Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नचिकेत जोशी

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » नचिकेत जोशी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 26, 200720 03-27-07  3:10 am

Mi_anandyatri
Tuesday, March 27, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनापासून धन्यवाद स्वाती ताई! :-)
एकाच शेराचे किती वेगळे पदर असू शकतात हे मला माझ्याच गझलेच्या तू केलेल्या रसग्रहणावरून कळलंय...
उदा.
जरी धावलो भूवरी वास्तवाच्या
ठसे पावलांचे खगोलात होते
यात "मी वास्तवाच्या जमिनीवरून धावलो खरा, पण वास्तवात जे काही वागलो, त्याच्या पाऊलखुणा आकाशात उमटाव्यात असं ते वागणं होतं", अशा आशय त्या वेळी लिहीताना माझ्या मनात होता.

न मी भेटलो कोणत्याही गुरूला
हरी सावळे रूप ध्यानात होते
हा शेर मला हवा तसा पोचलेला नाहीये! :-(
इथे मला फक्त कृष्ण अभिप्रेत आहे. म्हणून "हरी सावळे" वापरलंय. आणि कृष्ण का? तो मला देव वाटतच नाही, सर्वोत्कृष्ट "मॅनेजर" वाटतो. एक अत्यंत हुशार बहुरूपी! ते रूप, त्याचं विविध प्रसंगातील वाग़णं नीट निरखलं तर कोणत्याही गुरूला भेटण्याची गरजच नाही असं सांगायचा प्रयत्न केलाय! थोडक्यात "कर्मण्येवाधिकारस्ते.."
"ध्यानात" होतं. "ध्यानात"हा शब्द मात्र पोचलाय.. मलाही तेच दोन अर्थ मांडायचे होते. :-)

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वातीच्या एका रसग्रहणावरून खूप काही जे शब्दात सांगता येणार नाही- शिकायला, निरखायला मिळालंय..

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद!
चुभूद्याघ्या.


Swaatee_ambole
Tuesday, March 27, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, एकाच वाक्यात ' ताई' पण आणि ' धन्यवाद' पण? :-)

आभार वगैरे नका मानू रे. तुम्हा सगळ्यांबरोबर शिकायला आवडतंय मला. आभार मानायचेच तर गुरुजींचेच. चांगलं लिहू शकणारे ताज्या दमाचे इतके कवी गज़लकडे आकर्षित केल्याबद्दल. :-)


Meghdhara
Tuesday, March 27, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत,
चढत गेलेत शेर एकदम!

उभा सूर्य झालो.. वाचताक्षणी पुलस्ति म्हणतोय तसाच पोहचला. जसं काही मी उगाच सत्याच्या शोधात आहे. आणि शेराच्या शेवटी शायरचं खेदपुर्ण स्वताला हसणं ऐकू येतं. :-)

मेघा


Mi_anandyatri
Wednesday, March 28, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मेघा!
पण "उभा सूर्य.." मधून तसा खेद दाखवायचा नव्हता गं! :-(
प्रश्न सानी मिसर्‍यात आहे, आणि उत्तर उला मिसर्‍यात आहे.
"सारे सत्य कुठे उजेडात होते" म्हणून नभाच्या उराशी सूर्य (बनून) उभा झालो.." असं सांगायचं होतं.


Pulasti
Wednesday, March 28, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत,
"सारे सत्य कुठे उजेडात होते" म्हणून नभाच्या उराशी सूर्य (बनून) उभा झालो.." पण हा जो "म्हणून" आहे तो गृहित धरण्याइतका obvious नहिये:-) हे जे "म्हणून", "जरी", "तरी", "कसे", "असे" सारखे शब्द असतात; ते वरवर पाहता फार निरुपद्रवी आणि कधी कधी निरुपयोगी वाटतात; पण त्यांच्यात मतितार्थ बदलण्याचे विलक्षण सामर्थ्य असते!
पण आता तू म्हणतोस तोही अर्थ मला लागतोय :-)
-- पुलस्ति.

Mi_anandyatri
Wednesday, March 28, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति,
मी ही माझा अर्थ बाजूला ठेवून विचार करून पाहिला.
आणि, तुमचं म्हणणं ही मला पटलंय.. तसा अर्थ ही निघू शकतो.. तिथे मी "म्हणून" घेतलं, तसंच, "तरी" हे ही चपखल बसतंय.. आणि अख्ख्या शेराचा अर्थच बदलतोय!!!
आपण "म्हणून" हेच घेऊया! :-)


Chinnu
Wednesday, March 28, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत छान. 'भरावे' शब्द पटला नाही. सले वेदना.. आणि मक्ता सुंदर. स्वाती, समजावुन सांगितल्याबद्दल धन्यवाद.

Ashwini
Thursday, March 29, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, शेवटचे दोन्ही शेर खूप आवडले.

Mi_anandyatri
Thursday, March 29, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद चिन्नु, अश्विनी! :-)
चिन्नु,
मतल्यात मी ही "जगावे कसे हे मला ज्ञात होते" असं सुरुवातीला लिहीलं होतं(गुर्जींना पाठवण्याआधी).. पण "कसं जगावं" यापेक्षा "स्वत:ला कसं परिपूर्ण करावं" हा विचार जास्त योग्य वाटला.. आणि त्यासाठी "भरावं" हाच शब्द योग्य वाटला, कारण यात सुरूवातीचं "रिकामंपण" आपोआप अधोरेखित होतं...
चर्चेसाठी सदैव तय्यार.. :-)
चुभूद्याघ्या..


Mayurlankeshwar
Thursday, March 29, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा नचि!! चर्चेतून मस्त उलगडत जातेय गझल!!

तुझ्या मतल्यापेक्षा तू explanation मध्ये लिहिलेलं वाक्य--
"पण "कसं जगावं" यापेक्षा "स्वत:ला कसं परिपूर्ण करावं" हा विचार जास्त योग्य वाटला.. आणि त्यासाठी "भरावं" हाच शब्द योग्य वाटला, कारण यात सुरूवातीचं "रिकामंपण" आपोआप अधोरेखित होतं..."
जास्त आवडलं!!


Chinnu
Thursday, March 29, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, राग नका मानु पण मतल्यातली ती ओळ explaination शिवाय वाचली तर अर्थबोध होत नाहीये. भरावेचा तुम्हाला अभिप्रेत अर्थ आवडला.
'स्वत:ला, मला' हे देखिल बरोबर वाटले नव्हते! गझलेच्या समुद्रात गटंगळ्या खाणारी एक मुंगी समजुन चिन्नुला माफ कराल अशी आशा! :-)


Mayurlankeshwar
Thursday, March 29, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझलेच्या समुद्रात गटंगळ्या खाणारी एक मुंगी !!!
काय कल्पनाशक्ती आहे! वा!

समुद्रातुनी
मुंगी उडाली आकाशी...


Saavat
Thursday, March 29, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंद यात्री,

न मी भेटलो कोणत्याही गुरूला
हरी सावळे रूप ध्यानात होते

तुम्हाला दिसलेला 'कृष्णातला Manager ' ध्यानात आला!
पण कृष्णातल्या 'आनंदा'च्या यात्रेसाठी 'गुरु' लागतोच!


Mi_anandyatri
Friday, March 30, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु,
या बाबतीत मयूर ला अनुमोदन!
"गझलेच्या समुद्रात गटंगळ्या खाणारी एक मुंगी !!!
काय कल्पनाशक्ती आहे! वा!"

आणि मी म्हणेन, "स्वातीताईच्या गझलेचं सुंदर रसग्रहण लिहीणार्‍या तुमचा हा विनय आहे!" :-) असो.
आणि मी काय पामर तुम्हाला माफ़ करणार? "भरावे" तून अपेक्षित असणारा अर्थ पोचण्यासाठी दुसरा समर्पक शब्द नाही सुचला.. पुढच्या वेळी नक्की सुचेल! असो.. पुन्हा असं माफी वगैरे मागू नका..

सावट, गुरू लागतोच हे मान्य आणि तुमचे प्रत्येक अवतरणचिन्ह अर्थासकट मनात अवतरलंय! .. "त्या" गुरूचा शोध चालू आहे! :-)


Chinnu
Friday, March 30, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) दिग्गज्जांनी कौतुक करावे, याउपर माझ्यासारखीला काय हवे! मयुर, आनंदयात्री अनेक धन्यवाद.
हरी सावळे रूप ध्यानात होते, हे उच्च!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators