दातांतुन कळा येतात(थंड व गरम खात नाही) दांत कश्यामुंळे कळा मारतात कळत नाहि पण कधी (बदाम सारखा वस्तु पण खाता येत नाही ) खुप त्रास होतो आहे कोणि उपाय सुचवा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी शिकलेला धडा : दाताची समस्या सुरू झाल्याअर लगेच दंतवैद्याकडे जावे. लवकर जाल तितकी उपाययोजना कमी वेदनादायक, दात वाचायची शक्यता जास्त.
वर्षातून एकदा दंतवैद्या कडे जाऊन तपासणी आणि क्लिनिंग करून घ्यावे.

बरोबर नानबा..........मला एवढेच म्हणायचे होते कि जल्धौती म्हणजे ते नव्हे.....

माझा वरचा पुढचा एक दात दुचाकीचा अपघात झाल्यापासुन दुखतो आहे, थोडासा हलतोय. आता २ महिने झाले पण अजुन ही दुखतो आणि हलतो. आता दुखणे कमी आहे पण पाणी पितांनाही दुखतो. डेंटिस्टकडे ह्यासाठी गेले नाही अजुन, ओठाला जखम होती आणि मला उगीच भिती वाटतीये कि ते म्हणतील काढुन टाका आणि खोटा बसवा. माझा असा प्रश्न, दात काही दिवसांनी आपोआप दुखायचा कमी होतो का आणि हलायचा पण थांबतो का?

अश्विनी, मी असं ऐकल आहे (नक्की माहीत नाही) की, काही दिवस, दिवसातुन तीन ते चार वेळा तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास दात दुखी थांबते. बर्याच ayurvedic दंत मंजनात तुरटी असते.

अमया, धन्यवाद गं! आई पण मला म्हणत होती, तुरटी वापरुन बघ म्हणुन. घरात तर नाहिये, बघते इथे कुठे मिळते ते.

दन्तदूखी , हिरड्या वर ईरीमेदादी तेल वापरून बघा, आयुर्वेदिक दुकानात मिळेल. अतीशय प्रभावी उपाय आहे.

ईरीमेदादि तेल २ /३ थेबं क्वाटन बड वर् घेउन दातावर व हिरड्या वर् लावावे. ४/५ तासात आराम पडेल.
२ /३ आयूरवेदी़क कंपन्या हे तेल बनवतात. नाव पाहून लिहिन नन्तर.

दाता वर सर्वात चान्गले दन्तमंजन म्हणजे ऊमीकेरी, केरळातील लोक हे दन्तमंजन घरी बनवतात. ऊमीकेरी म्हणजे भाताच्या टर्‍रफलाचा र्कोळसा, त्यात मीठ व मीरी पूड घातले कि दन्तमंजन तयार.
भारतात इतर कुठेही मिळणार्‍र नाही पण हे केरळी ईथे दूबईत सूध्दा घर्रुन घेऊन येतात,

माझा वरचा पुढचा एक दात दुचाकीचा अपघात झाल्यापासुन दुखतो आहे, थोडासा हलतोय. : >>>> चार चाकीचा वापर कर. हलणारा दात इच्छा झाली तरी उपटायचा प्रयत्न करू नको. डॉक्टरांना दाखव.

दातांसाठी जी लेसर ट्रीटमेंट करतात, ती फक्त रुट कॅनाल साठीच करतात की नेहमीचं आपलं दाताच्या फिलींग साठी ही करतात ? पुण्यात कोण करतं ? मला डेंटीस्ट च्या त्या ड्रीलिंग ची भयंकर भिती वाटते...त्यामुळे फिलींग पुढे पुढे ढकलतेय..

जुलै २०१० च्या रीडर्स डायजेस्ट मधली बातमी : Blasting through a decaying tooth to reach a cavity can involve 'drilling out healthy parts of tooth to get to a small area of infection'. Enter Icon, DMG America's new treatment for early cavities, which works by injecting liquid resin into the tooth. The quick flowing resin reaches the inner 'lattice' of decay faster than traditional metal or composite fillings can. Once inside the problem spot, it solidifies and stops the cavity from progressing. Patients love it because there is no anasthetic and no drilling. Already on the market in the Europe, Icon will be widely available elsewhere this year.

मायबोलीवर एकही दंतवैद्य नाही का?

http://en.wikipedia.org/wiki/Endodontic_therapy : रूट कनॅलची माहिती

दात घासून झाले की मग विको सारख्या एखाद्या दंतमंजन ने पुन्हा दात घासावेत. घासताना हिरड्यांना हलक्या हाताने मसाज केल्यासारखे घासावे. तोंडातली थूंकी लगेच थूंकून टाकू नये. साधारण १०-१५ मि. गुळणा पण करू नये. नंतर संपूर्ण तोंडात मावेल येवढे पाणी घ्यावे, ह्यात गाल फुगतात, तोंडातले पाणी सगळीकडे पोहचते मग तोंडातले अर्धे पाणी टाकून द्यावे व राहिलेले अर्धे पाणी घश्यापर्यंत नेऊन गुळण्या कराव्यात. असे केल्याने अगदी घशापर्यंतचा चिकटा वैगेरे निघून येतो.

दातांना खूपच ठणक असेन तर एक तांब्या पाणी घेऊन त्यात ५-६ पेरूची पाने व थोडी तुरटी घालून हे पाणी ग्लासभर शिल्ल्क राहितोपर्यंत ऊकळावे. मग ह्या पाण्याने गुळण्या केल्यास दातांचा ठणक कमी होतो.

मि शाळेत असल्यापासुन साधारण ५वी पासुन ते १० वी पर्यत रोज चिंचा खायची एक दिवस नाही असं नाही त्या वेळेला कधीच दातांचा प्रोमलेम नव्हता. पण आता चिंचा किंवा आंबड खाल्ल तरी दात खुप सळसळतात आणि दुसरा कोणताच पदार्थ खाण अशक्य होत मग दात घासुन नंतर मिठाने धुवुन मग थोड्या वेळाने खाता येत. असं का होत असावं माहिती आहे का?

आंबट आणि अतिगोड जसे की आपल्या बरफ्या पेढे दांतासाठी अपायकारक आहे.

आवळा दांतासाठी उत्तम असतो. तसेच कडूनिंबाच्या ओली फांदी चावून त्याचा ब्रश वापरावा. किड येत नाही दाताला मग. आपल्याकडे मिळणारे आयुर्वेदीक मंजन कोलगेट पेक्षा केंव्हाही चांगले. मी सकाळी कोलगेट तर रात्री मंजन असे वापरतो. तुरटी त्रिफळा चुर्ण ह्यानी पण दात मजबूत होतात. उस दातानी खाल्ला की दात टणक होतात. सोफेचे कण, उसाचे कण दातात अडकून रहाणे योग्य नाही. दात आंबतील इतके आबंट खावूचं नये. दातांसाठी उत्तम प्रतिचा ब्रश वापरावा व तो सतत तीन महिन्यांनी बदलावा. दात घासतात हळूहळू चहुबाजूनी दात घासावे. खसखस जोरात खूप पाणी सांडून दात कधीचं घासू नये. संथ गतीने दात घासावे. अति उष्ण अति थंड पेय पिऊ नये. विड्याचे पान दातांसाठी उत्तम. फक्त पान खावे इतर काहीही न घालता. जांभूळ दांतासाठी उत्तम आहे.

असो..

दाढेला (बारीक काळा डाग आहे) म्हणजे किड आहे असा दात दुखत नाही पण त्या बा़जुने खाता येत नाही कळ मारते काय उपाय आहे क? कि डॉ कडे जावे.

