करायचं ते करून टाक

Submitted by ratnakari on 5 October, 2009 - 05:28

माझ्या मनाला नाही पटंत
तिला नसेल ना हे रुचत
सगळ्या जगाचं तुला कळतं
दुस-याचं मन बरं दिसतं
मग बसतो रडत कुथत
किति झाले अंक मोजत,

मग रडत बसण्यापेक्षा
आणि अंक मोजण्यापेक्षा

करायचं ते करून टाक ,
विचार तुझा चुलीत टाक ॥

ती फक्त छान आहे,
हे काय महान आहे,
रूप वगैरे झूठ आहे
पुस्तकी ग्यान पाठ आहे
खरं , तू एक माठ आहे
न संपणारी ही वाट आहे

कधी , त्या रुपाच्या धुंदीत,
सुंदर , एका गाण्याच्या गुंगीत

करायचं ते करून टाक ,
विचार तुझा चुलीत टाक ॥

दैवावर तुझा प्रचंड विश्वास
स्व्प्ने असती केवळ भास
अरे आव्हान दे कधी दैवास
घेउन बघ एक मोठा चान्स
प्रेम सजवेल मग तुझी आरास
चालु होइल एक अध्याय खास

अशाच कवितेने प्रेरित होउन
वाटल्यास छोटा मुहुर्त पाहून

करायचं ते करून टाक ,
विचार तुझा चुलीत टाक ॥

गुलमोहर: