Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 01, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through March 01, 2007 « Previous Next »

Mankya
Wednesday, February 28, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिबी येत होते बिबी जात होते
लिहावे कसे हे कुणा ज्ञात होते .....!

वैभवा .... आज एक वाक्य आठवतय मित्रा ....
" भान ठेवून योजना आखा अन बेभान होऊन राबवा !"
सार्थ ठरवलस तु हे वाक्य !

माणिक !


Jo_s
Wednesday, February 28, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव

मझ्या एका मित्रालाही पाठवायची आहे गझल. पण त्यानि आताच नाव हितगुजवर
register केल आहे व अजून पिन न मिळाल्यामुळे ल्~ओगईन करता येत नाहि त्यामुळे उद्या पाठवलि चालेल का?

Vaibhav_joshi
Wednesday, February 28, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मेल करायला सांग ना . हितगुज च होईल तोपर्यंत .

आणि तुझा ई मेल दे की रे सुधीर . चर्चा कशी करणार ?


Mayurlankeshwar
Wednesday, February 28, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव तुला खरोखरच त्रिवार सलाम
शेवटी गझल विषयी जी भीती मनात होती ती आता मावळते आहे.
अजून बराच पल्ला गाठायचा आहे.. आता कुठे सुरुवात झाली आहे..
सर्वांचेच धन्यवाद!


Shyamli
Wednesday, February 28, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव गमतीत गुर्जी म्हणायला लागले होते तुला
पण त्या शब्दाचा मान राखतोयस
परत न कंटाळता उत्तर देणं,समजाउन सांगण not a joke

सलाम :-)

Ashwini
Wednesday, February 28, 2007 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, गझल पाठवली आहे.... हुश्श्य. :-)
Please, मिळाली का ते सांग.


Admin
Wednesday, February 28, 2007 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jo_S
तुमच्या मित्राला केंव्हाच email गेली आहे. त्याना spam folder मधे गेली का ते बघायला सांगा

Vaibhav_joshi
Thursday, March 01, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांनी गज़ल पाठवेल्या आहेत त्यांची अंतिम यादी

१) अनिलभाई
२) जयश्री
३) मीनू
४) देवदत्त
५) नचिकेत जोशी
६) नचिकेत आठवले
७) चिन्नू
८) मनिषा लिमये
९) माणिक
१०) गणेश कुलकर्णी
११) श्यामली
१२) प्रिंसेस
१३) अश्विनी सातव
१४) झाड
१५) विनायक कर्नाटकी
१६) नीरज कुलकर्णी
१७) सुधीर
१८) सतिश देश्पांडे
१९) नंदिनी
२०) मिल्या
२१) मेघधारा
२२) मयूर लंकेश्वर
२३) शलाका
२४) पुलस्ति
२५) डॉ. गजानन
२६) अपर्णा
२७) अभिजीत दाते
२८) आफ़ताब
२९) हेम्स

आधीपासून जे गज़ल लिहीत होते पण कार्यशाळेत सहभागी झालेले गज़लकार

१) प्रसाद शिरगांवकर
२) स्वाती आंबोळे
३) सुमतीताई वानखेडे
४) सारंग
५) चक्रपाणि
६) उपास

शक्यतो सर्व नावे घेतलेलीच आहे. कुणाचेही नाव राहिले असेल तर ते केवळ अनावधानाने राहिले असावे . इथे किंवा माझ्या मेलवर कळवावे


Vaibhav_joshi
Thursday, March 01, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मी जे गीत गातो ....


आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे
चालु दे वक्षात माझ्या वादळांचे येरझारे

गुरुवर्य कै . सुरेश भटांच्या ह्या अप्रतिम ओळी . नवोदित गज़लकारांचा गज़ल लिहीण्याचा उत्साह बघताना ह्या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहवलं नाही .

मित्रांनो .. आपण मायबोली गज़ल कार्यशाळा - १ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही सगळे अत्यंत आभारी आहोत . आज आपण ह्या कार्यशाळेची सांगता भटांच्याच भुजंगप्रयातातील एका गज़लेने करत आहोत . यापुढे एक एक करून निवडलेल्या निर्दोष गज़ल पोस्ट करण्यात येतील .

अता राहिलो मी जरासा जरासा
उरावा जसा मंद अंती उसासा

कसा कोरडा कोरडा जन्म गेला
कसा रोज मी पीत गेलो पिपासा

कसे ओठ तू बंद केलेस माझे
करावा कसा आसवांनी खुलासा

गडे सांग हा घाव आहे कुणाचा
तुझा चेहरा वाटतो पाहिलासा

असे हे कसे जीवनाचे दिलासे
दिलाश्यांस मी देत आहे दिलासा

ह्या गज़लवर काहीही लिहीण्याची गरजंच नाही . आम्ही सर्व गज़लकारांशी चर्चा करेपर्यंत आपण सर्वांनी ह्या रचनेचे सौंदर्य पहावे , अभ्यास करावा व काही प्रश्न असलेच तर मेलवर संपर्क साधावा .

मित्रांनो ,

सर्वोत्कृष्ठ गज़लची निवड जास्तीत जास्त निस्पृहपणे / संपूर्ण त्रयस्थपणे करण्यासाठी आम्ही सर्वांनी तो मान कै . सुरेश भटांचे शिष्य , स्नेही , त्यांच्या बहुतांश कार्यक्रमांचे निवेदक , गज़लकार व शाहीर सुरेशकुमारजी वैराळकर यांना दिलेला आहे . आलेल्या गज़लमधून उत्तम १० रचना आम्ही त्यांच्याकडे सोपवणार आहोत . अंतिम निर्णय फक्त त्यांचा असणार आहे .

शुभेच्छा आणि पुन्हा एकवार शतशः धन्यवाद








Upas
Thursday, March 01, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार वैभव..
माझं नाव आधीच्या यादीत होतं वरच्या यादीत नाहीये.. :-)
आणि हो काही गझल मी लिहिल्या आहेत पूर्वी..


Vaibhav_joshi
Thursday, March 01, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास ... दिलगीर आहे . नाव बिनबक्षिसाच्या यादीत टाकलय .
:-)


Vaibhav_joshi
Thursday, March 01, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



मित्रांनो,

कार्यशाळेमध्ये पूर्ण झालेल्या गज़ल प्रकाशित करायला सुरुवात करत आहोत. आधी म्हटल्याप्रमाणे प्रवेशिका जसजश्या तांत्रिकदृष्ट्या निर्दोष होत जातील तश्या क्रमाने इथे प्रकाशित होतील.

एक गोष्ट इथे कार्यशाळेत भाग घेतलेल्यांसाठी नमूद करू इच्छितो. इथे गज़ल finalise झाली असं आपण म्हणतो ते या कार्यशाळेच्या संदर्भात.
त्या गज़लचा आणि तुमच्या गज़ल लेखनाचा प्रवास तिथे संपू नये, तर तिथून सुरू व्हावा. म्हणजे कुठलीही गज़ल प्रकाशित झाल्यावरसुद्धा ती अजून परिणामकारक, अजून तंत्रशुद्ध, अजून सहजसुंदर होवू शकते का, हा विचार स्वाध्याय (self study) म्हणून करत राहिलंच पाहिजे. त्यातून कदाचित ती गज़ल बदलणार नाही, पण पुढे लिहीताना विचारांना दिशा मिळायला मदत होते हा माझा अनुभव आहे.

तर आता सादर करत आहोत कार्यशाळेत पूर्ण झालेली पहिली गज़ल :





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators