Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

गिरीराज

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » गिरीराज « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 29, 200720 03-29-07  2:02 pm

Pulasti
Thursday, March 29, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, गझल छानच!
चेहरे शेर (वैभव, माणिकचे स्पष्टीकरण वाचल्यावरही) जरा गुंतागुंतीचा वाटतोय. शेवटचे २ शेर मला विशेष नाही आवडले.
हुंदका शेर - मनाला स्पर्षून गेला.
"श्रम" - मला या गझलेतला सगळ्यात आवडलेला शेर!! जरा सावरू लागता रात होते - जयु म्हणते तसं शेरे बब्बर, शेरे हासिल .. जे काय असतं ते.. केवळ अप्रतिम!
-- पुलस्ति.

Jo_s
Friday, March 30, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराज,
सुंदर गझल. एकुण एक शेर आवडले.


किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते

हा शेर खासच. सतीशजींशी एकदम सहमत


Giriraj
Friday, March 30, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रहो!

चेहरे शेर मला हवा तसा उतरला नाही.. मुळात मी तो असा लिहिला होता...

मला चेहरेही तुझ्या भावनांचे
सुखाचे कधी,क्षणि दुःखात होते


मला अभिप्रेत होते ते असे.... माझा चेहरा हा मूळ चेहरा नाहीच.. त्यावर सारखी आवरणं चडहवली जाताहेत ती इतरांच्या भावनांची... जर समोरचा सुखात असेल तर मी सुखात आहे असेच त्याला वाटते..

पण वृत्त सांभाळणे आणि फ़क्त सुख,दुःखाशी relate होऊ न देता व्यापक अर्थाने व्हावा म्हणून गज़लेत आहे तसा लिहिला. अर्थ स्पषट होत नाहिये पण खूप विचार करूनही मला काही सुचेचना!

पुर्वी मी गज़ल लिहायचा प्रयत्न करून नण्तर गज़लेच्या नादी लागायचे नाहि असे ठरवले होते. मुसलसल प्रकारातच आधी जमले होते. यवेळेसही तेच झाले आणि त्यामुळेच शेवटचा शेर टाकण्यापासून स्वतला आवरू शकलो नाही... कवितेसारखे! :-)

एक मात्र खरे आहे.. गज़लेत लिहितांना अर्थाशी तडजोड न करता लिहिणे महान लोकच करू शकतात! :-)


Gs1
Friday, March 30, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची
जिथे हुंदकेही पहार्‍यात होते

किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते

वा गिरी, हे दोन्ही शेर आवडले

Itsme
Friday, March 30, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा गिरी, खुपच सुरेख ... २ रा आणि ३ रा जास्त आवडले.

Cool
Monday, April 02, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


गिरी, सुरेख.. बर्‍याच दिवसांनी, पण मस्तच, खुपच भावली..


Desh_ks
Wednesday, April 04, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज,

"मला चेहरा.." बद्दल.

तुम्हाला काही सुचवावं हे धाडस केवळ यासाठी की तुमच्या या शेरामागची कल्पना मला खूप आवडली आहे आणि तो विचार सततच मनात होता. त्यावर मला जे सुचलं ते पुढे देतो आहे. अर्थात यावर तुम्ही अधिक चांगलं लिहालच, पण यावरही तुम्ही मत द्याल अशी अपेक्षा आहे.

मला चेहराही नसे रे स्वत:चा
तुला जे हवे रूप, ते त्यात होते

-सतीश


Giriraj
Wednesday, April 04, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, माझ्यासारख्या बालकाला तुम्ही 'अहो जाहो' म्हणून अवघडवून टाकताच आहात पण पुन्हा स्वतच्या सुंदर रचनेला 'धाडस' म्हणुअवून घेऊन अजूनच लज्जित करताहात! :-)

कधी कधी आपल्याला काय म्हणायचे आहे तेच स्पष्ट नसते तर कधी ते कसे म्हणायचे हे जमत नाही... माझे दुसर्या प्रकारे झाले... मुळात कही ठिकाणी असलेल्या मीटरच्या चुका वैभवच्या मार्गदर्शानाने इथे दिसत नाहियेत... अगदी अडखळायला झाले होते असे शब्दही अर्थात बदल न घडवता जितक्या सहजतेने मला सुचवले तेव्हा तर आश्चर्या वाटल्यावाचून राहीले नाही... आणि आता आपण जे सुचवत आहात तेही तितकेच सरळ आणि सुंदर आहे.... आपल्यासारख्यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच फायदा होत राहील... धन्यवाद! :-)


Chinnu
Wednesday, April 04, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीश, वाह!
गिर्‍या शिक काहीतरी! :-) दिवे घे हो!


.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions