मिस्टर शशी थरूर आय बेग टु डिफर विथ यु.

Submitted by श्रीकांत on 9 October, 2009 - 20:09

" देखो, विमान मे से मुंबई कितनी खूबसुरत दिखती है." खिडकी मधून खाली पहात इमिरेट्स
एअरलाईन्स च्या बहरिन-मुंबई विमानात इकॉनॉमी क्लास मधे शेजारी बसलेल्या गंगाधर ला मी म्हटले.
" नही , मैने आपको पहलेही बताया ना मुझे डर लगता "

खरेच, अंधारात नोव्हेंबरच्या पहाटेच्याथंडीत मुंबई आकाशातून फार सुंदर दिसत होती. विमानातून रात्री मी बहरिन, दुबई, ही प्रकाशाच्या ठिपक्यांनी रांगोळी घालावी तशी दिसणारी शहरे पाहिली होती. आपली मुंबापुरी मात्र जणू काही हि-यामाणकांचा खच पडल्यासारखी दिसते. पण गंगाधर ला ती बघायची भीती वाटत होती.

बहरिन ला विमानात आपल्या जागेवर बसल्या नंतर आता दोन तास तरी ताणून द्यावी अशा विचारात मी असतानाच वीसबावीस वर्षाचा मध्यम उंचीचा कालासावळासा दिसणारा एक मुलगा आपली सीट शोधत माझ्या जवळ आला. मी पाय बाजूला केले व म्हटले,
"बैठो भाई आपकी ये विण्डो सीट है."
"नही वहा आप बैठो "
" अरे क्‍यू भाई, अच्छी विण्डो सीट मिली है तो बैठो ना ." मी.
" नही, मुझे डर लगता है ."
"क्या बात करते हो? " मी.
" सचमुच!. आप हसोगे, पर मुझे सचमुच डर लगता है . वो जमीन दूर जाते दिखती है , उतरते वक्त जोर से पास आती है तब मुझे बडा डर लगता है. आप बैठो वहा . "
"ठीक है" असे म्हणून मी खिडकीजवळ बसलो.
मुलगा चांगलाच गप्पिष्ट होता. त्याचे नाव गंगाधर. आंध्र प्रदेश मधे हैदराबाद जवळ कोणत्या तरी खेडे गावाचा राहणारा. जेमतेम मॅट्रिक पास, नंतर उडाणटप्पूपणा मुळे शिक्षणात गती नाही. अशी माहिती त्यानेच मला गप्पा मारता मारता मला सांगितली.

"कहासे आ रहे हो ?" मी विचारले.
" इजिप्त से , वॉ शर्म-अल शेख सुना होगा ना मनमोहनसिंग अभी अभी गया था वहा , वो. वहासे आ रहा हु."
वहा इतने दूर? कौनसे कंपनी मे हो? क्या काम करते हो ? " मी एका दमात अनेक प्रश्न विचारले.
" ओमान के सुलतान के लिये काम करता हु...." मी उडालोच.
"क्या काम करते हो ? " मी पुन्हा विचारले.
"आप जैसा बडा आदमी नही हु भाई. झूट क्यो बोले?"
कुठल्या तरी पेट्रोकेमिकल कारखान्यात इंजिनीयर वगैरे असणे ही त्याच्या लेखी बडा आदमी ची व्याख्या होती.
"ओमान के सुलतान के पॅलेस मे हाउस कीपिंग का काम करता हु."
थोडक्यात गंगाधर सफाई कामगार होता.साफसफाई व्यतिरिक्त किरकोळ प्लंबिंग कामेही तो करू शकतो त्या मुळे च त्याला हे काम मिळाले होते. पण हाउस कीपिंग का काम हे शब्द आपण भंगीकाम करतो हे कसे सांगावे या संकोचातून आले नव्हते तर हिंदी फार चांगले येत नसल्याने आले होते हे मला लवकरच कळुन आले.

( असे काही बोलायचे असले कि लोक हमखास ईंग्लिश भाषेचा आधार घेतात आणि तोही हायफाय शब्दात. म्हणजे आपण भंगार वाले असलो तर माझा सॉलिड वेस्ट मॅनेज्मेन्ट चा बिझिनेस आहे म्हणण्यासारखे, भ्रष्टाचार हा त्यांच्यासाठी एथिकल फ्लेक्झिबिलिटी असतो. गटार म्हणायच्या ऐवजी इफ्लुएंट ट्रेंच असे लिहीत जा असे सांगणारा एक साहेब आठवला बघा.)

