मध्यरात्री २ चा प्रहर

Submitted by sas on 6 September, 2009 - 23:05

जीवनात कधी कोणती डोकेदुखी सुरु होईल याचा नेम नाही. आता बाकिचे प्रोब्लेम्स कमी होते काय? त्यात आणखी एका समस्येची नव्हे त्रासाची भर झाली. कॅलीफोरनियातुन इथे शीफ्ट झालो तेव्हा नवर्‍याने अपार्टमेंन्ट बुक करुन ठेवल होत. नवर्‍याच्या कुठल्याहि गोष्टिला बायकोचा प्रथम नकार आणी नापसंती ह्या बहु मताला खर करत मी नवर्‍याने बुक केलेल्या अपर्टमेंन्टला सुरवातीला नाक मुरडल, कुरकुर केली. कॅलीफोर्नियातल्या अपार्टमेंन्ट च्या मानाने हि अपार्टमेंट लहान हे कारण कुरकुर करायला पुरेस होत आणी खर हि होत.

ह्या भागातल्या अपार्टमेंन्टस अगदि नाळक्या बोळक्या आहेत. एक बेडरुम ची अपार्टमेंन्ट, बेडरुम बॅगांनिच भरल. क्लॉजेट मध्ये कश्या बश्या ३ बॅगा बसविल्यात आणी बाकिच्या मोठाल्या ३ बॅगा ज्यांचा ऊपयोग कपाटां सारखा करावा लागतो त्या बेडरुम मध्ये आडव्या पसारल्यात; (रोज लागणार्‍या बॅगा रोज ऊभ्या आडव्या करण्याची कसरत खरच नकोशी होते) पण त्यानेच बेडरुम भरल. हे बेडरुम ईतक लहान आहे कि यात दोन जणांना लागणारी क्विन साईज गादि जर बसवायची म्हटली तर मग मोकळी अशी जागा शील्लकच रहात नाही मग बॅगा कुठे ठेवल्या असत्या. लिविंग रुम मध्ये बॅगांचा पसारा नकोसा वाटतो. गादि विकत घ्यायची नाही खालीच पांघरुण पसरुन झोपायच अस ठाम असल्याने हा प्रश्न तेवढा कमी झाला.

हे झाल बेडरुमच किचन ची तर्‍हा अजुनच न्यारी. किचन मध्ये स्टोव्ह च्या बाजुला काऊंटरच नाही. सोव्हच्या समोर सींक आहे त्याच्या दोन्हि बाजुला काऊंटर आहे पण एक बाजु धुतलेली भांडी, वॉटर फिल्टर, ईतर किरकोळ सामान याने भरलेली आणी दुसरी बाजु भाजी चिरायला, पिठ मळायला ई. स्वयंपाकाच्या कामासाठी... मग रोज लागणार तेल, मसाले, मीठ कुठे ठेवायचे? खरी अडचन स्वयंपाक करतांना स्टोव्ह वरुन तयार भाजी चा पॅन वा कुकर ऊतरवायचा असला कि हा गरम पॅन वा कुकर ठेवायचा कुठे??? ... स्टोव्हच्या बाजुला काऊंटर नाही आणी खाली कारपेट वर गरम भांड ठेवता येत नाही. आता किचन मध्ये लहान टेबल आणयचा तर पुन्हा शिफ्टिंग च्या वेळी त्रास आणी ऊगाच खर्च नको म्हणुन किचन मध्ये मोठाले २-३ खोके स्टोव्ह जवळ ठेवुन त्यावर मीठ, मसाले, तेल वै ठेवायची सोय केली, त्यावरच गरम कुकर वै. ठेवता येतो.

लिविंग रुम मध्ये डायनिंग टेबल, खुर्च्या, लॅम्प, सामानाचे तीन बॉक्स, एका बॉक्स वर मॅक्रोवेव आणी पसरवलेल मोठ पांघरुण. हे पांघरुण म्हणजे आमचा सोफा, काऊच, बेड सगळ एकातच.

अश्या प्रकारे आमच बिर्‍हाण बसल आणी पुन्हा अ‍ॅडजेस्टमेंन्ट हा गुण असलेल मध्यम वर्गीय रक्त खालच्या दर्ज्याच मध्यम वर्गीय जीवन जगु लागल. नवरा इथे होता तोवर ठीक होत पण तो गेल्यावर मात्र मला आता सार सहन शक्ती पली कडे वाटु लागल आहे, नवरा इथे होता तोवर ज्या गोष्टि माझ्या लक्षात आल्या नव्हत्या त्या आता डोक्याचा ताप झाल्यात.

जमा झालेला कचरा फेकायचा म्हटल तर रस्ता क्रॉस करुन अंतरावर जाव लागत, आमच्या अपार्ट बिल्डिंग जवळ गारबेज जी व्यवस्था नाही, लाँन्ड्रि सुद्धा दुसर्‍या बिल्डिंग मध्ये रस्ता क्रॉस करुन, जीम हि आणखी पलीकडच्या अपार्टमेंन्ट बिल्डिंग मध्ये... अपार्टमेंन्ट घेतांना ह्या गोष्टि नवर्‍याने बघायला नको होत्या का?... सगळ्यात शेवटच्या बिल्डिंग मधल अपार्टमेंट घेतल वरुन भाड ईतर बिल्डिंगस पेक्षा $२० जास्त कारण काय तर ह्या बिल्डिंग मध्ये नवे किचन कॅबिनेट आहेत. मी आजवर जीम च तोंड पाहिलेल नाही काय ऊपयोग जीम, लाँड्री असलेली अपार्टमेंन्ट घेवुन!!!... पण आता कुरकुर करुन काय ऊपयोग ???.....पार्किंग हि लांबवर आहे. बर्फाच्या थंडित सामान घेवुन आल कि सामान अपार्टमेंट पर्यंत आणता आणता बर्फात कधी पाय घसरेल आणी कधी डोक फुटेल नेम नाही.

हे सगळ कमी होत कि काय म्हणुन आता एक नवा व्याप सुरु झाला अहे. गेल्या दोन महिन्यांन पासुन झोपेच वाटोळ झाल आहे. हि अपार्टमेंट ईतकि भयंकर आहे कि वरच्या मजल्या वर कुणी नुसत चालत असल तरी आमच्या टेबला वर ठेवलेल्या प्लेटा थरथरतात, ठणठण आवाज येतो. अपार्टमेंन्ट बिल्डिंगच दार कुणी ऊघडल बंद केल तरी आमची अपार्टमेंन्ट व्हायब्रेट होते. त्यात रात्री च्या वेळी असे आवज होत असतील तर झोप पुर्ण मोडते.

आमच्या वरच्या मजल्या वर कोण रहात हे मला माहित नाही पण हि व्यक्ती रात्री २ वा, कधी २.२२ ला कधी २:३० ला काल रात्री २:३७ ला अपार्टमेंन्ट मध्ये जोर जोरात चालते त्यामुळे आमची अपार्टमेंन्ट व्हायब्रेट होते आणी पायांच्या ठकठक आवाजाने झोप मोड तर होतेच पण डोक हि दुखायला लागत... गेल्या दोन महिन्यां पासुन हा त्रास वाढला आहे... मध्य रात्री २ च्या प्रहराला अपार्टमेंट मध्ये चालण्याच तेहि दणादण पाय ऊचलत चालण्याची काय गरज पडत असेल ह्या माणसाला काही कळत नाही

आधी, वर कुणीतरी भारतीय हि रहायचा; सध्या असलेल्याचा रुममेट होता तो कदाचित....तो आता नाही अस मला वाटत पण तो असतांनाहि असाच त्रास होता . एकदा तर मध्य रात्री २ च्या सुमारास ठोकाठोकि केली ह्या लोकांनी, काय ठोकत होते काय माहित पण त्याचा त्रास ईतर दोन भाडेकरुंना हि झाला असावा.

काल रात्री तर कहरच झाला रात्री २:३७ ला हा मुर्ख प्राणी दणादण चालत होता... बराच वेळ मी टाळण्याचा प्रयत्न केला पण मग मला सहन होईना बरेच वेळा मला जे करावस वाटत ते काल मी केल.... माझ्या कडे एक छोटा बॉल आहे रात्री ३ पर्यंत ह्या ऊंदराचा ऊपद्व्याप सहन केल्या वर मी जोरात माझ्या कडचा बॉल छताकडे फेकला, मी ४-५ वेळा अस केल्यावर हा मंद माणुस जोर जोरात काही तरी बोलु लागला जे एकण्यात समजण्यात मला रस नव्हता म्हणुन मी बॉल छतावर आदळण बंद केल नाही. मी आणखी २-३ वेळा अस केल्यावर त्याच चालण बंद झाल... रात्रिच्या अंधारात छतावर आदळुन ईकडे तीकडे जाणारा चिटुकला बॉल शोधुन परत छतावर फेकण्याचा माझा कार्यक्रम मी बंद केला आणी झोपले तो पुन्हा सकाळी ४ ला ह्याच चालण सुरु!!!!!!!!!!!!!!!!!!!

सुट्टिच्या दिवशी तर (जस काल, आज आणी उद्या हि) दिवस भर माझ डोक दुखत रहात हा चालुन चालुन थकत कसा नाही????

आता रात्रिचे ११ झालेत तरी ह्याच चालण सुरुच आहे.. .. पण रात्री २ च्या प्रहरा साठी मी सज्ज आहे!...

गुलमोहर: 

मी दिलेले उदाहरण कितपत समर्पक आहे-कारण ते भारतातील अनुभवाचे आहे- माहित नाही
तरिही
काही वर्षापूर्वी मी नैनिताल हून नोएडा ला स्थलान्तर केले.बायको नैनिताललाच मुलीच्या शिक्षणासाठी मागे राहिली होती.मधयन्तरीच्या काळात मी एक flat भाड्याने घेतला.ही आल्यावर लक्षात आले की plumbing ,space ,amenities व असलेले सामान याच्या अदाजात खूपच गफल्लत केली होती.
उभततानी चूक मानून घेतली-एकमेकावर दोषारोपण न करता.तुमचा वरच्या मजल्यावरचा problem आम्हालाही थोड्या वेगळ्या स्वरूपात होता.
शेवटी थोडा महाग पण विचार करून दुसरा flat घेतला.
त्रागा करून घेण्यात अर्थ नव्हता.
तुमची परिस्थिती वेगळी असू शकते.I respect that.

सास,
तुम्हाला माझी पुर्ण सहानुभूती आहे. माझाही अनुभव भारतातील आहे.
मी सध्या जिथे राहत आहे तिथेही अगदी मध्यरात्रीचा नाही पण दिवसभर असाच त्रास आहे.
आमच्या वरच्या flat मध्ये ६ जणांचे कुटुंब राहते. त्या बाई पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान उठतात. सकाळी उठल्यापासून त्यांची ठोकाठोक सुरु होते ती रात्री बारा-एक पर्यंत.. चौकशी केल्यावर कळले की त्यांच्याकडे दिवसभर ताजे मसालेच स्वयंपाकासाठी वापरले जातात व त्या सर्व मसाले मिक्सर / food-pro न वापरता पाटा-वरवंटा, खलबत्ता, दगड नी धोंडे वापरुनच बनवितात. Angry सणावारांच्या दिवसात पुरणपोळ्या करतात ते पुरणसुध्दा पाट्यावरच वाटतात. याशिवाय त्यांचा पोटापाण्याचा उद्योग म्हणजे पाळणाघर, शिलाईमशीन इ. याची दिवसभर कलकल. कधी कधी रात्री उशिरापर्यंत शिलाईमशीन चालू असते. तसेच रोज सकाळी खिडकीतल्या १७६० कुंड्यांना खालच्या flat मध्ये जाईल याची पर्वा न करता धबाधब पाणी घालणे, कपडे धुऊन ते न पिळताच खिड्क्यांच्या ग्रिलवर वाळत घालणे. आमच्या खिड्क्याचे पत्रे (पावसाची झड लागू नये म्हणून घातलेले) केस, लादिपुसणी, कागद, झाडांची पाने व अनेक प्रकारचा कचरा टाकण्यासाठी लावलेत असे ह्यांना वाटते बहूतेक.
शेवटी हे सर्व सहन न होऊन (जरा चिडूनच) एक दिवस मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ह्या सगळ्याबद्दल सांगून आले. आता त्रास थोडातरी कमी झाला आहे. पण ठोकाठोक व अधूनमधून कचरा टाकणे मात्र सुरुच आहे.

सास, अपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट करून पहा. आणि जर तिथेल्या तिथे जमत असेल तर दुसरी जागा पहा. आणि हा माणूस चालायला लागला की भिंतीवर जोराजोरात हात आपटायचा. टक टक केल्यासारखा. पहा कदाचित कळेल त्याला. आणि नाहीच कळाले तर सांगून पहा.
मलाही त्रास व्हायचा मागे. तेव्हा मी योजलेले उपाय आहेत. तुझ्या उपयोगी पडले तर उत्तम.

सास, करकर वाजणारं फ्लोअरींग ही इथल्या अपार्टमेंटस मधली सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. आम्ही आधी जिथे जिथे राहिलो तिथे ते वाजणारं होतचं पण सध्याच्या अपार्टमेंटमधलं वाजणं अक्षरशः कहर आहे. आम्ही सगळ्यात वरच्या मजल्यावर राहतो त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास नाही. पण जमिनीवर पाऊल ठेवताना अपराधी वाटतं इतकं ते वाजतं. इथे या कारणासाठी तक्रारी करण्याचं प्रमाण पण फार मोठं आहे म्हणे ! सुदैवाने आमच्या खालंच कुटुंब भारतीय आहे. तिच्याशी बोलून आले मी. माझा मुलगा बरेचदा रात्री रडत उठतो. मग त्याला घेऊन बाहेरच्या खोलीत येणं. शांत करायला फेर्‍या मारणं ह्यात खालच्यांना नक्कीच त्रास होत असणार. पण आमचाही नाईलाज असतो. तू तुझ्या वरच्यांशी बोलून बघ. कदाचित त्यांचंही असं काहीतरी कारण असेल. संवादाने बरेच प्रश्न सुटतात ! तो उर्मट निघाला तर मात्र तक्रार कर मॅनेजमेंट कडे.

नशीबाने माझ्या वर राहाणारे रात्री चालत नाहीत, पण काल बरीच गरमी असल्यामुळे बेडरूम्ची खिडकी खुली ठेवली होती तर रात्री एक महाभाग २ वाजता फोनवर काही तरी अंडूगुंडू मध्ये बोलत होता. म्हटलं जाईल ५ मिनिटात, पण १५ मिनिटं झाली तरी थांबाय्च नाव नाही, मग शेवटी खाली जावून त्याला सांगितलं कि बाबा रे तुझ्या घरात जाऊन बोल, तर म्हणतो कि घरातल्यांना त्रास होऊ नये म्हणून बाहेर आलो होतो, तुम्हाला त्रास होत असेल तर जातो.. Happy

तुम्ही सरळ एकदा जावून त्याला सांगा आणि तरीहि ऐकला नाही तर सरळ ९११ फिरवा Happy

सास, तुम्ही एकट्या रहाता असे उलट सुलट(माझ्या मते हो, उपाय जसे भिंतीला आपटणे वगैरे सरळ कंप्लेट द्यावी. वरती कोण रहातो माहेत नसताना मला तरी हे प्रकार चुकीचे वाटतात. मला सुद्धा हाच त्रास होता. वरती एक कपल होते. तेव्हा असे आवाज येणे रोजचेच होते असे समजून मी सुरुवातीला गप्प बसले पण मला माहीती होते की कोण कपल रहाते ते. शेवटी मी आधी सरळपणाने रस्त्यात दिसले असता नम्र विंनती केली तर उलट ज्यास्त त्रास व्हायला लागला. रात्रीची त्यांची रोजची कपलची अ‍ॅकटीवीटी झाली की जोरात शॉवरचा आवाज कधी २, कधी ४ वगैरे, मुद्दाम जोरात चालणे, पॅडिओत सिगरेट ओढणे, अल्मोस्ट दर शनिवारची त्यांची पार्टी व येणारे मित्र त्यांचा मोठ्या आवाजात बोलण्याचा आवाज, त्यामुळे मी माझा पॅडिओ व खिडकी सुद्धा उघडी ठेवत न्हवते. मग शेवटी एक मोठी कंप्लेट दिली अपार्ट्मेंट्ला तर तोही त्याला सामिल. आम्ही त्याला सांगू म्हणून मॅनेजरने पेपर ठेवून दिला. ज्या दिवशी सकाळी कंप्लेट केली त्याच रात्री पार्कींग केलेली माझी कार जी नीट होती, सकाळी मोठे डेन्ट आलेले. रोज तीन दिवस नवीन डेन्ट वेग वेगळ्या ठिकाणी. मी कार घेवून तीन दिवस गेलेच न्हवते कुठे कारण बर्फ असल्याने घरीच होते. अंदाज आला होता कोणी केले असेल ते. शेजारी ह्याचाच पार्कींग लॉट होता. नक्की अंदाज असूनही काही करू शकले नाही. तेव्हा ह्यांच्या तोंडाला पुढे लागण्या एवजी एकटी असल्याने मीच जागा बदलली. पोलीसांना बोलवायचा विचार होता पण म्हटले जावू दे डोक्याला कटकत नको.

अपार्टमेंट मधे राहताना ह्या अश्या छाळवादी शेजार्‍यांमुळे खूप त्रास होतो. पण बरेचदा ठोश्यास ठोसा न्याय चालंत नाही. एकदा अपर्टमेंट काँम्प्लेक्स्च्या ऑफिसात लेखी तक्रार करा. त्रासाचा अतीरेक झाला तरच ९११ बोलवण्यात अर्थ आहे.

मनू तू किती वैतागली असशील ते कळतंय, पण तुझं पोस्ट प्रचंड रेसिस्ट आहे. 'तक्रार केली म्हणून गाड्या ठोका, काचा फोडा, घरासमोर कचरा ओता' असली अत्यंत नालायक कामं करणारे लोक कुठल्या एका ठराविक वंशातच आहेत असं नाही.

रवि, मेधा, चिनु अश्विनि, प्रविण आभार Happy ... तुमच्या सगळ्यांची डोके दुखी काही कमी नाही Happy

मी एकटि रहाते आणी हि गोष्ट मला इथे कोणाला कळु द्यायची नाही... सेफ्टी साठी बाकी काही नाही ;
म्हणुन मॅनेजमेंट शी वा शेजार्‍यांशी आणी त्या वरच्या कटकटी शी बोलायच मी टाळते आहे .... तस आम्ही इथे नविन आलो तेव्हाच अगदि पहिल्या महिन्यात आम्ही मॅनेजर ला ह्या करकर वाजणार्‍या फ्लोअरींग ची तक्रार केली होती ... येता जाता लोक धाडधाड बिल्डिंगच दार ऊघडतात आणी बंद करतात त्यामुळे हि खुप त्रास हे हि सांगीतल होत.... मॅनेजर ने तेव्हा मी बोलेल सगळ्या भाडेकरुंशी अस सांगीतल बस ईतकच

पुढच्या दोन महिन्यात आमची इथली लीज संपेल... मग बहुदा नवरा जीथे आहे तीथे मी मुव्ह करेन आणी तीथे आम्ही आपार्टमेंट घेवु (ईथे गारबेज, लाँड्री, पार्कींग ह्या बाबत नवर्‍याने जे दुर्लक्ष दिल होत ते त्याने नव्या जागी करु नये म्हणजे झाल... खुपच गैरसोय आणी त्रास होतो ह्या गोष्टिं मुळे)... आता दोन महिने तर काढायचेत हत्ती गेला शेपुट ऊरलय अस मनात म्हणुन मी सहन करतेय

बाकी भिंतीवर जोराजोरात हात आपटायचा, टक टक केल्यासारखा >>> हे मी नक्की करेल खुपच त्रास झाला तर Happy

एकदा लीज साईन केली कि आपण अडकलो... लीज संपण्या आधी दुसरी कडे जायच म्हटल तर लीज मोडली म्हणुन २ महिन्यांच भाड भराव लागेल दंड म्हणुन... नुसत सहन करत रहा... अ‍ॅडजस्ट करत रहा... हे मध्यम वर्गीय जीवन !!!

भारतात आमच्या वर पाटिल काकु रहायच्या त्यांच्या कडे ५ लहान मुल होती ती सारखी पळत रहायची घरभर आणी ह्या काकु सकाळी सकाळी ५ ला मसाला, पापडाच पीठ कुटण्या ची काम करायच्या... Happy

पोस्ट कडे रेसिस्ट म्हणून बघू नका हे लिहायला विसरले. माझा हेतू हाच होता की हे लोक कितीही थराला जावू शकतात. एकतर ते ताकदीने चांगलेच असतात. त्यात त्यानाही आपल्याविषयी हाच दृष्टीकोण असतोच.
जाता जाता, मला वाटलेच की वाचताना 'काळे' हा उल्लेखाकडे ज्यास्त लक्ष जाणार. हे तर माझा हेतू तसा नसताना उगीच तसा अर्थ काढणे,लक्ष वेधणे व दंगली करणे झाले. Wink त्यापेक्षा नुसते शेजारी लिहिलेले बरे. तसेच मला तर देसी लोकांकडूनही बराच त्रास झालेला आहे. अपार्टेमेंट मध्ये बेबी सिटींग करून माझ्या डोक्यावर नाचणारे वगैरे. हे लिहिले होते मागे. असो. बाकी कुठल्याही वंशात असे दिवे असले तरी काही लोकांची दांडगाई जरा ज्यास्त असते नी हे त्यातलेच. बालटीमूरसारख्या एरीयात कायदे हातात घेणारे खतरनाक लोक पाहीलीत. असो.:)

मनु , म्रॄणमयी

आपल्या पोस्टस एकाच वेळी आलेल्या दिसता आहेत मी माझी वरची पोस्ट केली तेव्हा तुमच्या दोघांची पोस्ट नव्हती दिसत मला Happy

एकट रहातांना शेजारी, वरचे, खालचे आजु बाजुचे यांच्याशी जास्त न बोललेल, जास्त ओळख न केलेली बरी अस मला वाटत... आपण एकटे आहोत याचा गैर फायदा घेण्याचा लोक प्रयत्न करु शकतात तेव्हा आपण एकटे रहातोय हे लोकांना न कळु देण हे सेफ मला तरी सेफ वाटत... वरच्या माणसाशी बोलायला गेले आणी समोरुन त्याने समझदारी दाखवली आणी नंतर मनु ने सांगीतलय त्याप्रकारे सुड काढले तर मग काय करायच... कोण कस आहे हे आपल्याला माहित नसत ना ...त्यापेक्षा न बोललेल बर अस मला तरी वाटत.... हो अगदि आऊट ऑफ लीमीट झाल तर मग लेखी तक्रार आणी ९११ आहेत पण अशी वेळ न येणच चांगल नाही!!!.

..... खर सांगायच तर भारतीय मेल पासुनच जास्त सावध रहायला पाहिजे... वरचा कोण आहे काय माहित पण आधी तीथे एक सा. ई. आणी त्याचा रुमी होता... तो सा. ई. नुसता मुर्ख + बावळट होता... बरेचदा तो बाहेर दिसायचा ऊगाच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा.. त्याचे हि रात्री मध्य रात्री असे प्रकार चालायचे... तो आता महिना भरा पासुन दिसत नाही म्हणजे वर त्याचा रुममेट असावा वा नवा भाडेकरु पण जो पण आहे वैताग आहे Sad

आमच्या कॅलीफोरनियाच्या अपार्टमेंट मध्ये आम्ही तळ मजल्या वर होतो, तीथे आमच्या किचनची खीडकी कॉरीडॉर मध्ये ऊघडायची आणी किचन च्या मागे अपार्टमेंट ची लहानशी मोकळी जागा होती... ह्या जागेचा ऊपयोग काही भाडेकरु आणी अपर्टमेंट चा सर्व्हिस मॅन स्मोकींग साठी करायचे... एक यंग (२५-३० वयाचा) भाडेकरु मुलगा तर तीथे शु करायला यायचा ... मी किचन मध्ये असले कि मला खीडकीतुन मागे कोण जातय वा मागुन कोण येतय दिसायच... स्मोकींग चा सगळा वास आमच्या किचन मध्ये यायचा... मॅनेजर ला अनेक दा सांगुन हि फायदा नाही... आमची खीडकी बंद असली कि लोक हमखास मागे जाणार पण मला खीडकीच्या काचेतुन दिसायच कोण येत-जात ते.... वर रहाणार्‍या गुजराथी काकुंनि त्या मुलाला त्यांच्या गॅलरीतुन बरेचदा तीथे शु करतांना पाहिलेल... त्या नेहमी सांगायच्या "वो पीछे जाता हे और ... "... आता अपार्टमेंट मधल बाथरुम सोडुन बाहेर हे प्रकार करायचे म्हणजे ...

माफ करा, तुम्हाला त्रास होतोय हे ठीक आहे पण कित्ती विस्ताराने लिहायचे ह्याला काही मर्यादा ? तसेच हे ललित का आहे ? कोणाशी तरी बोलायचय मधे हलवायला हवय.

सींड्रेला

माफ करा पण कुणी किती विस्ताराने लिहायचे आणी लेखनाच्या मर्यादा काय असाव्यात हे संयोजकांनी ठरवल तर जास्त योग्य होईल अस मला वाटत....इथे कुणी कुणाचा अपमान केलेला नाही वा कुठलीही निगेटिव्ह चर्चा इथे सुरु झालेली नाही..... मी इथे वापरलेले शब्द मा. बो. वर ईतर ठीकाणी वापरण्यात आलेले आहेत..

कुणाची मर्यादा काढण वा मर्यादा वै. सारखे 'हार्श' शब्द वापरण मला तरी योग्य वाटत नाही..... मर्यादा वै. ठरविण्याच काम पात्र आणी Authorised व्यक्तीं नि केलेले ऊत्तम....

...मला नाही वाटत ईथे कुणाच्या हि मर्यादा ठरविण्याचा अधिकार मला आहे वा माझी तशी पात्रता आहे आहे आणी ह्याच प्रमाणे माझ्या मर्यादा काढण्याचा/ठरविण्याचा अधिकार कुणाला ही नाही (इथले संयोजक लेखनाच्या च्या मर्यादा आखतील त्यांच मी आदराने पालन करेन पण ईतरांनी माझ्या मर्यांदांचा ऊल्लेख करण हि मला साफ चुक वाटत तो तुमचा अधिकार नाही)

पब्लिक फोरम वर कडु प्रतिसाद येतात ते पचवावे लागतात मान्य पण प्रतिसाद देतांना आपणही कडवट पणाच्या मर्यादा न लादण हे जास योग्य ठरेल अस मला वाटत... कुणाच्या ही मर्यादे बाबत बोलण, लिहण , टिका करण हे खूप अयोग्य आहे.

माझ्या माहिती नुसार आपले अनुभव ललित माध्यमातुन ही लिहिता येतात आणी मी ललित लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.... मा. बो. वर आपले अनुभव केवळ "को. त. बो" या मध्येच लीहावे असा नियम असल्याच मला ठाऊक नाही.

वाचलेला सुविचारः कडवट शब्दांनि सकारात्मक अस काही साध्य होत नाही.

Please: वाद होतील, मन दुखेल, अपमान वाटेल, विषय भरकटेल असे प्रतिसाद देऊ नका!!!

माझ्या कडुन कुणाच हि मन दुखवल गेल असेल तर मी क्षमस्व आहे !

सास, किती ग तुला त्रास.
हे शू प्रकरण त्रासदायकच आहे. माझ्या घराशेजारी इमारतीची भिन्त आहे खास पुरुषी उपयोगासाठी. त्यामुळे
सकाळी उठून खिडकी उघडावी तर एक तर नको ते व्हिज्युअल्स व "ईयु-द-पिस" भपकारा आपली काही ही चूक नसताना.

म्युनिसिपालिटीची लोके येवून साफ करतात पण त्रास देण्याची क्षमता फारच.

भारतीय मेल पासूनच दूर रहावे. अगदी अगदी.

मामी
गंमत बघा देस असो वा विदेस समस्या सारकीच फक्त थोड्या फार वेगळ्या स्वरुपात Happy
... बाकी तुम्ही जीवनात जो स्ट्रगल केलाय त्या पुढे माझा त्रास काहीच नाही... तुम्ही ग्रेट आहात Happy

सास, आता दोन महिन्यांचाच प्रश्न आहे त्यामुळे जास्त विचार करु नका. आम्ही सीअ‍ॅट्लला होतो तेव्हा याच्या उल्ट त्रास होता. आम्ही वरच्या मजल्यावर आवाज होऊ नये म्हणुन सर्व खबरदारी घ्यायचो पण खालच्या मजल्यावरचा माणूस इतक्या जोराने म्युझिक लावायचा (सकाळी ५ वा.) की आमच्या पण खिडक्या हादरायच्या. त्याची कुणीतरी तक्रार केली तेव्हाच तो प्रकार थांबला.

सास,

सांभाळून जरा! असा प्रसंग आमच्यावर Tucson ला असताना आला होता. मी आणि माझा नवरा शिकत होतो. आमच्या वरच्या अपार्ट्मेंट मधे एक redneck रहायला आला. Move in झाला तेव्हाच आम्हाला वाटल की हा उच्छाद मांडणार! मोट्ठाले speakers, music system वगैरे सामान होत. तो रात्री कामावरून यायचा आणि हे जोरात music लावायचा. झोपच यायची नाही आम्हाला.

आम्ही पहिल्यांदा विनंत्या केल्या पण काही उपयोग नाही. मग अपार्टमेंट्च्या मॅनेजमेंट कडे चक्क तकादा लावला की ह्याला हलवा नाही तर आम्हाला लीझ मधून मोकळ करा. शेवटी मॅनेजमेंट ने त्याला ३० दिवसांची नोटीस दिली आणि खरा त्रास सुरू झाला. तो रोज रात्री मुद्दाम जोरात चालण, बॉल आपटण, म्युझिक ब्लास्ट करण, मित्रांना आणून दंगा कर् असले उद्योग करायला लागला. आम्ही एका रात्री पोलिसांना बोलावल. त्यांनी त्याला तंबी दिली.

शेवटच्या रात्री त्याचे मित्र बंदूका घेउन आले. आमचा एक धिप्पाड अमेरिकन मित्र त्याच बिल्डिंग मधे मागच्या बाजूला रहायचा. तो आम्हाला त्याच्या घरी झोपायला घेऊन गेला. न जाणो काही झाल तर.

तेव्हा जे काय करशील ते अगदी अगदी सांभाळून कर.

रेड्नेक ना बरोबर. तेच ते बुश ला निवडून आणणारे.
सास नाही ग उलट भारतात असे त्रास सोपे जातात सोड्वायला. नेट्वर्क असते. पोलीसला तर फोन करायचा फक्त. त्यान्चे फिरते पथक असते. ते सरळ तंबी देतात. तू लहान आहेस.कसं बघतीस एक्ट्याने.

सास, माझा प्रतिसाद हा एकुणच तुमच्या "ललित" लेखावर आलेल्या प्रतिसादांसाठी होता ज्यात अनाठायी डिटेल्स आले आहेत (ज्यात एक तुमचा पण आहे). इतके डिटेल्स लिहिण्याऐवजी सूचक शब्दांत शेजार्‍यांचा त्रास वर्णन करता आला असता (असे मला वाटले). तिथे नावं घेऊन लिहिले असते तर अगदीच वैयक्तिक झाले असते म्हणून ते टाळले इतकेच. तुम्ही अगदीच फक्त स्वतःवर ओढवुन घेतलेत. तसेच अपमान/पात्रता वगैरे पर्यंत तर जाऊच नका.

असो, सुविचार छान आहे. माझा पण एक आवडता सुविचार- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले Happy

सास , तुमचे आजवरचे सगळेच लिखाण मी वाचत आलेय . त्यावरील प्रतिक्रिया सुद्धा मी आवर्जून वाचत असते . तुमच्या बाबतीत जाणवलेली एक गोष्ट म्हणजे तुम्ही कोणी जरा टीकेच्या किंवा तुम्हांला नको असलेल्या शब्दांत तुम्हांला प्रतिसाद दिला की तुम्ही पटकन चिडता. मनाला त्रास करून घेऊन उगाच आणखी स्वतः कडवट लिहिता . पब्लिक फोरम वर नेहमीच तुम्हांला सहानुभूती मिळेल असे नाही . जसे तिथे राहाणार्‍या लोकांना तुम्ही एकट्या राहता ह्याचे डिटेल्स द्यायचे नाहीत , तर इथे सुद्धा एव्हढे डिटेल्स देऊ नका असं माझं मत आहे .
तुम्हांला लिहून मन हलकं वाटत असेल तर त्यावरच्या प्रतिक्रियांनी वागण्यात फरक पडून देऊ नका . तुम्हांलाच जास्त त्रास होईल म्हणून हे मी सांगते आहे . माझा ह्यात वैयक्तिक काहीही हेतू नाही .
ता. क. :- मी कोणाचीही बाजू घेत नाहीये , कृपया गैरसमज नकोत . त्यावर आणखी चर्चा करण्यात मतलब नाही .
मी ज्योतिषी सुद्धा नाही ( तुमच्या स्वभावाचे विश्लेषण केले म्हणून म्हणते आहे . Happy )

पण रात्री २ च्या प्रहरा साठी मी सज्ज आहे!...
--- तुमचा त्रास मी १०० % समजू शकतो (कारण थोड्याफार फरकाने मी यामधे राहिलेलो आहे, कधी नकळत त्रास देणारा म्हणुन तर कधी कळत सहन करणारा म्हणुन). तुमचा त्याला सांगण्याचा मार्ग भिन्न आहे, मला खटकतो. वर रहाणार्‍याचे रात्री २ वाजता (त्याचा जॉब रात्री १२ ला संपत असेल, अभ्यास करत असेल, काही लोकं ३ ते ९ झोपणारे असतात किंवा अजुन काही) चालणे नैसर्गीकही असेल, पण तुमचे रात्री २ वाजता छताला चेंडू मारणे अनैसर्गीक आहे. तुम्हाला त्याच्या चालण्याचा त्रास होतो आहे हे सांगयला पण तुम्ही स्वत: ला कष्ट देत आहात. काही दिवसांनी तो तुमच्या चेंडू च्या आवाजा कडे दुर्लक्ष करेल मग?

शेवटी तुम्ही तुमचा मनस्ताप कमी कसा होईल हेच बघायला हवे. तुमच्या कृतीने तुमचा त्रास (उदा - वर गाडी ला खरचटल्याचा उल्लेख आलेलाच आहे) वाढण्याची पण शक्यता आहे.

सास, संपदाशी सहमत आणि उदयशीही. कुठेही (इथे मायबोलीवर किंवा तिथे अपार्टंमेंट्मध्ये) त्रास करून घेऊ नकोस. तू म्हटलेल्या अशा प्रसंगातून अमेरिकेत अपार्टमेंट मध्ये राहाणारे जवळजवळ सगळेच जण गेले असावेत कधी ना कधी. मी तुझे बरेच लेख वाचले आहेत (बरंच काही वाचायचं राहून गेलय दरम्यान) काही कथा, लेख खूप आवडले. पण बर्‍याच लिखाणातून छोटासा का होईना तक्रारीचा सूर जाणवला. आयुष्यात प्रत्येक जण सुख दु:खातून/ त्रासातून जातातच. प्रत्येक प्रसंगातून शिकत पुढे जा, माणसांकडे, परिस्थितीकडे तटस्थ नजरेने पाहायला शिकण्याच्या अशा उत्तम संध्या असतात. आपली सहनशक्ती वाढते अशा प्रसंगातून, आपण माणूस म्हणून तयार होतो अशावेळी. 'माझ्याच नशीबाला असे का?' असा दृष्टीकोन ठेवू नकोस, आयुष्यातले चांगले शोधायचा प्रयत्न करीत राहा. 'हे ही दिवस जातील, चांगले दिवस येतील' ह्या उक्तीवर विश्वास असूं दे आणि मुख्य म्हणजे कुठल्याही परिस्थितीत स्वतः आनंदी राहा आणि दुसर्‍याला (इथे नवर्‍याला) आनंदात राहायला मदत कर. आपल्याविषयी इतरांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यापेक्षा आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगणे शेवटी उपयोगाचे ठरते. मागच्या प्रसंगातून शिकत पुढे जा. नवर्‍याच्या फिरत्या जॉबच्या टेंशन मध्ये तुझ्या आधाराची त्याला खूप गरज असणार, तू कुठल्याही प्रसंगात आनंदाने राहशील (अगदी कसंही अपार्टमेंट मिळालं किंवा काहीही झालं तरीही) हे त्याला कळलं की त्याचाही भार हलका होईल. वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जग. खूप सार्‍या शुभेच्छा तुम्हा दोघांना!

भाग्या
तुमच बरोबर आहे Happy आणी मी तेच करतेय Happy २ महिने त्रास कढल्या वर एकदा फक्त बॉल चा प्रयोग केला आणी तो परत करण्याची ईच्छा नाही आणी तशी वेळ येऊ नये हिच माझी ईच्छा आहे Happy

संपदा
तुमच्य प्रतिसादा बद्दल आभार Happy

माझ्या लेखावर जर कुणी असे प्रतिसाद दिलेत जे मला वाद कारक, विषय भरकटविणारे आणी माझी पुर्ण ओळख नसतांना माझ्या वर वैयक्तीक टिका केली आहे असे वाटतात तीथे मी कडक आणी कडवट प्रतिसाद देते जे मला चुक वाटत नाही .... आणी हे मी बर्‍याच दा अवॉईड केल्या नंतर सुरु केल आहे ... मा. बो. वर २-३ वर्षे झाल्यावर...

तुम्ही बरचस लेखन वाचल आहे आणी प्रतिसाद ही तेव्हा तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात आली असेल
मा. बो. काही ठराविक लोकच निगेटिव्ह प्रतिसाद देत असतात आणी असा एक प्रतिसाद चिंगी च काम करतो त्या नंतर मुळ चर्चा, विषय रहातो बाजुला आणी टोमणे आणी टोमण्यांना अनुमोदन सुरु होतात...

प्रतिसादा च्या नावाखाली कुणाचा , कुणाच्या धर्माचा, एखाद्या समाजाचा, त्यातील लोकांचा अपमान करण, टोमणे मारण, टिका करण योग्य नाही अस मला ठाम पणे वाटत...

आजवर मा. बो. वर ईतर कोणाच्याहि लेखाला, प्र. चि, कविता वै. कश्याला हि प्रतिसाद देताना मी वाद सुरु करणारे, विषय भरकटविणारे, कुणाची निंदा करणारे, टोमणे मारणारे असे प्रतिसाद न देण्याची (९९%) काळजी घेतली आहे.... माझा शक्यतो कुणाच्या हि लेखावर, कवितेवर ई. वर कश्या हि प्रकारचा निगेटिव्ह प्रतिसाद नसतो... मी जे सांगते चांगल्या शब्दात प्रतिसाद द्या त्याच पालन करण्याह्चा प्रयत्न हि करते... पण मला कुणी ऊगाच टोमणा मारत राहिल आणी मी गप्प बसेल ईतकि हि मी अती भयाड नाही. Happy

माझा मा. बो. वर लिहण्याचा हेतु सहानुभुती हा मुळीच नसतो.... मला फक्त माझे अनुभव शेयर करायचे असतात, इथे लेखनाचा हेतु हवाच असेल तर लेखनातुन चांगली चर्चा व्हावी आणी काही चांगल शीकायला मीळाव हा. सहानुभुती घेवुन मला काय करायचय? मी इथे कुणालाही वैयक्तीक रीत्या ओळखत नाही आणी माझा इथे कुठला गट हि नाही... असो... तुम्ही माझ लेखन वाचतात आणी इथे मला प्रतिसाद दिला या बद्दल आभार Happy

उदय
तुमच पटल Happy सगळ्या बाजुंनी परीस्थीती चा विचार करायला हवा,.... वरचे महाभाग दिवसाच कामावर जात असावेत कारण पायांचा चालण्याचा दणदण आवाज संध्याकाळ पासुन सुरु होतो जो झोपायच्या वेळा थोडा कमी होऊन मध्य रात्री पुन्हा जोर पकडतो Happy ... असो मी एकदाच बॉल चा प्रकार केला जो परत करण्याची माझी ईच्छा नाही Happy

उपास
तुमच बरोबर आहे माझ्या लेखनात तक्रारीचा सुरु जाणवतो आणी माझ्या बर्‍याचश्या लेखना तक्रार असते ही... मनात खुप तक्रारी आहेत त्या लेखनातुन बाहेर येतात... नशीब मी मानत नाही... तस नवर्‍याला मी माझे प्रोबलेम्स सांगत नाही , कुरकुर मात्र करते त्याच्या मागे :).... तुमचा प्रतिसाद मला कुणी तरी मोठ मला समजावतय असा वाटला... आभार Happy

<<कित्ती विस्ताराने लिहायचे ह्याला काही मर्यादा ?>>
नसेल, पण आपण किती वाचावे याला आपण मर्यादा घालू शकतो.
यात वाचण्याजोगे काही नाही. सगळ्यांना कसले कसले अनुभव येतच असतात. मी पण मला भारतात किती त्रास होतो त्याची अशीच वर्णने लिहीली होती.
ते इथे लिहिण्याचे कारण म्हणजे कदाचित् त्यातून योग्य सल्ला मिळेल, जसे या ठिकाणी त्रास होत असेल तर ही जागा सोडून दुसरीकडे जा. मलाहि विचारण्यात आले की मग येता कशाला भारतात. म्हणून मी पण शिकलो, ज्या काही कारणासाठी जावे लागेल ते संपेस्तवर नाक मुठीत धरून, डोळे नि कान बंद करून सहन करायचे नि लवकरात लवकर परत यायचे.
तसे अमेरिकेतून निघून जा, असे सांगता येत नाही. कारण यांच्यामुळेच अमेरिकेचे सर्व कारभार चालतात, नाहीतर अमेरिकेचे हाल झाले असते.

Happy Light 1