Perfect Match अंतिम भाग

Submitted by saakshi on 14 October, 2009 - 02:55

पूर्वा प्रत्येक गोष्ट आदित्यच्या कलानं घेण्याचा प्रयत्न करायची. आधीच्या अनुभवानंतर तिनं परत कधीच आदिला एकट्याला काम करून नाही दिलं. पण आदिचं तिच्याशी पटायचच नाही. काही ना काही मुदयावरून तो तिच्याशी वाद घालायचाच. त्या दिवशी दुपारी १:३० वाजले तरी सगळ्यांच काम कही उरकत नव्हतं.
"अरे यार! चला ना canteen मध्ये...... माझ्या पोटात कावळ्यांची सभा भरलीये....." इति अन्या.
"हो रे.... खूपच भूक लागलीये...." - विद्या.
"चला ना, मग काय मुहूर्त बघताय का???" समिधाचा मुद्द्याचा point!
सगळे निघाले आदित्य सोडून.......
"अरे आदि चल ना.... आल्यावर करू रे बाकीच...." - सलिल
"तुम्ही जा...." आदित्यनं हातातल्या test tube वरची नजर न हटवता म्हटलं.....
पूर्वा पण जायला निघाली, इतक्यात आदि म्हणाला,
"पूर्वा तू थांब! तू माझी gp ना?"
पूर्वा गप्पच.....
"अरे तिला फराळ करून येउ देत ना, आज तिचा उपवास आहे आणि तिनं सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही." विद्यानं पूर्वाचा हात पकडला.
"काम करूया म्हतलं की असं पळून जायचं आणि नकोम्हतलं की मात्र....." आदिच्या बोलण्याचा रोख सगळ्यांना कळला.....
शेवटी पूर्वा गेली नाही.
संध्याकाळपर्यंत काम करून ती पार थकून गेली..... परिणाम व्हायचा तोच झाला..... पूर्वाला चक्कर आली....
"अरे... पाणी आण लवकर...." सलिल विद्याला उद्देशून....
सलिलनं पूर्वाच्या चेहर्यावर पाणी शिंपडलं.... पूर्वानं डोळे उघडले.....
सर्वजण तिच्या भोवती जमले होते, पण तिला सगळ्यात आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की आदित्य तिच्या शेजारी बसला होता..... तिचा हात हातात घेउन.....
पूर्वा उठली....
"घरी नीट जाशील ना? का येउ सोडायला?" इति अन्या.
"अरे नको, मी जाईन बसने...." असं पूर्वा म्हणणार इतक्यात ती थांबली, आदित्य बोलत होता....
"मी सोडेन तिला तिच्या घरी....."
सगळ्यांचे चेहरे blank.... पूर्वाचा तर पाहण्यासारखा......
--------------------------------------------------------------------------

"अरे सल्या लेका कुठे आहेस?? मी इथे अर्धा तास थांबलोय. कधी येनार आहात तुम्ही सगळे....??
अरे येणारच नाही अहात की काय? का मला नुसतं पिक्चरचं पोस्टरच बघून परत पाठवायचा विचार आहे तुमचा???" अन्या थिएटर्च्या बाहेर थांबून वैतागला होता.... आजचा रविवार सगळ्यांनी movie साठी reserve ठेवला होता.
शेवटी एकदाचे सगळे आले. पिक्चर बघताना पूर्वा सलिलच्या एका बाजूला बसली तर दुसरया बाजूला विद्या...
शो संपल्यावर पूर्वानं सर्वांना जाउ दिलं..... सलिल सोडून......
"काय झालय सलिल???"
"कुठे काय??? काही नाही."
"मी खूप दिवस पाहातेय तुला.... विद्या तुझ्या आजूबाजूला असली की तुझे expressions.... ती तुझ्याजवळ नसली की तिला शोधणारी तुझी नजर्....ती काही बोलली की पडलेला तुझा चेहरा....
तिनं एखादी compliment दिली की हसणारे तुझे डोळे......!
या सगळ्यातून काय दिसतं, सलिल???
"----------"
"बोल रे सलिल.... नाही बोललास तर तुलाच त्रास होइल....."
"पूर्वा, माझं.... माझं विद्यावर खूप प्रेम आहे.... पण मी...... मी तिला नाही सांगू शकत....."
"काळजी करू नकोस.... मी बोलेन तिच्याशी...."
पुढे सगळं सलिलच्या मनासारखं झालं.... विद्याच्याही मनात त्याच्याबद्दल त्याच भावना होत्या.....
या सगळ्यात सलिल आणि विद्याला जाणवली ती पूर्वाची त्यांच्याबदाल ची काळजी....... तिनं त्यांच नातं जोडन्यासाठी केलेली धडपड........
मग सलिल, विद्या आणि पूर्वा खूप पक्के दोस्त बनले......
----------------------------------------------------------------------

"happy birthday to you........" सगळेजण एका सुरात म्हणत होते.....
आज आदित्यचा वाढदिवस होता आणि celebration ची सगळी तयारी पूर्वानं केली होती.....
हल्ली सलिल आणि विद्या पूर्वाला आदिवरून चिडवायचे आणि तिला ते अजिबात आवडायच नाही.......
"Thankls यार सल्या! मला वाटलं नव्हतं तुम्ही इतकं छान celebration कराल....." आदि खूप खूश होता....
"अरे आदि, ही तयारी मी नाही केलेली......" पूर्वानं सलिलला डोळ्यांनीच दटावलं पण सलिलनं चंगच बांधला होता....
"अरे ही तयारी तुझ्या मैत्रिणीनं- पूर्वानं केलीये......"
पूर्वा गप्प. खरं तर ती वाट पहात होती आदि बोलण्याची.....
"काय??? मैत्रीण???? कोणाची???? आम्ही फक्त gp आहोत सल्या!"
आदिच्या या बोलण्याचा सलिलला खरच राग आला.... पूर्वाच्या डोळ्यात पाणी तरारलं.......
त्याचा अर्थ फक्त सलिल आणि विद्यालाच कळला......
-------------------------------------------------------------------------

१२ जून २००७. अय्यर आणि शारंगपाणी सर lab मध्ये आले... एका महत्वाच्या announcement साठी.
१ महिना कोणाही दोघांना बंगलोरला पाठवायच होतं एका research workshop साठी.
selection ची जबाबदारी शारंगपाणी सरांनी अय्यर सरांवर सोपवली....
अय्यर सरांनी forst preference दिला आदिला. दुसरा partner त्यानेच निवडायचा होता..... पण आदिनं सांगून टाकलं.... "सर, कोणालाही निवडा, मला चालेल......"

पूर्वा काहिही न बोलता निघून गेली...... आपल्या डोळ्यातलं पाणी कोणाला दिसू नये म्हणून.....
मग मत्र सर्वांनी आदिला घोळक्यात घेतलं.....
"आदि, काय हे????? आज तरी तू पूर्वाचं नाव suggest करायला हवं होतस...." इति अन्या.
"आदित्य, ती तुझी gp आहे, project मध्ये प्रत्येक गोष्टीत तिनं मदत केलिये तुला....." -समिधा

"come on guys............! gp वगैरे ठीक आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्ही दोघांनी आयुष्यभर एकत्रच रहावं......." आदि पटकन बोलून गेला आणि त्याच वेळी सलिलच दाराकडे लक्ष गेलं दारात पूर्वा उभी होती..... हातात आदिची reading book..... डोळ्यात पाणी.............
--------------------------------------------------------------------------

"आदि आजपर्यंत मी तुला काही बोललो नाही पण आज मी नाही थांबू शकत.... काय चालवलयस हे???" सलिल बोलत होता.... पण आदित्य शांत.......
"अरे ती पूर्वा तुझी इतकी काळजी करते... तुझे मिनिटामिनिटाला बदलणारे moods सांभाळून काम करते.... तुझ्या प्रत्येक problem च solution असतं तिच्याकडे..... जणू तुझ्यासाठीच जगतीये ती.....
या सगळ्याचा अर्थ कळतो का तुला........???"
तरी आदि एक नाही अणि दोन नाही......
मग मात्र सलिल वैतागला......
"जाउ दे! तुला सांगणार नव्हतो..... कारण पूर्वा नको म्हणाली होती..... पण आता राहावत नाही....
पूर्वा उद्या resign करणार आहे...."
आता मात्र आदित्य गडबडला.......
resign म्हणजे......??? पूर्वा.... पूर्वा जाणार??????????
--------------------------------------------------------------------------

"nothing doing Miss. Poorva.... तुम्ही resign नाही करू शकत..... आजच मी तुमचं आणि आदित्यच नाव recommend केलय त्या workshop साठी......"इति शारंगपाणी सर.
"पण सर......." सरांनी पूर्वाला बोलूनच दिलं नाही......
पूर्वा केबिनमधून बाहेर आली...
समोर पाहिलं तर तिचा स्वतःवर विश्वासच बसेना......
समोर आदित्य........ तिच्याकडे एकटक पाहात उभा.......
तिनं एकवार त्याच्याकडे पाहिलं.... आणि जायला निघाली.....तर तिची सगळी टीम तिथे....
-------------------------------------------------------------------------

"पूर्वा................... ज्या दिवशी मी तुला पाहिलं तेंव्हाच आत कुठेतरी वाटलं.......
YES! PERFECT MATCH!!
पण माझ्यातला तो अभिमानी आदित्य हे मानायला तयार नव्हता की अशी कोणीतरी आहे....
जिच्यासाठी मी स्वतःलाही विसरू शकतो.......
जी माझ्याबरोबर असते तेंव्हा माझी अवस्था "प्रश्न मला जो पडला नाही त्याचेही तुज सुचते उत्तर....." अशी होते.....
मी..... माझं......" आदि अडखळला.....
"अरे बोल रे...... आम्ही आहोत तुझ्याबरोबर....." इति अन्या, सल्या आणि group.

