माझ्या बरोबर (गीत - प्रसाद, अल्पना, अद्वैत)

गीताचे शब्द :

माझ्या बरोबर कधीतरी
पावसात भिजत येशील का?
पावसासोबत, पावसामध्ये
पाऊस बनून जाशील का?

थोडं तिखट, थोडं खारट,
थोडं गरम... ओठांसारखं...
एकच कणिस माझ्याबरोबर
चिमण्या दातांनी खाशील का?
ओली पाने, ओली राने
गाती गाणी ओलेत्याने
गाणं राजा ओलं ओलं
मिठीत माझ्या गाशील का?

माझ्या बरोबर कधीतरी
पावसात भिजत येशील का?

(श्रवणीय विभाग: आपल्या संगणकावर MP३ प्रकारचे कार्यक्रम ऐकण्याची सुविधा आवश्यक आहे)


Download

गीतकार : प्रसाद शिरगांवकर
संगीतकार आणि गायिका: अल्पना शिरगांवकर
संगीत संयोजन : अद्वैत पटवर्धन