Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

झाड

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » झाड « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, March 21, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रांनो ,

मीटर मध्ये पहिल्यांदाच लिहीण्याचा विनायकचा प्रयत्न

झाड

ऋतू येत होते ऋतू जात होते
फुलाचे समाधान गळण्यात होते

कळ्यांचे कुठे फूल सगळ्याच होते
कळीचे खरे दु:ख खुडण्यात होते

कुणा मी भुलावे कुणा आठवावे
कुणी येत होते कुणी जात होते

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते

कुणी गीत अर्ध्यात टाकून गेले
कुणी राहिले त्याच मुखड्यात होते

कुणी वासनेच्या बुडाले तळाशी
कुणी मोह सोडूनही गात होते


Nachikets
Wednesday, March 21, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते


वा!!!!


Sanghamitra
Wednesday, March 21, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते

क्या बात है. छानच आहे प. प्र. :-)
कुणी हा शब्द जरा जास्त वेळा वापरलाय असे वाटतेय नाही का?
पण एकूण छानच.


Mi_anandyatri
Wednesday, March 21, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते
वा...
खूप आवडला...

कुणी गीत अर्ध्यात टाकून गेले
कुणी राहिले त्याच मुखड्यात होते
हे रत्न ही भारीच!

जियो... :-)


Desh_ks
Wednesday, March 21, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगलं आहेच पण एक विचार आला तो मांडतो आहे.

'भुलावे' हे 'भूल जाना' या अर्थी म्हटलं आहे असं समजून हे लिहितो आहे.

'भुलावे' याचा मराठी अर्थ 'मोहात पडावे' असा काहीसा आहे ना?

तुमच्या शेरात 'विसरावे' असं म्हणायचं असेल तर हे क्सं वाटतं ते पाहा

कुणा मी स्मरावे कुणा विस्मरावे
किती येत होते, किती जात होते

जर हे तुम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थाशी सुसंगत नसेल तर हा एक निराळाच शेर झाला म्हणायचा :-)


Jo_s
Wednesday, March 21, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच गझल

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते

हा शेर ..... काय बोलू? एकदम टचींग.


Meenu
Wednesday, March 21, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड छान गज़ल रे ..

Mayurlankeshwar
Wednesday, March 21, 2007 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याहू........... झाडा एकदम झकास रे!!

कुणा मी भुलावे कुणा आठवावे
कुणी येत होते कुणी जात होते

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते

जान कुर्बान रे भावा ह्या शेरांवर...

'कधी याच जागी तुझे हात होते ' हे आधी तुझ्या मेल स्टेटस वर वाचलेलं होतं त्याचा आज संदर्भ लागला :-)

देशपांडे तुम्ही सुचविलेला शेर छान आहे.

'कुणी वासनेच्या बुडाले तळाशी
कुणी मोह सोडूनही गात होते' इथे 'मोह सोडूनही गात' ह्या ऐवजी एखादी दुसरी शब्द रचना वापरता येईल काय?
म्हणजे मक्ता अजुनही प्रभावी करता येईल असे मला वाटते. मोह सोडून 'गात' असतील तर 'मोह सुटला' असे म्हणता येईल काय?
किंवा विरक्तीचे गाणे जर गात असतील तर त्या अर्थाने एखादा शब्द बसविता येतो का हे पाहा.
'कुणी' ह्या शब्दाने गझलेत एकूणच जास्त जागा व्यापली आहे असे वाटते.
चु.भू.दे.घे. :-)
एकूणच झकास गझल :-)
Jayavi
Wednesday, March 21, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडा........पहिलाच प्रयत्न झकास जमलाय :-)

कुणा मी भुलावे कुणा आठवावे
कुणी येत होते कुणी जात होते....... मस्त!

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते
माशाल्लाह........!Mankya
Wednesday, March 21, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडा ... फक्कड जमलीये रे !
सलावी कशी फुले ... फिदा आपण तर !

माणिक !


Mi_abhijeet
Wednesday, March 21, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते...!

जबरदस्त शेर...!


Vshaal78
Wednesday, March 21, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाद, चन्गले लिहिलय. पण ...
सर्वच्य सर्व शेर भारि अशि एकच गजल दिसलि. बकि गजलांमधे एक तरी दुबळा शेर आहेच.
असे क ? की पाच शेर हवेतच या हट्टपायी तसे होते ?


Zaad
Wednesday, March 21, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी!!! :-)
सतीश, तुमचा शेर छानच आहे. भुलावे हे विस्मरण या अर्थीच वापरलंय.
मयूर, मोह सोडून गाणं हे मोह सोडल्यामुळे मिळालेल्या खर्‍या आनंदाचे प्रतिक आहे. वासनेच्या खूप आहारी जाउनही अंती कसलेच समाधान न मिळणे आणि आता कसलाच मोह न उरल्यामुळे खरेखुरे समाधान मिळणे यातला फरक सांगायचा आहे. तसे म्हटले तर मोह सोडण्याची एक आस असते.... पण त्याला मोह म्हणता येणार नाही. मोह, इच्छा, वासना, कामना, जुगुप्षा हे सगळे सारखे वाटणारे शब्द असले तरी प्रत्येक शब्द कुठे वापरायचा याचे काही अध्याहृत संकेत असतात. इथे दुसर्‍या मिसर्‍यात आलेला मोह हा शब्द, भौतिक, ऐहिक सुख़ासीनता या अर्थी येतो, शिवाय पहिल्या मिसर्‍यात वासनेवर जोर दिलाय म्हणजे दुसर्‍या मिसर्‍यातील मोह म्हणजे नक्की कशाचा मोह हे अजून स्पष्ट होते.
दिग्गज्जांकडून यावर ऐकायला आवडेल!


Mayurlankeshwar
Wednesday, March 21, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड.. भावना पोहोचल्या :-)
actually पहिला मिसरा वाचल्यानंतर मी असा विचार केला की-- दुस-या मिस-यातही 'वासनेच्या तळाशी बुडलेल्या' लोकांबद्दल एखादा जहाल कटाक्ष असेल(माझी जहाल शब्दांची ओढ कधी कधी अतीच होते हा खरा तर अपराध मला मान्य करावाच लागेल :-))
पण पुन्हा एकदा गझल वाचल्यानंतर लक्षात आले की तशी खरेच काही आवश्यकता नाही. अर्थात मी आधी प्रतिक्रिया देताना 'मक्ता अजुनही प्रभावी करता येईल' असे जे म्हणालो होतो त्या 'प्रभावी'पणाचा अर्थ 'जहाल' हाच माझा गैरसमज होता. तो आता नाहीसा झाला आहे.
दोन भिन्न प्रवृत्तींच्या मानसिकतेचेजगण्याचे नेमके चित्रण साध्य झाले आहे ह्या मक्त्यातून हे ग्रेट!
लगे रहो... :-)


Pulasti
Thursday, March 22, 2007 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडा,
"भुलावे" - देशपांडेंच्या सूचनेस अनुमोदन.
खुडणे, मुखडा आणि मक्ता आवडला. पण "ओंजळ" खरच अप्रतिम आहे!
शुभेच्छा!!
-- पुलस्ति.

Giriraj
Thursday, March 22, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळीचे खरे दु:ख खुडण्यात होते >> खूपच छान!

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते ......
आहा.. थोडी वेदना,थोडी आठवण,थोडा रोमांच... क्या बात है! :-)
याबद्दल दहा हापूस आंब्यांची झाडं बक्षीस रे झाडा! :-)


Mayurlankeshwar
Thursday, March 22, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराजजी आफताब नंतर इथेही बक्षीसांची खैरात!!... तुम्ही भलतेच मोठे वतनदार दिसता :-)
झाडा.. आता इतक्या आंब्यांच काय करणार :-)


Gajanan1
Sunday, March 25, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडाला आम्बे लागतात.. पण गजल लागणार झाड आज पहायला मिळाले.

Vshaal78
Monday, March 26, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओंजळीतल्या फुलांचा शेर हा सर्वोस्त्तम शेर आहे या गजलेतला.
बाकिचे शेर ठीक आहेत. पण ती मजा नाही


Bairagee
Monday, March 26, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते

अतिशय सुंदर!


Ashwini
Thursday, March 29, 2007 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सलावी कशी ही फुले ओंजळीला
कधी याच जागी तुझे हात होते

सुरेख.. अगदी हळूवार.


Chinnu
Thursday, March 29, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाडा, छान झाली गझल. निर्मोही गळण्यात समाधानी फुले, समजुतदार कळीची खुडले जाण्याचे दु:ख, नाजुक आठवणींची सलणारी ओंजळ लयी भारी!

कुणी गीत अर्ध्यात टाकून गेले
कुणी राहिले त्याच मुखड्यात होते
हा मला सर्वात जास्त आवडलेला शेर.
मी पण अडकले आहे, पण मक्त्यात! मला नाही रे कळाला अर्थ. :-(.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions