चिंतन

Submitted by अरूण on 15 October, 2009 - 02:41

प्र. सु. : हे लिखाण माझं नाहिये. गडावरील ज्युनिअर मातेने हे लिहिलं आहे. तीला ऑफीसमध्ये नेट अ‍ॅक्सेस नसल्यामुळे पुपु वर लिहिलेलं तिचं हे चिंतन मी इथे डकवतो आहे.

आपल्या संस्कृतीमधील रांगोळ्या / चित्रांमधील सिंबॉलिझम

काल वसुबारस .. म्हणजे दिवाळीला सुरुवात. काल घरी गेल्यावर साडेसातच्या पुढे , मस्तपैकी दारासमोर वीस ठिपके वीस ओळींची स्वस्तिकांची रांगोळी काढली. आकाशकंदिलाच्या प्रकाशात अशी मोठी रंग भरलेली रांगोळी काढल्याशिवाय मला दिवाळी असल्यासारखं वाटतच नाही! फराळ बिराळ सब बाद मे. (वैसे भी वो अपने बस की बात नही! ) तर, काल रंग भरुन झाल्यावर त्या रांगोळीकडे डोळे भरुन पाहताना लक्षात आलं की आता दारात एवढी मोठी रांगोळी असताना येता जाता जपून यावं लागणार. मग सहज वाटून गेलं, हाच उद्देश असेल का रांगोळीचा? पाहुण्याचं स्वागत तर आहेच; पण बाहेरच्या व्यक्तीने घरात येताना, क्षणभर थांबावं.. इथले संस्कार, रिती, नाती यांना आपल्यामुळे धक्का तर लागणार नाही ना असा विचार करुन मनातल्या गोंधळाला, संतापाला आवर घालावा. सांभाळून, अदबीनं आपल्या घरात प्रवेश करावा आणि तितक्याच समाधानानं, शांत मनानं परतावं!!

गुलमोहर: 

तिथेही वाचलं होत पण प्रतिसाद मनातल्या मनात दिला. ईथे लिखाण दिल्याबद्दल धन्यवाद अरूणभौ.
खूप म्हणजे खूपच अप्रतिम विचार रांगोळीबद्दलचा. अगदी कोरला गेला वाचल्या वाचल्या.

हे शेअर केलं म्हणून आशुला धन्यवाद! Happy

सध्या आशुडे तुझे फारच विचारमंथन चालु आहे हं. पोक्त बनत चालली आहेस असे एक चिंतन आले डोक्यात. Proud

मस्तच लिहीले आहेस नेहेमीप्रमाणे. Happy