माझा वरचा एक दात पुढे होता म्हणून मी क्लिपिंग करुन तो सरळ करुन घेतला. ८ महिने क्लिप आणि मग रेटेंन्शन क्लिप अशी ट्रीटमेंट होती. रेटेंन्शन क्लिप १५ महिने. पण त्यामुळे तो दात आता सैल झालाय्...आणि रेटेंन्शन चा मला कंटाळा आलाय!! पण ती लावली नाही तर दात थोडा पुढे आलाय...
सफरचंद, कणीस चावा घेउन खाता येत नाही.. Sad

आणि सगळयात वाईट हे, की डाव्या बाजूने गोड घास घेतला तर दात प्रचंड शिवशिवतात्....मी खूप गोड खात नाही, तरी असं होतं. पहिल्या किंवा दुसर्या घासालाच वेग येतात दातातून Sad आणि मग नाईलाजाने उजव्या बाजूनी खाते मी.

क्लिप मुळे सम्पूर्ण हललेयत दात म्हणून आहे का असं?
प्लीज उपाय सांगा.

जस वय वाढत तस हिरड्या मागे मागे सरकु लागतात. परिणामी दातांच आयुष्य कमी होत.

यावर काही आयुर्वेदिक उपाय आहे का ? मागे सरकलेल्या हिरड्या फ्लॅप सर्जरी शिवाय पुढे आणता येतात का ?

फ्लॅप सर्जरी किती खात्रीलायक उपाय आहे या समस्येवर ?

माझ्या दाताच्या हिरद्या मागे जाताहेत व गरम आनि तिखत खाताना खुप त्रास्दायक होत. रक्त येत नाहि. दन्त वैद्यास भेतलो, antioxidants चि कमि आहे अस सान्गुन त्यावर गोल्या दिल्या पन फारसा फरक नाहि. oil pulling ने काहि उपयोग होइल का? कोनाला घरगुति उपाय माहिति असेल तर क्रुपया लिहा.

चीक बाईटवर काय उपाय करावा. जबड्यातल्या अक्कल दाढेच्या अरुंद जागेत मला हा त्रास वारंवार उद्भवतो. ३ वर्षांपूर्वी एका बाजूची अक्कल दाढ सर्जरी करून काढण्याइतपत त्रास झाला होता. दंतवैद्याकडे गेल्यास १-२ दिवसांचे औषध व दुखर्‍या जागी लावण्यासाठी मेडीकेटेड क्रीम, लोशन इ. देतात. पण डॉ. कडे जाऊन अ‍ॅक्च्युअल उपाययोजना सुरु होइस्तोवर काहीही खाण्याचे वांदे होतात. अशावेळी घरगुती स्वरुपाचा किंवा अर्जन्टली काही करता येईल अशा स्वरुपाचा काही उपाय कुणाला माहीतीये का?

थोडस विशयान्तर, पण उपयोगि..
मला खुप लहान पणा पासुन दातान्च दुखण आहे. माझ्या मुलिला हा त्रास होउ नये म्हनून मी doctor ना विचार्ले तर त्यनि सन्गित्ल कि जेवणात भरपुर salad खा. त्यात भरपउर् antioxidents अस्तात.

मी गेले महीना भर oil-pulling ही थेरपी करते आहे. दातान्च्या सर्वसाधारण समस्यान्वर परीणामकारक वाटले. ही वेब साईट पहा. WWW.OILPULLING.ORG.

oil-pulling >>>
तीळाच्या किंवा सूर्यफुलाच्या तेलाने गुळण्या?? ते ही १०-१५ मिनिट्स. मी पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार. तीळाचे तेल तोंडाला आतून उष्ण पडत नाही का? Uhoh

फीलीन्ग कीन्वा Caps असतील तर घ्यावयाची काळजी नीट वाचुन घ्या. >>
ओह. असं पण आहे का?? सांगितल्याबद्दल धन्स.

Pages