झुरळे, पाली आम्हां सोयरी..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

खरं सांगायचं तर मला पालींची खूप म्हणजे खूपच भीती, किळस वा तत्सम जे काही असतं, ते सगळं वाटतं! पाल अंगावर वगैरे पडणं म्हणजे जगबुडी व्हावी बहुधा! एकदम यक्, यक्! भयाण!

अगोदरच्या घरात पाल नव्हती अजिबात. नवीनच घर बांधलं होतं आणि घरमालक स्वतः रहायच्या आधी मी तिथे भाडेकरु म्हणून रहायला गेले. पाल - झुरळ विरहीत घर म्हणजे एक सुखस्वप्नच प्रत्यक्षात उतरल होतं! अर्थात, त्याऐवजी मुंग्या होत्या! पण त्या चालतात, आणि त्या काळ्या होत्या. लहानपणी म्हणत असू, काळ्या देवाच्या असतात, लाल चावकुर्‍या...

पहिलं घर छानच होतं, भरपूर प्रकाश येणारं घर. बंगळुरुमधे प्रकाशमान घर मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे म्हटलं! पण मग सद्ध्याचं घर बदललं, कारण, घरमालक आता त्याच्या घरी रहायला येणार होता. हे नवं घर तस जुनं आहे, बैठं. हेही छान आहे, लहान आहे, त्यामुळे आवराआवरी आणि साफसफाई पटकन होते! जमेची बाजू. घेताना घरमालकाने नवीन रंग वगैरे काढून दिलं होतं, त्यामुळे पाली, झुरळं नसतील असं मी समजून चालले होते. पण कसलं काय! नवीन घरात सामान आणून टाकलं, व्यवस्थित लावलं, तोपर्यंत ही मंडळी दबा धरुन बसली होती की काय कोणास ठाऊक! मग एकेक झुरळं बाहेर पडायला लागली, ही एवढाली! कधी नव्हे ती मी १०-१२ झुरळं तरी मारली असतील! आणि झुरळंही मला तेवढीच अप्रिय आहेत! फक्त त्यांना माझी भीती वाटायचय ऐवजी मला त्यांची भीती वाटते! तरीपण, हिय्या करुन मारलीच! सरवायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणतात हे हेच असावं!

असो. तर झुरळं मेली, राहिलेल्यांवर हीट आणून मारलं, मग ती मेली. राहता राहिल्या पाली. स्वयंपाकघरात एक, तिथल्या ओट्यावर फुदकणारी. स्वच्छ असतो ओटा, कोणी काही शंका घेण्याआधीच सांगते! दिवाणखान्यात बहुधा दोन असाव्यात, आणि झोपायच्या खोलीत दोन. एकूण ५ आहेत, मला ठाऊक असलेल्या. तसं, आम्ही एकमेकींना टाळायचोच. त्याही अन् मीही. त्यामुळे ठीकठाक एकमेकींचा अंदाज घेऊन वावर चालायचा. काहीही केलें तरी उपयोग नसतो, पाली कुठेही जात नाहीत बहुधा.

मध्यंतरी पुण्याला घरी गेले. परत आल्यावर काही तरी वेगळे वाटले खास. माझी समजूत होती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर पाल्केस्ट्रा सुरु असेल, पण नाही. नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली! अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की अजून काय झालं वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली! आत्ता झोपायच्या खोलीतली एक ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धावली! आली, आली! दुसरी कुठेय काय माहित! स्वयंपाकघरातली गुल्लच आहे! असो बापडी, आणि आज एक छोटुलंही दिसलं त्यांच! माझी शंका बरोबर होती म्हणायची! एकूण सगळ्या पालींमध्ये एक पालोबाही आहे वाटत! परमेश्वरा रे! वाचव!

पुढचे काही दिवस आता घरात अंड्याचं कवच प्रत्येक खोलीत ठेवाव लागणार! त्याने पाली येत नाहीत म्हणे, नायतर पालीला दिली भिंत आणि पाल घरभर पसरी, असं व्हायचं! भूतदया गेली खड्ड्यात!

काय म्हणता?

प्रकार: 

छान !!

<< स्वच्छ असतो ओटा, कोणी काही शंका घेण्याआधीच सांगते >> कसली शंका ? तु स्वयंपाक करतेस वैगेरे का ? Proud

माझ्याही घरात कमीत कमी ३ पाली सुखाने नांदताहेत.. अजुनही असतील पण मी हॉलमधली पाल रात्री झोपायला बेडरुम मध्ये येते असे मानुन चालते. (म्हणजे आता बघा घरात माणसे दोन आणि पाली तिन...घर यांच्यासाठीच घेतलेले वाटते मी).

घराच्या आजुबाजुला झाडे भरपुर असल्याने घरात किडे खुप येतात. ह्या पाली किडे खायचे काम करतात. आता एवढे चांगले काम केल्याबद्दल त्यांना दुवा द्यावा की किळस घाण वाटते म्हणुन् घराबाहेरचा रस्ता दाखवावा??

त्यांना मारणे पाप आहे असे लहानपणापासुन ऐकल्यामुळे मारायचे धाडस होत नाही..

या प्रश्नात एका नव्या बीबीचा ऐवज आहे महाराजा, आहात कुठं? >>>
मग करा की चालू नवा बीबी.. काही हरकत नाही.. (नाहीतरी आता ग्रह-तार्‍यांसारख्या निर्जीव गोष्टींचा कंटाळा आहे. change म्हणून प्राणी/पक्षी/किटकांचे बीबी चालू करा. Happy )

आयटे, मांजर पाळ एक. पाली आणि झुरळं कमी होतील. तशी पालींचा एक उपयोग म्हणजे त्या कोळी खातात. त्याने जाळी होत नाहीत घरात. बघ घर थोडं कमी आवरावं लागेल Wink

आयटे, मांजर पाळ एक. पाली आणि झुरळं कमी होतील.

या उद्योगात कुणी पडु नये. माझ्याकडे आहे मांजर. ते सकाळ संध्याकाळ त्याची खायची वेळ झाली की माझ्यावर गुरगुरुन आठवण करुन देते. शेजारुन उंदिर गेला तरी ते त्याच्याकडे ढुंकुनही बघणार नाही याची मला खात्री आहे. बरे, उपाशी ठेऊया म्हणजे आपोआप पाली/झुरळे/उंदिर खाईल म्हणुन तिला खायला दिले नाही तर इतक्या जोरजोरात म्याव्म्याव करते की मला झक मारत तिला खाणे द्यावेच लागते
Sad

लोल, आमच्या घरी पालिंबरोबर मस्त डॅन्स चालु असतो (पोरांचा...माझा नाही :फिदी:)
घराच्या मागच्या बाजुला शेत नदी वगैरे असल्यामुळे संध्याकाळी भरपूर किडे-बिडे येतात त्यासोबत पालीपण . म्हणून संध्याकाळच्या खिडक्या बंद झाल्या. पण खिडकीच्या काचेवर चालणार पाली आणि किड्यांच युद्ध बघायला माझी दोन्ही कार्टी संध्याकाळची वाट बघत बसलेली असतात.

२) जुन्या घरी, पालिंना ओळखायचा पण लेक माझा अरेच्चा ही स्वयंपाकघरातली आज बाहेर आली वाटत Uhoh
आई अग ही ना तिथे आतमधे असते आज इकडे काय करतेय्?:अओ:

छे! कुठल्या कुठल्या पालींची करुन आठवण दिलीस शैलजा Proud
पाल चालते पण उंदीर दिसला की मात्र पळा पळा होऊन जातं कुठेही दिसला तरी.

पाल हा काही कौतुकाने बोलण्याचा विषय नाही. तो घरातून हाकलण्याचा विषय आहे. कारन पालीचे विष अत्यन्त जहाल असते आणि त्याच्या विषबाधेतून मृत्यु ओढवू शकतो. बर्याचदा छतावरून चालनारी पाल तळव्याची वॅक्युअम गेल्यास निसटून दुधात , पातेल्यात पडून , मरून तळाला जाऊ शकते. व ते पदार्थ खाल्ले जाऊ शकतात. खेड्यात लग्नासारखे मोठे स्वैपाक चालू असताना कढईच्या वाफेने पाली त्यात पडू शकतात. व सामुदायिक विषबाधा होऊ शकते. पाली असलेल्यानी स्वयम्पाक घरात काहीही उघडे ठेवू नये. शक्यतो पालीची फूड चेन तोडावी. म्हनजे झुरळे, कोळी, मुंग्या नष्ट कराव्यात.
आमच्या कडे एक पाल कुठे सापडावी याचा काय अंदाज ? नाही.. आपला एक अंदाज हो? आमच्या बेसिनचा एक नळ कार्पोरेशनचा आहे आणि दुसरा वरच्या टाकीचा आहे. टाकीच्या नळाचे पाणि कमी कमी होऊ लागले. नन्तर ते थिबकू लागले. आम्हाला वाटले वॉशर फाटून नळ जॅम झाला असेल. प्लम्बर आला त्याने नळ खोलला तर त्यात मेलेली पाल . वरून टाकीतून येऊन अडकलेली.
दुसरी इलेक्त्रिकच्या स्विच बोर्डाच्या आत जे वायरींचे जंजाळ असते त्यात अडकून मेली खूप वास यायला लागला म्हणून खोलीतले सगळे सामान उलटे पालटे केले. खूप दिवसानी स्विच बोर्ड खोलला तेव्हा वाळलेली पाल मिळाली.

मलाही पालींची आणि झुरळांची तेवढीच भीती वाटते की किळस येते हे मला अजूनही कळलेले नाहीये.पहिल्यांदा पाली बिली बघितल्या की मी किंचाळत सुटायचे.आता माझ्या मुलीला आई शूर वीर आहे असे दाखवण्यासाठी जरा माइल्ड रीअ‍ॅक्शन देते.

<<<<<<<खरं सांगायचं तर मला पालींची खूप म्हणजे खूपच भीती, किळस वा तत्सम जे काही असतं, ते सगळं वाटतं! पाल अंगावर वगैरे पडणं म्हणजे जगबुडी व्हावी बहुधा! एकदम यक्, यक्! भयाण!>>>>>>>>>

अगदी माझ्या मनातलं बोललात

<<<<<<<<कावळे पाली खातात का?
कावळे पाली खातात का?
कावळे पाली खातात का?
कावळे पाली खातात, का?>>>>>>>>

झक्की खूपच छान प्रश्न.................

बाकी पाल हे खूपच किळसवाणं प्रकरण आहे
Sad

पालीची मला सापापेक्षा जास्त भिती वाटते. अजून तरी या घरात पाली नाहीत. टचवुड.
पूर्वी पालींचा लवाजमा प्रत्येक घरात असायचा आणि मांजरं असली की पालीफुडफेस्टीवल. मांजराला पाल पकडताना पाहण्याची क्रिया हा एक स्वतंत्र विषय आहे.

आय्टी- घरात ५ पाली म्हणजे मला काही ठिक वाटत नाही. आणि चुकुन जरी काही उघडं राहिलं तर कंबख्ती. हूडांच म्हणणं पटतं.

लिहीलयस झकास.

पालीची मला सापापेक्षा जास्त भिती वाटते. अजून तरी या घरात नाही. टचवुड. >>
म्हणजे... तुमच्या घरी सापपण येतो का... Sad

सगळ्यांना धन्यवाद! Happy
अंड्यांची कवचं ठेवायला सुरुवात केल्यापासून पाली दिसत नाहियेत... Happy
रैना, सापांचा लवाजमा? घरात? आणि तू राहिली आहेस? धन्य! _/\_
डॅफो, श्यामली! Proud
रॉबिनहूड, पालींचा किती तो अभ्यास! Happy नवीन बाफाचा ऐवज! Proud नको! पैशाला पासरी निघताहेत तेवढे बास नाहीत का! Happy
सिंडे, साधना - आता मांजर, मग कुत्रा.. नंतर? Happy
चेतन, हो, मग? Proud

म्हणजे... तुमच्या घरी सापपण येतो का>>> नाही नाही. संपादित केले आहे. >>

अगोदरच कळलं होतं... पण जरा असाच पी.जे. मारला होता... Wink

आयटे, मला किळसपेक्षा भीती जास्त वाटते कारण माझी त्वचा ओवरसेन्सीटीव्ह आहे. मच्छर चावला तरी पुरळ उठतयं. हूड म्हणतो तसे पालीचे विष जहाल असतं. माझ्या आईने कितीही सांगीतलं की पाल तुझ्या अंगावर चाटायला येणार नाहीये तरी मला जाम भीती वाटते की चुकून चाटलच तर काय घ्या? त्यामुळे पालीने माझ्या अंगचटीला येण्यापूर्वी मीच हात धुवून मागे लागते तिच्या.. तिला हुसकवेपर्यंत!

तुझ्या घरी पाच होत्या? बाप रे! Uhoh

बायकोला नाही एव्हढा पालीला घाबरतो. Happy

रच्याकने, शाळेत असतांना उन्हाळी सुट्टीत गांवी गेल्यावर मामाच्या घरी मी संडास- बाथरुममध्ये 'कांची वरद राजा' असं लिहिलेलं पाहिलं. त्याचा अर्थ मला लागेना. मी मामाला विचारलं तर म्हणे त्यानं पाली कमी होतात. मी मात्र त्याच ओळींवरून पालींना रोज खुशाल बागडताना पहात असे. Happy

Pages