तर, ओमान च्या सुलतानाचे अनेक देशांमधे राजवाडे आहेत तो जिथे जाणार तिथे आधी साफसफाई करता आधी गंगाधर आणि त्याची टीम अन त्याचा साहेब जाणार, सुलतान असेल तोवर तिथेच राहणार, नंतर सुलतानाचा मुक्काम जिथे हालणार असेल तिथे गंगाधर परत आधी रवाना. अशी त्याची गाड्या बरोबर नव्हे तर गाड्या आधी नळ्याची यात्रा सुरू असते.
मग आपला साहेब कसा चांगला आहे, साफसफाई च्या / प्लंबिंग च्या वगैरे कामात स्वत: कसा त्याला मदत करतो वगैरे गन्गाधर ने सांगितले.
" ये नौकरी तुम्हे कैसे मिला?" मी विचारले .
" वो मुंबई मे शापूरजी पालनजी कंपनी है ना, वहा मेरा मामा है. उसके पहचान से मिला . पिताजी गताजी गया, मा बहुत डाटता था, मामा भी बहुत समझाता था पर मै कुच सुधरा नही. दसवी के बाद स्कूल गया ही नही. आज आप जैसा लोग से बाता करता, तो लगता मै भी पढता तो आप जैसा इंजिनीयर बनता, पैसा कमाता."
"लेकिन अब दीदी को और छोटे भाई को पढायेगा, दीदी बहूत हुशार है, पढेगी तो रिश्ता अच्छा मिलेगा.छोटा भी मेरे जैसा नही है."
"जो कूच भी १०-१५ हजार कमाता वो सब सेविंग करता मै, उस के लिये घर भी मै दो साल बाद जा रहा हु. ये टिकेट भी मै खानेका पैसा मिलता उसमेसे बचाया और निकाला है."

" अभी उमर ही क्या है तुम्हारी,चाहो तो तुम अब भी सीख सकते हो, वहा तुम्हारे साथ कोई तो होगा पढालिखा. उसके साथ रोज थोडा वक्त बैठा करो अंग्रेजी तो तुम्हे कामचलाउ आती है ही, उसे सुधारो थोडा बहूत कम्प्युटर सीखोगे तो थोडा
जादा कमाओगे."त्याच्या बद्दल काहीतरी वाटू लागले म्हणून मी म्हणालो.
" आप सही कहते हो, पर क्या मुझे जमेगा?"
" हा हा, क्यो नही ? " मी दिलासा दिला.
विमान धावपट्टीवर उतरले, घाई घाईने उतरणार्‍या लोकांबरोबर गंगाधर ही माझ्याआधी उतरला. मग थबकला मागे वळला, माझ्या कडे पाहून त्याने निरोपाचा हात केला. आणि गर्दीत दिसेनासा झाला.

आपल्या कामाची लाज न वाटणारा, कष्ट करायची तयारी असणारा, जेवणाचे पैसे वाचवून तिकीट काढणारा, बचत करण्या साठी घरची खूप आठवण येत असून ही दोन वर्षानी घरी जायला निघालेला, बहीण व भावाला खूप शिकवण्याची, बहिणीचे लग्न चांगल्या घरात होईल, मी सुद्धा शिकेन
अशी स्वप्ने डोळ्यात असणारा गंगाधर मलातरी कॅटल क्लास वाटला नाही.
मिस्टर शशी थरूर आय बेग टु डिफर विथ यु.

गुलमोहर: 

गो श्रिकान्त. मला पटलं बरोबर आहे. इथे हैदराबाद्ला विमान्तळावार असे कितीतरी दिसतात. मला नेहमी त्यान्ची काळ्जी वाट्ते.

माझ्या गल्फ मधल्या वास्तवात अन मुंबई प्रवासात असेच खुप जण उराशी स्वप्न बाळगुन असणारे भेटले.
मळयालम , तेलगु ..तुटकी हिंदी शिवाय दुसरे बोलता पण येत नसते , पासपोर्ट वरची माहीती सुद्धा फॉर्म मधे भरता येत नसते , तरी स्वप्नपुर्ती साठी, घरची परिस्थेती नसतांना असलेले विकुन खुप पैसे मिळवण्याच्या आशेने येतात . exploitation होतेच , मृगजळाच्या पाठी धावत ..किती जणांचे स्वप्न पुर्ण होतात ..मे बी शशी थरुर नोज Happy

श्रीकांत , छान सहज सोप्या शब्दात मांडलेस .

विमानात इकॉनॉमी क्लास, गाडीत दुसरा वर्ग म्हणजे जिथे गुर ढोरांसारखी माणसे खच्चून भरली असतात ते वर्ग. म्हणून शशी थरूर त्याला कॅटल क्लास म्हणाले होते. पण लेखकाला म्हणायचे आहे तो कॅटल क्लास असला तरी माणसे चांगल्या विचारांची असतात.

