ताटी उघडा ज्ञानेश्व्ररा

Submitted by ar_diamonds on 31 October, 2009 - 01:34

आवाक्याच्या कुंपणाबाहेर स्वप्नांना काढुन तर बघा,जीवनात कशी रंगत येते,
मनस्वीपणे स्वप्नांचा पाठलाग करून तर बघा, नशीब सुध्दा जागे होऊन साथ देते.

अरे, तव्याचे चटके बसल्याशिवाय भाकर सुध्दा मिळत नाही,
अहो-जाहो केल्याशिवाय चाकर सुध्दा मिळत नाही.

केल्याने पर्यटन ज्ञान जरूर मिळते. स्व:मनाच्या गाभार्यात फिरून तर बघा,
स्व:ज्ञान नक्कीच मिळते. स्व:ज्ञानाशिवाय अज्ञान दूर होत नाही.
म्हणूनचं मुक्ताईने म्ह्ट्ले आहे "ताटी उघडा ज्ञानेश्व्ररा ".

केल्याने क्रर्म जिवनाचे मर्म समजत असले तरी नुसती हमाली करण्यात
काही अर्थ नाही अन् `अर्थ' ही नाही.

मग, जीवन म्हणजे वनवास का?
का रोज नवा सुवास?

आसमंतात दरवळणारा सुगंध घेता यायला पाहिजे.
अंर्तमनात वाजणार्‍या मुरलीचे सूर ऐकता आले पाहिजे.
आणि हो हे सर्व वास्तविक क्रर्तव्याची जाण ठेवून.

मग बघा जीवनाचा प्रत्येक क्षण कसा महोत्सवा सारखा जगता येईल.
मी तर जगतोय माझं आयुष्यं एका छंदासारखे...
Live your Life as a HOBBY.....

म्हणूनच सांगावसं वाटतयं
"आवाक्याच्या कुंपणाबाहेर स्वप्नांना काढुन तर बघा,
जीवनात कशी रंगत येते...."

गुलमोहर: