Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

मयुर लंकेश्वर

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » मयुर लंकेश्वर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 09, 200720 03-09-07  6:12 pm

Chakrapani
Friday, March 09, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला दुसरा, तिसरा आणि शेवटचा शेर सगळ्यात जास्त आवडला. त्यातही नात्यांचा शेर आणि स्मशानातले ठसे तर मस्तच! पहिल्या शेराच्या दोन ओळींमध्ये परस्परसंबंधाचा अभाव आहे. सारंग म्हणतायत त्याप्रमाणे क्लोज़ कनेक्टिविटी नाही. घणाघात असा शब्द ऐकल्याचे लक्षात नाही. हा शब्द 'घणाघाती' असा आहे असे वाटते. पण पहिल्याच प्रयत्नात इतक्या छान कल्पना आणि बरीच सहज़ता असणे निश्चित स्पृहणीय आहे.
मी आनंदयात्री यांचा कार्यशाळेतील इतर गझलांच्या मतल्यांतील ओळींमध्ये कनेक्टिविटी नसल्याचा आक्षेप पटत नाही. ऋतूंचे येणेज़ाणे म्हणजे सततचा बदल मानल्यास 'बदलणे तुझ्याही स्वभावात होते' शी कनेक्टिविटी लागते (अर्थात ही ओळ माझी स्वत्:चीच असल्याने अधिक स्पष्टीकरण देऊ शकलो) त्याचबरोबर 'चांदणे तेच स्पर्शात होते' म्हणण्यामागे ऋतू ज़री बदलत असले, तरी काही आठवणी कायम होत्या असा काहीसा बदल विरुद्ध कायमस्वरूपीपणा यांचा परस्परविरुद्ध संबंध लागतोच आहे. त्यामुळे या ओळी निश्चितच 'कनेक्टेड' आहेत.


Vaibhav_joshi
Friday, March 09, 2007 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चक्रपाणि
आतापर्यंतची तुझी सगळीच मतं खूपच अभ्यासपूर्ण आणि मुद्द्याना धरून वाटली . एकदा हे सांगायचं होतं . कधी कधी मी तुझ्या प्रतिक्रिया शोधत येतो .


Milya
Saturday, March 10, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर वा छान लिहिली आहेस रे...
चौथा आनि मक्ता खूप आवडला...

पहिल्या शेरात connectivity थोडी कमी आहे असे मलाही वाटले...



Lopamudraa
Saturday, March 10, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी बोललो मी सुखाशी जरासा,
कधी वेचिले दुःख मौनात होते>>>..
मयुर खुप छान आवडली गज़ल..
पहिला शेरही आवडला... !!!


Mayurlankeshwar
Sunday, March 11, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कनेक्टेड' चा अर्थ थोडा थोडा समजतोय आता...
सारंग,चिन्नु,आनंदयात्री,चक्रपाणी.. सर्वांचीच मतं अभ्यासपूर्ण आहेत... इथे प्रत्येक गझलेवर होणारी चर्चा कविताच वाटते :-)

आता स्व:ताच स्व्:ताच्या गझलेवर बोलणे हे बरोबर नाही... पण तो अपराध पत्करुन थोडेसे बोलावेसे वाटते.

खरे तर मतला लिहिताना मला अर्थाच्या दृष्टीने असंच म्हणायचं होतं कित्येक त्रृतू आले आणि गेले पण जगण्यातील वेदनांची लय आहे तशीच राहिली. आनंदयात्रींनी म्हटल्याप्रमाणे आतल्या आत खदखदत राहिलो हेच मला मांडायचे होते...
ही व्यथा दुस-या शब्दातही मांडता आली असती हे नक्कीच... पण सारंगनी म्हटल्याप्रमाणे
शब्दांचा रियाज महत्वाचा... आता नुकतेच कुठे गझलेचे गाणे म्हणतोय तर सूर जुळण्यास जरा वेळ लागेलच :-)
हिवाळे गेले... पण जगण्याला धुक्यांचा गुलाबीपणा कधी लाभलाच नाही...
पावसाळे आले..पण अस्तित्वाच्या मातीला हिरवे चैतन्य लाभलेच नाही...
उन्हाळे आले.. आणि इथेही नेहमीप्रमाणे धुमसनेच सोबतीला होते ज्याची आयुष्यभर कधी साथ सुटलीच नाही.
इतकेच म्हणायचे होते मला.
धन्यवाद! :-)


Meghdhara
Sunday, March 11, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर हं..
फक्त धुमसणे..पालवीचा कोंब जळुन जावा इतकं नको.
रियाज सुरू झालाच आहे तर हर पुढच्या मैफिलीला आणखीन मजा येईल... वाट पहातो.



Mankya
Sunday, March 11, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलताना आपण " भावना फक्त समजून घे, बाकी शब्द व्यर्थ आहेत " असाच विचार करतो, पण ईथे अक्षरालाही खुप महत्व आहे ओ ! व्याकरण ( वृत्त,मीटर ई. ) , लय, भावार्थ सगळ सांभाळावं लागतं भौ ! खरंच रीयाजाची खुप गरज आहे !

तर मयुरा ... भावना पोचल्या रे मित्रा ! खरंच खुप सुंदर उतरलिये गजल !

माणिक !


Pulasti
Monday, March 12, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर, "दु:ख" शेर मला वाचताक्षणीच आवडला! एक छान personal tocuh त्यात आहे. गझल पुन्हा वाचल्यावर मतला आणि आभाळही आवडलं. नाती विशेष नाही भावला.. कदाचित, चक्रपाणिंनी म्हटल्याप्रमाणे "घणाघात" च्या शब्दप्रयोगामुळेही असेल. मक्ता मी प्रयत्न केला पण नाही समजला :-(
एकंदरीत गझल खूप आवडली!
-- पुलस्ति.

Mayurlankeshwar
Monday, March 12, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक अगदी खरंय.. रियाजाला पर्याय नाही.

मेघधारा---"फक्त धुमसणे..पालवीचा कोंब जळुन जावा इतकं नको." हे सुंदर!!

पुलस्ती धन्यवाद :-) ... 'घणाघात' च्या जागी कोणता दुसरा शब्द वापरावा हे बरीच खटपट करुनही उमजले नाही. 'आघात' हा शब्दही बसवता आला असता... पण तो शब्द ही तितकासा भावला नाही.
'घणाघात' सुद्धा काही विशेष शब्द नाही हे खरंच आहे.पण तरी रन्-टाईम ला जे हाताशी लागले ते लिहिले. तसा हा शेर अजुनही मलाही तितकासा रुचलेला नाही. जशी शब्दसंपदा वृद्धिंगत होईल तसे बदल सुचतीलच. असो.
मक्त्यातून इतकेच सांगायचे आहे की-- जगण्याच्या अर्थाला शोधण्यासाठी इतका वणवण भटकलो.फिरलो. आयुष्याच्या विविध संदर्भांची इतकी जुळवाजुळव केली. पण तरीही ह्या सगळ्याचा शेवट मरणाच्या मातीतच व्हायचा होता.पावलांचे ह्या मातीत उमटलेले ठसे तेवढे गवसले!
धन्यवाद!


Pendhya
Monday, March 12, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर, गजल फ़ार आवडली. शेवट छान केलास.

Athak
Monday, March 12, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आसवांची किती ओढ होती!
अनोखेच आभाळ डोळ्यात होते
वा वा क्या बात है मयुरा
तुम्ही कवी मनाची लोकं स्वताच्या अनुभवावरुन लिहीता की दुसर्‍यांच्या .. खरच प्रश्न पडतो :-) कसं सुचत तुम्हाला हे छान छान अन अचुक शब्दात मांडायला ?


Sanghamitra
Monday, March 12, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर सुरेख आहे गज़ल.
सगळे शेर सहज आलेले आहेत.
मतल्यात दोन्ही मिसर्‍यात सरळ संबंध नाही जाणवला तरी वाचक स्वतः अर्थ लावू शकतील इतकी सूचकता आहे त्यात.
बाकीचे तर निर्विवाद छान आहेत.
घणाघात शब्दात काय चूक आहे काही कळले नाही. घणाचे आघात ते घणाघात. cricket commentary जास्त ऐकल्यामुळे मूळ शब्दापेक्षा त्याचे हे रूप अधिक जवळचे वाटतेय कदाचित. :-)


Mayurlankeshwar
Wednesday, March 14, 2007 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेंढ्या,अथक मित्रा धन्यवाद. :-)
अथक प्रत्येकाच्या मनात खोल कुठेतरी कवित्व लपलेलं असतंच.शब्दांनी सादवलं की ते कागदावर उतरतं इतकंच!
संघमित्रा सुचकतेचा मुद्दा पटला हं!
म्हणजे खरं तर जे लिहिलं ते काही जाणून-बुजून 'सुचकता' असा विचार करून लिहिलं नव्हतंच..तरी नकळत घडून गेलं...



Meenu
Wednesday, March 14, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी बोललो मी सुखाशी जरासा,
कधी वेचिले दुःख मौनात होते >>> मस्त !!

Bairagee
Wednesday, March 14, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर लंकेश्वर,

मला आसवांची किती ओढ होती!
अनोखेच आभाळ डोळ्यात होते
वा! वा! वा! फारच आवडला.

कधी बोललो मी सुखाशी जरासा,
कधी वेचिले दुःख मौनात होते
वाव्वा! सारंग ह्यांनी सुचवलेला बदलही चांगला आहे.

मतला अजून चांगला निभावता आला असता. नेहमीचे असले तरी 'सोयऱ्यांचे घणाघात' छान. 'घणाघात' हा शब्द चुकलेला वाटत नाही. मक्ता काही पटकन डोक्यात घुसत नाही. पण 'कसा आंधळा मी मुशाफीर होतो' हा मिसरा छान आहे.





.
हितगुज दिवाळी अंक २००८



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions