हि वाट दूर जाते

Submitted by वर्षा.नायर on 2 September, 2009 - 14:02

hi aat door jaate.jpg
हा नाशिकजवळील जव्हार घाटातील फोटो आहे.

गुलमोहर: 

javhar lake2.jpgjavhar lake.jpg

हे जव्हार येथिल एक अतिशय सुंदर तळे आहे. अतिशय निर्मनुष्य असे हे ठिकाण आहे. आपण रामायण काळात आहोत असा भास व्हावा इतके शांत आणि रम्य ठिकाण आहे.

छान आहेत फोटो.

अभिजीत माझ्यामते नाशिक, त्रंबकेश्वर आणि जव्हार. हाच रस्ता नाशिक्मार्गे गुजरातला जायला वापरतात.

मस्त वर्षा! पहिलं चित्र एकदम पेंटींगसारखं वाटलं
तिकडे दुबईहुन इकडे आल्यावरच तुला कळलं असेल ना हिरवाई म्हणजे किती स्वर्गीय नेत्रसुख देणारी असते ते....खासकरुन श्रावण आषाढातली. अजुन फोटो असतील तर टाक की ! Happy

फोटो आवडल्याबद्दल सर्वांचे आभार.

चेतन बरोबर, हा रस्ता नाशिकहून गुजराथला जाण्यासाठी वापरतात. जव्हार घाट नाशिकपासुन फक्त ४० कि.मी. आहे पण जव्हार गाव माझ्यामते ६० कि.मी. आहे नाशिकपासुन.
आम्ही दमण बीच वर जातांना वाटेत जव्हारला थांबलो. पण अगदी दमण लागेपर्यंत रस्ता इतका निसर्गरम्य आहे कि खुपच नेत्रसुख मिळते.
जव्हार घाटात खुप जिवंत झरे आणि धबधबे आहेत, पण सध्या पाउस कमी पडल्याने त्यांना इतके पाणी नव्हते.

भाग्या हो गं सध्या माहेरसुख उपभोगणे चालु आहे, पण आता जायचे दिवस पण जवळ आले आहेत. Sad