व्हेजिटेरिअन चिली

Submitted by स्वाती_दांडेकर on 1 October, 2009 - 13:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ सिमला मिरची मोठे तुकडे चिरून
१ मोठा कांदा जाड चिरून
६ मोठे टोमॅटो चिरून / ३ कॅन diced टोमॅटोचे कॅन
३ वाट्या राजमा रात्रभर भिजवून वाफवून / २ कॅन Dark Red Beans
१ छोटा कॅन Bush चिली स्टार्टर बीन / १ पाकिट चिली McCormick मसाला
४ लवंगा
४ तमालपत्रे
२ पॅटी Boca burger / 2 slabs Tofu
दालचिनी तुकडा चवीपुरता
वरून घालायला
किसलेले चीज
सावर क्रीम/लोणी

क्रमवार पाककृती: 

कॅन राजमा वापरणार असल्यास चिली आयत्यावेळेसही करता येते. एका मोठ्या भांड्यात थोडे तेल घालून जरासे तापले की लवंगा, तमालपत्र आणि दालचिनी परतून घ्यावे. कांदा फोडी टाकून परतून मग सिमला मिरचीचे तुकडे टाकावे व २-३ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून वाफवावे.
चिरलेले टोमेटो घालून आच वाढवावी. जरा खदखदायला लागल्यावर बोका बर्गर वा टोफू घालावे व झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. चिली स्टार्टर व राजमाचे दाणे घालून आच कमी करून १०-१५ मिनिटे शिजवावे.
खायला घेताना किसलेले चीज व सावर क्रीम वरून आवडीप्रमाणे पेरावे. चिलीबरोबर टॉर्टिया चिप्स खातात, किंवा नुसते सूपसारखेही खायची पद्धत आहे.

वाढणी/प्रमाण: 
६ लोकांसाठी
अधिक टिपा: 

चिली स्टार्टर मधे Mild/Medium/Hot मसाले मिळतात. आपापल्या कुवतीप्रमाणे तिखट वापरावे. माझी मुले बर्‍यापैकी तिखट खात असल्याने मी Medilum वापरते. मुले डब्यातही चिली न्यायला तयार असतात (थंड झाली तरी). मी नेहमीच वरील प्रमाणात बनवून उरलेली फ्रीज करते. त्याने ती जास्त मुरते. जितकी जास्त मुरते, तितकी अधिक चांगली लागते. Superbowl पार्टीच्या वेळेस ही हमखास लागतेच.
मांसाहारी करायची असल्यास बोका बर्गर वा टोफूच्या ऐवजी बीफ वा तत्सम काही घालतात.

माहितीचा स्रोत: 
मी - ट्रायल अँड एरर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ स्वाती
मस्त आहे ही रेसिपी. मी नेहमी व्हाईट चिकन चिली करते.
@लालू
छान दिसतेय चिली
@आश्विनी
सोया ग्रॅनुल्सची आयडिया आवडली. माझ्या कडे सोया ग्रॅनुल्स आहेत चुकून आणलेले ते आता वापरले जातील.
चिली स्टार्टर ऐवजी लसूण, तिखट, जीरे पावडर, ऑल स्पाइस, थोडी ओरॅगॅनो वापरूनही छान चव येते.

करणार आहे.
(धागा वर आणत आहे)
स्वाती२, स्टार्टर ऐवजी तू दिलेले पदार्थ घालून पाहीन.

खूप छान होते चिली ह्या रेसिपीने. मी कल्पु ने सांगितल्याप्रमाणे vegeterian crumbles वापरले होते बोका बर्गर ऐवजी.

ओके.. म्हणजे थोडक्यात राजमा उकडुन घ्यायचे आणि फोडणीत सिमला मिर्च, पनीर इ.इ.इ जे काही भारतात सापडेल ते घालायचे आणि पातळसर उसळ बनवायची. खाताना सजवुन खायचे... समझ गये. मला चिली स्टार्टर वगैरे काय ते कळतच नव्हते किती वेळ.

चिली स्टार्टर म्हणजे उसगावात मसाला मिळतो. त्यात काय काय आहे ते वरच्या चर्चेत लिहिले आहे. आपण आपल्या पद्धतीने फरक करून आवडल्यास नवीन रेसिपी म्हणून टाकू शकता किंवा इथेच प्रतिसादात लिहा, म्हणजे इतरांना त्याचा लाभ घेता येईल.
हा मूळ अमेरिकन पदार्थ असल्याने वरच्या रेसिपीला फोडणी नाहीच. माझ्या मुलांना आवडतो म्हणून मी व्हेजिटेरिअन पद्धतीने बनवून बघितला.

छान रेसिपी. आज केली होती. एकदम छान झाली.
काही पदार्थ नसल्याने प्रतिसादामधल्या सगळ्या टिप्सही वापरल्या Proud ( कणकेची, न्युट्रिला मिक्सर मधुन काढण्याची, चिली मसाला रिप्लेस्मेंटची)

आज केली ..

Chili.jpg

काही नोंदी .. Happy

१. काल घाईघाईत ग्रोसरीला गेले तेव्हा McCormick मसाला/चिली स्टार्टर काही दिसलं नाही .. पण मग Mrs. Dash extra spicy salt-free seasoning mix दिसलं ते आणलं आणि अंदाजाने वापरलं ..
२. तीन मध्यम आकाराचे टोमॅटो आणि एक डाइस्ड् टोमॅटो कॅन ज्युससकट वापरला.. पण मग सुरूवातीला म्हणावं तितकं रसदार(?) वाटलं नाही मग एक कॅन चिकन स्टॉक घातला .. (त्यानंतर थिकनिंग म्हणून कणकेचं roux(?) करून घातलं, नंतर तेही कमी वाटलं म्हणून तीन-चार किडनी बीन्स मॅश केले .. :p)
३. मी ह्यात ब्रॉकोली, गाजर, कॉर्न, हिरवी आणि लाल बेल पेपर्स ह्या भाज्या घातल्या (आवडतात म्हणून आणि यलोस्टोन च्या ट्रिपमध्ये बर्‍याच वेळा व्हेजि चिली खाल्ली तेव्हा त्यात होत्या म्हणूनही) ..
४. कांद्याबरोबर लसूणही घातली .. तसंच कांदा, लसूण परतताना मीठ/ब्लॅक पेपर घातलं ..
५. टोफू घातलं पण पुढच्या वेळी बोका पॅटी, व्हेजिटेरिअन क्रम्बल्स इ. ट्राय करून बघेन ..
५. चव मस्त, रेसिपीबद्दल आभार! Happy

Pages