Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Archive through February 28, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through February 28, 2007 « Previous Next »

Krishnag
Tuesday, February 27, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) अता राहिलो मी जरासा जरासा
लगा गालगा गा लगागा लगागा
२) डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
गागाल गालगागा गागा लगाल गागा
३)ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
गा गागा गागा लललल गागाल लगालल गागा
४) मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
गाललल गाल गाल गालगाल गाल गाल
५) त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
गा लगागा गालगागा गाल गा गागाल गा
६) मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
लगागागागा लगालगागा लगा लगा गाल गाल गागा
७) काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
गागा लगा लगागा गागालगाल गागा
८) प्रिया आज माझी नसे साथ द्याया
गागा गाल गागा लगा गाल गागा
९) एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
लगाल गा गागा लगा लगागा लगा गागाल गा
१०) भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
गालगा गा गाल गागा लल गागागा गालगा


वैभव, तपासून चुका कुठे झाल्यात आणि कश्या प्रकारे झाल्यात त्या कृपया सांगा!!Meenu
Tuesday, February 27, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग सुचेता ग ग नाही गा गा ..

Meghdhara
Tuesday, February 27, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१)अता राहिलो...
लगागा लगागा लगागा लगागा

२)डोळ्यात सांजवेळी...
गागाल गालगागा गागाल गालगागा

३)ती गेली तेव्हा...
गागागागागा गागा गागा गागागागागा

४)मालव्वून टाक...
गाल गाल गाल गाल गाल गाल गाल गाल

५)त्या फुलांच्या...
गालगागा गालगागा गालगागा गालगा

६)मनाप्र्माणे जगावयाचे...
लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

७)काटा रुते कुणाला..
गागा लगाल गागा गागा लगाल गागा

८)प्रिया आज माझी...
लगागा लगागा लगागा लगागा

९)एकाच या जन्मी...
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

१०)भोगले जे..
गालगागा गालगागा गालगागा गालगा

मेघा


Vaibhav_joshi
Tuesday, February 27, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई .. गज़ल किदर है?
:-)

मित्रांनो .. मनःपूर्वक धन्यवाद
सर्वांचेच प्रयत्न योग्य दिशेने आणि बरीचशी उत्तरे बरोबर दिली आहेत.

नचिकेत्स ने उत्तरे बरोबर आणि व्यवस्थित गट पाडून दिलेली आहेत .Shyamli
Tuesday, February 27, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, गट कसे पाडायचे यात गोंधळ आहे अजुनही
जरा सविस्तर सांगणार का?


Vaibhav_joshi
Tuesday, February 27, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली

डोळ्यात सांजवेळी , आणू नकोस पाणी

गागालगालगागा , गागालगालगागा

स्वल्पविरामावर लक्ष दे . इथे pause येतो मीटर म्हणताना आणि गाणं म्हणताना पण .

आतापर्यंत गज़ल पाठवणार्‍यांची नावे

१) जयश्री
२) डॉ गजानन
३) मनिषा लिमये
४) मेघधारा
५)श्यामली
६) मीनू
७)देवदत्त
८) पुलस्ति
९) प्रिया
१०) माणिक
११) गणेश कुल्कर्णी

जाणकारांपैकी

१) प्रसाद शिरगांवकर
२) स्वाती आंबोळे

धन्यवाद


Vaibhav_joshi
Tuesday, February 27, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुजंगप्रयात ...

गज़लकार :- चंद्रशेखर सानेकर
संगीत :- गज़लनवाज भीमराव पांचाळे
गायक:- गज़लनवाज भीमराव पांचाळे

पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे

(पहा:- एक दीर्घच्या ऐवजी दोन लघू अक्षरांचा वापर "गुणगुणावे" )


तुला पाहिजे तो मला रंग दे तू
तुला पाहिजे ती मला ठेव नावे

(पहा:- परीपूर्ण शेर. "माझी तक्रारच नाहीये" किती सुंदर आलंय !)


दिले कोवळे स्वप्न मी जीवनाला
तुझे स्वप्न माझ्या उशाला असावे

(पहा:- सुंदर विरोधाभास . तू स्वप्न आहेस हे मान्य आहे पण ते तरी कायम उशाशी असावे ह्याचेसुध्दा "स्वप्नच" बघतोय मी)


असा आज एकांतही गप्प आहे
जणू काय बोलायचे ते न ठावे

(पहा:- "गप्प" ह्या बोलीभाषेतल्या शब्दाचा परिणामकारक वापर. विशेषतः शब्दांची मांडणी पहा. वाक्याच्या शेवटी गप्प आल्याने गायकाला अर्थपूर्ण जागा घेण्याची जागा करून दिली आहे )


दिव्याला छळावे जसे वादळाने
तुझे श्वास देती तसे हेलकावे

(पहा:- सौंदर्य , विरोधाभास , कल्पनाविष्कार. काय बोलावं. हासिल-ए-गज़ल शेर)


इथे वाहतो गंध बदनाम माझा
फुलांनी जरा वेगळे दरवळावे

(पहा:- १ गुरू ऐवजी दोन लघूंचा वापर. "दरवळावे")


कुठे राहिलो मी मला ओळखीचा
अता टाळतो मी तुझेही सुगावे

(पहा :- माझी ओळख काय होती? )


मला जीवना तू नको साथ देऊ
तुझे मानले मी कधीही न दावे


मला पाहिजे ती दिशा लाभली, पण
अता वाटते की दिशाहीन व्हावे

अशी रात्र आहे जिला सूर्य नाही
अता काजव्यांनी निखारेच व्हावे


Sarang23
Tuesday, February 27, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे वाहतो गंध बदनाम माझा
बदनाम मध्ये पण बद हे दोन लघू घेतले आहेत...


Ekrasik
Tuesday, February 27, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,

अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरु केला आहेस. मी जरी गजल लिहीत नसलो तरी मला एकायला, वाचायला आवडते. ह्या उपक्रमा निमित्ताने गजलेचे बारकावे समजत आहेत. आणि फ़क्त गजलच कशाला, व्रुत्त, मात्रा ह्यांचा ही अभ्यास होतो आहे. रसग्रहणा बरोबरच हे ही समजल्या ने आनन्द द्विगुणित झाला आहे.
हा उपक्रम गजलकारांनाच नाही तर माझ्या सारख्या वाचकांनाही अत्यंत उपयुक्त आहे.

तुझे मनापासुन आभार आणि उपक्रमासाठी अनेक शुभेछा.

- पराग.Swaatee_ambole
Tuesday, February 27, 2007 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लगागा लगागा.. किती होत त्रागा!!
कुणी भरविले खूळ डोक्यात होते!!!

कसे ओळखू मायबोलीकरांना?
दिसे कोण अन कोण रोमात होते


Jokes apart,
वैभव, तू ग्रेट आहेस. ज्या प्रकारे टप्प्या टप्प्याने हे सगळं शिकवतोयस, just great!! Hats off!!! :-)


Upas
Tuesday, February 27, 2007 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशाला तुझा हा उगा होत त्रागा
गुरुजी असे मायबोलीत होते!
:-)

स्वाती, खूळ भरविले च्या ऐवजी खूळ घेतले असं घेतलस तर लगागा लागतय बघ.. :-)

वैभव, मी गझल मुदतीपुर्वी पाठवायचा प्रयत्न करतो.. अतिशय स्तुत्य आणि तितक्याच ताकदीने चालवतोयस तू हे.. संकल्पना, मांडणी, पाठपुरवा सगळच अगदी खास आहे! मनापासून आभार तुझे.

Daad
Wednesday, February 28, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह!! अगदी म्हणजे अगदी बोळा झालाय. उठून "लगा लगा" चालू लागावं म्हटलं तरी नकोच....... पुन्हा लगा लगा आहेच. तेव्हा "लगा" रहो हेच खर!

(स्वातीला १००% अनुमोदन! नुसतं hats off नाही तर..... वैभव, पटके आणि शेमले सुद्धा!!)


Meenu
Wednesday, February 28, 2007 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतु येत होते, ऋतु जात होते ..
किती ही वहीवाट, डोक्यात होते ..

सुचेना दिसेना दुजे आज काही,
ऋतु येत होते ऋतु जात होते ..

