Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अभिजीत दाते

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » अभिजीत दाते « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 06, 200720 03-06-07  11:39 am

Chinnu
Tuesday, March 06, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजित मान गये दोस्त! काही काही शेर अगदी कहर आहेत! (म्हणजे खुप चांगले आहेत. स. स्प. :-))
मला जरा खटकलेले म्हणजे दर्यात होते आणि शहार्‍यात होते, या दोनही जागी अलामत बरोबर आहे काय? अज्ञात होते असे मतल्यात म्हटल्यावर आ ही अलामत पाळणे गरजेचे होउन बसते ना? (माझ्या mentor ने माझे बरेच शेर नापास केलेत त्यामुळे विचारलं ~D )
जुन्या वादळांनी.., प्रकाशून वीज.. सर्वात सुंदर आणि चित्रमय, तर झुरावे.., तुला का न.. हे शेर ओके वाटलेत. मक्ता विशेष आवडला.
नचिकेत तुमची शंका रास्त आहे. पण गजलमध्ये काही शेर स्पष्ट करतात कि, जुनी जखम उकरली जात आहे, जुने वादळ पुन्हा घोंघावु पहात आहे त्या स्पर्शामुळे. म्हणजे वर्तमानात ज्या गोष्टी घडत आहेत त्या गझलकाराला भूतकाळात नेवुन सोडत आहेत. हे शेवटी असह्य जाल्याने गजलकार म्हणतो कि जे जुने सोसले तेच अजुन विसरु शकलो नाही, आता नकोच (असे) घाव देवुस (प्लीज!) :-)
अभिजित, आणखी एक शंका म्हणजे घोंघवु हा शब्द घोंघावु असा आहे न? CBDG!
वैभवा, सन्मी म्हणतेय तशी नियमावली च्या बीबी वर गजलेची Terminology/Definitions? एका पोस्ट मध्ये टाकता आल्यात तर उत्तम होईल. सन्मी मक्ता म्हणजे शेवटला शेर. वैभवने 'मक्ता घेणे' अश्या सुंदर उदाहरणाने स्पष्ट केले आहे ते. मला पोस्टची लिंक सापडल्यास पाठवेन. :-)


Ashwini
Tuesday, March 06, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, मस्त.
वैभवने म्हंटल्याप्रमाणे कल्पनांचे नाविन्य आहेच आणि शब्दयोजनाही अतिशय चपखल आहे.


Swaatee_ambole
Tuesday, March 06, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत सुंदर गज़ल!! ' इशार्‍यात होते, शहार्‍यात होते' झकास.

चिन्नू, दर्यात, शहार्‍यात या शब्दांत अलामत भंग होत नाहीये. बरोबर आहेत ते. :-)


Chinnu
Tuesday, March 06, 2007 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नुला शंका फार! :-) अजून मला स्पष्ट झाले नाही, त्या शब्दात अलामत कशी बरोबर आहे ते? :-( कृपया मार्गदर्शन करावे. अर्धा र किंवा 'रफ़ार' धरुन अलामत आल्यास(च) चालते का?
जनहो! माझी बडबड व्यर्थ वाटल्यास क्षमस्व!


Swaatee_ambole
Tuesday, March 06, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या जागी रफारच काय, कोणतंही जोडाक्षर चालेल. अलामत हा ' स्वर' असतो. आपली गज़ल अजून पोस्ट झालेली नाही म्हणून त्यातली उदाहरणं मेलमधे सांगते तुला. :-)
बाकी व्यर्थ वगैरे काही नाही. शिकताना no question is a silly question. :-)


Chinnu
Tuesday, March 06, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वातीजी, धन्यवाद! अभी थोडासा 'कळ्या' हं मेरेकु. :-)

Swaatee_ambole
Tuesday, March 06, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी कोणाला काही मूलभूत शंका असल्यास
इथे उत्तर सापडतं का बघा.

Asami
Tuesday, March 06, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शहार्‍यात होते ... भारी उस्ताद

Milya
Tuesday, March 06, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा एकदम मस्त गझल... सर्वच शेर झकास आहेत...

इशा़ऱ्यात आणि शहाऱ्यात ... सर्वात कहर...

Manuswini
Wednesday, March 07, 2007 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मराठी गझल काय प्रकार आहे हे इथे येवुन कळले..
वाचुन वाचुन थोडे फार कळते, पण अभीजीतची ही गझल खुपच touchy आहे, माझ्यासारखीला(गझल मधील थोडेच ज्ञान असणारीला) त्यातील वेदना कळली.

ही गझल प्रेमात झालेली वेदना सांगतेय ना? बरोबर आहे का माझे understanding?


Yog
Wednesday, March 07, 2007 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकाशून स्वप्ने... मस्त शेर आहे.
पण मला गझलेचा शेवटचा शेर अगदीच सुमार वाटला.. kinda anticlimax!


Devdattag
Wednesday, March 07, 2007 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है!!!.. ..

Pendhya
Wednesday, March 07, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, छान वजन पैदा केलयस

Nachikets
Wednesday, March 07, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू, धन्यवाद!! :-)
पण मला अजून confusion आहे. पुन्हा प्रयत्न करतो.

प्रथम काही शेर स्पष्ट करतात ह्या विषयी. ही गज़ल मला मुसलसील (वेगवेगळे विषय वा भावना हाताळणारी) वाटते. तसे नसले तरीही गज़लेच्य मूलभूत नियमाप्रमाणे प्रत्येक शेर ही एक स्वयंपूर्ण कविता असते. शेर वाचताना पुढचा मागचा reference नसला तरीही वाचका पर्यंत काहीतरी एक अर्थ पोहोचला पाहीजे असे मला वाटते.

आता गज़लेचे नियम जरा बाजूला ठेउन शेवटचा शेर असा असता,

"नको आणखी घाव देऊस आता
जुन्याचेच देणे मला खात आहे"

तर पहिल्या आणि दुसर्‍या ओळींतला परस्पर संबंध लगेच समजतो.

आधीच म्हंटल्या प्रमाणे माझ्या समजण्यात काही चूक होत असेल. जाणकार मंडळींनी ह्यावर काही भाष्य करावे ही विनंती...


Maitreyee
Wednesday, March 07, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही! इशारा - शहारा चा शेर जबरा!

Bairagee
Wednesday, March 07, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतू येत होते ऋतू जात होते...
मला जे हवे तेच अज्ञात होते...
ह्मह्म. ह्या ऋतूंमुळे, त्यांच्या जाण्यामुळे मतल्यात थोडा त्रास होतो हे खरे. ठीक.

जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे...
असे काय आव्हान स्पर्शात होते...
घोंघावण्याबद्दल चर्चा झाली आहे. "असे काय" भरीचे किंवा पादपूर्तीसाठी आलेले वाटते. शेरात अजून प्रॉमिस आहे. ठीक.

प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज उध्वस्त दर्यात होते...
मस्त. जोमदार. खालची ओळ कडाडून भेटते. 'उध्वस्त दर्यात'मुळे अनुकूल अशी नादनिर्मिती. वा!

झुरावे कशाला तुझ्या आठवाने...
उगा आसवांचे बळी जात होते...
छान.

तुला का न माझे इरादे कळाले...
इशा-यात होते ,शहा-यात होते...
चांगला. लहजा फार आवडला.

नको आणखी घाव देऊस आता...
जुन्याचेच देणे मला खात होते...
ठीक.

अभिजित, तुम्ही जोमदार गझल लिहाल यात शंका नाही.




Paragkan
Wednesday, March 07, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya baat hai .. isharyaat hote, shaharyaat hote !!

Sarang23
Thursday, March 08, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! अभिजीत, 'उध्वस्त दर्यात' छान आहे, शेवटचा शेरही आवडला! एकूण छान गझल!!

Kandapohe
Thursday, March 08, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत. सुंदरच. सगळेच सव्वाशेर आहेत. :-)

Bee
Thursday, March 08, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझल छान आहे अभिजीत. पण एका गझलवर काम भागणार नाही हं :-)

Mi_abhijeet
Thursday, March 08, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो आणि मैत्रीणींनो
सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार...!

माझ्या गज़लेच्या अनुषंगाने बोलायचं तर सुरूवातीलाच मला या काव्यप्रकाराबद्दल फ़ारशी माहिती नाही हे स्पष्ट करतो त्यामुळे माझ्या तुटपुंज्या ज्ञानाच्या जोरावर हे धाडस...! मायबोली वर सहज चक्कर टाकली आणि ही कार्यशाळा सापडली एक प्रयत्न म्हणून जे सुचल ते लिहिलं यात वैभव जोशी यांच्या मार्गदर्शनाचा मला विशेष उल्लेख केला पाहिजे
मला विचाराल तर "दर्यात" हा मला स्वतःला भावलेला शेर तसंच "शहार्‍यात" सुद्धा... वादळाच्या शेरात "घोंघावणे" शब्दात वैभवनी सांगितल्याप्रमाणे बेदरकारी आणि भीषणता आहे ती कदाचित बाकीच्या शब्दांत सापडली नसती शेवटचा शेर हेतुपुरस्सरच...
एकूण गज़लेशी परिचय झाला...
आणि तोडकीमोडकी का होईना एक गज़ल लिहिता आली हा आनंद वेगळाच...!
माझा हा प्रयत्न गोड मानून घेतल्याबद्दल धन्यवाद..!


Lopamudraa
Saturday, March 10, 2007 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज उध्वस्त दर्यात होते...

झुरावे कशाला तुझ्या आठवाने...
उगा आसवांचे बळी जात होते...

तुला का न माझे इरादे कळाले...
इशा-यात होते ,शहा-यात होते......>>>.

अभिजित सगळेच शेर सुंदर आहेत..
मला हे जास्त आवडलेत..


Abhiyadav
Wednesday, March 14, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ithe prakaashit zalelya gajhalaamadhun jar sarvotkrusht 3 nivadaychya asatil tar hi gajhal nakkich yeil tyat. ajun baryach gajhalaa yet aahet mhanun 3 mhanale nahitar this is best.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators