एक कप कॉफी

Submitted by अतरंगी on 24 January, 2008 - 00:43

अशीच कोठेतरि वाचलेली एक गोष्ट.

संघमित्रा चे मनमोकळे भाग २ आणि झक्कि काकांची एका कुठल्यातरि बिबि वरिल पोस्ट वरुन आठवलि.

मराठी अनुवाद.

एकदा आपापल्या क्षेत्रात नावाजलेले चार पाच प्रतिथयश लोक आपल्या एक जुन्या प्रोफेसर ( गुरुजी म्हणुयात ) ना भेटायला गेले. निमित्त तसे बघायला गेलं तर नेहमीचेच होते, म्हणजे आज काल गुरुजींची तब्येत बरी नसायची.
गुरुजी म्हणजे तसे साधेच. कधी पैशाचा लोभ नाहि कि कधी वरच्या पदांसठी कोणापाशी वशिलेबाजी नाहि. फक्त ज्ञानदान आणि माणसे जोडणे हेच छंद त्यांनी आयुष्याभर जोपासले.

गुरुजींना भेटल्यावर जरा नेहमीची विचारपुस झाल्यावर गाडी नेहमीच्या संभाषनांकडे वळाली. हा कुठे असतो, तो कुठे असतो. हि भेटली होती, तिचा मुलगा ईकडे असतो वगैरे वगैरे. आज काल वेळच मिळत नाहि, खुप व्यस्त असतो, घरी पण जास्त वेळ देत येत नाही, कामाच्या व्यापातुन तब्येती कडे सुद्धा लक्ष देता येत नाही, ईथे येण्यासठि पण कसा बसा वेळ मिळाला, जवळ जवळ प्रत्येकाचा हाच सुर होत.

गुरुजींनी रंगलेल्या गप्पांकडे बघत मस्तपैकि कॉफी बनवायला टाकली. घरात असलेले जे काहि चार दोन मोडके तोडके कप होते त्यातुन ती कॉफि मुलांसमोर आली.
कॉफि पिता पिता गुरुजींनी “विचारले कशी झाली आहे कॉफी?”

सगळ्यांच्या कडुन एकजात उत्तर “छानच झाली आहे”

तितक्यात गुरुजींचा पुढचा प्रश्न आलाच,” तुम्हाला काहिंना सुंदर नविन कप मिळाले तर काहिंना जुने तुटके, कान तुटलेले कप मिळाले. काय करणार माझ्याकडे फक्त हेच कप आहेत.” सगळ्यांना गुरुजींच्या या वाक्या वर अवघडल्या सारखेच झाले.

एक जण कसातरि धीर करुन म्हणाला, “अहो गुरुजी कपांचं काय ते घेउन बसलात, तुम्ही आमच्या साठि ईतकि सुंदर कॉफि बनवलीत यातच खुप काहि आले.”

गुरुजि उत्तरले,
“मित्रांनो हे आयुष्य म्हणजे या कॉफि सारखे आहे. आणि तुमचं हे करियरचे चढते आलेख, हे ऐश्वर्य, हि मोठ मोठि घरे, या गाड्या, म्हणजे हा कप आहे जो फक्त आयुष्याला चांगले कोंदन देण्याचा प्रयत्न करतो. पण आपण सगळे हा कप सुंदर करायच्या नादात कॉफिची मजा घ्यायला विसरतो आहोत. कॉफीची चव हि कपावर अवलंबुन नसते.”

“हे यशस्वी करियर, हे ऐश्वर्य म्हणजे आयुष्य नव्हे, या गोष्टि जरुर मिळवा, यशस्वी होन्याचि महत्वाकांक्षा जरुर ठेवा. पण त्याच बरोबर, फक्त याच सर्व गोष्टि म्हणजे आयुष्य अस गैरसमज करुन घेउ नका.
हातातला कप जास्तीत जास्त सुंदर करायच्या प्रयत्नात खर्‍या आयुष्याची चव आणि गोडी चाखायला तर आपण विसरत नाहि ना याकडे पण लक्ष द्या.

गुलमोहर: 

छोटेखानी पण अप्रतिम कथा आहे. हे कशाचे भाषांतर आहे?

अप्रतिम,
सध्याची स्थिति तरी अशिच आहे..
मस्त वाटल वाचुन Happy

खुप समर्पक लिहिले आहे अगदी वास्तवाशी निगडीत आहे. असेच लिहित रहा.

अरे ही तर झेनकथा, मला वाटते मायबोलीवरच होती.. फक्त कॉफी च्या जागी सूप किवा नूडल्स असावेत..:)
~D

Happy

अच्छा झेन कथा आहे होय! असेल मला महित नाहि. मई फक्त अनुवाद करुन ईथे टाकली

अच्छा झेन कथा आहे होय! असेल मला महित नाहि. मी फक्त अनुवाद करुन ईथे टाकली