एका ID ची कथा !

Submitted by कवठीचाफा on 24 September, 2009 - 03:55

तिन-साडेतीन वर्षापुर्वीची गोष्ट, एका काळोख्या रात्री एका निर्जन भागातल्या स्मशानातुन ‘तो’ आळोखेपीळोखे देत जागा झाला. त्याची झोप ही अशीच अनिश्चीत कालावधीची. कधीही जाग येईल तेंव्हा उठायचे नाहीतर वर्षानुवर्ष झोपेतच जात असत. आताही तो उठला किती काळाने हे त्यालाही सांगता आले नसते.

आळस झटकुन त्याने आजुबाजुचा अंदाज घेतला. खाण्यापिण्याची काळजी नव्हतीच पण रहाण्यासाठी जागेची गरज निकडीची होती. आता त्यासाठी त्याची भटकंती सुरु झाली.पुर्वी सारखा दिवट्यावगैरे नाचवत त्याला एखाद्या पडक्या वाड्यात रहाता येणार नव्हते कारण एव्हाना जग बदलले होते. ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहील्या होत्या. पडक्याच काय पण एखाद्या धडक्या वाड्याचेही नावनिशाण नव्हते. दुसरी गरज त्याची वेळ घालवण्याची होती. त्यासाठी काय करावे याबद्दल त्याचे विचारचक्र सुरु झाले. तसे त्याला कुठेही रहाता येणे शक्य होते पण त्याला माणसांच्यात मिसळायचे होते बदललेले जग जाणुन घ्यायचे होते. अश्या एखाद्या उपयुक्त जागेच्या शोधात त्याने बराच वेळ घालवला आणि त्याला योग्य ठिकाण सापडले. बदलत्या तंत्रड्न्यानेच त्याला ही संधी उपलब्ध करुन दिली. त्याने सरळ एका सर्व्हरमधे मुक्काम ठोकला. आता प्रश्न होता नव्या जगातल्या करमणुकीचा त्यासाठीही त्याला सर्वोत्तम ठिकाण सापडले. ‘मायबोली’ नावाची वेबसाईट, त्याने तिथे शिरकाव केला, अचानक कुणाच्याही नजरेला न जाणवेल असा. एका इरसाल आय.डी. ने तो मायबोलीवर वावरु लागला. सुरुवातीला त्याच्या भेटी देण्याचे ठिकाण ठरावीक होते पण हळूहळू त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. पुर्वापारचे अनुभव आणि माहीती गाठीशी असल्याने त्याचा वावर सर्वत्र दिसु लागला. मायबोलीकरही त्याला चांगलेच ओळखायला लागले. त्याचा वेळ छान मजेत जात होता. अचानक त्याला त्याच्या माहीतीची विचारणा व्हायला लागली. त्यासाठी त्याला थोडा विचार करावाच लागला. मग त्याने आपण एका दुरदेशी रहात असल्याचे सांगुन टाकले. त्यामुळे त्याला कुणी भेटायला येण्याची शक्यता नव्हतीच. असे अनेक मायबोलीकर जगभर पसरले असल्याने त्याचा हा बहाणाही सहज खपुन गेला. त्यातच त्याने एका मित्राला त्याच दुरदेशातुन एक वस्तु मिळवुन दिली अर्थात हा त्याचा डाव्या हातचा खेळ होता म्हणा, पण त्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा दाखला मिळाल्यासारखे झाले.

दिवस, महीने सरत होते त्याची मित्रमंडळी वाढतच होती, आता त्याला गुगलचा वापर करणे भाग पडले. नाहीतर त्याच्याशी गप्पा मारणारी मित्रमंडळी त्याला भेटणार कशी? लोकप्रीयता वाढत गेली मित्रमंडळ विस्तारत गेले. आता सर्वांना ओढ होती ती त्याला प्रत्यक्शात भेटायची, ते त्याला कदापी शक्य नव्हते. वेळ मारुन नेण्यासाठी त्याने मायदेशी परत येण्याची तयारी करत असल्याचे सांगीतले आणि अनेकवेळा तेच सांगत राहीला. मित्रमंडळीही स्वस्थ बसे ना ! त्यामुळे त्याने आणखी एका अधुनीक उपकरणाचा आधार घेतला. ‘मोबाईल’ त्यावरुन त्याने काहींना फ़ोनही केले. अर्थात फ़ोन करणारी व्यक्ती नेमकी त्या सेकंदाला कुठे आहे हे कळत नसल्याने सगळ्यांनाच त्याच्या अस्तित्वाची खात्री पटली.

शेवटी अनेकवेळा मायदेशी येणे लांबवत राहील्यावर अखेर त्याला मायदेशी येणे भाग पडले निदान तसे दर्शवणे तरी भाग पडले. मायदेशातुन त्याने जवळपास सगळ्याच मित्रमैत्रीणींना फ़ोन केले त्यामुळे ‘आता हा भेटणार’ अशी सर्वांचीच खात्री पटली. भेटायची उत्कंठा तर प्रत्येकालाच लागलेली पण त्याला तसे करणे शक्य नव्हते. अखेरीस सर्वांनाच फ़ोन करत राहुन भेटण्याची खात्री देणे याखेरीज त्याला सध्यातरी पर्याय नव्हता. शेवटी त्यालाच हे मित्रमंडळींचे प्रेम सोसवेना त्यामुळे त्याने पुन्हा एकदा शितनिद्रेत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो अदृष्य झाला.

कुणास ठाउक आता कुठे असेल ‘तो’. कोणत्या दुस-या नावाने वावरत असेल? की कोणत्या वेबसाईटवर असेल? की पुन्हा त्याच्या अनिर्णीत शितनिद्रेत गेला असेल? प्रश्न मलाही पडलेले आहेत पण उत्तर फ़क्त तोच देउ शकेल जेंव्हा केंव्हा त्याला जाग येईल तेंव्हा.

तळटीप : कृपया गृपबाजीचा आरोप करु नये केवळ गंमत म्हणुन लिहीलेली गोष्ट आहे !

गुलमोहर: 

अरेरे... चाफ्या अमिताभ बच्चनचा पिक्चर बघायला जावे अन त्याने अनिल धवन सारखे करावे तसे झाले...

चाफ्या "तो" भेटला की त्याला माझ्या वतीन भरपुर फुल्या फुल्या फुल्या दे.
मला भेटला तर मी देइन त्याला फुल्या फुल्या फुल्या तुझ्यावतीने.

झकोबा, या आयडी(या) च्या कल्पनेने केद्या रोमातुन सक्रीय झाला होता पण यावेळी ही आयडीयापण फेल रे ! Happy
roobeenhood,akhi,shree,yogita :
सॉरी , पण ही कथाच एका आय डी साठी लिहीलेली होती .

चाफा, मी तर प्रेमातच पडलेय बहुतेक या कथेच्या. खूप खूप ......आवडली. तुझ्याकडून अपेक्षा फार वेगळी होती.पण, छानच वाट्ली. सुपर्ब.