Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

श्यामली

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » श्यामली « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 08, 200720 03-08-07  12:50 pm
Archive through March 09, 200720 03-10-07  3:52 am

Bhramar_vihar
Saturday, March 10, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, अप्रतिम गज़ल! लांघुन या शब्दात काहि गैर नाही. हा शब्द बरेच कथांमधुन वाचल्याचे स्मरते. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा. :-)

Desh_ks
Saturday, March 10, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,

'लंघून' बद्द्ल माझंही थोडंसं

'लंघून' या शब्दात एक अगतिकता आहे, सहजता आहे. एखादं भांडं पाण्यानं पूर्ण भरून ओसंडून जावं तसं माझ्या मनात दु:ख मावेनासं झालं तेव्हां नकळत उमटलेला हा उसासा किती सुंदर शब्द आहे त्यात दु:ख, असहायता, निराशा, अगतिकता सारंच व्यक्त झालंय.

आणि 'लांघून' या शब्दाचा अर्थ जरी 'ओलांडून जाणं' असाच असला तरी त्यात एक सहेतुकता, व्यक्त होण्याचा प्रयत्न आहे असा भाव येतो असं मला वाटतं.

आणि तुमच्या त्या सहजसुंदर शेरात म्हणूनच 'लंघून' अधिक समर्पक होईल अशी माझी कल्पना.

'तुला वाटले जोगिया गात होते' यात माझ्या अगतिक, सहज बाहेर पडलेल्या उसाशाला तू 'दाखवलेलं' दु:खच समजलास ना? असा भाव आहे असं मला प्रतीत झालं, म्हणून हे सारं मांडलं.

आणि 'लंघून' असं लिहिण्यात मात्रांचीही काहीच चूक नाही.

इतक्या सुंदर शेराबद्द्ल पुन्हा अभिनंदन!


Athak
Saturday, March 10, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माशा _ ए _ अल्लाह बहोत खुब बहोत खुब ऐसेही और शेर जनम लेते रहे आपकी कलमसे

Dineshvs
Saturday, March 10, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, छान जमलीय. माझ्या आठवणीप्रमाणे, तु पहिल्यांदाच असे काहि वृत्तात वैगरे लिहिले आहेस.
तुझ्या वतीने, जोगिया बद्दल चार शब्द लिहु का ? जोगिया हा एक आर्त राग आहे. भीमसेन जोशींचा, पिया मिलनकि आस, बहुतेकानी ऐकला असेलच. निदान वद जाऊ कुणाला शरण हे नाट्यगीत तरी परिचयाचे असेलच.
आणि लताचे भेटीलागे जीवा.
या सगळ्या रचनेतुन, हा राग छानच खुललाय.
गदिमांची जोगिया नावाची एक कविता होती. घरकुल सिनेमात ती सी रामचंद्राच्या चालीवर, फ़ैयाजने गायलीय. ( तिचे नंतर एक रडगाणे स्वरुप देखील बाजारात आले. ) पण फ़ैयाजचा खर्जातला आवाज, प्रत्येक शब्दाला दिलेला न्याय आणि तालवाद्य न वापरता दिलेली मोजक्या नाजुक वाद्यांची साथ, यामूळे ते गायन खुपच परिणामकारक झाले होते. मी काहि ओळी लिहिल्या तर जास्त चांगले होईल नाही का ?

कोन्यात झोपली सतार, उतरला रंग
पसरली पैंजणे, सैल टाकुनी अंग
दुमडले गालिचे, तक्के झुकले खाली
तबकात राहिल्या, देठ, लवंगा, साली


Milya
Saturday, March 10, 2007 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिमा का सीमा
माझ्यामते सी दुसरा आहे

मग सीमोल्लंघन का सिमोल्लंघन?


Lopamudraa
Saturday, March 10, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अता स्पंदनांचे उगा दाखले का?
तसेही कुठे प्राण देहात होते?>>>>>
आणि तो जोगिया...

श्यामले पाय कुठे तुझे.. काय सुरेख लिहिले ग...!!!!
वा वा.. काय दाद द्यावी.. आणि कशा कशाला...


Pendhya
Saturday, March 10, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले, बोहोत खूब! छानच केलियेस गजल.
शेवट तर फ़ारच छान.


Shyamli
Sunday, March 11, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंड्ळी :-)
दिनेशदा, हो वृत्तबद्ध लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न हा :-)

मिल्या, सी, दुसराच (आता शब्द तपासून बघायची सवय लागली ):-)

Pulasti
Tuesday, March 13, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली. फार छान गझल. अभिनंदन!!
सर्वच शेर आवडले! मक्ता तर ("अ"ता असूनही) हेलाऊन गेला. यातला पहिला मिसरा असा केला तर - "कशाला उगा दाखले स्पंदनांचे"
-- पुलस्ति.

Bairagee
Tuesday, March 13, 2007 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'लांघना' हे हिंदी क्रियापद/धातू आहे. मराठीत 'लांघणे' वापरत असल्यास ते मराठीवरील हिंदी प्रभावाचे एक उदाहरण असावे. 'लंघून' आणि 'लांघून' दोहोंच्या मात्रा समान आहेत. त्यामुळे 'लंघून' वापरावेसे सुचवावेसे वाटते.
मिल्या, सीमोल्लंघन बरोबर:-). दिनेश फैय्याज उत्तम गायिका 'होती' हे त्या गाण्यामुळे कळते. माझे एक आवडते गाणे आहे.
Shyamli
Wednesday, March 14, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझल आवडली आणि अभ्यासपूर्वक अभिप्राय दोन्हीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद पुलस्ति :-)
१ली गझल आहे तेंव्हा एवढी सुट घ्यायला(द्यायला) हरकत नसावी ना!
पण पुढल्या गझलच्यावेळेला मात्र मी हे नक्की लक्षात ठेवीन.

बैरागी, "लंघून" चा बदल बिनशर्त मान्य :-)
आपल्यासारख्या जाणकार लोकांनी वेळीवेळी मार्गदर्शन करत राहावं ही नम्र विनंती :-)

देशपांडॆजी, लांघून आणि लंघून च तुम्ही केलेलं विवेचन आवडलं, पटलं, धन्यवाद :-)


Nalini
Wednesday, March 14, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय श्यामली.
तुझी ही गजल ऑरकुट ह्या संकेतस्थळावरील मैत्रिण ह्या सदरात (community मध्ये) मेघना नावच्या मुलीने टाकलिय. तिथे तुझ्या नावाचा कुठेच उल्लेख नाही. मी तिला तसा मेसेजपण पाठवलाय. तुही लक्ष घालशील.
http://www.orkut.com/Messages.aspx?msg=U0027098074%2FIB%2F0973693981%2FU0054652842&;fld=IB&debug=&na=1&nid=&nst=1

Meenu
Thursday, March 15, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा श्यामली बाई मोठ्ठ्या कवी झाल्या म्हणजे आता ..

Shyamli
Thursday, March 15, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद नलीनी :-)
मेसेज टाकलाय मी तीला

मीनु :-)

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions