मोबाईल कसा वापरावा: एक धडा

Submitted by tilakshree on 29 January, 2008 - 21:54

हल्ली भारतांत; विशेषतः मुंबईसारख्या महानगरात मनोरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच वृत्त नुकतंच कुठेसं वाचलं. पण प्रत्येक मनोरुग्ण म्हणजे वेडा नव्हे याचीही जाणीव होती.मात्र बांद्रा स्टेशनच्या प्लॅट्फॉर्मवर मल दिसलेल्या 'त्या' दृश्याचा धक्का बसून मलांच वेड लागायची पाळी आली... मात्र या धक्क्यातून सावरता सावरता माझ्यांतला बातमीदार जागा झाला आणि 'आता वेड्यांचेही सोफेस्टिकेशन' अशा शीर्षकाखाली एक बातमी 'सोडून' देण्याचा विचार मनात चमकून गेला.
बांद्रा स्टेशनच्या प्लॅट्फॉर्मवर एक तरुण उभा होता.चेहेर्‍यावरून केवळ 'नॉर्मलं'च नाही तर 'स्मार्ट' वाटत होता. अंगावर फिक्कट रंगाची कॉटन जीन्स, त्यावर मॅचिंग असलेला गडंद रंगाचा टी-शर्ट', खांद्यावर सॅक, डोक्यावर कॅप, डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा, पायांत उंची स्पोर्ट्स शूज अशा टापटीप पेहेरावावरून तो चांगल्या घरंचा मुलगा असल्याचं जाणवंत होतं.वेडेपणाचं कुठलंही लक्षण त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वावरून दिसत नव्हतं. पण त्याच्या वागण्यावरून त्याच्या डोक्यावर किती मोठा आघात झाला असेल ते कळंत होतं. प्लॅट्फॉर्मच्या कोपर्‍यांत बिचारा एकटांच बडबडंत उभा होता. मोठ्या काकुळतीने बोलंत होता. त्याच्या एकूण आविर्भावावरून अंदाज येत होता की तो त्याच्या समोर असणार्‍या 'काल्पनिक व्यक्तीला काहीतरी विनवंत होता. मधूनंच पुढे झुकूंन दोन्ही हात फैलावून काही बोलायचा. बहुदा 'ती' व्यक्ती
काही दाद देत नाही अशी समजूत करून घेऊन हताशपणे कपाळाला हात लावायचा हळूहळू त्याच्या त्राग्याची जागा वैतागाने घेतली आणि एका क्षणी तो मटकन खालीच बसला. अजूनही त्यची बडबंड सुरूच होती. मात्र आता त्याच्या बोलण्यात कुठलाच आवेग नव्हता.मक्खपणे शून्यांत नजर लाऊन अगदी कोरडेपणाने बडबडंत होता.
मला बिचार्‍याची कीव आली. जरा त्याचं स्वगत ऐकून त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तो समजावून घ्यावा आणि जमलंच तर जरा त्याला समजावण्याचा प्रयत्न करावा; या सदहेतूनेमे त्याच्या दिशेने चालू लागलो. त्याच्यापासून चार पावलं दूर असतानाच मला साक्षात्कार झाला की त्याच्या प्रॉब्लेमपेक्षा माझ्या समजुतीचा घोटाळा मोठा होता.त्याच्या खिशांत अत्याधुनिक 'मोबाईल हँडसेट' होता आणि कानाला 'ब्ल्यू-टूथ'चं यंत्र होतं. त्याचं त्या मोबाईलवर त्याच्या 'गर्ल फ्रेंड' बरोबंर बोलणं सुरू होतं.