Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तुषार ( Imtushar ) ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » तुषार ( Imtushar ) « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, March 28, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ....

काहीच बदल न करावी लागलेली आणखी एक गज़ल

तुषार

ऋतू येत होते ऋतू जात होते
कसे हे दुरावे नशीबात होते

सख्या मीलनाची किती वाट पाहू
सरेना तुझ्याविण सुनी रात होते

तसे संपले जीवघेणे उन्हाळे
अता आसवांचीच बरसात होते

किती दूर लोटू, कसे पाश तोडू
खुळे दु:ख माझ्याच प्रेमात होते

तुझा दोष नाही, सुखांशी तसेही
जणू वैर माझे पिढीजात होते

मला सागरांची नको लाच आता
खरे प्रेम एका तुषारात होते


Nachikets
Wednesday, March 28, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान गज़ल आहे, तुषार!!

खुळे दुःख आणि मक्ता विशेष आवडले.


Jayavi
Wednesday, March 28, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे संपले जीवघेणे उन्हाळे
अता आसवांचीच बरसात होते.... सुरेख!

तुझा दोष नाही, सुखांशी तसेही
जणू वैर माझे पिढीजात होते....... वा.....!

मला सागरांची नको लाच आता
खरे प्रेम एका तुषारात होते ....क्या बात है....!
आवडेश :-)


Mankya
Wednesday, March 28, 2007 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार ... सहि है !
खुळे दुःख ... जमून गेला रे अगदि !
सुखांशी पिढिजात वैर .. कल्पना आवडली मित्रा !
मक्ता ... या रचनेचा मुकुटमणि म्हणेन मी !
अजूनहि खुलेल हि गजल काहि प्रयत्नांनी !

माणिक !


Mi_anandyatri
Wednesday, March 28, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, खूऽऽऽप छान आहे गझल..
सगळे शेर आवडले..

"सरेना तुझ्याविण सुनी रात होते"
इथे फ़क्त पहिल्या वाचनात "सरेना" हा शब्द अतिरिक्त वाटतोय.. त्याला संदर्भ नाहिये असं वाटतंय.. कारण "सरेना" चा कर्ता असलेला "रात" शब्द "सुनी" शी अधिक जवळचा वाटतोय.. चुभूद्याघ्या..

पण गझल खरंच छान आहे.. "तुषार" चा सदुपयोग केला गेलाय.. :-)


Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझा दोष नाही, सुखांशी तसेही
जणू वैर माझे पिढीजात होते!
अतिशय सुंदर तुषार. मक्त्यामध्ये हुशारीने नाव गोवलत! :-) छान.

Mayurlankeshwar
Wednesday, March 28, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे संपले जीवघेणे उन्हाळे
अता आसवांचीच बरसात होते
हे खूप आवडलं!!


Paragkan
Wednesday, March 28, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya baat hai ... shewatacha she khaasach!

Desh_ks
Thursday, March 29, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार,

मक्ता छान आला आहे.

-सतीश


Meenu
Thursday, March 29, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त जमलीये गज़ल तुषार, त्यातही हे तीन शेर जास्त आवडले, वेगळे आहेत म्हणुन
किती दूर लोटू, कसे पाश तोडू
खुळे दु:ख माझ्याच प्रेमात होते

तुझा दोष नाही, सुखांशी तसेही
जणू वैर माझे पिढीजात होते

मला सागरांची नको लाच आता
खरे प्रेम एका तुषारात होते


Sanghamitra
Thursday, March 29, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> तुझा दोष नाही, सुखांशी तसेही
जणू वैर माझे पिढीजात होते
सही!
मक्ताही छान जमवलाय.
बाकी ठीकठाक आहेत.


Zaad
Thursday, March 29, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझा दोष नाही, सुखांशी तसेही
जणू वैर माझे पिढीजात होते

व्वा!!! मस्त जमलाय! गज़ल छानच!!!


Daad
Thursday, March 29, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, आवडली गजल. खुळे दु:ख कल्पना मस्तय.
तुझा दोष नाही. - ह्या शेराची मांडणी मजेशीर (छान) आहे. दुसरा शेर पहिल्यातच सुरू झाल्यासारखा........
एक प्रश्न आहे तुजविण हा शब्द तुज'वी'ण असा हवा का?
र्‍हस्व 'वि' हा तुजविणा मध्ये वापरता येतो (म्हणजे तसं वाचलय). चू.भू.द्या.घ्या.


Giriraj
Thursday, March 29, 2007 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मक्ता ज़बरी रे! :-) -- -- --

Rmjadhav75
Thursday, March 29, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूषार,:-)

नाद खुळा भावा!!!!!


Imtushar
Thursday, March 29, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.

या कवितेबद्दल माझी भूमिका मांडावी असे वाटले...

"प्रियकर परतून येणार नाही (अता आसवांचीच बरसात होते)" ही अपरिहार्यता या कवितेत अधोरेखित करणं आवश्यक वाटलं (आणि ते थोडफार जमलंय असे वाटते).

तू येणार नाही हे नक्की असून सुद्धा माझे तुझ्यावर प्रेम कायम आहे अणि ते तसेच राहील (जे मक्त्यातून दिसते),
आणि माझ्या नशिबी जे दु:ख आहे ते मी तुला दोष न देता स्वीकारते (खुळे दु:ख... आणि सुखांशी पिढीजात वैर) या भावना त्या अपरिहार्यतेच्य पार्श्वभूमीवर अधिकच उठून दिसतील असे वाटले.

आनंदयात्री,
सरेना हा शब्द मला अतिरिक्त नाही वाटला..
तुझ्याविण सुनी रात सरेना(शी) होते या अर्थाने ती ओळ होती.

शलाका, तुझ्याविण बद्दल - वृत्तामध्ये 'वि'च बसतो म्हणून तो तिथे आहे व्याकरणदृष्ट्या 'वी' असावा असे वाटते. ( same with 'अता')

पण एकंदरीत हा शेरच मला अतिरिक्त वाटतो कधीकधी.

गझल उशीरा पाठवल्यामुळे (आणि कदाचित तांत्रिक फ़ेरबदल करण्याची गरज नसल्याने) वैभव आणि इतर गुरुजनांशी संवाद होऊ शकला नाही, परंतु या कार्यशाळेत खूप शिकायला मिळाले. याबद्दल सर्वांचेच आणि खासकरुन वैभवचे मन:पुर्वक आभार.

-तुषार





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators