मुंबईतली म्युझिअम आणी त्यांच्या (आपल्याला असलेल्या???) आठवणी....

Submitted by प्र-साद on 6 November, 2009 - 02:09

मुंबईतली म्युझिअम आठवायला सुरुवात झाली की, गेट वे ऑफ इंडियाजवळचं छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय म्हणजे पूवीर्चं प्रिन्स ऑफ वेल्स डोळ्यासमोर येतं. पण, सात बेटांपासून र्वल्डसिटी झालेल्या या शहरात वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली अनेक म्युझिअम्स आहेत. इतिहासाचं दर्शन घडवणाऱ्या मुंबईतल्याच काही म्युझिअम्सची मुंबई टाइम्सने घडवलेली ही स्पेशल टूर...
........

धावत्या चाकांचा साक्षीदार :

मुंबईकरांची लाडकी 'बेस्ट' आता नव्याने बांधलेल्या सी-लिंकवरूनही धावणार आहे. पण, सव्वाशे वर्षांपूवीर्ही या मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्ट होता. ही सेवा चक्क कुलाब्यापासून काळबादेवीपर्यंत होती. ती चालायचीही दोन घोड्यांवर. आणि तिचं तिकीट होतं अवघं एक आणा.

बॉम्बे ट्रामवे कंपनीने सुरू केलेल्या या ट्रामच्या ताफ्यासाठी दोनशे घोड्यांची कुमक तैनातीला होती. त्यांच्यासाठी लागणारा चारा-पाणी वाहून नेण्यासाठी काही बैलगाड्याही कंपनीच्या पदरी होत्या. १९०७ मध्ये या गाड्यांची जागा विजेवर चालणाऱ्या ट्रामने घेतली. आजच्या पिढीला ही माहिती असणं जरा शंकास्पदच. पण, ती मिळवणं यामुळे शक्य आहे. मुंबईतल्या बेस्ट प्रवासाचा इतिहास गेली अनेक वर्षं बेस्टच्या या संग्रहालयात उभा आहे. तिकीटवाटपाची यंत्रं, बस-इंजिनाचे सांगाडे, मॉडेल्स, चित्रं, पुस्तकं, तिकिटांचे नमुने अशा रूपात साकारलेला हा ठेवा आज मात्र प्रेक्षक-प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. १९८० च्या सुमारास तत्कालिन महाव्यवस्थापक प.बा. केरकर यांच्या पुढाकाराने हे संग्रहालय साकारलं. त्यावेळी बसमध्ये पोस्टाची पेटीही असायची. १९३७ मध्ये डबलडेकर सुरू झाली. रस्त्यावर चालणारी ट्रामबस, जोडबस, ट्रेलर बस हे सगळे टप्पे इथे दिसतात. टेलिफोनसारखे रिंग फिरवून तिकिट देण्याचे एक जाडजूड यंत्र त्यावेळी कंडक्टरकडे असायचं, तेही इथे आहे. शिवाय १९०५ ते १९४७ पर्यंतची जुनी तिकिटंही आहेत.

बेस्ट, वडाळा ट्रक टमिर्नस. आणिक आगार
वेळ - सकाळी ९ ते संध्याकाळी ५. (प्रवेश विनामूल्य)
शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी बंद
संपर्क- २४०९ १३७१

-------------------

पैसा बोलता है...:

ऑॅनलाइन ट्रान्झॅक्शन्स, डेबिट-क्रेडिट कार्डच्या युगात दगड, धातूचे तुकडे यांना पैसा म्हणणं पचनी पडणारं नाही. पण, असाही एक काळ होता. याची साक्ष देत रिझर्व बँकेचे मॉनिटरी म्युझिअम मुंबईत उभं आहे. अगदी वस्तूविनिमय पद्धतीपासून आताच्या ऑॅनलाइन व्यवहारापर्यंतच्या पैशाच्या सगळ्या व्यवहारांचं दर्शन इथे एका छताखाली पाहायला मिळतं. सुमारे तीन हजार वर्षांपूवीर् निष्का हा दागिना भेटवस्तू आणि मोबदला म्हणून जास्त वापरला जायचा. त्यानंतरच्या काळात हा दागिना ज्या धातूपासून बनवला जाई, तो धातू बदल्यात दिला जाई. मग, त्या धातूपासून नाणी बनवली गेली. सगळ्यात पहिली आली ती भोकाची नाणी. यातलं प्रत्येक नाणं हे त्या त्या काळात झालेल्या बदलांचं, राजवटींचं प्रतीक आहे. पैसा म्हणून वापरल्या जाणारे शिंपले, दगड ते भाल्याच्या टोकांपर्यंत सगळ्या वस्तू इथे ठेवल्यात. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून मुगलांच्या काळात तयार करण्यात आलेल्या कोरीव कामाची नाणी, ब्रिटिश सरकारने चलनात आणलेली नाणीही इथे आहेत. पूवीर् खासगी बँकांनी छापलेल्या नोटा, बँकांचं विलिनीकरण, बँकांची रुपांतरं हे सगळं इथे पाहायला मिळेल. अमर बिल्डिंग, सर फिरोझशाह मेहता रोड, मुंबई, सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५, शनिवार : १०.३० ते दुपारी १, संपर्क - २२६१४०४३

