लेगो शैक्षणिक साधन

Submitted by विनायक.रानडे on 18 September, 2009 - 02:57

lego1.jpglego2.jpglego3.jpglego4.jpglego5.jpg
वयाच्या ४ वर्षा पासून मी माझ्या मोठ्या मुलाला लेगो खेळणी आणली. त्या छोट्या भागांची
जुळणी करण्यात तो रमुन जात असे. वयाच्या १० वर्षा पर्यंत ह्या लेगोत खूप पैसे गुंतवले. त्याचा
फायदा आज होत आहे. कल्पकता, समतोल, कोणता भाग कुठे जोडायचा हे शिक्षण त्याला त्या
लहान वयात मी देऊ शकलो. निकॉन कूलपिक्स ९९०.

गुलमोहर: 

आयला, कस्ल भारी हे! Happy
तुझ्या पोरान्चा मला हेवा वाटतो रे भो! Happy
मला तर अजुनही अशी खेळणी मिळाली तर खेळायला आवडेल! Happy कुठे मिळतात ही?
की झक्कीन्ना सान्गु पुढच्या वेळेस माझ्याकरता आणायला?

लहानपणी आम्ही मेक्यानो घेऊन खेळायचो, तेव्हा प्ल्यास्टिक नव्हते, सगळ लोखण्डि! अन सगळे पार्टस भरपुर असायचे, जाम मजा यायची!
नन्तर त्यातल काहिच मिळेनास झाल, जे मिळत ते प्ल्यास्टिकच Sad
झालच तर चतुशृन्गी जत्रेतून रुळान्वर चालणारी किल्लीची रेल्वे आणायचो, तीन वर्षे सलग आणली, मग सगळे रूळ एकत्र जोडत मोठ्ठा ट्रॅक...... यन्व रे यन्व! हे सगळ लोखण्डीच असायच, एकदम दणकट!

आयला, ते वरले फोटू बघुन भारीच हुरहुर लागली बोवा!
[आता असल खेळण मिळवणं हाच यावरील उपाय]

फारच जबरी.. माझा अत्यंत आवडता खेळ होता लेगो हा.. अजूनही काही तुकडे शिल्लक आहेत त्यातले.. त्याची एक छोटी गाडी बनवून ठेवली आहे घरात..