---हरवलेल्या वाटा---

Submitted by paresh_mahamunkar on 21 August, 2009 - 06:08

पत्र वाचुनि त्यातले ते
पीस जपुनि ठेवायचे
मोरपंखि दिवस ते
आता कोठे शोधायचे...

शब्द असति तेच तरिही
अर्थ वेगळे सांगायचे
ते मनाचे कल्लोळ सारे
सांग कोणी सोडवायचे...

काळजाचे दु:ख ते
आम्ही ऊरी झाकायचे
जखम दिसली एक तरिहि
घाव ना सांगायचे...

स्पर्शातुनि नेमके ते
सांग कसे सांगायचे
ते किनारे केव्हातरि पण
वाहुनी गं जायचे...

बहरलेले झाड ते
वळ्णावरि भेटायचे
पानगळी त्या भोगलेल्या
कधिच ना सांगायचे...

खळाळत वाहत्या लोचनांना
सांग कसे अडवायचे
मि घातले बांध तरिही
पापण्यांतुनि वहायचे...

तुझ्या गालांवरिल ओघळांना
हातानेच पुसायचे
माझ्या गालांवरी मात्र
नविन ओघळ यायचे...

शब्द तुझे ऊच्चारलेले
ह्रदयी खोल रुतायचे
रक्ताचेच झाले पाणि
डोळ्यांत दाटुनि यायचे...

पाऊस पडुनी गेल्यावरी
धुक्यांत दवं शोधायचे
तुझ्याचं पापणीतील पाणी
दवं मानुनि प्यायचे...

भरकटलेले जहाज ते
काठांवरुनीच पहायचे
धुक्यांत हरवलेल्या वाटांना
आता कोठे शोधायचे...
धुक्यांत हरवलेल्या वाटांना
आता कोठे शोधायचे... ---पारवा---

गुलमोहर: 

मस्त !