हिंदीत लिहिल्यामुळे एकदम वास्तवता आली आहे कथेला. कारण हैद्राबाद मधली माणसे मराठी कसे बोलतील?

लिंबुटिंबू

नमस्कार,
नुकतेच काही दिवसापूर्वी अतिशय उच्चविद्याविभूषित असे केरळचे खासदार शशी थरुर यांना (व अन्य खासदारांनाही) त्यांच्या वरिष्ठांनी , पंचतारांकित निवास, बिझिनेस क्लास ने प्रवास टाळावे भारतामधे बहुसंख्य लोक दोन वेळ नीट जेवू शकत नाहीत असे असताना पैशांची उधळपट्टी करु नयेअसे सुचवले होते.त्यावर मी माझे पैसे खर्च करतो असे म्हणुन, त्यापुढे त्यांनी इकॉनॉमी क्लास त्यांना आवडत नाही हे सांगतांना त्या क्लास साठी "कॅटल क्लास" हा शब्द वापरला. विमानात या क्लास मधे जेमतेम हालचाल करता येइल अशा तर्‍हेने जास्तीत जास्त सीट्स असतात म्हणून गुराढोरांसारखी माणसे कोंबून नेणे या अर्था ने गरिब प्रवाशांसाठी अमेरिकेत हा शब्द वापरतात. असे बोलुन शशी थरुर यांनी भारतीयांची मने दुखावली होती. हा तो सन्दर्भ.
श्रीकंत

मस्त लेख आहे.
त्या शशी थरूर ला काय जातेय म्हणायला. Cattle Class etc
उगीच UN मध्ये कागदी घोडे नाचवायला काय अक्कल लागते ?

उगीच UN मध्ये कागदी घोडे नाचवायला काय अक्कल लागते ?
>>>
यु एन मध्ये कागदी घोडे नाचवायला अक्कल लागत नाही हे ब्रम्हज्ञान प्रथमच झाले. उगीचच लोक IFS वगैरे होतात आणि यूनोत जातात असे दिसते. शशी थरूरचे वाद्ग्रस्त मत आणि त्याच्या प्रोफेशनला त्या मतावरून अक्कल लागत नाही हा निष्कर्ष हे अजबच आहे. इथे की बोर्ड बडवून मत व्यक्त करायला तरी काय अक्कल लागते?

रॉबिनहुड,
पॉल यांची प्रतिक्रिया शशी थरुर यांनी भारतीयांची मने दुखावली होती त्यातून आलेली वाटते, माझा लेखही त्यामुळेच लिहिला गेला. शशी थरुर यांच्या उच्चविद्याविभूषित असण्यामुळे, युनोमधिल त्यांच्या सेवेच्या अनुभवामुळे आजच्या जगात भारताचे म्हणणे प्रभावी पणे मांडू शकतील अशा मोजक्या व्य़क्तिंमधे ते आहेत, त्यामुळे मलाही ते आवडतात. पण त्यांनी असे बोलायला नको होते असेही वाटते.
श्रीकांत.

शशी थरूर यांची ती चूक होती हे मान्य. खरे तर ते त्यानी ट्विटरवर म्हटले होते. उद्या मी माझ्या मित्राला मायबोलीवर अथवा ओर्कुटवर पन्तप्रधानाबद्दल काही बोललो तर त्याचा सार्वजनिक इश्यू होऊ शकतो का हाही एक वेगळा प्रश्न आहे. ते त्यानी कुठे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटले नव्हते. थरूर ब्युरोक्रॅट होते राजकीय लोकांइतकी बोलण्यात भान आणि लवचिकता त्याना नसेलही. पण म्हणून त्यांच्या युनोच्या कामासाठी अक्कल लागत नाही हे म्हणणे कशात टाकायचे ? हे जनरलाईज्ड स्टेटमेन्ट आहे त्यामुळे युनोत कामकरणार्‍या इतर भारतियांना व इतर देशातील विद्वानानाही अक्कल लागत नाही हे ओघाने आलेच.
यूनोत काम करणार्‍यांच्या जोड्याजवळ तरी उभे राहण्याची आपली लायकी आहे का हे पहिल्यान्दा तपासून पाहिले पाहिजे....

इथे वाचणारे खुळे बसलेत असे वाटले की काय तुम्हाला.? मुळात त्या मुलाच्या कहाणीला थरूरांचा सन्दर्भ देणेच अस्थानी आहे त्यामुळे तुमचीही अक्कल चव्हाट्यावर आली आहे. अन्यथा एक अनुभव म्हणून तुमचे लेखन अप्रतिम आहे.

Pages