Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

शलाका (दाद)

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » शलाका (दाद) « Previous Next »

Vaibhav_joshi
Friday, March 23, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, हीसुद्धा काही अगदी माफक बदल करताच निर्दोष झालेली गज़ल :


दाद(शलाका)
ऋतू येत होते ऋतू जात होते
तुझे श्वास माझ्या उरी गात होते

कुसुंबी उन्हाने लवे सांज दारी
तुझ्या आठवांचा सडा रात होते

कसे दंश सोसू, पिश्या चांदण्याचे
फणी केवड्याची उभी कात होते

सयींचा शहारा, सुगंधी उसासे
मुकी देहबोली खुली बात होते

जरी गाइले मी ऋतूंचे तराणे
कळीचे परी फूल मौनात होते

'तुझी याद येते' म्हणू मी कसे रे
तुझ्यावीण काही कधी ज्ञात होते?


Mayurlankeshwar
Friday, March 23, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद.. सगळ्यच शेरांना दाद...

कसे दंश सोसू, पिश्या चांदण्याचे
फणी केवड्याची उभी कात होते
हा समजला नाही तरी आवडला!

सयींचा शहारा, सुगंधी उसासे
मुकी देहबोली खुली बात होते

'तुझी याद येते' म्हणू मी कसे रे
तुझ्यावीण काही कधी ज्ञात होते?

ultimate केवळ अप्रतिम


Mi_anandyatri
Friday, March 23, 2007 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका वा...
सयींचा शहारा, सुगंधी उसासे
मुकी देहबोली खुली बात होते

"तुझ्या आठवांचा सडा रात होते" - यात भावना पोहोचताहेत, पण विभक्ती वेगळी वापरायला हवी होती असं वाटतंय..

'तुझी याद येते' म्हणू मी कसे रे
तुझ्यावीण काही कधी ज्ञात होते?
सहज जमलेला शेर, तरीही खूप छान... :-)


Sanghamitra
Friday, March 23, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका क्या बात है!
मस्त वाटलं वाचून. अतिशय सुरेख सगळेच शेर.


Mankya
Friday, March 23, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद ... तुला कशी दाद देणार आम्ही !
खरंच शब्द अपुरे पडताहेत दाद द्यायला !
सर्वांगसुंदर, अप्रतिम शब्दरचनेचा साज लेवून कशी नटलीये हि गजल !
मात्रांचा पुरेपुर उपयोग, जे म्हणायचे आहे तेही व्यवस्थितपणे पोहोचोवतेय !

सयींचा शहारा, सुगंधी उसासे ... आह ! कसं करायचं वर्णन ह्याचं !
तुझी याद येते ... सौंदर्य अजूनच खुलतय यामुळे !

दाद ... सगळ्या शेरांना मनापासून दाद देतो फक्त व्यक्त करता येत नाही, my vocabulary doesn't support me in this case !!

माणिक !


Zaad
Friday, March 23, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळीचे परी फूल मौनात होते !
आहा!! मस्तच!!!


Psg
Friday, March 23, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच, दाद ला काय दाद द्यायची? कोमल गजल आहे ही! :-)

कुसुंबी उन्हाने लवे सांज दारी
तुझ्या आठवांचा सडा रात होते

कसे दंश सोसू, पिश्या चांदण्याचे
फणी केवड्याची उभी कात होते

हे दोन शेर खूप आवडले.

Desh_ks
Friday, March 23, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर!!

हळव्या स्वरूपाची छान रचना आहे.
"मुकी देहबोली खुली बात होते" हे फारच छान मांडलं आहे.

अभिनंदन शलाका!


Imtushar
Friday, March 23, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शलाका, सुरेख गझल...

'तुझी याद येते' म्हणू मी कसे रे
तुझ्यावीण काही कधी ज्ञात होते?

अप्रतिम!

-तुषार


Jo_s
Friday, March 23, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका,
छानच आहे गझल


Pulasti
Friday, March 23, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका! वाह!
कुसुंबी उन्हे, उभी कात, सयींचा शहारा, चांदण्याचे पिसे... तुझ्या शब्द-भांडाराला साष्टांग प्रणिपात! i am speachless... आमच्यासारखे पामर शब्द शोधत बसतात, तुमच्या बाबतीत शब्द जणू झुंबड करताहेत - मला घे ना, मला घे ना म्हणत!!
मक्ता ही अप्रतिम.
-- पुलस्ति.

Jayavi
Friday, March 23, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं......कसले शब्द वापरले आहेत गं शलाका..... तुझ्या शब्दवैभवाला एक कडक सॅल्युट.....! एकदम जबरी!
खूप खूप आवडली :-) !!

Bairagee
Saturday, March 24, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'तुझी याद येते' म्हणू मी कसे रे
तुझ्यावीण काही कधी ज्ञात होते?
वावा! फारच आवडला हा शेर.

तुम्ही सरावाने उत्तम गझल लिहाल ह्यांत शंका नाही.
Daad
Sunday, March 25, 2007 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम वैभव आणि त्याला मदत करणार्‍या सगळ्यांचे मनापासून आभार. "आपल्याला येतय ना? मग कशाला उस्तवार फुकटची?" असा सर्वसामान्य (अतिसामान्य?) विचार न करता, वैभवने पुढाकार घेऊन सुरू केलेली ही कार्यशाळा! कुणी याला "लष्कराच्या भाकर्‍या" म्हणतील... पण त्याही कुणीतरी थापाव्याच लागतात. अन, त्यातली हर एक भाकरी आपणच खाणार असल्यासारखा वैभवने आणि त्याच्या टीमने दाखवलेला उत्साह, घेतलेली मेहनत याला तोड नाही!
"ही आणि यासारखीच काव्यनिष्ठांची मांदियाळी या भूमंडळी तुम्हा आम्हास अनवरत भेटोत!" - अजून काय म्हणू?
माझ्या "गज़ले"ला गज़ल बनवण्यासाठी स्वातीने केलेलं मार्गदर्शन आवश्यक आणि अमूल्य! ( thanks गं!)

ही कार्यशाळा सुरू झाल्यानंतर काही कारणाने मला अजिबातच इथे फिरकायला मिळालेलं नाही. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या गजला स्वस्थपणाने वाचून, त्यावर मनसोक्त दाद देण्याची संधी मिळालेली नाही. (घाऊक कौतुक करण्याची कार्यशाळा ही जागा नाही आणि शिवाय मी एक विद्यार्थिनी!). कार्यशाळा ही "शिकण्याची, विवेचनाची" जागा आणि सगळ्यांनीच त्याचा योग्य तो(च) उपयोग करून लाभ घेतलेला दिसतो. त्याबाबतीत माझा सहभाग शून्य होता आणि मला त्यासाठी सगळ्यांचीच वैभव, स्वाती, आणि इतर गुरुजन तसेच सहाध्यायी सगळ्यांची माफी मागायचीये.
(आणि त्यामुळे तुम्ही माझ्या गज़लेचं केलेलं कौतुक खूप जड वाटतंय.)

एक खरं, की खूप प्रयत्नानंतरही गजल जमली नाही तरी "समजेल" तरी. आणि ह्याचं सारं श्रेय पुढाकार, मेहनत घेऊन कार्यशाळा संपन्न करणार्‍या वैभव आणि त्याच्या Team ला आणि त्यात भाग घेऊन ती सफल करणार्‍या सार्‍या कवी मंडळींना!


Daad
Sunday, March 25, 2007 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर...
कसे दंश... हा शेर
पिश्या (वेड्या) चांदण्याचे दंश कसे सोसू? अरे, सारा देह, केवड्याच्या कणीसासारखा होतो.
यात काही अर्थांच्या छटा आहेत.
चांदण्यांच्या दंशाने, जागी झालेली लालसेची नागिण, तिचं केवड्याच्या बनात कात टाकणं, केवड्याच्या संगानं गंधाळणारं तिचं अंग किंबहुना स्वत:च केवड्याचं कणीस (फणी) झालेलं अंग.......
असं काहीसं!
असा "अभिप्रेत" अर्थ देण्याची सुचना प्रिय स्वातीची ( hats off to her ). मला स्वत:लाही आवडलेली!


Ashwini
Thursday, March 29, 2007 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, काय अप्रतिम लिहिलं आहेस ग. पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह होतोय.

Chinnu
Thursday, March 29, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कुसुंबी उन्हाने लवे सांज दारी
तुझ्या आठवांचा सडा रात होते
अप्रतिम!

कसे दंश सोसू, पिश्या चांदण्याचे
फणी केवड्याची उभी कात होते
दुसरी ओळ नाही कळली. उला मिसरा खुपच सुंदर. पिश्या चांदण्यांचे दंश, वाह!

सयींचा शहारा, सुगंधी उसासे
मुकी देहबोली खुली बात होते
क्या बात है!

मक्ता पण भारी. सहीच!


Meghdhara
Wednesday, April 04, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका अगदी झोकून दिलयस.
अशी वेगात आत येते ही गज़ल!
पुलस्ति अगदी खरं :-)

तुझी याद येते.. निव्वळ अप्रतिम.

मेघा


Me_anand
Tuesday, April 10, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतीम... सगळेच शेर उच्च आहेत :-)

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions