पुरंदर

Submitted by झकासराव on 14 January, 2008 - 11:22


चालत्या गाडीतुन फोटो काढलाय शिवाय झूम वापरल होतच त्यामुळे तेवढा छान नाही आलेला. तरिही मनातल लिहाव म्हणून टाकलाय....

कोल्हापुरला जाणं सारखच होतं.
अगदि ठरवुन महिन्यातुन एकदा जायचच असही जवळजवळ वर्षभर केल होतं.
जाताना नेहमी रात्रीच जायचो.
येताना दिवसा येत असे. असच पुण्याला येताना जर झोपलो नाही तर आजुबाजुला बघत बसे खिडकीतुन बाहेर काय दिसत ते. (बर्‍याच लांबवर असणार्‍या डोंगरावरच्या सातारा कराड ह्या पट्ट्यातल्या अंधुक दिसणार्‍या पवन चक्क्या ह्या अस पाहताना लागलेला शोध :))
असच एक दिवस पाहताना मला हा वरचा प्रचंड डोंगर दिसला. त्यावेळी बरचस ऐतिहासिक कादंबर्‍यांच वाचन झाल होतच. मनात विचार आला जर त्या काळात मी असतो तर छत्रपती शिवाजी महाराजाना हा अति प्रचंड डोंगर नक्की दाखवला असता आणि त्यानी नक्कीच एखादा किल्ला तिथे बनवला असता. Happy
तर कापुरव्होळ जवळुन जाताना वाचल की पुरंदर तालुका. मनात आल की हाच तर पुरंदर नसेल???
आणि गावाच नाव वाचल तर कापुरव्होळ. मग खात्रीच पटली. मनात खुप आनंद झाला कारण हाच तो किल्ला ज्यावर शंभु राजेंचा जन्म झाला.
तो कुठे आहे हे माहित असुन देखिल पहाण झालच नाही. पण एकदा एक ट्रेलर कात्रज घाटात अडकल्याने आमची एशियाड कापुरव्होळ्-सासवड मार्गे आली. त्यावेळी किल्ल्याच बरच जवळुन दर्शन झालं. त्याची उंची पाहताना मान खाली पडती के काय अस वाटल Happy
आणि मी ज्या बाजुने फोटो काढलाय त्याच्या बाजुने त्या किल्ल्याचा रक्षण कर्ता म्हणून एकही मोठा डोंगर आडवा नाहिये म्हणून मनातुन वाटत होत की एवढ काय असेल त्या पुरंदरला जिंकणं पण गाडी वळसा घालुन नारायणपुर क्रॉस करते तेव्हा लक्षात येत पुरंदर काय चीज आहे ते. Happy
माझ नशीब असल आहे ना मी त्याच्या पायथ्यापर्यंत गेलोय पण अजुन एकदाही वरपर्यंत जायला मिळाल नाहि Sad
बघु कधी माझ नशीब उजाडतय ते.
तो पर्यंत तरी कोल्हापुरला जाता येता मला तो पुरंदर साद घालणारच आणि मी ही गारुड झाल्यासारखं तो दिसेनासा होइतो त्याच्याकडे बघत राहणारच Happy

गुलमोहर: 

मस्त फोटो आणि वर्णन झकास. पुरंदर ची फारशी माहिती नाही, येथे ही बालेकिल्ला वगैरे आहे का?

झकासराव, एकदम झकास राव्....लिखाणातला फ्लो फार छान....

निदान किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाणे फारच सोपे आहे..नंतर बराच चढ आहे...केदारेश्वरपर्यंत...तिथून विहंगम नजारा दिसतो..बाजूचीच टेकडी..वज्रगड नावाने ओळखली जाते...आणि मुरारबाजींचा पुतळाही कायम स्मरणात राहील असा आहे..जाऊन याच एकदा...

अमोल्,अज्जुका,पल्ली आणि केतन Happy
जावुन येइन नक्कीच फक्त माहितगार माणुस हवा सोबत म्हणजे आपोआपच मलाही माहिती मिळेल. Happy
बघु पुढच्या महिन्यात प्रयत्न करेन.
अमोल मलाही नीट माहिती नाहि रे. इतिहासात वाचुन फक्त आहे माहिती. प्रत्यक्ष जावुन आल्यावर लिहिनच Happy

झकास ... फोटो खूपच छान आहे Happy

फोतोपेक्शा लिखान चान जमल् आहे.
किल्ला पहिल्यवर लेखन जरुर करा.

गावाच नाव वाचल तर कापुरव्होळ>> कापुरहोळ. या गावातनच संभाजी राजांना धारावु मिळाली होती. ( दुध पाजवनरी आई).
पुरंदरला बालेकील्ला आहे. हा किल्ला पडल्यामुळेच शिवाजी राजे जयसिंगाला शरन गेले. ह्या किल्ल्याचा समोर दोन बसके डोंगर आहेत. त्यावर धमधमे बांधुन दिलेरखानाने पुरंदरवर हल्ला चढवला. व त्यासोबतच सुलतान्ढवा केला. महाराजांना हा किल्ला खुप दिवस लढत देइल असे वाटले होत तशी या किल्ल्याने खुप लढतही दिली पण शेवटी पडला.

(हे किल्यांचे फोटो बघुन कधी कधी शिव पुराण मायबोलीवर लिहावे वाटते, सर्वांना सर्व माहीत असुन सुध्दा)

झकास... फोटो अगदी झकास...
तसे तुझे बरेच फोटो बघितलेत... पण हा गाडीतुन काढलास अन तरी खुप छान आलाय... माहिती वचुन प्रत्यक्ष तिथे जावेसे वाटले... Happy ट्रीप काढ कि मायबोलिकर्स ची:)

झकासा, लवकर जाऊन ये किल्ल्यावर. मधे काच नसती तर आणखी छान दिसला असता.
हिरवाईचा अभाव चांगलाच जाणवतोय.