प्रवेशिका क्र. ३
शीर्षक: "वार्याची बात "
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात असलेला महादेवाचा डोंगर परिसर म्हणजे दुष्काळजन्य प्रदेशच आहे. दरवर्षी इथे पावसाळ्यातही पुरेसा पाऊस पडत नाही. बर्याच गावांमध्ये तर पावसाळ्यातही ओढे, नाले, तळी कोरडीच असतात. पावसाळ्यातही टँकरनेच या गावांना प्यायचे पाणी मिळते. दृष्टिक्षेपात दूर दूर बस बोडके वृक्षहीन डोंगर दिसतात. इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली एकमेव निसर्गदत्त गोष्ट म्हणजे 'सोसाट्याचा वारा'! जो वारा एका ढगाला कुठे विसावू देत नाही, की एखाद्या वृक्षाला पठारावर थारा! पण अशा प्रतिकूल परिस्थितही हार मानेल, तो प्राणी मनुष्य कसा?
इथल्या वार्याचा वापर करून त्यावर वीजनिर्मिती करणार्या अनेक पवनचक्क्या ठिकठिकाणी उभ्या केलेल्या आहेत.
शीर्षक: "पराक्रमाची की पापाची प्रतीके! "
नागरीकरणामध्ये वने नष्ट झाली. जंगली प्राण्यांचे आश्रयछत्र हरविले. बरेच प्राणी दुर्मिळ होत चाललेले आहेत. शासनाने खास या प्राण्यांना अभय देण्यासाठी काही क्षेत्रे राखून ठेवलेली आहेत. पण त्या क्षेत्रांवरचे प्रशासनाचे नियंत्रण ही चिंतेची बाबच आहे. अजूनही बर्याच भागात या प्राण्यांची अवैध कत्तल होते. लोक फक्त स्वतःचे निष्ठुर शौक पूर्ण करण्यासाठी, गरीब प्राण्यांच्या शिकारी करतात. भिंतींवर टांगलेली शिकार केलेल्या प्राण्यांची शिंगे म्हणजे त्यांना स्वतःच्या पराक्रमाचे प्रतीकं वाटतात!
जबरी सादरीकरण.
जबरी सादरीकरण.
गुड वन. वरती पवनचक्क्या
गुड वन.
वरती पवनचक्क्या सुंदरच दिसत आहेत तर खालच्या फोटोत मांडणीच अशी आहे की त्यातुन
गुढ खलनायकी छटा दिसत आहेत.
अरे ह्या पवनचक्क्या म्हणजे
अरे ह्या पवनचक्क्या म्हणजे जुनोनी जवळच्या ना? त्या महादेवाच्या डोंगराला काळू-बाळूचा डोंगर पण म्हणतात..
पहिला फोटो सुरेख, दुसरा फोटो
पहिला फोटो सुरेख, दुसरा फोटो पाहून अतिशय वाईट वाटले.
अपेक्षित परिणाम साधलाय!
(No subject)
धन्यवाद सर्वांचेच ! टण्या,
धन्यवाद सर्वांचेच !
टण्या, हो महादेवाच्या डोंगरांना काळूबाळूचा डोंगरही म्हणतात. हे नांव अशात...म्हणजे या तिसेक वर्षात पडले असेल. काळूबाळू हे दोघे त्या भागातले प्रसिद्ध तमासगीर.
हार्दिक अभिनंदन, प्रकाश!
हार्दिक अभिनंदन, प्रकाश! सुंदर आणि परिणामकारक प्रचि!
अभिनंदन प्रकाश !! पोस्टत रहा
अभिनंदन प्रकाश !!
पोस्टत रहा अशीच सुंदर प्रकाशचित्रे !
खूपच सुरेख प्रकाश!!!!!!
खूपच सुरेख प्रकाश!!!!!!
प्रकाश अभिनंदन. मस्त.
प्रकाश अभिनंदन. मस्त.
तुझे कौतुक करायला महिनाभर
तुझे कौतुक करायला महिनाभर उशीर झालाय खरा.
अप्रतिम. दोन्ही चित्रातून विरोधाभास चांगलाच प्रकट होतोय. पॉझिटीव्ह - निगेटीव्ह.अभिनंदन.
मनापासुन अभिनंदन प्रकाश
मनापासुन अभिनंदन प्रकाश !!!!
"संवेदनशीलता हा कलेचा आत्मा असतो " तुमच्या कामात हे सातत्याने जाणवते ......