------------------

* नेहरू सेण्टर परिसर :
मुंबईत एक अख्खा दिवस घालवायचा असेल, वरळीच्या नेहरू सेण्टर परिसरात जायचं. नेहरू तारांगण, नेहरू विज्ञान कंेद आणि नेहरू सेण्टर या तीन वास्तू आपल्याला खूप काही सांगतात. नेहरु संेटरमध्ये असलेलं डिस्कव्हरी ऑॅफ इंडिया हे कायमस्वरूपी प्रदर्शन भारताची कथा सांगतं. इथली चित्रं, शिल्पं आणि प्रतिकृतीमधून अगदी प्राचीन भारतापासून स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारतापर्यंत अनेक टप्प्यांचं दर्शन घडतं. भारतीय इतिहासातील काही घटनांवरच्या व्हिडिओ फिल्म्सही इथे पाहता येतात. नेहरू तारांगणात तर चक्क आकाशातील तारे आणि ग्रह खाली उतरलेले सापडतात. त्या व्यतिरिक्त अंतराळ संशोधनातले विविध टप्पेही इथे प्रदर्शन स्वरूपात मांडले आहेत. तसंच वैज्ञानिक जिज्ञासा पूर्ण करणारी अनेक वैज्ञानिक खेळणी इथे आहेत. या दोन्ही वास्तुंपासून थोड्या अंतरावर नेहरू विज्ञान केंद आहे. इथे सारी विज्ञान नगरी अवतरलेली आहे.

नेहरू संेटर
डॉ. इ. मोझेस रोड, वरळी
वेळ - सकाळी १० ते ५. दर सोमवारी सुटी.

------------------

महात्मा घडवणारं मणी भवन :

महात्मा गांधींनी दक्षिण अफ्रिकेत कृष्णवणीर्यांसाठी लढा दिल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते भारतात परतले. स्वातंत्र्याच्या लढाईत १९१७ ते १९३४ या काळात गांधीजी मुंबईतल्या मणी भवनमध्ये राहायला होते. याच मणी भवनात असताना गांधींजींना एक सुतकताईवाला भेटला आणि बापूंना स्वदेशीच्या चरख्याची प्रेरणा मिळाली. मोहनदास ते महात्मा या गांधीजींच्या प्रवासाला ही वास्तू साक्ष आहे. इथे आता गांधी स्मृती संग्रहालय साकारलं आहे. यात गांधीजींचा जीवनपट मांडणारे फोटो, बापूंची वस्त्रं, चरखा आदी गोष्टी पाहता येतात. गांधीजी राहायचे ती खोलीही त्यावेळेसारखीच ठेवण्यात आली आहे. याच खोलीत गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याची रूपरेषा ठरवली. इथेच नेताजी सुभाषचंद बोस आणि गांधीजींची पहिली भेट झाली. इथे गांधी विचारांची पुस्तकं, फोटो आणि स्मृतिचिन्हं उपलब्ध आहेत. तसंच इथे गांधी विचारांना वाहिलेलं ग्रंथालयही आहे. या साऱ्या आठवणी जागवणारं हे संग्रहालय प्रत्येकाने एकदा तरी पाहावं असं आहे.

मणी भवन, लॅबर्नम स्ट्रीट, गावदेवी,
भवन्स कॉलेजजवळ, गिरगाव चौपाटी,
फोन- २३८० ५६८५. प्रवेश विनामूल्य.

------------------

नौदलाचा मान.. बॅलार्ड बंदर:

मुंबईची महामुंबई बनण्यासाठी कारणीभूत ठरलं ते सुसज्ज बंदर, अशी त्याची ओळख. बंदराकाठच्या या शहराचा विकास जसा झाला, त्याची चित्रमय कथा बॅलार्ड पिअरच्या गेट हाउसवर उभारण्यात आलेल्या नौदलाच्या म्युझिअमध्ये पाहता येईल. १९२० मध्ये बांधलेल्या या गेट हाउसमध्ये काही वर्षांपूवीर् हे म्युझिअम उभारण्यात आलं. नौदलाच्या बोटींची मॉडेल्स, बोटीवरची घंटा, मानचिन्हं आणि त्यांची समर्पक माहिती भारतीय नौदलाची यशोगाथा सांगते. तसंच मुंबई शहरातील अनेक वास्तुंचं, जुन्या मुंबईतील राहणीमानाचं दर्शनही या संग्रहालयात घडतं.

बॅलार्ड बंदर नौदल म्युझियम,
बॅलार्ड पिअर, मुंबई टाकसाळीजवळ.
प्रवेश विनामूल्य.

------------------

पारशी जीवनाचं एफडी अल्पाईवाला :

मुंबईच्या जडणघडणीमध्ये पारशी समुदायाचे फार मोठे महत्त्व आहे. या पारशी समुदायाच्या प्रवासाचे दर्शन केम्प्स कॉर्नरच्या एफडी अल्पाईवाला पारशी म्युझियममध्ये घडते. इराणमधून आलेल्या या समुदायाने मुंबईतील अनेक उपक्रमांसाठी अमूल्य योगदान दिलं. त्यांचे विविध फोटो, प्रतिकृती या म्युझिअममध्ये पाहता येतात. जुन्या पारशी लोकांच्या वापरातील अनेक वस्तूही इथे पाहता येतात. त्यात जमशेदजी जिजिभाय यांनी वापरलेले चांदीचे घड्याळही आहे. डिसेंबरपर्यंत हे म्युझिअम देखभालीसाठी बंद आहे. एफडी अल्पाईवाला पारशी म्युझियम, एन. एस. पाटकर मार्ग, खारेघाट कॉलनी. संपर्क- २३६१ ६५८६

------------------

भाऊ दाजी लाड :

राणीच्या बागेत म्हणजे आताच्या जिजामाता उद्यानात असणारं भाऊ दाजी लाड म्युझिअम हे मुंबईतलं महत्त्वाच्या संग्रहालयापैकी एक. भाऊ दाजींचं नाव मिळण्यापूवीर् ते व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझिअम म्हणून ओळखलं जायचं. मुंबई या शहराच्या विविध टप्प्यांचं दर्शन यातून घडतं. जुन्या मुंबईकरांची जीवनशैली मांडणारी शिल्पं, मुंबईचे जुने नकाशे आणि बऱ्याच ऐतिहासिक वस्तू इथे आहेत. पारशी समुदायाची स्मशानमभूमी असणारे टॉवर ऑॅफ सायलेन्स कुणालाच पाहाता येत नाही. पण, इथली समर्पक प्रतिकृती पाहून तिचा अंदाज येतो. या म्युझिअमची वास्तूही निरखून पाहावी अशी आहे. ज्या हत्तीच्या शिल्पांमुळे मुंबईजवळच्या बेटांना एलिफंटा नाव पडलं त्या हत्तीचं शिल्प इथे आवारात पाहता येतो. त्याचप्रमाणे मुंबईच्या अनेक चौकातून काढलेले अनेक पुतळे या आवारात विसावलेले दिसतात. काळा घोडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा एडवर्डचा पुतळाही या म्युझिअमपासून हाकेच्या अंतरावर आहे.

भाऊ दाजी लाड म्युझिअम,
जिजामाता उद्यान, भायखळा.
वेळ : सकाळी साडेदहा ते पाच. बुधवारी सुटी.

------- सौजन्य - महाराष्ट टाईम्स...

(*** प्लीज असा विचार करु नये की, प्र-साद फक्त कॉपी पेस्ट करत असतो, बाबांनो मला काहीही लेखन करता येत नाही. पण काही छान बातमी असल्यास शेअर करावयास नक्कीच आवडते... )

गुलमोहर: