निरपराध

Submitted by सुनिल परचुरे on 3 October, 2009 - 07:40

ö निरपराध ö
``निनाद ,`किति झाले रे वजन ?``
``31.2 किलो. बापरे म्हणजे 30 किलोच्याही वर जास्त झालय``
``आता मला ह्यातल काय ठेऊ नी काय काढु असच झालय, तरी बर खायच काही न्यायच नाही म्हणून``
``ह्या दोन जीन्स काढून बघतो``
``अरे एकदम 2 नको काढूस, आधी एक काढून बघ आणि वजन कर``
``ह, आता 30.6 किलो झालय``
``त्यांना सांग, कॉलेजची मुल आहोत, कन्सेशन म्हणून लगेजच 30 व हँडबँग्जच 7 किलो वजन दिलय. तरी थोडसच जास्त झालाय तर चालवून घ्या. चल बाबा निनाद, रात्रीची फ्लाईट आहे. आधी जेऊन घे बघु``.
आईची धावपळ चालू होती. मुंबइचा निनाद कामत .12 वी नंतर नवीनच मुंबईत कॅटरींगचा कोर्स सुरु झाला होता. इथल्या कॉलेजमध्ये पहिली २ वर्षे व शेवटचे वर्ष ऑस्ट्रेलियात मेलबोर्नच्या कॉलेजात . हा ट्वाईन कोर्स होता. कॉलेजच्या सि.ई.टी. मध्ये तो 29 वा आला होता. त्यामुळे ऍडमिशनला काही प्राब्लेम आला नाही.
``आई तिथ राहयची काळीजी करु नकोस. आधी तिथे गेल्यावर पहिले 15 दिवस कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच काढायचे आहेत. त्याचे पैसे आपण भरले आहेत. पुढे आमचा जो 1३ जणांचा गुप आहे न त्यांनी ठरवलय जवळच भाडयाने 4 -5 बेडरुम्सचे फ्लॅट मिळतात, शेअर करुन राहू. सगळेच अस करतात, त्यामुळे पैसेही वाचतील`` निनाद म्हणाला.
``हे बघ निनाद, तुम्ही सर्वजण एकत्र आहात म्हणून काळजी वाटत नाही, पण तिथे गेल्या गेल्या लोकल मोबाईलच सिम कार्ड बघ. म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये राहता येईल. तसा तुझ्याकडे लॅपटॉप आहेच, म्हणजे आठवडयातून 1-2 दा स्काईपवरही भेटता येईल``, निनादचे बाबा जेवतांना म्हणाले.
``तुला माहीती आहे तरी परत एकदा सांगते, तुझ्या बाकीच्या मित्रांएवढे आपण श्रीमंत नाही, तेव्हा शक्यतो खर्च कमी कर. बाबांची खुप इच्छा होती आपल स्वतच छोट का होईना पण एक हॉटेल असाव. तुला माहीतीच आहे की, आजोबांच एक लालबागला छोटस हॉटेल होत. पण ते गेले आणि ह्यांचे 3 भाऊ व 2 बहिणी सर्वजण हॉटेल विकायला निघाले. कुणालाही ते चालवायची इच्छा नव्हती. म्हणाले विकायचे नसेल तर आम्हाला आजच्या बाजारभावाने जे पैसे विकुन येतील तेवढा वाटा द्या. आपल्याकडे कुठुन एवढे पैसे, शेवटी ते विकावे लागले. प्रत्येकाच्या वाटयाला जे 10-10 लाख आले त्यातच सर्वांनी सुख मानल. कसही करुन बाबांनी तुला ह्या कोर्सला घातला , ही सर्व फी व खर्च झेपत नसतांना सुध्दा. वाईट वाटून घेऊ नकोस पण मी तुला हे सर्व मुद्दाम एवढयाच करता सांगते की, फक्त अभ्यासावरच लक्ष दे. चांगला शिकुन ये, एवढीच आम्हा दोघांची इच्छा आहे." आईन डोळ्यात आलेले पाणी पटकन पदराने पुसले.
``आई मला हे सगळ माहीत आहे, तरी परत एकदा सांगतो की, अभ्यास सोडून दुसरीकडे कुठेही जास्त लक्ष देणार नाही. खात्री बाळग", निनाद म्हणाला.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
``कसा आहेस बाळा ?``
``आई मी ठीक आहे, खुपच छान आहे ग इथे. हा देशच वेगळा आहे. इथली शिस्त, वक्तशीरपणा, स्वच्छता, आई मी ह्या सगळ्यावर जाम खूश आहे ग``.
``जेवणाच काय ?``
``अग इथे ब्रेकफास्ट देतात, दुपारी असंच काहीतरी खातो. रात्री इथे बरीचशी इंडियन रेस्टॉरंट आहेत. महाग आहेत, पण सर्वजण शेअर करुन खातो. आम्ही इथेच जवळ असणारे 3 -4 बंगलोज ही बघीतलेत, अस ठरतय की मी, रिटा, सँडी, रिचा व मॅकी एकत्र एका बंगल्यात राहू. बंगला बघून आलो, 5 बेडसचा आहे. तसा सर्वांनी शेअर केल्यावर रेंट काही जास्त येत नाही आहे. किचनही आहे, जवळच एक मॉल ही आहे. तिथे एक इंडियन दुकानही आहे. त्यात आपल्या सारखच सगळ मिळत. आम्ही तेही कॅल्कुलेशन केलय. आम्ही 5 जण व जवळच दुसरे दोन बंगले बघितलेत तिथे 4 -4 बेडरुम्स आहेत ते 8 मित्र व आम्ही 5 मिळून एकत्रच किचन चालवू .त्यामुळे खुपच स्वस्तात काम होईल. मी इथे सर्व चौकशी केल्यावर एका कंपनीचे सिमकार्ड ही घेतले आहे. त्यांच्यात खास स्टुडंटना म्हणून लोकल कॉल फ्री आहेत. मी तुम्हाला मीस्ड कॉल देईन. मग तुम्ही मला कॉल करा, म्हणजे मला बिल येणार नाही, शिवाय स्काईप आहेच. ह्या स्काईपमुळे एक बरय की पैसे लागत नाहीत``.
``पैशाच जाऊ दे रे,स्काइपवर तुला हसतांना, बोलतांना, बघायला मिळत घ्यावरच मी पुढचे 2-3 दिवस कसे बसे काढते``,
``अग मग पुर्वी हे स्काइप नव्हत. फोन ही नव्हता तेव्हा`` -
``ते जाऊ दे रे ``
``हे बघ आता आम्ही नवीन बंगल्यात गेलो की मग स्काईपवर भेटु चालेल ?``
``हो चालेल``
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
``अरे यार, यहाँ आके एक महिना हो गया एसा लगताही नही है``
``ना ना ना बस अब इंडिया की याद ही न निकाल, आय वाँट टू स्टे हियर, "
``अरे वो एक पब में सिव्हि दिया था न वहाँ से कॉल आया था, पुढच्या आठवडयात बोलावलय, बॉटल कलेक्टर म्हणून, अरे तेवढेच खर्चाला पैसे तर मिळतील. "
``मी पण एका मॉलमध्ये सिव्हि देऊन आलोय. बघुया``
``बघ न खर तर एक्झामस् मुंबइत हेच कॉलेज घ्यायच, प्रोजेक्टस, हीच लोक सिलेक्ट करुन पाठवायची ,पण कसल आपल कॉलेज - आणि हे बघ, लाइक फाईव्ह स्टार बिल्डींग . यार कभी सोचा भी नही था की जिंदगी में एसि बहार आएगी``.
``ओ बहार ,बाहर चलो, सामान आणायच किचनच``
``अरे रिटा ,तु म्हणत होतीस तुला बर वाटत नाही म्हणून, आता कस आहे ?``
``सँडी नही यार, सरदर्द बहोत हो रहा है ``
``हे बघा तिला बर नाही तर तिला आराम करु देत, माझही ह्या प्रोजेक्टवर थोडे काम बाकी आहे, मीही थांबतो, तिला सोबतही होईल, तुम्ही सर्वजण आणा सामान``
``ठीक है -चलो``हे तिघे व बाकिचे सर्वजण सामान आणायला निघाले.
``अरे घेतले का सर्व सामान लिस्ट प्रमाणे ?``
``चालु हे - चालु है``
``कोण ?``
``क्या पिजे मारता है ?``
``अरे बापरे, माझा मोबाईल मी घरीच विसरलो, आईचा फोन येणार होता, हे बघा तुम्ही सर्व सामान घेईस्तो अर्धा तास जाईल. तोपर्यंत मी घरी जाऊन तो घेऊन येतो." निनाद म्हणाला व त्या सर्व मित्रांची परवानगी न घेताच निघाला. भराभर चालत बंगल्यात आला. चावीने मेनडोअरच लॅच उघडल. कारण ह्या मेनडोअरची व आपापल्या रुमची चावी प्रत्येकाकडे होती. आत आल्यावर तो हबकलाच. रिटाच्या रुममधून सँडी फक्त अंडरपँटवर बाहेर येत होता.
``अ - अरे तु, एसा अचानक``
``हा - मी - माझा मोबाईल इथेच राहीला तो न्यायला आलो होतो."
``ये देख - ये जो तुने देखा ना इसका जरा भी जीक्र कीसी के पास नही करना,"
``नाही - मी कशाला करु, चल मी मोबाईल घेऊन जातो``
निनाद म्हणाला, व घराबाहेर पडला.
``क्या हो गया सँडी ?``रिटा म्हणालि.
``अरे तो निनाद अचानक आला आणि त्याने मला अंडरवेअर मध्ये बघितले."
``तरी मी तुला सांगत होते कपडे घालून जा. आता तो निनाद म्हणजे एक पात्रच आहे. एकदम बावळट. किसको कहेगा तो नही न ?``
``अरे नही ! त्याला सांगितले आहे. त्याची हिम्मत होणार नाही",
``तरी पण आपल्याला त्याला प्रेशरमध्येच ठेवावे लागेल."
``म्हणजे ?``
``बघु``.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
``अरे सँडी तुमने एसा क्यों किया ? आपल्याला 5 जणांच्या गुप प्रोजेक्टमध्ये मला का नाही घेतल ? त्या विराटला का घेतलेस ? तो तर आपल्या गुपमध्ये कधीच नसतो ?``
``अरे जेव्हा कॉलेजमध्ये गुपवाईज प्रोजेक्ट करायला आले व स्टुंडटच्या नावाची लिस्ट द्यायची होती न तेव्हा तो एकटा पडत होता - म्हणून आम्ही त्याला घेतला. "
``अरे तो एकटा पडला तर त्याला घेतला आणि मी तुमचा खास मित्र, तो एकटा पडला तर तुला चालल ?"
``अरे यार करेंगे कुछ न कुछ``
``अरे काय करेंगे आपल्या सर्वांचे 4- 4 चे ग्रुप ऑलरेडी आहेत त्यांना तसेच प्रोजेक्ट मिळालेत. आता मी एकटा काय करु ? "
निनादला आता थोडे थोडे कळायला लागले होते. त्या दिवशीच्या प्रसंगा पासून ही दोघे जण आपल्याला टाळायला लागलीत. माझ्याबद्दल बाकीच्यांना काय सांगितलय माहीत नाही पण त्यांचही वागण बदललय. इतके वर्षापासून आपण एकत्र राहलो. ह्यांना समजत नाही की मी कसा आहे ते. कोणी कुणाबद्दल काहीही सांगितल तरी हे सर्व विश्वास ठेवतात ?
एवढयात मोबाईल वाजला, आईचा फोन होता.
``काय कसा आहेस ?``
``ठिक आहे``
``प्रोजेक्टच काम सुरु झाल का ?"
``नाही अजुन, माझा अजुन गुप नक्की नाही, तो झाला की चालू होईल."
``गुप नक्की नाही म्हणजे ? तुम्ही सर्व जण एकत्र आहात न ."
``हो आहोत ग, पण - जाऊ दे"
``सँडी किंवा मॅकी कुणी आहे का तिकडे, मला त्यांच्याशी बोलु दे``
``नाही इथे कुणीही नाही आहेत. सर्व बाहेर गेलेत."
``बघ बाबा, आता मी इथे बसुन काय करु ?``
``काहीही टेंशन घेऊ नको ग, बघु`` निनाद म्हणाला.
आपण सर्वजण घरात असताना हा आईला अस का सांगतो, की सर्वजण बाहेर गेलेत म्हणुन ? ह्याने आईला काही सांगितले की काय आपल्याबद्दल. रिटा व सँडी ह्या दोघांच्याही मनात हेच विचार घोळु लागले.
``सँडी इसने कुछ अपने बारे में मम्मी को बोला लगताय ?`` निनाद फोन संपल्यावर घराबाहेर पडल्यावर रिटा म्हणाली.
``नाही ग तो नाही सांगणार``
``अरे तु का त्याच्या बद्दल एवढा विश्वास दाखवतोस ? त्याने जर त्याच्या आईला सांगितल व त्याच्या आईने माझ्या तर, घर में तुफान होगा``
``मी सांगतोय - मी त्याला चांगला ओळखतो - तो असल काहीही करणार नाही. खरतर त्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये घ्यायला हवा होता. हुषार आहे तो. सर्व कामे करील. तुझ्यामुळेच फक्त मी त्याला घेतला नाही."
``एक छोटीसी भुल के लिऐ मुझे मेरी जिदंगी चेंज नही करनी "
``म्हणजे - तु काय करणार आहेस."
``देखुंगि``
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मि. निना - आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी तुला एक महिन्याची नोटीस देतो. एक महिन्यात तु दुसर घर बघ" बंगल्याचा मालक मि. केन निनादला सांगत होता.
``व्हाय सर ? व्हॉट आय हॅव डन ?``
``ह्या मुलीने तुझ्या विरुध्द तक्रार केली आहे की तु घरात एकटा असतांना तिच्याशी असभ्य वागण्याचा प्रयत्न केला."
``कोणी ,ह्या रिटाने? ओह माय गॉड " निनाद सर्दच झाला.
``मला हे असले चाळे तु केलेस की नाही केलेस ह्याबद्दल चौकशी करायची नाही आहे. नशीब समज मी हे पत्र कॉलेजमध्ये देत नाही आहे, पण तु दुसर घर बघ"
``रिटा - तु - तुला झालय तरि काय ? "निनाद कळवळुन म्हणाला.ति काहीच बोलली नाही, सँडीही निघुन गेला. आता जर मि त्या दिवशिचा प्रसंग कोणाला सांगितला तर कोणि माझ्यावर विश्वासच ठेवणार नाहि . मुद्दाम मि बनवुन काहितरि सांगतोय अस वाटेल. निनादच्या डोळ्यासमोर अक्षरश काळोखी आली. सर्वजण बाहेर निघुन गेले. निनाद एकटाच घरात राहिला. बापरे कसला आरोप, शि असल्या मित्रांबरोबर आपण राहतो, मित्र म्हणण्याच्या ही लायकीचे नाहीत. आपला गुन्हा काय तर त्यांना त्या अवस्थेत बघितले आणि हे मी घरी सांगेन ही भिती. पण मी कशाला कुणाला सांगु. आधी कॉलेजमध्ये २ वर्षे असतांना कधी स्वप्नातही नव्हत की अस कुणी आपल्याशी वागु शकेल. 5- 6 तास दिवसाचे एकत्र असायचो . ट्रेनने जाता-येतांना , कॉलेजमध्ये सगळे माझी कंपनी एंजॉय करायचे, माझ्या हुशारीचे कौतुकही कराचे, पण इथे आल्यावर सर्वजण अशी भरकटायला का लागली ?
रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. हाच विचार आता पुढे काय ? हे सर्व घरी कळले तर ? काहीही कारण नसतांना माझी बदनामी ? आई-वडलांनी मोठया आशेने मला इथे पाठवलय आणि त्यांना आता कसे तोंड दाखवु? परत एकटयाला नवीन घर मिळणही अवघड आणि त्यापेक्षा परवडणार नाही. घरात रात्री कुणीच आल नाही म्हणून त्याने सँडीला फोन केला तर कळले की ती सर्व जण पिक्चरला गेली आहेत, व रात्री मित्रांबरोबरच राहणार आहेत. एवढया मोठया बंगल्यात न खतापिता तो एकटाच रडत राहीला.
सकाळी कधीतरी जाग आली, कळेना आपण कुठे आहोत, आदल्या दिवशी काहीच खाल्ल नव्हत. सर्व आटपल तरी कुणाचा पत्ता नव्हता म्हणून परत सँडीला फोन केला तर कळल की ती सर्वजण आज एक दिवसाच्या ट्रिपला जवळच गेली आहेत. संध्याकाळी येणार आहेत. घरात खायला ही काही नव्हत.
तेवढयात मोबाईलची बेल वाजली बापरे आईचा फोन, माझा हा असा अवतार, चेहरा बघुनच ती लगेच ओळखेल की काही तरी बिनसल आहे.
``हॅलो - अरे काय रे दोनदा पुर्ण वेळ रिंग वाजली. तु होतास कुठे?"
``अ - नाही ग - सकाळच आवरत होतो."
``तुझा आवाज असा काय येतोय."
``कसा ?``
``अस चिडुन काय बोलतोस, आधी स्काईप वर ये बघु",
``आँ``
``स्काईपवर ये``
"अग कालपासून नेटचा इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, स्काइप येत नाही आहे."
``नक्की न तु ठीक आहेस न."
``अग मी खोटे का बोलेन``
``बर मग तु काही खाल्लस का"
``अग त्या करताच तर बाहेर जात होतो."
"का बाकीची सर्वजण कुठे आहेत."
"अग ते एक दिवसाच्या ट्रिपला गेलेत - बरेच पैसे खर्च होणार होते म्हणून मी नाही म्हटल."
"अरे जायचस न त्यांच्याबरोबर, अगदी एवढ कंजुषीने राहू नकोस, बर खाउन आलास आणि नेट आल तर एक रिंग दे मी नेटवर येईन,"
"बर"
मोबाईल बंद केल्या केल्या निनादला खुप रडु येऊ लागले. मोठमोठयाने तो रडायला लागला. घरात कुणीच नव्हते. रडल्यावर त्याला जरा बर वाटल. तो घराबाहेर पडला, मिळेल त्या रस्त्यावर चालत राहिला. डोक्यात नुसता विचार करुन करुन भुगा झाला होता. त्याला काही खायचे-प्यायचे भानच नव्हते. त्यात कालपासूनचा उपास. चालतांना त्याला चक्कर यायला लागली. तो फुटपाथवरुन क्षणार्धात रस्त्यावरच पडला. एवढयात मागुन येणा-या गाडीने करकचून ब्रेक दाबूनही त्याला उडवूनच ति गाडी थांबली. पण लगेच ति रिव्हर्स होऊन दिसेनाशी झाली. निनाद रस्त्यावर निपचीत पडला होता. शांत .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुस-या दिवशी मुंबईच्या वर्तमानपत्रात बातमी.
``ऑस्ट्रेलियात मेलबोर्नमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला. आतापर्यंत मुलांना नुसते शारिरीक इजा करायचे पण आता तर खुन करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पोलीसांनी अनामिक माणसांकडून खुन अशि तक्रार नोंदवून घेतली आहे. अजून किती विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावल्यावर आपले सरकार जागे होणार आहे ? ह्या बद्दल पालकवर्गात संताप खदखदत आहे. त्याचा स्फोट कधी होईल सांगता येत नाही``

गुलमोहर: 

आवडली!!!:स्मित:

धन्यवाद अमोल्,संजिवनि,मंगेश्,धनु-स्मिता

KHUP CHHAN.

HE ASCH ASTI.
DUSRYACHI POLI SHEKTANA SWATACHA HAT JALTO.
MAG KA AAPAN AAPLI POLI SHEUN SWATACHA HAAT BHAJUN GHYAVA.

NIDAN SWATASATHI KELELYA POLICHI CHAV TARI MAJJET GHETA YETE.

SUPRB STORY

KHUP CHHAN.

HE ASCH ASTI.
DUSRYACHI POLI SHEKTANA SWATACHA HAT JALTO.
MAG KA AAPAN AAPLI POLI SHEUN SWATACHA HAAT BHAJUN GHYAVA.

NIDAN SWATASATHI KELELYA POLICHI CHAV TARI MAJJET GHETA YETE.

SUPRB STORY