मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्‍या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय?

Submitted by मदत_समिती on 13 September, 2009 - 20:01

मायबोलीकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे असे खास वेगळे शब्द निर्माण करून वा शब्दांची लघुरुपे वापरात आणून ती नेहमीची केली आहेत. या शब्दांची सूची व त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी "मायबोलीवरील विशेष शब्द" हा आपली मायबोली या ग्रुपमधला दुवा पहावा. तसेच वेळोवेळी या दुव्यावरील संकलनात भर घालावी.

हो.
'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही' असं येतंय. आणि कुठला ग्रूप तेही दिसत नाहिये, सभासद व्हायला.

हितगुज विषयानुसार बघा- आणि अवांतर मधे 'माहिती हवी आहे 'ह्या ग्रुपमधे सामिल व्हा तिथे दिसेल.
खरतर कादेपोहेनी दिलेल्या दुव्यावर देखील दिसतयं.

'मदत हवी आहे' या ग्रुपची सभासद असून देखिल 'मायबोलीवरील विशेष शब्द' ला 'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही' असं येतंय

गेट टुगेदर ह्या शब्दाचे संक्षिप्त मराठीकरण !
अधिक टिपा : त्याला काही लोकं जीटीजी असंही म्हणतात. जर शुद्ध मराठीत बोलायला आवडत असेल तर एवेएठी असंही म्हणतात. म्हणजे 'एका वेळी एका ठिकाणी'. हा शब्द बहुतेक झक्की ह्या ज्येष्ट मायबोलीकरांनी पहिल्यांदा वापरला Happy

रच्याकने >>> रस्त्याच्या कडे ने BTW , इथे कुणाच्या सुपिक डोक्यातुन काय काय शॉर्टफॉर्म निघतील काही सांगता येत नाही Proud

शिट्टीकर : CT (Connecticut, USA) इथे रहाणारे
बा.रा.. -बाग राज्य (Garden State New Jersey)
बाराकर - बाग राज्यात रहाणारे
पाशां - पांढरी शाई (पूर्वी जुन्या मायबोलीवर पांढर्‍या शाईने लिहीता येत असे.. त्यामुळे ते Mouse ने Highlight केल्याशिवाय दिसत नसे).

अगो: रच्याकने 'ए.वे.ए.ठि.' ही माझी कल्पना आहे...

झब्बु देने म्हणजे काय??>>> धाग्या विषयी संबधित फोटो ( साहित्य) दुसर्‍याने पण प्रकाशीत करणे.

>>रच्याकने म्हणजे काय? कोणी व्यक्ती आहे का?
Rofl

झब्बु हा एक पत्त्यांचा खेळ आहे रे, त्यावरून घेतले आहे.. श्री चे बरोबर आहे

'पार्ले' या शब्दाचा अर्थ काय? पायरेट्स वपरतात तसे काही आहे का? मी असे ऐकले आहे की या नावाचा एक बाफ आहे आणि कोणते बाफ बंद होणार, कोणते सुरु होणार वगैरे सर्व तिथे ठरते. या पायरेट लँड मध्ये कसे पोचायचे?

पार्ले हे 'दहशतवादी प्रशिक्षण केंद्र' असून तो एक स्वतंत्र ग्रूप आहे. त्याचे सर्व सदस्य 'दहशतवादी' मध्ये मोडतात, मग ते तिथल्या धाग्यांवर लिहीत असतील किंवा नसतील. तुम्हाला चालणार असेल तर ग्रूपचे सदस्य व्हा मग तिथे पोचता येईल.

Pages