Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 15, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » कथा कादंबरी » निश्चल » Archive through April 15, 2007 « Previous Next »

Sakhi_d
Tuesday, April 10, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मला कितीतरी वेळ त्याला काय उत्तर द्यायचं तेच सुचेना. >>

लवकर उत्तर दे..... :-)

Chinnu
Tuesday, April 10, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, धीर धरवत नाहिये, पण महतप्रयासाने वाचायचे टाळत आहे. लवकरच वाचेन! :-)

Pendhya
Thursday, April 12, 2007 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, अतिशय सुंदर लिखाण करतेस. विषय, थोडा वेगळा, पण छान घेतला आहेस. कथेनी, छान पकड घेतलीये.
नायीकेच्या मनाची चलबिचल, छान रेखाटली आहेस.


Nandini2911
Friday, April 13, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दिवशी मला उठायला उशीरच झाला. बाहेर आले तोवर उन्हं वर आली होती. रीज़ॉर्टमधले कस्टमर जंगल सफ़ारीला गेले होते. मी पिंकीला कॉफ़ी बनवायला सांगितलं. तेवढ्यात अभिजीत आला..
"अरे, तू सफ़ारीला गेला नाहीस?" ही टूर नेण्याचं काम त्याचं असायचं.
"नाही, थोडं बरं नाही म्हणून नाही गेलो." त्याचा आवाज पण एकदम खोल वाटला.
"काय झालं?" मी विचारलं.
"तीन दिवस झाले. ताप आहे," पिंकीने सांगितलं, "पण ऐकत अजिबात नाही, आज अगदी उठवतच नव्हतं म्हणून टूरला गेला नाही,"
"अरे मग मला नाही का सांगायचं? मेडीसीन्स आहेत माझ्याकडे." मी म्हणाले.
"नको, मला त्या मेडीसीन्सचा कंटाळा येतो.." त्याने उत्तर दिलं.
मी त्याच्या गालावर हात ठेवला. चांगलाच गरम होता तो.. पण माझ्या अंगावर शहारे का आले ते मलाच कळलं नाही..
मी त्याला मेडीसीन्स आणून दिले... पण का कोणास ठाउक मला तेव्हापासून त्याच्या नजरेला नजर भिडवण्याचं धाडस होईना. सतत तो त्याची नजर माझ्यावर रोखून आहे असंच वाटायचं.

मी शक्यतो त्याच्याशी बोलणं टाळायला लागले. मी विधव आहे, मी मंगळी आहे हे स्वत्:च स्वत्:ला शंभरदा बजावायला लागले. कुठल्याही मोहात आता मला पडायचं नव्हतं. माझ्या अभिचा गेला होता.. पण मला अता कुणाचा ही बळी घ्यायचा नव्हता. असं म्हणतात की मन वार्‍यासारखं चंचल आहे, मी माझं मन दगडासारखं निगरगट्ट बनवत होते. जमलं असतं का मला हे? अभिजीतच्या नजरेतलं आमंत्रण मी केव्हाच ओळखलं होतं. पण तरीही जाणून बुजून मी अज्ञानी बनायचा प्रयत्न करत होते. स्वत्:लाच मी दगड बनवत होते....


Pendhya
Friday, April 13, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण माझ्या अंगावर शहारे का आले ते मलाच कळलं नाही.. >>>>>>>> व्वा!


Disha013
Friday, April 13, 2007 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, अगदी कसलेली लेखिका दिसतेस तु. कसलं वजनदार लिहितेस!

Nandini2911
Saturday, April 14, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा चेंज म्हणून परत कथेकडे वळू...
================================


मला स्वत्:ला सावरणं कठीण झालं होतं. कुठेतरी खोलवर आयुष्यामधे असणारी पुरुषाची गरज मलाही वाटत होती. पण तरीही मी समाजाला घाबरून होते. मात्र ही सगळी बंधने एका क्षणात तुटलीच.

रात्रीचे नऊ वाजले होते. कुणीतरी दरवाजा खटखटवला. एवढ्या रात्री माझ्या कॉटेजवर कोण आलं असेल म्हणून मी दरवाजा उघडला. बाहेर काळामिट्ट काळोख होता. आणि दरवाजात अभिजीत उभा होता.
"अभिजीत, तू काय करतोयस इथे?" तो काहीच बोलला नाही, फ़क्त दरवाजा धरून उभा राहिला.
"अभिजीत..?" मी परत आवाज दिला. तो एकटक माझ्याकडे बघत होता. "आत येऊ?" त्याने विचारलं.
"काय काम आहे?" मी आवाजात उसनं अवसान आणून विचारलं.
"काही नाही" तो तितक्याच शांतपणे म्हणाला.
"अभिजीत, हे बघ, मी इथे एकटी आहे आणि तुझं इतक्या रात्री इथे येणं शोभत नाही.. तू परत जा," मी ही दरवाज्यातच उभी राहिले.
"नाही जाणार.." तो म्हणाला. एखाद्या चाकूने मला थंडपणे कापल्यासारख्या आवाजात.
"हे बघ, अभिजीत.. मी एका घरची सून आहे. लग्न झालय माझं.. आता तरी परत जा..." माझा सूर आता विनवणीचा होता.. त्याने दरवाजा सोडला. माझ्या डोळ्यात भिती थरारून आली होती. एक मन म्हणत होतं त्याला परत जाऊ देऊ नकोस.. पण हे असं वागण्याचा हक्क मी गमावून बसले होते. की माझा तो समज होता. तो परत जाइल असं मला वाटलं. तो दोन पावलं पाठि सरकला. आणि त्याने माझा हात धरला... आणि मला कॉटेजच्या बाहेर ओढलं. त्याने बाहेरचा लाईट बंद केला. मी पूर्णपणे अंधारात होते. त्याचा चेहरा फ़क्त मला दिसत होता. त्याचे डोळे माझ्या चेहर्यात काहीतरि शोधत होते.
"आसावरी.. मला आता या क्षणी तू हवी आहेस.." तो हळूच कुजबुजला.
"अभिजीत.. प्लीज.." माझ्या आवाजातला दुबळा प्रतिकार मलाही जाणवला.
ती रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रात्र ठरली. पहाटे पहाटे मी अभिजीतला माझी सगळी कहाणी सांगितली. मी मंगळी असल्यामुळे हे झालं असं सांगितल्यावर तो दिलखुलास हसला...
"मूर्ख आहेस.. माझा अशा गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. आणि तूही ठेवु नकोस.. उगाच डोक्याला ताप.. " तो सहजतेने म्हणाला.
बेडच्या जवळच माझा आणि अभिचा एक फ़ोटो होता. मी तिकडे पाहिलं.... का कुणास ठाऊक.. मला अभि एकदम दिलखुलासपणे हसत असल्याचा भास झाला.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators