Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सुधीर जोशी (jo_s) ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » सुधीर जोशी (jo_s) « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, April 02, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ...

स्वातीच्या गज़ल वरच्या एका चर्चेला उत्तर देताना मी लिहीलं आहे ...

" एकाच वृत्तातल्या एकाच ओळीवर आधारीत रचना सादर करताना नंतर नंतर तेच ते काफ़िये येण्याचा संभव असतो . कृपा करून फक्त इतकेच न पाहता तोच तो विचार असेल तरीही त्यातील लहज़ा , शैली , सुटसुटीतपणा ह्या सारख्या गज़लेतील इतर सौंदर्यस्थळांकडे लक्ष देण्याइतके आपण ह्या वृत्तात तरी सक्षम झालो आहोत . कृपया त्याचा उपयोग करून प्रत्येक गज़ल ही नवी गज़ल अश्या दृष्टीकोणातून वाचा . जे योग्य वाटत नाही त्यावर जरूर जरूर लिहा पण त्याचसोबत " कसं योग्य करता आलं असतं ? " हे ही कमीतकमी गज़लकारांनी तरी जरूर लिहावे अशी कळकळीची विनंती . त्यातून इतर कुणाला नाही तरी आपल्या स्वतःला फायदा होईल ह्याची मला खात्री आहे .

उदा :- सुधीर च्या गज़ल मधला

असे सांगती लोक सारेच मोठे
हसे मीपणाचे अतोनात होते


हा शेर बघा . कुणीतरी समोर बसून सहज बोलता बोलता ऐकवल्यासारखा
ओघवता झाला आहे . ( अर्थात हे माझे मत )

सुधीर जोशी

ऋतू येत होते , ऋतू जात होते
मनाला परी हे कुठे ज्ञात होते

तुझे भास होते कधी अंकुरीही
कधी वाळलेल्याच पानात होते

अपेक्षा अशा आज नाहीत काही
सदा भाग्यरेखांत आघात होते

नको रे मना दोष कोणास देऊ
जसे होत होते , नशीबात होते

असे सांगती लोक सारेच मोठे
हसे मीपणाचे अतोनात होते

बदलत्या ऋतूंचा न त्यांना सुगावा
पुराण्या सुरांना सदा गात होते


Sanghamitra
Monday, April 02, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> तुझे भास होते कधी अंकुरीही
कधी वाळलेल्याच पानात होते
वा फारच सुरेख. पुन्हा एकदा मला देव आणि प्रेयस दोन्ही दर्शवेल असा शेर सापडला. तुम्हाला यातलाच कुठला अर्थ अपेक्षित आहे की नाही माहिती नाही. आता काही अपेक्षा नाहीत म्हणताच आहात पुढे. :-)

>>अपेक्षा अशा आज नाहीत काही
सदा भाग्यरेखांत आघात होते

नको रे मना दोष कोणास देऊ
जसे होते होते , नशीबात होते
आहे त्यात समाधान! दोन्ही शेरातले उले मिसरे खूप आवडले.
एकूण गज़ल छानच झालीय.



Mayurlankeshwar
Monday, April 02, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे सांगती लोक सारेच मोठे
हसे मीपणाचे अतोनात होते

तुझे भास होते कधी अंकुरीही
कधी वाळलेल्याच पानात होते

वा! सुधीरजी काय बोलकी आहे गझल!!

'नको रे मना दोष कोणास देऊ
जसे होते होते , नशीबात होते'
इथे काही typo आहे काय??
'जसे होते होते'...वृत्त गडबडले आहे इथे.

छान गझल :-)


Vaibhav_joshi
Monday, April 02, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही मयूर

Typo होती माझ्याकडून. नीट केलंय


Saavat
Monday, April 02, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


व्वा! सुंदर गझल,

ऋतू येत होते , ऋतू जात होते
मनाला परी हे कुठे ज्ञात होते

सुरुवातीला 'मी'त गुरफ़टलेल आणि काळाच्या गतीविषयी 'अनभिज्ञ'असणार मन...

तुझे भास होते कधी अंकुरीही
कधी वाळलेल्याच पानात होते

अपेक्षा अशा आज नाहीत काही
सदा भाग्यरेखांत आघात होते

पुढे काळाचे 'आघात'झेलून 'विचारी' बनलेल मन,अपेक्षेरहित होण्यातल 'सुख'अनुभवत आहे.. असे वाटते आणि ते स्वत:स सांगते....

नको रे मना दोष कोणास देऊ
जसे होत होते , नशीबात होते

असे सांगती लोक सारेच मोठे
हसे मीपणाचे अतोनात होते

'प्रारब्ध आणि अहंकार' सुरेख गुंफ़लाय!!'विचारी' बनलेल्या मनातला 'विवेक' स्पष्ट करायला शेर समर्थ आहे!

बदलत्या ऋतूंचा न त्यांना सुगावा
पुराण्या सुरांना सदा गात होते

अनुभवांती परिपक्व झालेल त्याच जुन्या मनाला, 'न थांबणार्या काळाचा खेळ' कळून चुकल्यामुळे,भूतकाळात रमलेल्यांच्या विषयी, 'खेद' वाटू लागलाय..असे वाटते!

काळाच-ऋतूंच चक्र उलगडायला, गझलकारांना सुरेख जमलय!

धन्यवाद!



Nachikets
Monday, April 02, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीरजी,

छान गज़ल. 'तुझे भास' आणि 'मीपणा' हे शेर विशेष आवडले. 'भाग्यरेखा' आनि 'नशीबात' ही छान. फक्त भासाच्या शेरात 'वाळलेल्याच' मधल्या 'च' चे प्रयोजन मात्र मला लक्षात येत नाहीये. C.B.D.G.


Mankya
Monday, April 02, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर .. जमून गेली बघ अगदी !
तुझे भास ... वाह !
भाग्यरेखात .. जसे होत होते .. ओघ खूप आवडला !
अतोनात .. वैभवाला अनुमोदन ( खूप बोलका ) !
मक्ता .. शेवट असावा तसाच शेवट केलायेस !
तशी गजल व्यथेवर आधारलेली पण ती ही देखणी केलीस हो ! साधेपणा अन सहजता यांचा संगम साधून शांतपणे वाहणारी सरीताच जणू ही गजल !

माणिक !


Psg
Monday, April 02, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, सुंदर गजल!
मलाही 'वाळलेल्या'च'' खटकले.. 'वाळलेल्या'ही'' किंवा 'वाळक्या' मीटर मधे बसू शकेल का?

बाकी सगळीच गजल मस्त आहे!


Mayurlankeshwar
Monday, April 02, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ने म्हटल्या प्रमाणे 'वाळक्या' मीटर मध्ये बसविता येईल पण ते असे--
'कधी वाळक्या जीर्ण पानात होते.'

आणि हे देखील इतकसं रूचत नाही असं मला वाटतं...


Jayavi
Monday, April 02, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर.......मस्त झालीये रे....!

तुझे भास होते कधी अंकुरीही
कधी वाळलेल्याच पानात होते
सुरेख!!!
बदलत्या ऋतूंचा न त्यांना सुगावा
पुराण्या सुरांना सदा गात होते
वा....ऋतूचक्र पूर्ण झालं :-)



Meenu
Monday, April 02, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुधीर मस्त जमलीये.

Chinnu
Monday, April 02, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, जयुला अनुमोदन. वाळल्या पानात आणि अंकुरात ऋतू घडले आहेत. छान आहे.

Mi_anandyatri
Monday, April 02, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीरजी!
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली तुमची गझल वाचताना, ती म्हणजे, गझलेच्या प्रत्येक शेरात विलक्षण सहजता आहे. गुर्जी म्हणाले तसं समोर बसून कोणीतरी सहज बोलून जातोय असं वाटतं...
वा... हे जमणं किती छान! लिहीत रहा...
तुझे भास होते कधी अंकुरीही
कधी वाळलेल्याच पानात होते - सर्वात आवडलेला शेर...
:-)


Daad
Monday, April 02, 2007 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर (जी), वैभव म्हणतोय ते खरय. ओघ, सहजता हे वैशिष्ट्य पण त्यामुळे कुठेच सपाटपणा आलेला नाही.
एक शंका आहे-
हसे "मी"पणाचे.... हा शेर जर एकटाच वाचला, तर अर्थबोध होत नाहीये. "नको रे मना..." ह्या शेरानंतर आल्याने(च) त्याला अर्थ येतो का? "असे.." म्हणजे कसे? ते आधेच्या शेराच्या संदर्भाने(च) कळतय.
की मी वाचताना काही चुकतेय? चू. भू.द्या. घ्या.

मलाही अंकूर आणि वाळलेल्याच पानांचा शेर आवडला. वाळलेल्याच मधला "च" महत्वाचा!


Meghdhara
Tuesday, April 03, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सुधीर व्वा!
नको रे मना.. निराशावादी किंवा दैववादी वाटतो..
बदलत्या ॠतूंचा.. नंतर अजुन पुढे काही आहे असं वाटतं.

दाद..
मी पणाचे.. अगदी स्वताःच जोरदार शेर वाटतोय.

आनंदयात्री..
'व्वा.. हे जमणं किती छान ' आणि किती कठीण. :-)

मेघा


Jo_s
Tuesday, April 03, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम वैभवचे आभार, कारण मुळात मात्रा वगैरे पासून चार हात दूर होतो आणि त्यापुढे गझल या प्रकारा पासून आणखी दूर होतो. वैभच्या या कार्यशाळेमूळेच याच धाडस केलं.

संंघमित्रा, मयूर, सावत्, नचिकेत, माणिक, पुनम , जयावि, मिनू, चिन्नू, आनंदयात्री, शलाका, मेघा अभिप्राया बद्दल धव्यवाद

संघमित्रा "पुन्हा एकदा मला देव आणि प्रेयस दोन्ही दर्शवेल असा शेर सापडला" माझ्या मनात देवच होता मग प्रेयसी हा अर्थही येतोय हे लक्षात आलं आणि ते वाचणाऱ्यावर सोडलं.

सावत छान वर्णन केलय, धन्यवाद.

नचिकेत , तो "च" मात्रे साठी च टाकला आहे. इतर काही पर्याय ट्राय केले. पण हाच बरा वाटला. कारण तो च अर्थात बाधा आणतोय असे वाटत नाही.

पुनम , त्या च च्या जागी "ग" ही बसला असता पण मला देवाला उद्देशून लिहिण अपेक्षीत होतं. म्हणून च टाकला.

मयूर "कधी वाळाक्या जीर्ण पानात होते" हाही पर्याय चांगला आहे पण त्यात तो जोर मिळत नाहीना?

शलाका, धन्यवाद. ते दोन शेर एकमेकावर अजीबात अवलंबून नाहीत. तस झालं तर तीला गझल म्हणता येणार नाही (नुकत्याच शिकलेल्या नियमा प्रमाणे).
अस पहा
"असे सांगती लोक सारेच मोठे
हसे मीपणाचे अतोनात होते"
याच अर्थ अगदी साधा आहे. सगळेच थोर सांगत असतात की वृथा मीपणा करूनये. आपण मी मी करण्या पेक्षा आपले गुणच बोलले तर अधीक चांगलं नाही का ? आणि सतत असं मी मी करणाऱ्यांच हसं झाल्या शीवाय रहात नाही. त्यामूळे मी मी करण्या पेक्षा "मी" जाणून घेता आला तर किती बर होईल.

सर्वांचेच साधेपणा व सहजतेला दिलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद, कारण माला या गोष्टी नेहमीच आवडतात.

सुधीर


Nvgole
Tuesday, April 03, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, तिथे मनोगतावर 'ऋतू येत होते ऋतू जात होते'
शीर्षकावर अनेक विडंबने पाहत होतो. त्याचा उगम तुझ्या कवितेत आहे हे समजल्यावर तू खूपच थोर वाटू लागला आहेस.

खैर. मुळात
'असे सांगती लोक सारेच मोठे
हसे मीपणाचे अतोनात होते'
ही रचनाच सहजसुंदर आहे.

गझल आवडली. सुरेख!


Jo_s
Tuesday, April 03, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोळे काका धन्यवाद,
इथे गेले काही दिवस वैभव जोशींच्या कृपेने गझल कार्यशाळा चालू आहे.

/hitguj/messages/75/123104.html
इथे गेलात तर याहून चांगल्या गझल पहायला मिळतील

सुधीर


Daad
Tuesday, April 03, 2007 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ हो! सुधीर, कळलं आता. मुळात माझा प्रश्नंच चुकीचा होता. इतका मोठा नियम डावलून गज़ल प्रकाशित होणारच नाही नाहीका?
इथे "शंका" विचारून डोक्यात घोळणार्‍या विचारांत आलेला एक विचार असा- "असे" सांगती.... च्या ऐवजी-
"तसे" सांगती लोक सारेच मोठे
हसे "मी" पणाचे अतिनात होते
केल्यास अर्थ थोडा "कोपरखळी" वाला होतो. - तसं लोक बरंच काही मोठं सांगतात (किंवा मोठे लोक बरच काही सांगतात) आणि त्यात "मी"पणाचं हसं करून घेतात.
किती गंमत आहे पहा, एक शब्द बदलून अर्थाचा अनर्थ (??) होऊ शकतो.....
असो, लिहीत रहा बाबांनो, छान लिहिता.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators