एक गोष्टं

Submitted by नविना on 24 September, 2009 - 13:21

पारुलचा फोन आल्याचं पप्पानी सान्गितला आणि घरचे सगळे धावत आलेत. कोमल आणि रितु सगळ्यात आधी!!!! आणि त्यांच्या मागे दादी!! कोमल ला रागवण्यासाठी. "कितनी बार बताना पडेगा इस लडकी को. जरा धीरे चला कर . दौड मत. पर किसीकी सुनेगी तो जैसे बुरा होगा ना." रितु नी पण मग गमतीनी कोमल ला रागवल्यासारखा केलं. दादी ला पण मग बरं वाटला. पण कोणाचा ऐकण्यासाठी कोमल चं लक्ष कुठे होता. ती उत्सुकतेनी पप्पांकडे पहात होती.
त्यांच्या चेहर्‍या वरचा आनन्द तिला सगळा काही सांगून गेला. पारुल चा रिझल्ट छान लागला होता. आणि पप्पा हळूच बोललेत. " शायद ये खबर मुझे पहले भी मिल सकती थी." बाकी कोणाला कदाचित काहीच सन्दर्भ लागला नाही, आणि कोणी ऐकला ही नाही कदाचित. पण कोमल आणि रितु मात्र हळूच हसल्यात पप्पांकडे पाहून. कोमल पुढे झाली आणि पप्पांच्या गळ्यात पडली. आणि हळूच म्हणाली " कोइ बात नही. पर मै खुश हु की आप खुश है."
तिच्या पासुन स्वतःला सोडवत त्यानी डोळे पुसलेत आणि नोकराला आवाज दिला मिठाइ आणण्यासाठी.

कोमल तेवढ्या ही श्रमानी थकली होती. हळु हळु चालत ती तिच्या आवडत्या खिडकी जवळच्या सोफ्यावर जावुन बसली. पप्पांनी मुद्दामच तो तिथे ठेवुन घेतला होता. तिला आवडतो म्हणुन. बरोबरच होता म्हणा त्यांची लाडकी बेटी घरी आली होती तिच्या पहिल्या वहिल्या बाळन्तपणासाठी. त्यांचा नातु येणार होता ना!!! खुप खुश होते ते. विचार करता करता कोमल कधी भुतकाळात गेली तिला पण नाही कळला.
कोमल, एका तालुक्याच्या गावी राहणार्‍या संयुक्त मारवाडी कुटुम्बातली एक मुलगी. घराचे प्रमुख तिचे बाबुजी म्हणजे आजोबा. तिची आजी म्हणजे मां. दोघही प्रेमळ पण बाबुजी कडक आणि थोडे कर्मठ. घरातल्या मुलींनी घरातच राहिला पाहिजे अगदी असंही नाही. पण जास्त शिकुन काय करायचा आहे असा विचार करणारे. थोडी 'typical Marvadi mentality'. असं सगळेच म्हणायचे. घरामध्ये त्यांचा शब्द शेवटचा. मां चा पण शब्द महत्वाचा पण त्यांच्या नन्तरच यायचा. बाबुजींचे वडील इथे महाराष्ट्रातल्या या गावात आलेत आणि इथेच स्थाइक झालेत.
त्यांची मुलं म्हणजे तिचे पप्पा धरुन चार मुलं आणि दोन मुली. मुलींची लग्नं झालेली. त्यापण आपापल्या घरी सुखात नान्दत होत्या. मोठा मुलगा जवळच एका शहराच्या ठिकाणी स्थाइक झालेला. त्याचं कुटुम्ब म्हणजे २ मुलं, १ मुलगी म्हणजे तिची लाडकी दिपा जीजी आणि कोमल ची बडी मम्मी. महिन्यातुन एकदा नक्की मोठ्या घरी येणारे. बडे पप्पांचा पण घरात बर्‍यापैकी दरारा. घराच्या बाहेर राहून पण घरातल्या निर्णयांमध्ये महत्वाचा सहभाग. कोमल ला कधी कधी राग पण यायचा पण काही इलाज नव्हता. तिचे पप्पा पण काही फारसा आक्षेप घेत नसत त्यामुळे बाकीचे लहान भाऊ तर शक्यच नाही.
घरात पुर्णपणे व्यवसायी वातावरण. बडे पप्पांची नोकरी पण निमित्तमात्र. तिचे पप्पा जिनिंग प्रेसिंन्गच्या व्यवसायात. छोटे दोन्ही चाचु पण घरातलीच दुकानं वगैरे बघायचे.
सगळी मिळुन घरात २० तरी माणसं असायची. नोकर चाकर मिळुन. तिची दोन्ही चाची तिच्या फार लाडक्या. एकदम लाडक्या. कोमल घरातल्या सगळ्या लहान मुलांमधे मोठी. बडे पप्पांची मुलं सोडलीत तर.
तिला २ लहान सख्या बहिणी. रितु आणि पारुल.
घराचं नशिबच अस की तिथल्या मुली नेहमीच मुलांना outperform करायच्या. मुलांनी शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज नाही असंच सगळ्यांना वाटायचं. मुली मात्र खरंच हुशार होत्या.
१२-१३ वर्षांआधी दिपा जीजी चा १० वी चा रिझल्ट आला. तिला ८०% मिळाले होते. ती तर खुश होतीच खुप कारण दिपा जिजि ला बडे पप्पांनी सांगितला होता चांगला रिझल्ट असला तर तिल जे हवं ते शिकता येइल. त्यामुळे जेव्हा तिने म्हटलं तिला engineering ला जायचंय आणि त्यासाठी तिला १२वी science ला जावं लागेल तेव्हा तिला खात्री होती की बडे पप्पा नाही म्हणणार नाहीत. पण हा पण आडवा आला. आणि त्यानी नाही म्हटलंच. कोणी काही म्हणणं शक्यच नव्हतं. शेवटी तिच्या बडी मम्मी ने तोडगा शोधला आणि दिपाजीजी ने polytechnic ला fashion designing ला admission घेतली. बडे पप्पांनी याला पण विरोध केलाच पण शेवटी हो म्हटलं. पण यावेळी बाबुजी मात्र खुपच नाराज झालेत.
कोमलला या वेळी वाटले होते कदाचित हिच सुरुवात आहे. माझ्यासाठी मार्ग मोकळा झाला नसेनाका पण कुठेतरी मिणमिणता उजेड तर निर्माण झाला होता.
त्यामुळे जेव्हा एक वर्षां नन्तर त्याच घरात कोमलचा दहावीचा रिझल्ट आला तेव्हा किती आनन्द झाला होता तिला. ८५% टक्के मिळाले होते. सगळेच आनन्दी होते. आणि कोमल ने अचानक पप्पांना म्हटले तिला बाहेर मोठ्या शहरात जायचं होता. पुढे शिकण्यासाठी. झालं तिथेच सगळा संपलं. घरात कोण गहजब झाला. तिचे बाबुजी तर भडकलेच पण पप्पा सुद्धा चिडले होते. हे काय चाललं आहे म्हणुन. बडे पप्पा आणि पप्पांचं पण भांडण झालेलं की तुझ्या मुली मुळेच माझी मुलगी अश्या काही मागण्या करते म्हणुन. तू तुझ्या मुलीचे लाड केलेत तरी मी ते करणार नाही. कोमलची जिवाभावाची मैत्रिण रुतुजा पण येउन बोलली तिच्या पप्पांशी. पण त्यांचा म्हणणं एकच. माझ्या बाबुजींच्या इच्छे बाहेर मी जाणार नाही. बाबुजींनी पण मग आपलं म्हणणं धरुन लावलं. आणि शेवटी कोमल ला एका अटीवर science ला admission घ्यायला मिळाली, की त्यानन्तर ती बी. कॉम ला जाइल. कोमल ने तेवढ्यावर पण समाधान मानलं, आणि विचार केला ठीक आहे, मी १२ वी मध्ये अजुन चांगले मार्क्स मिळवीन आणि मग पप्पा काही म्हणणार नाहीत.
रुतुजा पण आता मोठ्या शहरात गेली होती शिकण्यासाठी. कोमलनी पण आपला अभ्यास सुरू केला. ती हुशार होतीच त्यामुळे काही फार कठीण नव्हतं तिच्यासाठी.२ वर्ष निघुन गेली आणि कोमलचा १२वी चा रिझल्ट आला. तिला ८१% मिळालेत. पण सायन्स ग्रुप ला ९८% होते. तिची मेहनत वाया गेली नव्हती. आणि यावेळी पुन्हा तिला वाटलं आता तरी पप्पा हो म्हणतील तिच्या पुढच्या शिक्षणासाठी. खूप अभ्यास केला होता तिने. तो पाहिला होता त्यांनी. आणि तिला माहिती होतं त्यांना तिचं खूप कौतुक पण आहे. पण २ वर्षा मध्ये खूप काही बदललं नव्हतं. म्हणायला आता तिच्या पप्पांना पण इच्छा होती तिला शिकवण्याची, पण मग माहिती नाही काय झालं ते. त्यानी पुन्हा एकदा तिला नकार दिला. कोमल खूप रडली होती. तिचे १२वी चे एक लेक्चरर पण घरी येउन सगळ्यांशी बोलून गेले. समजावुन गेलेत. पण काहीही परिणाम झाला नाही. कोमल ने शेवटी गावातच बी. कॉम जॉइन केला. प्रकरण संपलं असं वाटत असतानाच रितुचं १२वी झाला. आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रश्ण पुन्हा ऐरणीवर आला. पुन्हा सगळं तेच. पण यावेळी कोमल रितुच्या पाठीशी उभी होती. आणि रितु ने बी. कॉम सोबतच काही पार्ट टाइम कोर्स करायला परवानगी मिळवलीच. त्या दोघी तर त्यातही खुश होत्या. कोमलचं ग्रॅजुएशन झाला. आणि लगेच घरी लग्नाबद्दल तयारी सुरु झाली. एकाठिकाणी सगळं जुळून पण आलं. हितेश जवळच्याच एका शहरातला होता. MBA झाला होता. घरचाच व्यवसाय साम्भाळत होता. बास घरच्याना एवढा पुरे होतं. लग्न ठरलं आणि झालं पण. कोमल आपल्या घरी गेली. ती तिथे रुळली. अधून मधून माहेरी येणं जाणं होतं. सगळं छान चाललं होता. पण ह्या सगळ्या मध्ये एक सो कॉल्ड ग्रेट घटना मात्र घडली होता. कोमल ची लहान बहीण चक्क engg ला गेली होती. सगळ्या घरच्यांना वाटायचं असं कसं झालं. पण ते झालं होतं मात्र.
कोमल ला तो दिवस आठवला. तिचं लग्न ठरल्याचा. घरचे सगळेच खुप खूश होते. त्याच आनन्दात पप्पांनी कोमल ला विचारलं तिला तिच्या लग्नासाठी काय स्पेशल गिफ्ट हवंय. कोमल ने हळुच त्याना सान्गितला होतं "वैसे तो मुझे कुछ नही चाहिये, पर आप अब पुछ ही रहे हो तो पारुल को engg मे जाने दो न पापा. प्लीज!!!"
तिचे पप्पा तिच्या कडे पहातच राहिलेत. त्याना क्षण भर कळलंच नाही. आणि त्यांनी झटकन "ठीक है" म्हटलं. पण मग ते नाराज होत हळूच म्हणाले "पर अब ये कैसे हो सकता है? पारुल की १२ वी हो गया बेटा इसी साल. और उसने तो entrance दी ही नही." त्या वर्षी engg entrance चं पहिलं वर्ष होता महाराष्ट्रात. कोमल ने त्याना पुन्हा एकदा विचारलं "पर आपको कोइ दिक्कत तो नही है ना अगर वो आगे पढे तो?" . तिच्या पप्पांनी जस्सं "नही" म्हटलं तशीच ती धावत आणि ओरडतंच आई, रितु आणि पारुल कडे गेली. झालं असं होतं, १ दिवसा आधीच पारुल चा पण १२वीचा रिझल्ट आला होता. आणि पप्पांच्या नकळत कोमल आणि रितु ने आईला विश्वसात घेउन पारुल चा entrance चा फॉर्म भरला होता. आणि तिची ती exam पण झाली होती. दोघी मोठ्या बहिणी फक्त सन्धीची वाटच बघत होत्या पप्पांचं मन वळवण्यासाठी. आणि ती सन्धी त्याना मिळाली होती. पारुल ने पण त्या सन्धीचं सोनं केलं होता. entrance ला चांगले मार्क्स मिळाले होते तिला. एका चांगल्या college मध्ये admission मिळाली. त्यानन्तर ६-८ महिन्यात कोमलचं लग्न झाला. ती तिच्या घरी गेली.

पाहता पाहता ४ वर्ष निघुन गेलीत. कोमल आज आपल्या पहिल्या बाळन्तपणासाठी माहेरी आली होती. रितुचं पण लग्न झालं होता मागच्याच वर्षी. ती पण आली होती कोमल ला भेटायला. आणि पुन्हा एकदा रितु चा आवाज घरात घुमला. " ओ प्यारी जिजी, हितेश जिजु आये है. अगर मिलना है तो नीचे आ जा. वो जरा जल्दि मे है. कहते है उपर आकर मिलने की फुर्सत नही है." रितुचं हे नेहमीचंच होतं. हितेश समोर असला की ती कोमल ला खूप त्रास द्यायची. मग हितेश कडुन काही तरी उकळुन मगंच त्याला सोडायची. तो पण लाडकी साळी म्हणुन तिचे सगळे नखरे उचलायचा.
विचार करत करतच हितेश तिथे आला सुद्धा. तिच्या जवळ बसत म्हणाला "कैसी हो?". हळुच तिच्या खान्द्याभोवति हात टाकत म्हणाला " याद आ रही थी तो सोचा मिल आऊ तुम्हे." कोमल ने हळूच त्याला दटावलं" मैने तुमसे कब पछा क्यूं आये हो?". आणि म्हणतच त्याच्या खान्द्यावर डोकं टेकवून त्याला अचानक एक प्रश्ण विचारला "अपना promise भुलोगे तो नही?" माहेरी येण्याआधी, हितेश ने तिला promise केलं होता "लडका हो या लडकी मै अपने बच्चे को उसकी मर्जी से पढाउंगा." हितेशने आता फक्त तिला जवळ घेत आपलं promise confirm केलं.

ही एक सत्य घटना आहे. पात्रांची नावं बदललीत मी फक्त. खुप dramatise नाही केला त्यामुळे थोडं रटाळ वाटू शकतं.

---नवीना

गुलमोहर: 

कथा चांगली आहे.....पण जरा शुध्दलेखनाकडे लक्ष दिले असते तर अजुन मज्जा आली असती वाचतांना....पण चांगला विचार मांडला आहे....

मला ही कथेचं बिज आवडलं. मोठ्या आणि सनातनी कुटुंबात वाढणार्‍या मुलिंच्या कला-गुणांना आणि हुशारीला बर्‍याच वेळेला वाव मिळत नाही. मी ही अशी बरीच उदाहरणं पाहिली आहेत.
दुर्दैवाने हे भारतात अजूनही काही ठिकाणी सुरू आहे. Sad

एक सुचवावसं वाटतं. तुम्ही खूप ठिकानी झाला, केला असं लिहिलंय... उदा.
>>आता फक्त तिला जवळ घेत आपला promise confirm केला. >>
>>पण २ वर्षा मध्ये खूप काही बदलला नव्हता >>
>>झाले तिथेच सगळा संपला >>

तुम्ही कथेला खास मारवाडी टच देण्यासाठी असं लिहिलंय का? पण तसं ते रूचत नाही फारसं.
खटकतंय वाचताना...

धन्यवाद मधुरा आणि दक्षिणा. मी मराठीतून पहिल्यांदाच लिहितेय. त्यामुळे नाही लक्षात आल्यात ह्या चुका. होइल सवय हळुहळु. Hopefully!!! आता काही बदल केलेत. कदाचित आता सुसह्य होइल वाचणं.

chan ahe gosth...aavadli..sadhi,saral aani sulabh vatli..majhya pan kahi marwari frds ahet so mala mahit ahe tyanchya ghari ase aste..pan halli jamana badalto ahe..jyana eudcation ghayache ahe pudhe te shikat ahet..pudhil lekhnasathi khup sarya shubheccha!!!keep it up..:)