"माझं..... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पूर्वा..... माझी होशील??????????"
पूर्वाच्या चेहरयावर हसू फुललं....... आणि आदि.... त्याला तर आकाशच ठेंगणं झालं होतं.......कारण त्याची Perfect match आता त्याची झाली होती.........

गुलमोहर: 

अगदीच सामान्य वाटली कथा!

माफ करा, पण अगदी स्पष्टपणे जे वाटलं ते लिहीतोय. पुर्वाला आदिबद्दल प्रेम का वाटावं ते कळलं नाही. खरं तर दुसरी कुणी अशी महत्त्वाकांक्षी मुलगी असती तर तिने इतक्या इगोइस्टिक मुलासोबत जेवढ्यास तेवढे असेच संबंध ठेवले असते.

अर्थात स्त्रियांच्या मनातलं कुणीच ओळखू शकत नाही असं म्हणतात ते खरंच खरंय! पण तरीही हे काही पटलं नाही. तिला आदिबद्दल प्रेम वाटण्यसाठी नक्कीच काही प्रसंग घडले असतील. ते जर रंगवता आले असते तर कथा थोडीतरी भक्कम झाली असती.

इतरही प्रसंग अजून खूप रंगवता आले असते.

ही कथा पूर्ण वाचून झाल्यावर एखाद्या हिंदी मालिकेची थोडक्यात कथा वाचल्यासारखं वाटलं.

असो. हे माझं वैयक्तिक मत आहे. एक वाचक म्हणून जे वाटलं ते शेअर केलं.

पुलेशु.

कथेची सुरुवात जितकी सुन्दर झाली तेवढा शेवट भावला नाही Sad
पण तरिही कथा आवडली

अर्थात स्त्रियांच्या मनातलं कुणीच ओळखू शकत नाही असं म्हणतात ते खरंच खरंय!>>>>>
अगदी खरं

महत्त्वाकांक्षी मुलींना इगोइस्टिक मुलं आवडन्याची उदाहरणे माझ्या समोर असल्यामुळेही कदाचीत मला ही कथा आवडली असेल
Happy

Happy

महत्त्वाकांक्षी मुलींना इगोइस्टिक मुलं आवडन्याची उदाहरणे >>> याला मी पण अपवाद नाही... अशाच इगोइस्टिक मुलासोबत लग्न केलं... आणि आता तोच इगोइस्टिक मुलगा एवढा काळजी घेतो की विश्वास बसत नाही "हाच का तो...?" Happy

कथा ठिक ठिक... प्रसंग पुरेसे रंगवले गेले नाहीत कदाचीत त्यामुळे घाईघाईत गुंडाळल्यासारखी वाटते...

पुलेशु... Happy

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

कथेची सुरुवात छान झाली होती. शेवट अपेक्षित आणि एकदम उरकून टाकल्यासारखा वाटला.
तरीही आवडली.!!!!
पुलेशु Happy

सर्वांचे आभार........

"पण तरीही हे काही पटलं नाही. तिला आदिबद्दल प्रेम वाटण्यसाठी नक्कीच काही प्रसंग घडले असतील. ते जर रंगवता आले असते तर कथा थोडीतरी भक्कम झाली असती.
इतरही प्रसंग अजून खूप रंगवता आले असते.">>>>>>>>>>>>>mi_yogi, मलाही पटतयं...... कथेचा शेवट खूपच पटकन झाला आहे......

"कथेची सुरुवात जितकी सुन्दर झाली तेवढा शेवट भावला नाही" >>>>चिमुरी, अनुमोदन......

कारण मी जेंव्हा कथेचा पहिला भाग लिहिला तेंव्हाची आणि अंतिम भाग लिहिला तेंव्हाची माझी मनस्थिती खूप वेगळी होती..... अर्थातच त्याचा माझ्या लिहिण्यावर परिणाम झाला........
तरिही तुम्ही सर्वांनी माझी गोष्ट वाचलीत याबद्दल धन्यवाद..................!

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!

कारण मी जेंव्हा कथेचा पहिला भाग लिहिला तेंव्हाची आणि अंतिम भाग लिहिला तेंव्हाची माझी मनस्थिती खूप वेगळी होती..... अर्थातच त्याचा माझ्या लिहिण्यावर परिणाम झाला........>>>>>>>>>>>>>
काय स्वतःचीच कथा नव्हता लिहीत ना ??? Happy
just kidding

इगोइस्टिक मुलाच्या प्रेमात पडणं, सगळं त्याच्या कलाने घेणं सर्व ठिक आहे पण आदित्य मध्ये इतका ड्रास्टिक चेंज तो ही इतक्या फटकन? झेपला नाही.. Uhoh