Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 10, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » कथा कादंबरी » निश्चल » Archive through April 10, 2007 « Previous Next »

Nandini2911
Monday, April 02, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळचे साडेसहा वाजले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर सूर्यनारायण नुकताच उगवला होता. खरंतर मला अजिबात उठायची इच्छा नव्हती. पण आता ड्युटीची वेळ झाली होती.
सगळं आवरून मी रूमच्या बाहेर आले. हलकंसं धुकं उन्हाबरोबर लपंडाव खेळत होतं. त्यातच दवबिंदू हलकेच चमकत होते. दूरवरचा धबधबा मोत्यासारखा दिसत होता. माझ्या रूमबाहेरची दरी हिरवी शाल ओढून अजून साखरझोपेत होती. मी मात्र उठून कामाला लागले होते. अख्ख्या रीझॉर्टमधे इतक्या लवकर कुणीच उठले नसेल. इथे येणारे बहुतेक हनीमून कपल्सच. ते कशाला इतक्या पहाटे उठतील? मी आणि अभि जेव्हा गोव्याला गेलो होतो, तेव्हा काय केलं होतं? अभिच्या आठवणीसरशी अंगावर काटा आला. तीन वर्षें... तीन वर्ष मी त्याच्याशिवाय जगतेय. एकत्र जन्ममरणाच्या शपथा घेतल्या होत्या आम्ही. आणि आज तो हे सारं तोडून निघून गेला. मी मात्र वाट बघत राहिले...... तो परत येणार नाही हे माहित असूनही... तिथेच.. त्याची वाट बघत.. तशीच निश्चल..


Sanghamitra
Monday, April 02, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक लघुलघुकथा वाटतं. हं...
छान आहे गोष्ट. विशेषतः शेवट तर खूपच आवडला. ती शेवटची दोन टिंबे तर खूप काही सांगून जातात.
थोडक्यात नंदिनी दिवे घे आणि लौकर लिही आणि ९ ओळींपेक्षा जरा मोठे. :-)


Nandini2911
Monday, April 02, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे?
कादंबरी लिहत होते तेव्हा आता बास केव्हा करणार? आणि म्हणून ही लघु कथा.. :-)
दिवे घ्या आणि पुढला भाग लवकरच येत आहे.


Marathi_manoos
Monday, April 02, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

whts Dive ghya?? koni mala sangel kaa?

Swa_26
Tuesday, April 03, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवे घ्या म्हणजे... take it lightly

Nandini2911
Wednesday, April 04, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाठून कुणाच्या तरी पावलाचा आवाज आला. मी पाठी वळून पाहिलं. "उठलीस पण एवढ्यात? मला वाटलेलं दुपारपर्यंत तरी डोळॆ उघडणार नाहीस.. कालची रात्रच तशी होती ना.." तो मिश्किलपणॆ हसला. त्याने हलकेच माझ्या गालावरून हात फ़िरवला. मला या क्षणी त्याचा स्पर्श सुद्धा नकोसा होता..
"अभिजीत.. प्लीज.." मी त्याचा हात झिडकारला आणि तिथून निघाले.
"सावरी..." त्याने आवाज दिला. पण मी थांबले नाही. स्वत:वरच मी चिडले होते. कदाचित त्याला हे समजल.ं असावं. तो तिथेच थांबला.
मी रूमवर आले. चेहर्यावर गार पाणी मारलं. पण तरी मन काही शांत झालं नाही. कुणीतरी नाश्ता आणून ठेवला होता. माझी त्याच्याकडे बघण्याची सुध्दा इच्छा नव्हती. मी खिडकीच्या जवळ खुर्ची टाकून बसून राहिले.
कुठून निघाले होते आणि कुठे पोचले होते. स्वत:शीच हिशोब मांडत बसले होते. हातात जमा काहीच नव्हतं. सगळं गमावलेली मी... आता काय मिळवण्याच्या पाठी होते कुणास ठाऊक?
रूमची बेल वाजली. दारात पिंकी होती. रीझोर्टची चीफ़ शेफ़, तिला काहीतरी सामान मागवायचं होतं,
मी काम सुरू केलं पण माझं लक्ष नव्हतं.
"आसावरी... काय झालय? तू फ़ार उदास दिसतेस.." ती म्हणाली.
"काही विशेष नाही. जरा घरची आठवण येत होती म्हणून..." मी सारवासारव करायचा प्रयत्न केला.

"मग घरी जात का नाहीस. सुट्टी घे ना.. इथे जंगलात रहायचं तर वैताग आहे.." पिंकी बडबडत होती.
माझं लक्ष नव्हतं. घर.. ते आता राहिलंच कुठे होतं.
आई बाबाचे घर होतं. अभिचं घर होतं. पण माझंच घर नव्हतं.
"अभिजीत पण पुढच्या महिन्यात सुट्टीवर जाणार आहे," पिंकीच्या या वाक्याने मी भानावर आले.
खरंच तो म्हणाला होता... पुढच्या महिन्यात तो पुण्याला जाणार होता. येतेस का असेही विचारलं होतं.
"पिंकी.. तुझी लिस्ट बरीच मोठी आहे. इथे हे सगळं सामान मिळणार नाही. चार पाच दिवस लागतील." मी विषय बदलायचा प्रयत्न केला.
"ओके. पण लवकर.. आणि त्या फ़िशवाल्याला रोज फ़्रेश माल द्यायला सांग. परवा एक कस्टमर ओरडत होता."
पिंकीच्या येण्याचा मला फ़ायदा झाला होता.. कामाचं रामायण पडलं होतं. आता माझ्याजवळ विचार करायला वेळ नव्हता. स्वत:ला स्वत:पासून विसरण्यासाठी तर मी इथे आले होते ना..

Neelu_n
Thursday, April 05, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी डेली एपिसोड का?:-) लिह लिह पटापट

Nandini2911
Thursday, April 05, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवस सगळा असाच कामात गेला. जरी मी या रीजॉर्टची administrator होते तरी माझ्या हाताखाली कुणीच नव्हतं. सगळी कामं मलाच बघायला लागत होती. त्यातच दिल्लीवरून आलेल्या एका कस्टमरच्या पोटात दुखायला लागलं. जवळचं शहर म्हणजे बेळगाव.. तिथपर्यत त्याला घेऊन गेले आणि चेक अप करून आणलं.

हे जंगल रीजॉर्ट कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर होतं. पहिल्यान्दा जेव्हा इथे आले तेव्हा हरवल्यासारखं झालं होतं मला. आई बाबा तर अशा ठिकाणी मी एकटी कशी राहू शकेन या प्रश्नात तर मी आता इथे मी एकटीच... या आनंदात. मस्त हिरवीगार दरी... मोठ्यामोठ्या रूम्स. एकमेकापासून मुद्दामच लांब ठेवलेली कॉटेजेस. आणि सभोवताली किर्र जंगल. अभि जर इथे आला असता तर कायम इथेच राहायचं असं म्हणाला असता... आणि म्हणुन मी कायम इथे रहायचं ठरवलं.

इथे दिवस कसा जायच कळायचाहि नाही... अवघा तीस जणाचा स्टाफ़ होता.. आता पावसाळा जवळ आल्यामुळे अर्धे लोक परत जाणार होते. फ़ारतर दहा बारा जण उरलो असतो आम्ही.

आजचंही काम आटोपलं आणि मी माझ्या रुमवर आले. अख्ख्या रीजॉर्टमधलं हे सगळ्यात दूरचं कॉटेज. माझं कॉटेज संपलं की सुरू व्हायची खोल दरी...

काळोखामधे मात्र दरी आहे की नाही ते समजायचंच नाही... आताही मी सगळे लाईट बंद केले आणि शांतपणे बेडवर पडून राहिले. अकरा साडे अकरा वाजले असावेत. रूमचा दरवाजा उघडला. मला कोण आलं ते बघायची वाटली नाही. माझ्या कॉटेजचा चावी माझ्याशिवाय फ़क्त अभिजीतजवळ होती.
"सावरी... " त्याने मला आवाज दिला.
"अभिजीत.. किती उशीर करतोस?" मी त्याच्या मिठीत शिरले.

परत एकदा अपराधीपणाची भावना मनात येऊन गेली. परत एकदा अभिजीतच्या उष्ण श्वासात ती जळून गेली. मी विधवा होते... पण म्हणून मला जगण्याचा हक्क नव्हता? का मी माझ्या सासू सासर्याच्या आणि आई वडीलाच्या डोळ्यात धूळ फ़ेकत होते? माझ्या उण्यापुर्या दहा महिन्याच्या संसाराच्या आठवणी घेऊन मी कसं अख्खं आयुष्य जगणार होते?

रात्र चढत गेली तसे सगळेच प्रश्न बाजुला पडत गेले. उरले ते फ़क्त देहाने देहाला दिलेले साद प्रतिसाद...



Dhoomshaan
Thursday, April 05, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीबाई, वाट कसली पाहता?
येऊ द्या भराभर!!!!!!!


Manogat
Friday, April 06, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि रे सहि
यावेळेस प्रिया नाहि कथेत, :-)
येउदेत लव्कर पुर्ण कथा


Nandini2911
Friday, April 06, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहाटे जाग आली... तर अभिजीत उठून निघून गेला होता. आता मला झोप येणं अशक्य होतं डोळ्यासमोर मला माझा अभि दिसायला लागला होता. अभि आणि मी.. कॉलेजात असताना आमची ओळख झाली आणि कधी प्रेमात पडलो तेच समजलं नाही. त्याला नोकरी लागल्या लागल्या लग्न करायचं असं आम्ही ठरवलं होतं. सुदैवाने त्यालाही लगेच नोकरी लागली. आणि सहा महिन्यात आम्ही लग्न केलं. नव्या घरात मला कधीच परक्यासारखं वाटलं नाही. आईनी मला अगदी लेकीसारखं वागवलं. त्याना खरंतर मुलीची खूप हौस होती. पण अभि तर एकुलता एक..
मग मलाच मुलगी मानून खूप लाड करायच्या. सासरे तर त्याहून गमतीशीर होते. आणि अभि.... स्वर्ग म्हणजे काय ते मला पहिल्यादा समजलं होतं. खूप सुखात होते मी....
पण कदाचित हे दु:खाच्या आधीच सुख होतं... कारण एके रात्री अभिला ऑफ़िसवरून यायला उशीर झाला.. तसा तो हल्ली होतच होता. पण रात्रीचे दीड वाजले तरी तो आला नाही. मी वाट बघून झोपी गेले तोच फ़ोन वाजला.
बाबानी सगळी धावाधाव केली. अभिचे सगळे मित्र आले. माझे आईवडील पुण्यावरून आले. मला कित्येक वेळ नक्की काय चालू आहे तेच समजेना. आणि मग मला जेव्हा कळलं तोपर्यन्त अभि मला सोडून गेला होता... कायमचा. "आता जाउन येतो बघ,..." असं सकाळी म्हणाला होता आणि परतच आला नव्हता.

आई बाबा पारच कोलमडले होते. त्याच्याकडे बघणारं कुणी नव्हतं. मला पुण्याला पाठवायला ते तयार झाले पण मी नाही म्हणून सांगितलं. आता हेच माझं घर होतं. अवघी बावीस वर्षाची मी... पांढर्‍या कपाळाने रहायला शिकले. वेळ जावा म्हणून पुढे interior desighner चा कोर्स केला. हळू हळू माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली. खरं तर मला पुन्हा एकदा डाव मांडायची कसलीही इच्छा नव्हती. पण आई बाबाना तसं मला सांगताही येईना. त्याना माझ्या भविष्याची काळजी होती. मी भूतकाळातच जगायचा हट्ट धरून बसले होते.


Chaffa
Friday, April 06, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी कथा चढत्या क्रमाने चटका लावत चाललेय दोस्त

Disha013
Friday, April 06, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच चाललयं की! प्रिया नाहीये, पण अभिजीत २,२ आहेत.

Bhramar_vihar
Saturday, April 07, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही एकमासी कथा असणार आहे का?

Aamya
Saturday, April 07, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदिंनी तुझ्या कथा खरच खुप छान असतात.तु वचकांची उत्सुकता ( की अंत ?) ताणुन धरन्यास बर्याच प्रमाणात यशस्वी ही होतेस. मला असे वाटते की तु चागंली एपीसोड रायटार बनु शकतेस.

Nandini2911
Saturday, April 07, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी अवस्था माझ्या आई बाबाना बघवत नव्हती. खरं तर मी सुख आणि दु:खाच्या पलीकडे जाउन पोचले होते. मला अभिकडे जायला वेळ लागला नसता पण त्याच्या आईवडीलाकडे बघणारं कोण होतं?
"आसावरी.." एके दिवशी बाबानी मला आवाज दिला. मुळातच त्याचा स्वभाव कमी बोलण्याचा होता आणि आता तर अजिबात बोलत नसत.
"काय बाबा?" मी विचारलं.
"हे वाच" त्यानी मला एक पत्र दिलं. माझ्या आईने माझं नाव एका विवाह मंडळात नोंदवलं होतं. मला तिचा इतका राग आला होता. मला न विचारता तिने हे काम केलं होतं. पण बाबा आणि काहीच बोलले नाहीत. उलट आईनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजावलं. सगळं आयुष्य बालवाडेच्या मुलाब्वरोबर घालवलं असल्यामुळे असेल कदाचित पण त्याना न सांगता बरंच काही समजायचं. माझ्या मनातली प्रत्येक भावना त्या चटकन समजून घ्यायच्या.
"आसावरी,,, अगं, एक माणूस गेलं म्हणून का आपलं जीवन थांबते? त्याचा इतक्याच दिवसाचे ऋण होतं त्याने फ़ेडलं.... आपलं अजून आहे असं समजायचं..." नाना तर्हेने त्या माझी समजून घालायच्या.. कधी मला पटायचं, कधी नाही. पण मी त्याना कधीच काही बोलले नाही.
असेच परत एक पत्र आलं. नाशिकचा कुण्या बिजवराचं स्थळ होतं. आधी बाबानी मला विचारलं, "करायची ना पुढची बोलणी?"
मला नकार द्यायचा होता... पण बाबाच्या पुढे बोलायची हिंमत झालीच नाही. त्याची भिती नव्हती.. पण त्याची माझ्याविषयीची ममता खूप काही सांगून गेली.

पण इतकं सहज माझं नशीब यापुढे नव्हतंच. या माणसाच्या आईने माझी पत्रिका मागितली होती. या आधी ती काढलीच नव्हती. बाबाच्या ओळखीतल्या एका माणसाला सगळी माहिती दिली. तो दोन तीन दिवसात घेऊन येतो म्हणाला....

मी पायर्‍या चढून वर आले. दुपारचा एक वाजला असावा. घरात कुणीतरी आलं होतं. मी दरवाजा उघडून आत जाणार तेवढ्यात माझी पावलं थबकली.
"हं... पत्रिका पाहून वाटलंच होतं मला. पण आता तुम्ही सांगितल्यावर विश्वास बसला. कठीण आहे हो... तुम्ही आधी पत्रिका पाहिली असती तर कदाचित सगळं टाळता आलं असतं... पण आता काय करणार? अहो, इतका कडक मंगळ.. कशी ही मुलगी संसार करेल? स्वत्:चं कुंकू स्वत्: पुसण्यतच हिला समाधान वाटेल आयुष्यभर..."

तिथल्या तिथे धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर किती बरं झालं असतं....
म्हणजे अभिच्या अकाली जाण्याला मी जबाबदार होते. जर मी त्याच्या आयुष्यात आलेच नसते तर कदाचित....
मी मारलं होतं त्याला... माझं कुंकू मीच पुसलं होतं. अभिच्या जाण्यापेक्षाहीहे दु:ख मल असह्य झालं. मरणा मरणाच्या यातना देऊन गेलं.


Nandini2911
Monday, April 09, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतके दिवस आयुष्याला जोडणारी कुठेतरी एक नाळ शिल्लक होती. त्या एका वाक्याने तीही तुटली. आई बाबानी जर मला दोष दिला असता तर कदाचित बरंच झालं असतं. पण त्यानी मला यातलं काहीच सांगितलं नाही.. माझीच मला अपराधीपणाची भावना गिळायला लागली.
तेव्हाच मी घर सोडण्याचा निर्णय घेतला.. कारण आता या घरात मी स्वत्:लाच परकी मानायला लागले होते.
आई बाबानी खूप समजावलं पण मी ऐकायला तयारच नव्हते. नेमकं त्याचवेळेला अभिच्या एका मित्राने हे रीजॉर्ट सुरू केलं आणि मी इकडे शिफ़्ट झाले.

खरं तर मला त्या वातावरणापासुन दूर जायचं होतं. कारण तिथल्या प्रत्येक गोष्टीशी अभि निगडीत होता. पण जागा बदलली म्हणून मन थोडीच बदलतं. इथं आल्यावरही प्रत्येक वेळेस तो आठवायचाच.
पण इथे खरंच खूप छान वाटयचं. एक तर कुणालाही मी माज्झा भूतकाळ सांगितला नव्हता. कारण मला स्वत्:ला त्या "बिच्चारी" नजरेची कीव येत होती.
मला इथे आल्यावर पहाटे लवकर उठायची सवय झाली.
सकाळच्या प्रसन्न हवेत फ़िरायला खरंच खूप बरं वाटायचं. थंडीचे दिवस होते. त्यामुळे मी शाल ओडून अशीच भटकत होते.
"हाय.." पाठून आवाज आला.
मी वळून पाहिलं.
साधारण पंचविशीचा एक तरूण होता. असच कुणी रीझॉर्टचा कस्टमर. पण मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं.
"हेलो" मी हसून उत्तर दिलं.
"यु मस्ट बी आसावरी.." तो म्हणाला.
मी नुसती हसले.
"अभिजीत.." मी चमकून पाहिलं. त्याने हात पुढे केला होता. मी थिजल्यासारखी त्याच्या कदे बघत होते. मूळचा गोरा रंग.. पण उन्हाने बराच रापलेला. काळे डोळे. आणि चेहर्‍यावर हसू..
"केव्हा आलात? आणि कधीपर्‍य.त आहात?" मी विचारायचं म्हणून विचारलं.
"काल रात्री आलो.. आणि कदाचित एक सहा महिने तरी इथे नक्कीच आहे.:" तो सहज म्हणाला.
रीजॉर्टच्या एका दिवसाचं भाडं सहा हजार रुपये होतं.....
"काय?" मी जरा जोरात विचारलं. "सहा महिने?"
"हो, कदाचित जास्तही लागतील." तो म्हणाला.
कदाचित तो माझी थट्टा करत असावा.
"कुठल्या कॉटेजला आहात?" मी विचारलं.
"त्या तिथल्या..." त्याने लांबवरती बोट दाखवलं.
"पण त्यात तर स्टाफ़साठी आहेत.." मी बोलले.
"मग?" त्याने माझ्याकडे पाहिलं.
कदाचित माझ्या चेहयावरचे प्रश्नचिन्ह त्याने वाचलं असावं.
"ओह.. मी अभिजीत.. इथला नवीन ecologist .."
"ओके.." मी बोलले.
"आणि या नोकरीशिवाय मी इथे Ph D पण करतोय. या भागातल्या reptiles वरती."
मी आणि तो रेस्टॉरंट्पर्यन्त चालत आलू.
कॉफ़ी घेऊन होईस्तोवर मला त्याने त्याच्याविषयी बर्cंच सा.गितलं होतं.
पिंकीने तर आल्या आल्या त्याला रेडीओ हे नाव देऊनसुद्धा टाकलं होतं. त्याला सगळेजण अभि म्हणायचे.. मी कधीच म्हटलं नाही.


Zpratibha
Monday, April 09, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी एकदम सहि. पण जरा लवकर लवकर येऊ देत. ऊत्सुकता अगदि ताणली जाते.

Sanghamitra
Monday, April 09, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी छान चालू आहे. आत्तापर्यंतची तरी अगदी interesting वाटतेय. तुझी कथा खुलवायची शैली छान असते.
फक्त आता पुढे बालाजी टेलीफिल्म्सच्या वळणावर जाऊ नये ही गोष्ट.


Nandini2911
Tuesday, April 10, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत केव्हा माझा मित्र झाला ते कळलंच नाही. सगळ्या स्टाफ़चा तसा तो लाडका होता. म्हातार्‍या गुरूकाकानी तर त्याला आपला मुलगाच मानलं होतं.
दिवसभर जंगलात भटकायचा.. कसले तरी किळसवाणे प्राणी गोळा करायचा. आणि त्याचे फ़ोटो काढायचा. भरीस भर म्हणून जो भेटेल त्याला हे प्राणी दाखवायचा... आता गांडुळात बघण्यासारखं काही असतं का.. पण नाही.. हा चक्क त्या गांडुळाबरोबर चहा पीत गप्पा हाणायचा.

पण त्याचं निसर्गावर खूप प्रेम होतं. अख्ख्या रीजॉर्टमधे एक जरी प्लास्टीकची पिशवी दिसली तरी तो भडकायचा. सुरुवातीला मला त्यात चिडण्यासारखं काय आहे तेच कळायचं नाही. पण हळू हळू त्याचं हे वेड लक्षात येत गेलं. रीजॉर्टमधे येणार्‍या सागळ्यासाठी तो रात्री एक लेक्चर द्यायचा. माणसाने निसर्गावर केलेलं आक्रमण त्याचा दुष्परिणाम्ल.. सगळं इतकं छान समजावून सांगायचा की बास...
अभिजीतच्या लेक्चरच्या शेवटी तो एक वाक्य सांगायचा..
"लक्षात ठेवा माणसाने निसर्गावर कितीही आक्रमण केलं तरी निसर्गाचं काहीही बिघडत नाही.. मात्र मानवाने जपून रहायला हवं कारण आज आपण विसरलोय की आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत... "
हे सांगतानाचा त्याचा आवेश मला खूप आवडायचा.
कधी कधी मी मनातल्य मनात अभिची आणि अभिजीतची तुलना करायचे. एक नाव सोडलं तर दोघात काहीच समान नव्हतं. पण तरीही.. मनातल्या मनात तुलना व्हायचीच.

अभिजीत आणि मी दररोज सकाळी फ़िरायला एकत्र जायचो. त्याचे आईवडील पुण्याला होते. एकच बहीण तिचंही लग्न झालं होतं. घरची परिस्थिती चांगली होती, म्हणूनच याच्या या जगावेगळ्या करीअरमधे येणं शक्य झालं होतं.

"आसावरी... तू या जंगलात का राहतेस?" त्याने एकदा मला विचारलं..
"का म्हणजे मला आवडत..." मी हसून उत्तर दिलं.
"नाही.. तुला इथं आवडत नाही..."
"असं तुला का वाटतं..." मी त्याला विचारलं.
"तू इथे आहेस कारण तू कसापासून तरी लांब जाण्याचा प्रयत्न करतेय्स.." त्याने धीर गंभीर आवाजात उत्तर दिलं...
"तुला असं वाटतं की तू इथे राहिलीस तर जगापासुन दूर आहेस.. "

मला कितीतरी वेळ त्याला काय उत्तर द्यायचं तेच सुचेना.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators