Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

मनिषा लिमये

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » मनिषा लिमये « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, March 28, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messageमनिषा लिमयेऋतू येत होते ऋतू जात होते
तुझ्या संगतीने सुखे न्हात होते

जरी वादळे , ऊन , पाऊस वारा
मला सावराया तुझे हात होते

असे काय अंधारले भर उन्हाचे
मळभ दाटले का उजेडात होते

कळेना असे हे कसे काय झाले
कशी भंगले मीच स्वप्नात होते

तुझी प्रीत स्वार्थी मला रे कळाली
कसे सावरू ? मीच धोक्यात होते

पुन्हा तू उठावे , नव्याने लढावे
तुझ्या फक्त इतकेच हातात होते


Jayavi
Wednesday, March 28, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा....... तो आपकी गझल आ ही गई.....!
छान झालीये.
तुझी प्रीत स्वार्थी मला रे कळाली
कसे सावरू ? मीच धोक्यात होते
छानच!

पुन्हा तू उठावे , नव्याने लढावे
तुझ्या फक्त इतकेच हातात होते
मक्ता आवडला....!

Mankya
Wednesday, March 28, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा ... छाने !
वातावरणमिर्मिती उत्तम !
जसे " मळभ दाटले उजेडात "... लगेच दृष्यही डोळ्यासमोर उभे रहाते अन अर्थही मनात तत्काळ उमटतो ! अर्थात सहजताही आहे अन बरीच बोलकीही आहे ग़जल ! परीश्रम कारणी लागले तुमचे असे मी तरी म्हणेन !

माणिक !


Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा 'कशी भंगले मीच स्वप्नात' छान डेप्थ create झालीये. मक्ता छान.

Chyayla
Wednesday, March 28, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरी वादळे , ऊन , पाऊस वारा
मला सावराया तुझे हात होते

तुझी प्रीत स्वार्थी मला रे कळाली
कसे सावरू ? मीच धोक्यात होते

खरच एकिकडे हात देउन सावरणारा लगेच स्वार्थी झाला... वा वा उत्तम "राग" निर्मिती केलीस... मजा आली...


Kushaldhande
Thursday, March 29, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ख़ुपच छान. आधि निट समजल नाही, पण मंगेश ने समजावून सांगितल्यावर कळली. यमक छान जुळल आहे.

Bairagee
Friday, March 30, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझे मत-
ह्या गझलेतला साधेपणा-सोपेपणा फार आवडला.

पुन्हा तू उठावे , नव्याने लढावे
तुझ्या फक्त इतकेच हातात होते
फारच आवडला! नेहमीची कल्पना छानच आली आहे.

जरी वादळे , ऊन , पाऊस वारा
मला सावराया तुझे हात होते
वाव्वा! एकंदर छान.

कळेना असे हे कसे काय झाले
कशी भंगले मीच स्वप्नात होते
वरची ओळ मस्त प्रवाही आहे. शेर छान.Mayurlankeshwar
Friday, March 30, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे गझल.
'स्वप्नात भंगण्या'चा शेर आवडला.
पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा :-)


Chakrapani
Monday, April 02, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागीबुवांशी सहमत आहे. गझलेतला साधेसोपेपणा आणि नेहमीच्या कल्पना प्रवाहीपणे मांडणे चांगले झाले आहे.

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions