सात बावन्नची मेट्रो - दिवस पहिला.

Submitted by shreyasirudra on 17 September, 2009 - 13:42

सात बावन्नची मेट्रो - दिवस पहिला

आज अमेरिकेत येउन नुकतेच ७-८ दिवस झाले आहेत. एक नवीन नोकरी मिळाली आहे, आणि ती ही वॉशिंगट्न डी.सी मध्ये. मी रहाते व्हर्जिनीया नवच्या एका छोट्या गावत; जे वॉशिंगट्न डी.सी पेक्षा १० मैल दूर आहे. जण्यासठी एक बस आणि मग मेट्रो करवी लागते. पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर काटाच आला. पुण्याची सवय, पेशवाई थाट अजून मनातून बाहेर पडत नाही. मुंबई प्रमाणे लोकल चा प्रवास जमणारच नाही अस वाटलं पहिल्यांदा......पण मग पहिला दिवस उजाडला सकाळी बस स्टॉप पाशी पोहोचले, बस आली आत चढून पैसे टाकून त्या यंत्राने होकाराचा बीप दिला. आत गेले नजर जणू कोण्या ओळखीचा चेहरा शोधत होती. रंगबिरंगी केस निरनिराळे चेहरे कधीही न पहिलेले अज्ञात...कोणी फट्ट गोरं तर कोणी ठीक्कर काळं. सगळेच चेहरे मी बघत होते कोणी नवी नवरी सासरी पहिलं पाऊल टाकताना जडं अंतकरणाने सगळ्यांच्या चेहर्‍यावरिल भाव जाणण्याच्या प्रयत्नात असते नं अगदी तशीच. मग मी एका आजीबाईंच्या शेजारी जाऊन बसले, त्या कदचित चिन किंवा जपान च्या असाव्यात, छोटे छोटे मिचमिचे डोळे ...माझ्याकडे बघून एक छानस स्मितं हास्य केलं. मला एकदम हायसं वाटलं, अगदी वाळवंटात मृगजळ दिसावं त्या प्रमाणे. आजीबाईंच्या हातात एक पुस्तकं होतं. माझ्याकडचा हास्य कटाक्ष वळ्वून त्या परत त्यांच्या पुस्तकाकडे वळाल्या. बस चा सगळा वेळ आज खिड्कीतून बाहेर बघण्यातच गेला. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीदाट गर्द झाडी, मोटर गाड्यांनी भरलेला मोठ्ठा रस्ता. बघता बघता बस मेट्रो स्टेशन ला पोहोचली. लांब वर पसरलेले रूळ, स्वच्छ मेट्रो, मोठ्या मोठ्या काचा अन छान छान कापड्यातली माणसं. नवख्या जगातला पहिला दिवस एकदम अविस्मरणीय होता. ऊद्याच्या दिवसाची आता उत्सुकतेने वाट बघत आहे.

गुलमोहर: 

पेशवाई थाट? म्हणजे स्वतःची गाडी होती वाटते? वातानुकुलीत, पाच CD changer, leather heated seats, satelite radio इ. इ. ? मग इथे पण घ्या की एक लेक्सस! पुनः पेशवाई! हाकानाका!

आर्चचे म्हणणे मनावर घ्या. तसे व्हर्जिनिया बरेच मोठे राज्य आहे. अनेक गावे आहेत त्यात, अगदी 'वॉशिंगट्न डी.सी पेक्षा १० मैल दूर' सुद्धा.

बाकी डीसी मध्ये मायबोलीकर लालू नि रुनि आहेतच.

धन्यवाद!

पेशवाई थाटा बद्द्ल मी सहजच वाक्य लीहलं होतं. बघू पुण्याबद्द्ल लिहिन कधीतरी.
सध्या तरी सात बावन्न ची मेट्रो लीहणार आहे.
पहिल्यांदाच लिहीती आहे चूका माफ करा.

हे सर्व काल्प्नीक आहे. मला व्हर्जीनीया हे राज्य आहे त्याची पूर्ण कल्पना आहे.
डोलारा तयार करावयास मी त्याचा उल्लेख गाव म्हणून केला आहे.

आ॑णि शेठ हे पुण्यात शिवाजी काळात गुजराथ वरून आले. पेशवाई काळात पुण्यातच होते.

श्रेयसी.