फुलपाखरू छान किती दिसते !

Submitted by विशाल कुलकर्णी on 2 November, 2009 - 05:55

ठाण्यापासुन ७-८ किमी अंतरावर एका निसर्गवेड्याने फुलपाखरे जोपासली आहेत. आम्ही संध्याकाळच्या वेळी गेलो असल्याने फुलपाखरे फारशी पाहायला नाही मिळाली पण माहिती मात्र खुप मिळाली. हा छंद जोपासणारे ओवळेकर वाडीचे मालक श्री. राजेंद्र ओवळेकर यांनी फुलपाखरे आणि त्या संदर्भातील खुप माहिती पुरवली. स्वारस्य असणारे राजेंद्रजींशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधु शकतात. ०९८६९२५६०५४.

तिथे काढलेली काही छायाचित्रे...

फुलपाखरांची अंडी / लहान अळ्या (सुरवंट)

पुर्ण वाढ झालेला सुरवंट

शेवटची स्टेज

फुलपाखरांची काही न पाहीलेली रुपेही पाहायला मिळाली. (नावे विचारु नका Wink मी विसरलो, भलतीच क्लिष्ट होती)

हे नेहमीचेच ...

काही इतर मित्रांचीही उपस्थिती होती.

विशाल.

गुलमोहर: 

ते वाळलेल्या पानासारखे पंख असलेलं फ़ुलपाखरू सही आहे.त्याचे डोळे वगैरे डिटेल्स मस्त.

त्या फ़ुलपाखराच्या खालचा फ़ोटो आणि शेवटच्या दोन फ़ोटोंमधे फ़ोकस चुकला आहे. े

सह्हीच रे, विश, मस्त फोटोस लहान पणीच्या कवितेची आठवण झाली "धरु नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे"

मास्तर म्हणतायत ते बरोबर आहे

धन्यवाद.

प्रकाश, अरे ती पाखरे एका जागी स्थीर थांबायला हवीत ना. कॆमेरा रोखेपर्यंत चार जागा बदलुन झालेल्या असायच्या त्याच्या. Wink