तिला दिलेलं शॉपिंगचं प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी तो बांद्रा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एंडिकेटरखाली वेळेत येऊन तिची वाट बघंत उभा होता. 'ती' मात्र त्याला 'डिच' करून भलतीकडेच फिरत होती. अशी अतिशय गंभीर वस्तुस्थिती माझ्या लक्षांत यायला फारसा वेळ लागला नाही. त्याची 'गर्ल फ्रेंड' असल्यामुळे तिची चूक असूनही त्याला तिच्यावर डाफरणं तर सोडांच; उलंट तिच्याच मिनंतवार्‍या कराव्या लागंत होत्या. त्यामुळे त्याची होत असलेली कुचंबणाही स्वाभाविक असल्याचं माझ्या लक्षात आलं.
या 'ब्ल्यू टूथ'च्या यंत्राने माझा 'बाळू' बनल्यामुळे क्षणभर का होईना; पण न्यूनगंडाचा एक तीव्र झटका मला येऊन गेला. वास्तविक मोबाईल फोन हे वस्तू वापरणार्‍यांसाठी कितीहे उपयुक्त, आवश्यक आणि अतिप्रिय असली तरीही त्यामुळे त्याच्या आजूबाजूला असणार्‍या अनेकांना त्यामुळे शारिरिक, मानसिक आणि मनोशारिरिक त्रासाला सामोरं जावं लागतं. उदाहरणंच द्यायचं झालं तर लोकल प्रवासाचंच घ्यां नां... एक तर 'कर लो दुनिया मुठ्ठी में ' चा नारा देत 'समर' अन 'विंटर' असे कसल्या कसल्या हंगामांचे हंगामे करत चिल्लर किमतीला मिळणारे मोबाईल आणि त्यंच्याशी स्पर्धा करण्यासाठी किंवा त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन इतरांनीही मोबाईलच्या दराण्ची घसरण करण्याची चढाओढ सुरू केली आहे. त्यामुळे हल्ली ज्याच्या त्याच्या 'मुठ्ठी में' दुनिया असते. त्यातून ज्याच्या मुठींत ती नाही त्याला 'हम इस दुनिया के काबिल' नसल्याची भावना विलक्षण दुखावते. याही पुधी जाऊन सांगायचं म्हणजे मोबाईलची सर्वात भयानक बाब म्हणजे ध्वनिप्रदूषण! त्याचे दुष्परिणाम अख्ख्या जगाला दीर्घकाल भोगावे लागणार आहेत.लोकलमधे बसून प्रवास करताना किंवा वर्दळीच्या रस्त्याकडेच्या फूटपाथवरून चालताना हे 'मोबाईलधारी' अशा काही आवेशांत बोलत असतात की त्यांच्या आवाजाची पट्टी ऐकून बहिर्‍याचेही कान फुटावे... मग सामान्यांची काय कथा? याशिवाय लोकलमधून प्रवास करणारा एक विशिष्ट असा प्रामुख्याने व्यापारी वर्ग आहे. यांनी लोकलमधे चढताना कानाला लावलेला मोबाईल आपण किंवा ते गाडीतून उतरेपर्यंतही सुटंत नाही.दोन डब्यांपलिकडेही ऐकू जाईल इतपत आवाजात ते काय ते "भाव चढ्यो" अन "उतर्‍यो"; लाख, बे लाख, त्रैण लाख असे काय काय बडबडंत असतांत. एकतर त्यांचा तार स्वर, त्यांची न समजणारी भाषा आणि तरीही समजणारे लाखा- लाखांचे आकडे यामुळे सर्वसामान्यांच्या; विशेषतः आमच्यासारख्या पोटार्थी चाकरमान्यांच्या मनांत स्वतःविष्यी हीनत्वाची भावना निर्माण होऊन मनावर फार मोठा आघात होत असतो. त्यामुळे किमान सार्वजनिक ठिकाणी तरी मोबाईलवर बोलण्यांस बंदी घालावी किंवा रेल्वे गाड्या, बस गाड्या अशा ठिकाणी 'मोबाईल जॅमर' बसवावेत या मागणीसाठी प्रसंगी रेल रोको, रास्ता रोको, चक्का जाम या किंवा अशा सत्याग्रही, सनदशीर मार्गांचा अवलंब करण्याची आमची 'चळवळ्यांना' आग्रही सूचना आहे.
तसा एरवीदेखील मुंबईकर माणूस हजारोंच्या घोळक्यात असूनही तो असतो एकटाच! कार्यालयातले सहकारी, ट्रेन, बसमधले सहप्रवासी यांच्याशी अकारण गप्पा मारणे हे मुंबईकरांच्या रक्तातंच नाही. त्यांच्या या एकलकोंडेपणात मोबाईलमुळे अधिकाधिक भर पडंत असल्याचा महत्वपूर्ण शोध आम्ही अतिसूक्ष्म आणि प्रदीर्घ निरिक्षणातून सिद्ध केला आहे. अंधेरी पूर्वेच्या सेठ नागरदास रस्त्यावरून अंधेरी रेल्वे स्टेशनच्या दिशेने रविवार वगळंता आठवड्याच्या इतर सर्व दिवशी संध्याकाळी विशिष्ट वेळेला सुमारे ६ ते १० युवतींचा घोळका पायी प्रवास करतो. त्यांचा पोषाखाचा प्रकार व रंग एकसारखांच असतो. त्यांच्यापैकी एक- दोघींचा अपवाद वगळता त्यांच्या गळ्यांत लटकवलेली 'आय कार्ड' दुरून तरी (फार जवळून कशी हों बघणार?) सारखीच दिसतात.यावरून हे सिद्ध होतं की त्या एकत्र काम करणार्‍या असून त्यांचा एकमेकींशी किमान परिचय असणारंच. अर्थातंच त्यामुळे १५ मिनिटांच्या पायपिटीत त्यांच्यामधे हवा पाण्याच्या गप्पा; किमान आपापल्या बॉस, सिनिअरला शिव्या देणं अशा स्वरुपाचा संवाद होण्यास काहीच हरकंत नसावी. मात्र आडवा येतो तो मोबाईल!!! या १५ मिनिटांच्या प्रवासांत त्यापैकी बहुतेक जणी सरासरी ११ ते १३ मिनिटं मोबाईलवरंच बोलंत असतात्.अर्थातंच पाहणार्‍यांना त्या सहप्रवासी वाटल्या तरी ही प्रत्यक्षात त्या एकेकट्यांच मार्गक्रमणा करंत असतात्.अर्थात त्यांच्या मोबाईल वापरामधे एक जमेची बाजू असल्याचं दिसून येतं या युवतींच्या मोबाईल संभाषणामुळे ध्वनिप्रदूषणाचा धोका मुळीच संभवंत नाही. एकीच्या शेजारून चालणार्‍या दुसरीलाही तिचं बोलणं अजिबात ऐकू येत नाही.
एकूण मोबाईलची उपयुक्तता आणि उपद्रव याचा सांगोपांग, सखोल तुलनात्मक विचार करतां मोबाईल वापरावर सरसकट बंदी घालण्याऐवजी मोबाईलवर बोलताना कमाल अमुक-एक डेसिबल तीव्रतेच्या आवाजाची मर्यादा घालावी. या मर्यादेत बोलण्यासाठी मोबाईलधारकांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावं आणि असं प्रशिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी उपर्निदीष्ट संभाषणकुशल युवतींची त्वरेने नियुक्ती करण्यांत यावी अशी आम्ची शिफारस आहे.

गुलमोहर: 

बरोबर आहे तुमच म्हणन. भ्रमणध्वनीचा गैरवापर फार वाढतोय.

सुरूवातीला आला तेव्हा मोबाईल फक्त फोन होता. (अर्थात तेव्हाही वजनदार असल्याने त्याचा पेपरवेट म्हणुनही बापर व्हायचा Happy ). नंतर त्याचा आलार्म क्लॉक झाला, कधी टॉर्च झाला, एफ एम रेडीओ झाला, नंतर म्युझीक प्ल्येयर, कॅमेरा, गेमींग कन्सोल, रिमोट काय काय रुप घेतली त्या फोनने. लवकरच मोबाईल मधे फ्रिज, डिशवॉशर सुद्धा येईल बहुतेक

आणखी एक उपयोग - मसाला लावून चिकनची तंगडी कानावर ठेवायची. जेवायच्या वेळेस्तवर भरपूर भाजलेली तंदुरी तयार!

रच्याकने
एका मोबाईल कम्पनीनेच काढलेली फिल्म्.त्याची लिंक देत आहे.मला खूप टचिंग्,सुसंगत अन् वस्तुस्थितीला धरून वाटली
http://www.youtube.com/watch?v=17ZrK2NryuQ&NR=1
आवर्जून पहा व अभिप्राय द्या.
आणखी एक धक्कादायक स्टॅटिस्टिक्स
5,500 were killed in 2009 as a result of distracted driving (e.g. texting/talking while driving)."

Lol
लेख धम्माल आहे.

पण अजून फुलवता आला असता असं वाटतं.
खरंच मोबाईल कसा वापरावा याचं प्रशिक्षण देणंच आवश्यक आहे.

मंदार जी
मी दिलेली यू ट्युब ची लिंक पहा.
आपणही असेच बनलो आहोत याची खंत्,लाज वाटू लागली आहे.
लेख धमाल आहे

छान लेख.
युट्युबची लिंक एकदम मस्तच Happy
<<मोबाईलची सर्वात भयानक बाब म्हणजे ध्वनिप्रदूषण! त्याचे दुष्परिणाम अख्ख्या जगाला दीर्घकाल भोगावे लागणार आहेत.>> (माझ्यामते) लेखात सांगितलेलं ध्वनीप्रदुषण कदाचित फक्त भारतात अनुभवायला येतं. इतर बर्‍याच ठीकाणी पब्लिक प्लेस मधे मोठ्याने बोलणे जाऊ द्या, पण मोबाईलवर बोलणे, मोबाईल जोरजोरात वाजणे सुद्धा फार शिष्टसंमत मानलं जात नाही.

बहुतेक ठिकाणी परदेशी आपला मोबाईल नंबर फार थोड्या लोकाना दिला जातो व त्याच प्रमाणे उठ सुट वापरला जात नाही.

एक वैय्यत्तिक अनुभव:

मध्यंतरी गावाला गेलो होतो (केळशीला - कोकणात) तेव्हाची ही गोष्ट.
गावात अजून मोबाईलची रेंज नाही (बी.एस.एन.एल.चा टॉवर आहे म्हणे पण अजून चालू नाही झालेला).
मला मोबाईलवर एकही फोन/समस आला नाही आणि मला करता आला नाही याचं जराही वैषम्य वाटलं नाही. उलट शांत शांत वाटलं.
याउलट काही पाहुणे मंडळी "काय चायला मोबाईलची साधी रेंज नाही" म्हणुन कुरकुरत होती.
वस्तू आपल्यासाठी आहे, आपण वस्तूसाठी नाही ही साधी समज आपल्याला कधी येणार?

मंदार जी
एक जरा तिरपा अथवा गूगली प्रश्न टाकतो.
अनेकाना जिथे रेन्ज आहे तिथे समस वा कॉल करणे याशिवाय जमेल का?
जमलं तर जिंकली मग!!
असे काही लोक माझ्या माहितीत आहेत.
मोबाईल त्यंच्यासाठी आहे!!
ते मोबाईल्ल साठी नाहीत!!
मोबाईल यायच्या आधी हे लोक रिसिवर उचलून ठेवायचे फोन नको असल्यास.
आता यावरही मतभिन्नता असू शकते.
पण अनोळखी नम्बर मिस कॉल आला तरही कासावीस होवून रिटर्न कॉल करून "सौजन्य" दाखवणारे आहेत.
ही कुठली काळजी ग्रस्त करते की मनोविकार आहे?
यामुळे हा मोबाईल चा दोष कि काही मानसिक विकृती आहे?
compulsive communication disorder!!!
ccd

खोलात चर्चा व्हायला हवी.