वैभवनी ही कार्यशाळा सुरु केली म्हणुनच खरं तर मी अभ्यासपुर्वक वगैरे असं काही लिहीलं. नाहीतर माझ्यासारखे आळशी कामाला लागले नसते. एक खरोखर सुंदर अनुभव मिळाला गज़ल लेखनात. लिखाण करत असताना जो आनंद अनुभवला त्यासाठी वैभवचे आभार .. आणि अर्थात त्याला मदत करणार्‍या प्रसाद, सारंग, स्वाती, बैरागी आणि जे कुणी असतील त्या सर्वांचे.


R_joshi
Wednesday, February 28, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव तुझे प्रयत्न चांगलेच आहेत पण मला हे जमेल असे वाटत नाहि आहे. प्रयत्न करते आहे त्याला हवी तशी नेटाची(इंटरनेटची) साथ मिळत नाहि आहे. त्यामुळे या कार्यशाळेतुन मी माझे नाव मागे घेते.:-(

Nandini2911
Wednesday, February 28, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बास,,, आम्ही आता रणछोड राणा... शस्त्रेही टाकली आणि धारातीर्थी पडायच्या आत पळत आहोत.. ये अपने बस की बात नही.. ( for that matter आपल्या ट्रेनची किंवा प्लेनची पण बात नही) :-)

Chakrapani
Wednesday, February 28, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवराव, गझल पाठवली आहे. चर्चेच्या/विश्लेषणाच्या वेळी ज़ाणकार नसलो, तरी सहभागी व्हायला आणि या उपक्रमात तुम्हांला लागेल ती मदत करायला नक्कीच आवडेल; तशी तयारीही आहे. कळावे.

Milya
Wednesday, February 28, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना अनुमोदक... वा काय step by step शिकवित आहेस..

खरेच तू सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद आहेच आणि तू घेत असलेले कष्ट पण


Mi_abhijeet
Wednesday, February 28, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान सुचना आहेत मला पण प्रयत्न करावासा वाटला मेल पाठवला आहे इतरांना पण बेस्ट लक...!


Mi_anandyatri
Wednesday, February 28, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुर्जी,
फ़िजुलची भिती ही मनी गाडली मी
गझल आपल्याला अता धाडली मी... :-)

मिळाली नसेल तर कळवणे...


Vaibhav_joshi
Wednesday, February 28, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो ..

आतापर्यंत रचना पाठवलेल्यांची नावे ....

१)जयश्री
२)मिल्या
३)मीनू
४)उपास (३ गजल)
५)मयूर लंकेश्वर
६)मनिषा लिमये
७)आफ़ताब
८)मेघधारा
९)पुलस्ति
१०)अभिजीत दाते
११)डॉ. गजानन
१२)गणेश कुलकर्णी
१३)माणिक
१४)शलाका(दाद)
१५)प्रिया (चिन्नू)
१६)देवदत्त
१७)नीरज (निरु_कुल)
१८)सुधीर ( jo_s )
१९)मी आनंदयात्री
२०)नंदिनी देसाई

आधीपासून गज़ल लिहीणार्‍या जाणकारांपैकी

१) प्रसाद शिरगावकर
२)स्वाती आंबोळे
३) सुमतीताई वानखेडे
४) चक्रपाणि* आज रात्रीपर्यंत ज्यांना शक्य आहे त्यांनी संदिग्ध रचनाही पाठवायला हरकत नाही .

*आता पर्यंत ज्यांनी गज़ल पाठवल्या आहेत त्या गज़लकारांशी चर्चा सतत सुरू आहे . आणि ती यापुढेही सुरू राहील जसजशी एक एक गज़ल त्या गज़लकाराला अभिप्रेत असलेल्या कल्पनांनी नटून निर्दोष तयार होईल तसतशी ती इथे पोस्ट केली जाईल .

* यादीत कुणाचे नाव राहिले असल्यास माफ़ करा . व तसे लक्षात आणून द्या . सर्वांच्या मेल्स मिळाल्या आहेत हे नक्की . पण काय आहे परवाची परिस्थिती पाहून प्रसाद शिरगावकरांच्या तोंडून उत्स्फूर्त शेर निघून गेला


ऋतू येत होते ऋतू जात होते
अन इनबॉक्स माझे उतू जात होते


:-)

मनःपूर्वक धन्यवाद


.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions