Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

सुमति वानखेडे

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » सुमति वानखेडे « Previous Next »

Vaibhav_joshi
Friday, March 16, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमतिताई वानखेडे

ऋतू येत होते , ऋतू जात होते
गुपित वादळाचे कुणा ज्ञात होते

तुलाही कळेना मलाही कळेना
कळेना कशी धुंद बरसात होते

शिकू दे मलाही गणित ह्या जगाचे
कधी हार होते , कधी मात होते

अश्या सांजवेळी तिमिर दाटताना
दिव्यातील सोशीक फुलवात होते

कसा उन्मळूनी सख्या तूच गेला
अता सावराया तुझे हात होते

जगाची कशाला तमा बाळगू मी ?
खरे पाप त्यांच्याच नेत्रात होते


Mankya
Friday, March 16, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताई ... जश्या कविता अप्रतिम तशी गजलही ...!
मतला .. वेगळेपणा वाटला !
तिमिर दाटताना .. सावराया ... आतपर्यंत उतरले हे शेर !
शिकू दे .. साधेपणा भावला !
मक्ता .. शेवट भीषण सत्य .. भावलं अन पटलं !
खूप विचार करायला लावणारी पण समजायला सोपी ( ह्यातच यश असतं नाहि लिखाणाचं ! ) अशी वाटली !

माणिक !


Meenu
Friday, March 16, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगाची कशाला तमा बाळगू मी ?
खरे पाप त्यांच्याच नेत्रात होते >> हं !! खरय ..

Sanghamitra
Friday, March 16, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमती मस्त उतरलीय.
पुन्हा एकदा वाचते. :-)


Bee
Friday, March 16, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमती गझल छान आहे.

Abhiyadav
Friday, March 16, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगाची कशाला तमा बाळगू मी ?
खरे पाप त्यांच्याच नेत्रात होते


best one

Ganesh_kulkarni
Friday, March 16, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमतिताई,
गज़ल आवडली!

१)तुलाही कळेना मलाही कळेना
कळेना कशी धुंद बरसात होते


क्या बात है!Mi_anandyatri
Friday, March 16, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्या सांजवेळी तिमिर दाटताना
दिव्यातील सोशीक फुलवात होते
खूप आवडला..


Chinnu
Friday, March 16, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदयात्रींना अनुमोदन. सुमती, सुंदर गझल.

Pulasti
Saturday, March 17, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमतिताई,
गझल आवडली.
मतला कळला नाही. (मला बहुतेक कार्यशाळेतले मतले न कळण्याचा रोग जडला आहे.. तेव्हा राग नसावा :-))
फुलवात आणि हात शेर विशेष भावले.
-- पुलस्ति.

Meenu
Saturday, March 17, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी हार होते , कधी मात होते >>> मला वाटतय की इथे द्विरुक्ती होतीये .. हार आणि मात दोन्हीचा अर्थ हरणे असाच होतोय ना ..?

पुलस्ति मतला कळला नाही की connected नाही असं वाटलं. अर्थ मला वाटतं की स्पष्ट आहे. दिवस सरकत होते, बदल होत होते पण ते बदल वादळ घेउन येणार आहेत हे ठाऊक नव्हतं. किंवा वादळाच्या येण्याची गुप्त पणे तयारी चालु होती आणि आपल्याला कळलच नाही ..

कसा उन्मळूनी सख्या तूच गेला
अता सावराया तुझे हात होते >> इथे 'अता' लिहीण्याऐवजी मला चालेल असं वाटलं

Pendhya
Saturday, March 17, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी साध्या शब्दातली एक सुंदर गजल.

Nachikets
Saturday, March 17, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कधी हार होते , कधी मात होते" -- वा!!!
सोशीक फुलवात आणि जगाची तमा .... खूप आवडले.
दुसर्‍या शेरातल्या सानी मिसर्‍यात "कळेना" repeate झाल्यासारखा वाटला. त्या ऐवजी अजून काही शब्दांसाठी जागा करता आली असती असे वाटते.


Jayavi
Saturday, March 17, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा.....सुमति...खूप छान उतरलीये गं!
पण हार होते आणि मात होते...ह्या द्विरुक्तीचं प्रयोजन कळलं नाही.
अजून एक.....
कसा उन्मळूनी सख्या तूच गेला
अता सावराया तुझे हात होते
हे पण कळलं नाही. कारण सखा उन्मळून गेलाय तर सावरायला त्याचेच हात कसे असणार. माझा हा कदाचित बालिश प्रश्न असेल. चू.भू.पदरात घ्यावी.
कळेना चं repeatation मला पण थोडं जाणावलं.

अश्या सांजवेळी तिमिर दाटताना
दिव्यातील सोशीक फुलवात होते
हा शेर सगळ्यात जास्त आवडला.


Meenu
Saturday, March 17, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसा उन्मळूनी सख्या तूच गेला
अता सावराया तुझे हात होते >>> जयावी हा प्रश्न मलाही पडला होता त्याचा मी उलगडलेला अर्थ असा निघाला ... आत्ता तर तुझे हात मला सावरायला होते आणि तोच तु उन्मळुन गेलास ... पण तो काढलेला अर्थच म्हणावा लागेल म्हणुनच मला तिथे मला जास्त चांगलं वाटेल असं वाटलं

Sumati_wankhede
Tuesday, March 20, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसांनी मायबोलीवर येत आहे..
सर्वप्रथम वैभवचे आभार मानते.
आणि इथल्या सार्‍याच ज़ाणकार रसिकांचेही...
आता काही खुलासे...
'अता सावराया तुझा हात होते' अशी ती ओळ आहे. उन्मळून पडणार्‍या सख्याला हात देणारी सखी..
असा अर्थ माझ्या लिखाणाचा आहे.
"मात करणे' म्हणजे दुसर्‍यांवर विजय मिळविणे.('मराटी शब्दरत्नाकर' मध्ये दिलेल्या अर्थानुसार)
त्या मुळे मला वाटतं... हार आणि मात दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत.
जया, 'कळेना' शब्दाचं पुन्: पुन्हा येणं... मला तरी वावगं वाटत नाही.
आणि काही चुका झाल्याच असतील तर.. क्षमस्व.. कारण मी ही सद्ध्या विद्यार्थीच आहे.


Mi_abhijeet
Tuesday, March 20, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्या सांजवेळी तिमिर दाटताना
दिव्यातील सोशीक फुलवात होते

शेर आवडला...!


Meenu
Thursday, March 22, 2007 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मात करणे' म्हणजे दुसर्‍यांवर विजय मिळविणे.('मराटी शब्दरत्नाकर' मध्ये दिलेल्या अर्थानुसार) बरोबर पण मात होणे म्हणजे हार होणे. एक जण दुसर्‍यावर मात करतो आणि दुसर्‍याची मात होते .. यात मात करतो तो जिंकतो ज्याची मात होते तो हरतो .. असं मला वाटतय तरी अजुन कुणाला नक्की माहीत असेल तर सांगावं
त्या मुळे मला वाटतं... हार आणि मात दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. हार या शब्दाला हरणे अर्थ आहे पण मात दोन्ही बाजुंनी वापरता येतो हरणे आणि जिंकणे दोन्ही अर्थ क्रियापदावर अवलंबुन आहे.


Imtushar
Thursday, March 22, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हार होते आणि मात होते या दोन्हींचा अर्थ एकच आहे (असे मला वाटते). मीनूशी सहमत.

गझल सुंदरच... 'तुलाही कळेना...' अप्रतिम!

-तुषार


Sumati_wankhede
Thursday, March 22, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंर बाबा...
'कधी जीत होते, कधी मात होते'
आता ठीक आहे


Meenu
Thursday, March 22, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंर बाबा...
'कधी जीत होते, कधी मात होते'
आता ठीक आहे >> जी मॅडमजी !!!

Pulasti
Thursday, March 22, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म.. काय पण चिकचिक करतात हे कार्यशाळेतले विद्यार्थी. जीत काय हार काय - काय फरक आहे.. हाच तर शेराचा point आहे!! :-):-)
-- पुलस्ति.

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions