Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

प्रिया(चिन्नू) ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » प्रिया(चिन्नू) « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 11, 200720 03-12-07  3:54 am

Pendhya
Monday, March 12, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रणाम प्रिया. ( ही गजल वाचल्यावर, ( चिन्नू ) , म्हणावसं वाटलं नाही. )
पहिला प्रयत्न, अतिशय छान जमलाय. लिखाण सुरु ठेव.


Mayurlankeshwar
Monday, March 12, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशबंधू... मुळात ह्या गझलांचा उद्देश 'बदलणारे त्रृतूरंग टिपणे' असा निसर्गसौंदर्याधिष्टीतच असायला हवा असे काही नाही.येणा-या जाणा-या त्रृतूंसोबत जीवनाची प्रत्येक वेळेस लय जुळेलच असेही नव्हे. किंबहुना
ब-याचदा जुळतच नाही.त्यांतुन आलेले नैराश्यही इथल्या गझलांमधुन प्रकट झालेच आहे. :-) केवळ सहा त्रृतूंची भाव-वर्णने लिखीत करणे हा एक वेगळा प्रयत्न होऊ शकेल.
मला वाटते इथे त्रृतू ह्या शब्दालाच अतिशय व्यापक अर्थ आहे.जीवनात आलेल्या घडुन गेलेल्या अनुभवांचे चित्रण इथल्या गझलांतुन निश्चीतच झाले आहे.एकंदरीत जगण्याचे रंग टिपले आहेत. :-)


Zakasrao
Monday, March 12, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला सोबतीला नवा सूर्य येतो
तुझ्या आठवांची इथे रात होते >>>>>>>.एकदम खास

Kandapohe
Monday, March 12, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू, छान झालीय गझल. शेवटचा शेर जबर्‍या आहे.

उगा चालता चालता थांबते मी
अधाशी मनाची पुन्हा मात होते!


Mankya
Monday, March 12, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा ... मयुराला अनुमोदन !
कुणी प्रथम विषय ठरवून लिहित नाही किमान पहिल्या प्रयत्नात तरी ! जो कागदावर उमटतो तो एक उत्कट भावनाविष्कार असतो, तिथे चौकटीच नसतात, तिथं असते फक्त उत्कटता ! गजलेत आणखी एक अवघड गोष्ट अशी कि भावना मनात लाख असतात, प्रभावी शब्दही लाख सापडतील पण मुख्य बंधन असतं मात्रा अस मला वाटलं !
ह्या सगळ्यातून तरणं, आपल्याला हवा किंवा अपेक्षीत तो विषय कलात्मकतेने मांडणं हे सारंगसारख्या मुरलेल्या गजलकारालाच जमतं, नवीन लोकांनी त्यातूनही जो प्रतिसाद दिला तो अप्रतिमच !

हा फक्त एक विनम्र प्रयत्न आहे दिनेशदा माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ज्या माझ्याही मनात आल्या पहिली गजल लिहिताना !
बाकी लिखाणाचं म्हणाल तर आपण जाणकार आहातच !
आपली अपेक्षाही रास्तच !

माणिक !


Sanghamitra
Monday, March 12, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू छान आहे पहिला प्रयत्न.
मला पाचवा आणि शेवटचा खूप आवडले.
"तुझ्या" पेक्षा "तुला" च छान वाटले. खास तुला सोबत करायला असा काहीसा अर्थ येतोय त्यातून.
शेवटचा अगदी जमून गेलाय.
बाकीच्यांवर अजून काम करायला हवे होते असे वाटतेय. पण एकूण छान आहे. विशेषतः शब्द छान वापरलेयस.
पुढच्या गज़लेसाठी शुभेच्छा.


Ganesh_kulkarni
Monday, March 12, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया,
छान गज़ल!
तुला सोबतीला नवा सूर्य येतो
तुझ्या आठवांची इथे रात होते

तुला जाणिले मी जिण्याचा बहाणा
तुझ्यावीण काही न जगण्यात होते

क्या बात है!


Chinnu
Monday, March 12, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रणाम पेंद्या, धन्यवाद. अहो मला चिन्नुच म्हणा, मी चिन्नुच आहे! :-)
गणेश, झकासराव, केप्या धन्यवाद. सन्मी तुला आवडले म्हणजे मी नक्किच छान लिहिते अस समज बाळगायला हरकत नाही! :-)
दिनेशदा, मयुर आणि माणिकने लिहील्याप्रमाणेच प्रत्येक गजलकाराने ऋतूंचे रंग आणि त्यांचा after impact टिपायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जे गाणे इथे उदाहरण म्हणुन पोस्टले त्यातही आहे ना, ऋतू येती जाती पण जीवलग येईना..
Infact ही गजलेची जमीन एवढि broad आणि सुंदर आहे कि यातून कुणाला कशी प्रेरणा मिळेल आणि सुंदर कल्पना गजलेद्वारा सजेल सांगता येत नाही!


Dineshvs
Monday, March 12, 2007 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरेश आणि माणिक, सगळ्या कविंचे कौतुक आहेच. पण मला हि कल्पना, पुरेशी वापरली गेली नाही असे वाटले. माणिक ने लिहिल्याप्रमाणे मात्रांचे बंधन असेलहि.
मी जे गाणे लिहिलेय ते आणि आशाने गायलेले गाणे आहे, त्यातले शब्द बघितल्यास, सर्व कडव्यातुन एकच विरहभाव आहे, पण त्याला सर्व ॠतुंचा योग्य तो संदर्भ आहेच.
असो चिन्नु, माझे निरिक्षण फारसे मनाला लावुन घेणार नाही, म्हणुन इथे लिहिले. वादाचा मुद्दा अजिबात नाही हा.Chinnu
Monday, March 12, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, तिमीर नाही तिमिर बरोबर आहे. you caught me here! My mentor already warned me about this. पण लवकर सुपूर्त करण्याच्या नादात चुक राहुन गेली. दिलगीर आहे. या शेराला असे बदलले तर?
अता ना खुणावे नभाचे तराणे
खिन्न सूर वेडे, इशार्‍यात होते..
चक्रपाणि, नभाचे तराणे म्हणजे चंद्राचे डोकावणे आणि चांदण्यांचे गाणे. जे 'तो' असतांना कितीतरी सुंदर भासत असत, पण आता तो सोबत नसतांना ते 'तराणे'ही खिन्न भासत आहे. (मुळच्या शेरामध्ये 'तो' असतांना जीवनात प्रकाश होता, तो नसल्याने जीवन अंधकारमय वाटत होते, असे अभिप्रेत होते)
हा तारकांचा 'खुणावून' लक्ष वेधण्याचा खुळा प्रयत्न, तू सोबत नसल्याने मला निष्फळ वाटत आहे. चक्रपाणि, 'खुणावे' हा शब्द आता सध्या ती क्रिया सुरु आहे या अर्थी घेतला आहे. खुणावती जास्त सुंदर आहे. लिहीतांना लक्षात आले नाही, पुढे हाताशी ठेवते त्याला, धन्यवाद! :-)
तुझ्यावीण दोनदा आला. पण झाले असे, वृत्तात लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आणि एक्-दोन शेरांची फार मोडतोड झाली. I couldn't dare to risk on 4th & 6th. मला वाटले की पर्यायी शब्द शोधून बसवण्याच्या नादात या शेराचे सौंदर्य हरवून जाईल. यापुढे गाठ बांधुन ठेवली आहेच! :-)


Chinnu
Monday, March 12, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, 'मी'पण म्हणजे माझे अस्तित्व ह्या अर्थाने लिहिले ग. 'मी सुद्धा', असे म्हटले तरी अर्थ बदलत नाही. :-)

तुझ्यावीण मजला कुणी ओळखेना

या ओळी एका English poem मधल्या ओळीतून 'प्रेरित' :-) आहे. ओळी अशा होत्या:
nobody knows me, nobody recognise me without you
they say, your name is written on my face!
तुझ्यावर प्रेम करता करता मीच तू केव्हा झाले, हे मला कळाले नाही. 'तू'ला माझ्यातून जर वजा केले तर माझ्याकडे काही उरत नाही, हे मांडायचा हा प्रयत्न होता.

दिशाहीन 'मी'पण निकालात होते.

दिशाहीन झालेले माझे अस्तित्व तू नसल्याने गळुन पडले होते, त्याला काही अर्थ राहिला नाही. तुझ्याशिवायची माझी अवस्था अधोरेखीत व्हावे म्हणुन दिशाहीन 'मी'पण असे लिहिले. पुनम, हा एकच अर्थ होता ग. :-)

मक्ता लिहील्यावर फार समाधान मिळाले! ३-४ दिवसांची घालमेल जणु सार्थकी लागली होती, असे वाटले! :-)
मनाला समजावणे फार कठीन झाली आहे. किती समजावले तरी तुझीच ओढ कायम आहे. चालता चालता उगाच असे वाटते कि तू अजूनही परतशील माझ्याकडे. पण तू येत नाहीस, मग तुझ्या भेटीसाठी हपापल्या आणि 'अधाशी' झालेल्या मनाची परत परत हार होत राहते. येणारे जाणारे ऋतू दिलासे देतात, वेडे मन आशेने वाट पाहते, पुन्हा त्याची हार होते.

उगा चालता चालता थांबते मी
अधाशी मनाची पुन्हा मात होते!

इथे पोस्ट न करता ज्यांनी कौतुकाने कळविले, त्या सर्वांचे खुप खुप आभार.
सर्व मार्गदर्शकांचे आभार. चिन्नु तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने अधिकाधिक सुंदर होत राहील, यात शंकाच नाही.Dhulekar
Tuesday, March 13, 2007 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्लो चिन्नु:
गझल वाचली आणी एकदम आवडली.
थोड्या शब्दात, तुम्ही त्या व्यक्तिचे मन उघडे केले, हे खरच आश्चर्यकारक आहे. या गझलवरुन वाटत नाही की हा तुमचा पहीलाच प्रयत्न आहे. आम्हाला अश्या आणखीन गझल वाचायला मिळोत, अशी अपेक्षा करतो.
कीप इट अप

धुळेकर.


Pulasti
Tuesday, March 13, 2007 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु,
तसं मला जे म्हणायचंय ते आधीच कुणा ना कुणाच्या प्रतिसादात आले आहेच, पण तरी... :-)
मक्ता आणि सूर्य, इतर सगळ्यांप्रमाणे मलाही खूप आवडला. "क्षणार्धात" हा सानी मिसराही फार मस्त बांधला आहेस, पण त्या शेरातल्या उला मिसर्‍यावर थोडं अजून काम होऊ शकेल असे वाटते.
इतर शेरातल्या छान छान कल्पनांचा वृत्तबंधनांमुळे (तिमिर, तुझ्यावीण, अता इ.) थोडा रसभंग होतो आहे.
overall पहिला प्रयत्न मनापासून आवडला. अभिनंदन आणि शुभेच्छा!
-- पुलस्ति.

Chinnu
Tuesday, March 13, 2007 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुळेकर पायधुळ झाडलीत इकडे. तुम्हाला गजल आवडली, धन्यवाद!
मी एक विरहात असणार्‍या आणि विरह संपण्याचा chance नसलेल्या व्यक्तीचं मन मांडले, हे तुम्ही इथे नमुद केलतं, ते फार बरं झालं. लोकांना उगाच आपल्या शंका!! :-)

पुलस्ति, वृत्तात लिहिण्याची ही पहिलीच वेळ. त्यातून limited शब्द-प्रपंच असल्याने बरच काम राहुन गेलय! 'क्षणार्धात' सुचल्यावर आणि तो शेर ओके झाल्यावर मी बर्‍याच उड्या मारल्या. :-) तो शेर मी काहीना काही कारणाने २-३ दा बदलला! :-)
उला मिसर्‍यावर काम म्हणजे शब्दांबाबत म्हणायचयं का तुम्हाला? मला तरी मिसरे connect झालेत असच वाटलं.
'तिमिर' आणि 'अता'चा शेर वरील एका पोस्ट मध्ये बदलुन लिहिला आहे. 'तुझ्यावीण' बद्दल पुन्हा एकदा दिलगीर आहे.
बैरागींनी एका ठिकाणी 'बातम्यांचे मथळे' छापु नका असे म्हटले आहे. या गजलेत, एकाच थीमवर लिहितांना, परिस्थितीचे वर्णन करणे महत्वाचे झाले होते. तिथे सूर्याचा शेर लिहीला. पहिल्या ड्राफ़्टमध्ये जवळ जवळ तो एकच शेर ओके झाला होता! :-):-)
कार्यशाळेचे प्रशिक्षण सुरु आहे, त्यामुळे पुढे अजुन चांगले लिहायचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.


Supermom
Friday, March 16, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू,
वाचली ग तुझी गजल. एकदम खासच आहे.
'तुझ्या सोबतीला.....' एकदम सुपर्ब. अशीच मस्त मस्त लिहीत रहा आणि आम्हाला मेजवानी देत जा तुझ्या शब्दांची.


Ganeshbehere
Sunday, March 25, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनुताई, मस्त जमली हो गझल. दुसरी कधी लिहिणार आहे

Chinnu
Thursday, March 29, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम धन्यवाद. मेजवानी काय हो गरीबाघरची भाजी भाकरी ती! :-)
गणाभाव नवीन गझल, गझल बीबी वर पोस्ट केली आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.


.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions