Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

उपास

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » उपास « Previous Next »

Vaibhav_joshi
Thursday, March 22, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही आणखी एक ' जाणकार' गज़ल:

उपास


ऋतू येत होते ऋतू जात होते
धुके दाट स्वार्थांध डोळ्यात होते

गुरे माणसे ही सुनामीत जाती
अहोरात्र कामी किती हात होते?

मलाही हवी तूप रोटी पुढ्यासी
गळा फास कोण्या नशीबात होते

मनाच्या कवाडास जाळीत जाती
असे काय कर्पूर धर्मात होते?

कुणा राखण्या कारणे देह सांडी
तयाशी कुठे बंध रक्तात होते?

अहो काय त्याचे कुणी का मरेना
मला फक्त स्वारस्य रोख्यात होते!!


Mayurlankeshwar
Thursday, March 22, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरे माणसे ही सुनामीत जाती
अहोरात्र कामी किती हात होते?

अहो काय त्याचे कुणी का मरेना
मला फक्त स्वारस्य रोख्यात होते!!
हे शेर लाजवाब!

सगळीच वास्तवाला स्पर्श करून जाते.
अप्रतिम!


Aaftaab
Thursday, March 22, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,
एकदम वास्तववादी...
शेरांचे अर्थ खूप आवडले..


Jayavi
Thursday, March 22, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास..... वास्तव भिडतंय मनाला.
अहो काय त्याचे कुणी का मरेना
मला फक्त स्वारस्य रोख्यात होते!!
विदारक सत्य!

Ganesh_kulkarni
Thursday, March 22, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,
खरच एक विदारक सत्य माडंलय तुम्ही!


Vshaal78
Thursday, March 22, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजल छानच अहे.
वाईट मनू नका पण जाणकर गजल म्हनून ज्या अपेक्षा असतात त्या नहि होत आहेत पुर्ण


Sanghamitra
Thursday, March 22, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> कुणा राखण्या कारणे देह सांडी
तयाशी कुठे बंध रक्तात होते?

आवडला. छानच आहे गज़ल.
पण मनाची कवाडास नाही समजले. :-(


Imtushar
Thursday, March 22, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,

गज़ल छान आहे.

मला फ़क्त स्वारस्य 'रोख्यात' होते

या मिसर्‍यामध्ये 'रोख्यात' हे कुठल्या अर्थाने आले आहे हे समजले नाही. कुणी कृपया सांगू शकेल का?

-तुषार


Mankya
Thursday, March 22, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार,
माझ्या मते ' रोख्यात ' याचा अर्थ ' अर्था ' साठीच ( रोख = पैसा ) आला आहे ! चु.भु.दे.घे.

अभिनंदन मित्रा उपास ..
पुर्णपणे वास्तववादि .. वाह बापू लढ तू !
वाचताना अक्षरशः प्रसंग उभा राहिले डोळ्यासमोर ! फार कमी जण असा प्रयत्न करतात सोप्या शब्दात वास्तव रेखाटण्याचा ... अभिनंदन मित्रा उपास तूझी कामगीरी फत्ते झाली !

माणिक !


Psg
Thursday, March 22, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, वास्तववादी गझल! मक्ता सही आहे!

Bee
Thursday, March 22, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, आशय छान आहे गझलचा पण शब्दांची निवड नीट जमली नाही.

Imtushar
Thursday, March 22, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फ़क्त स्वारस्य 'रोख्यात' होते -

मध्ये रोख = पैसा असे वापरायचे असेल तर 'रोखीत' असे वापरायला हवे.

रोख = रोखीत
रोखा = रोख्यात (खोक्यात सारखे)

रोखा म्हणजे bond

माझी शंका चुकीचे किंवा क्षुल्लक असेल तर कृपया ignore करा. BB गझलेचा आहे, व्याकरणाचा होऊ नये.

-तुषार


Pulasti
Thursday, March 22, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,
मतला चांगला आहे.
सुनामी - अर्थ आणि शब्द दोन्ही आवडले.
तूप-रोटी - मला तरी दोन मिसर्‍यांचा संबध लागला नाही.
कर्पूर-धर्म - प्रयत्न केला पण कळला नाही. पुन्हा वाचेन.
रक्त - अर्थ लागतोय पण अस्पष्टसाच.
रोखीत/रोख्यात - "माणसांची सर्वसाधारण पैशाबद्दलची स्वार्थी वृत्ती" असा अर्थ असेल तर कल्पना आणि शेर दोन्ही जरा सपाट आहेत. तुषार, तुझा असा "कीस" पाडणे मला तरी योग्यच वाटते :-) BB जरी गझलेचा असला तरी ही कार्यशाळा गझल आणि गझलेच्या "व्याकरणाची" आहे.

CBDG राग नसावा :-) पुढील लेखनास शुभेच्छा!
-- पुलस्ति.

Upas
Friday, March 23, 2007 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, विशाल चं बरोबर आहे जाणकार म्हणणं फार मोठं होईल.. तो शब्द काढता आला तर बघ.. मी शिकतोय अजून.. सुरुवात केलेय शिकायला इतकचं..

सामजिक जाणीवा आणि जबाबदार्या ह्यांची जाणीव नसलेल्या स्वार्थी मनाला उद्देशून लिहिण्याचा प्रयत्न केलाय..

मलाही हवी तूप रोटी पुढ्यासी..
ह्या शेरात शेतकर्यांच्या आत्महत्येकडे सामान्याचे होणारे दुर्लक्श आणि अनास्था मांडायचा प्रयत्न आहे..

मनाची कवाडेही जाळीत जाती..
ह्यात हिंदू मुस्लिम दंगली आणि जाळपोळ ह्या बद्दल खेद व्यक्त केला आहे..

कुण्या राखण्या कारणे देह सांडी..
ह्या शेरामध्ये सैनिकांनी आप्लल्यासठी रक्त सांडले, बलिदान दिले तरीही ते रक्ताचे नाते नसल्याने आपल्या त्याचे फार काही वाटत नाही असे सांगायचा प्रयत्न आहे.. बी तुझं म्हणणं इथे पटतय.. शब्द सुमार झालेत थोडे..

मला फक्त स्वारस्य रोख्यात होते..
ह्यात रोखे आणि शेअर बाजार असा अर्थ डोक्यात होता.. म्हणजे कुणाचे काही झाले तरी मला फक्त शेअर बाजारतील नफ्यातच रस होता अशी स्वार्थी बुद्धी दाखवायची आहे!

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद..

Paragkan
Friday, March 23, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good one Upas ... vagali aahe !

Jo_s
Friday, March 23, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास मस्त, छानच लिहीली आहेस,

अहो काय त्याचे कुणी का मरेना
मला फक्त स्वारस्य रोख्यात होते!!

हे खासच जमलय

Imtushar
Friday, March 23, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, 'रोख्या' च्या खुलाश्यानंतर आता perfect अर्थ लागला. :-)

Chinnu
Thursday, March 29, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुड वन उपास! ... वेगळी आहे! :-)

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions