Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

देवदत्त

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » देवदत्त « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 13, 200720 03-13-07  5:18 pm

Shyamli
Wednesday, March 14, 2007 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाच्या स्वभावासारखीच शांत गझल :-)
छान झालीये देवा गझल,
भाव हिंदोळ,हा शब्दप्रयोग आवडला मस्त वाट्तय वाचायला.
न ठावे मलाही.... व्वा!
मक्ता.....सिक्सर!


Mayurlankeshwar
Wednesday, March 14, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा इतकी शांत गझल ह्यापूर्वी कधी वाचनात आल्याचे आठवत नाही. :-)
पण मला अजुनही एक शंका आहे(कदाचित आकलन नावाची बाब माझ्यात आधी पासुनच कमी आहे :-) )

तर काय म्हणत होतो--
इथे दुस-या शेरात 'उन्हा सावल्यांचे करी हात होते' ,ह्या ठिकाणी हा 'करी' शब्द नेमके काय सुचित करतो ते समजले नाही. इथे 'करी' म्हणजे 'हाती' असे म्हणायचे आहे काय? म्हणजे 'हाती हात होते' असं काही तरी... एकाच वाक्यात हाताला 'हात' आणि नंतर 'करी' म्हणणे तितकसं रुचलं नाही.
चु.भू.दे.घे.


Bairagee
Wednesday, March 14, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


देवदत्त, फार चांगला प्रयत्न आहे.

कुठे भावनांची मला भ्रांत होती?
उन्हा सावल्यांचे करी हात होते
वा! छान. ऊन आणि सावली हातात हात घालून (जात, बोलत, बसले) होते ही कल्पना आवडली.

"एकाच वाक्यात हाताला 'हात' आणि नंतर 'करी' म्हणणे तितकसं रुचलं नाही." हे मयुरलंकेश्वर ह्यांचे म्हणणेही पटते. वृत्ताच्या, जमिनीच्या मर्यादांमुळे असे कधी कधी 'करी हात' होतात.

जसा शांत भासे नदीचा किनारा
तसे मूक संगीत ओठांत होते
वा! शेर प्रथमदर्शनी आवडला. वरच्या ओळीत संथ-शांत वाहणारा नदीचा प्रवाह अधिक योग्य वाटू शकला असता काय?

कुणी पुण्य प्राप्तीस जावे कुठेही
मला सौख्य हे प्राप्त काव्यात होते
वा! वा!
संघमित्राशी बराचसा सहमत. पुण्यप्राप्ती आणि सौख्यप्राप्ती ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. (संघमित्रे, सुचविलेला बदल चांगला आहे.) सौख्य ऐवजी पुन्हा पुण्य आले असते तरी चालले असते. पण गिरिराज म्हणतात तसेही असू शकते. हे पुण्यप्राप्तीतले सौख्य असावे.


न ठावे मलाही कसे वागणे हे
शिकवले तुम्ही की स्वभावात होते
हा शेर मला भरतीचा वाटला. शेर-बराए-शेर. म्हणजे शेरासाठी शेर.

न केले कुणालाच घायाळ देवा
जरी शब्द गांडीव हातात होते
वा!
तार्किकदृष्ट्या भातातल्या बाणांचा घायाळ करण्याशी संबंध अधिक चांगला लागतो, असे मला वाटते. पण कदाचित 'शब्दगांडीव' हा शब्द अधिक परिणामकारक आहे आणि 'हाती गांडीव घेणे' वाक्प्रचार म्हणून.


Chakrapani
Wednesday, March 14, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागीबुवांशी सहमत आहे. शेरांमधल्या कल्पना आवडल्या. लिहीत रहा, सफाई येत ज़ाईल.

Meenu
Wednesday, March 14, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न केले कुणालाच घायाळ देवा
जरी शब्द गांडीव हातात होते
जसा शांत भासे नदीचा किनारा
तसे मूक संगीत ओठांत होते >>>हे शेर आवडले देवा ..

Devdattag
Wednesday, March 14, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी..:-)
गिरी.. बरोबर..:-) पण बहुदा नीट मांडता आल नाही..
बैरागी, मयुर.. तुमचं म्हणणं पटतय, पण पर्याय सुचला नाही
about.. स्वभावात होते.. त्रास दिला ह्या शेराने.. could not find the correct words to express ..:-(


Pulasti
Wednesday, March 14, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त, मला प्रतिक्रिया द्यायला नेहेमीच उशीर होतो. त्यामुळे पुनरुक्ती होइलच - क्षमस्व.
मूक संगीत, काव्यसुख/पुण्य (संघमित्राची सूचना आवडली) हे शेर मस्त आलेत! मला स्वत:ला "स्वभावात" हा शेर छान वाटला. मक्त्यातले "शब्द-गांडीव" तर खासच! "गांडीव" हा माझा फार आवडता शब्द आहे.. वेगवेगळ्या शक्यता, छटा आणि संदर्भ असलेला शब्द आहे. तुम्ही फारच सुंदर वापर केला आहे!
मतल्यातला "भाव-हिंदोळ" प्रयोग कानांना मधुर वाटला - पण नेमके प्रयोजन कळले नाही - "शब्द तेच होते पण वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे भाव वाहून नेत होते" असा अर्थ जाणवला. CBDG :-)
दुसरा शेर एक-दोन दिवसांनी पुन्हा वाचीन :-) बैरागींचे विवेचन वाचल्यावरही मला नीटसा कळत नाहिये :-(
एक छान गझल वाचायला मिळाली - धन्यवाद आणि अभिनंदन!
-- पुलस्ति.

Kmayuresh2002
Wednesday, March 14, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न केले कुणालाच घायाळ देवा
जरी शब्द गांडीव हातात होते ...देवा,सुरेख रे..:-)


Chinnu
Thursday, March 15, 2007 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा. मस्त रे!
भावहिंदोळ? हिन्दोळ की हिंदोळे? एकच हिंदोळा असतो का? की भावकल्लोळ? 'देवा' वाचवा हो, गोंधळ उडालाय चिन्नुचा! :-) (चुकले तर आचरटपणा माफ करा!)
हे शब्दगांडीवधारी 'देवा', तुम्हाला 'कुठे'पण 'सौख्य'प्राप्ती होत राहो! (ही सदिच्छा! देवासाठी देवाकडेच काय प्रार्थना करायची बरं?)


.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions