Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Archive through February 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through February 26, 2007 « Previous Next »

Gajanan1
Sunday, February 25, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या गजल मध्ये यमक फ़क्त शेवटच्या दोनच अक्षरात आहे. असे चालते काय?

Vaibhav_joshi
Sunday, February 25, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये " लगागा " क्या लगा रख्खा है मामू !!!

अशी दिसेल आपल्या सर्वांची गज़ल

ऋतू येत होते ऋतू जात होते
लगागा लगागा लगागा त होते

लगागा लगागा लगागा लगागा
लगागा लगागा लगागा त होते


लगागा लगागा लगागा लगागा
लगागा लगागा लगागा त होते


लगागा लगागा लगागा लगागा
लगागा लगागा लगागा त होते


लगागा लगागा लगागा लगागा
लगागा लगागा लगागा त होते


* :- जिथे जिथे ल आणि गा आहे तिथे फक्त आपल्या कल्पनांनी रिकाम्या जागा भरायच्या आहेत .


ल :- लघु किंवा र्‍हस्व अक्षर
उदा :- अ, क, मु, दि. लि

गा :- गुरू किंवा दीर्घ अक्षर
उदा .:- आ, जा, गा, ते,तो,ती


लघु अक्षर म्हणजे एक मात्रा व दीर्घ अक्षर म्हणजे दोन मात्रा असा हिशेब असतो .

एका गुरू ऐवजी दोन लघु अक्षरे लिहिली तरी ओळीच्या एकूण मात्रांत फरक न पडल्याने कानाला खटकत नाही .

उदा : - संदिप - सलील चे " अताशा असे हे "

अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणि डोळ्यात येते ( णि र्‍हस्व का हे पुन्हा कधीतरी )
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो

आता इथे तिसर्‍या ओळीत मी

" सहज बोलता बोलता स्तब्ध होतो "


असे लिहील्याने गाणे म्हणायला बिलकुल अडचण येणार नाही कारण

" बरा " = ब ची एक मात्रा + रा च्या दोन = ३

" सहज " = प्रत्येकी एक मात्रा = ३

अर्थात हे सर्व त्या त्या अक्षराचे वाक्यात आलेले वजन त्याला जोडून आलेली अक्षरे ह्यावर अवलंबून असतं .

उदा : - वरती आपण " दि " हे अक्षर लघु घेतल आहे .
जसं :- दिशा .
पण हेच दि जर " बंदिस्त " या शब्दात आलं तर दि वर येणारा जोर आणि तो उच्चारण्यासाठी लागलेला वेळ ह्यामुळे तो दीर्घच गणला जातो .

आपल्या ह्या गज़ल साठी सध्या इतकेच करायचे आहे की भुजंग प्रयातातील कुठलीही चालीवरची रचना घेऊन त्यावर आपण लिहीत असलेली गज़ल गुणगुणून बघावी . जिथे आपोआप अडाल तिथे आपोपाप विचार केला जाईल फक्त आपण लिहीलेले शब्द मुद्दाम adjust करत त्या चालीत बसवायचे नाहीत . सहज गुणगुणायचं .

सहज बोलता बोलता गज़ल होते
पुन्हा ऐकता पूर्तता येत जाते
लगागा लगागा लगागा लगागा

ऋतू येत होते ऋतू जात होते

:-)


Meghdhara
Sunday, February 25, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कसलं सोपं करुन समजावतोस..

मला वाटतं येता जाता.. जेवताना.. संभाषण याच पद्दह्तीत म्हणायचा थोडा प्रयत्न केला तर हे मीटर पक्कं डोक्यात बसेल..

'खुबसुरत' आठवला.

मेघा


Gajanan1
Sunday, February 25, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे छान सान्गितले. आता वाक्यातील शब्दाच्या मात्रा व यमक यान्च्याबाबत confusion राहिले नाही.

Meenu
Monday, February 26, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुर्जी आता मात्र खरे गुर्जी शोभलात ... गुर्जींना आपण शाब्बासकी दिलेली चालते का ..?

Mayurlankeshwar
Monday, February 26, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) क्या बात है मामू.... अपुन के भेजे मे 'लगागा' घुसरेला है

Prasad_shir
Monday, February 26, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुर्जी.... फारच छान सुरू आहे शाळा!

लगे रहो वैभव गुर्जी!!


Nandini2911
Monday, February 26, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मामु, भेजे मे केमिकल लोचा हो गया है....


Mankya
Monday, February 26, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है वैभव भाई, सबके भेजे में ' लगागा ' का Chemical लोचा भर दिया ! लेकिन भाय ने बोला ना कि ' लगागा ' लिखनेका तो लिखनेका !
भाय, तुमने तो गजल लिखना सिखा दिया, रियल वाले Professor हो गये ले तुम तो ! मजा आ गया !

माणिक !


Ganesh_kulkarni
Monday, February 26, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव सर,
किती छान प्रकारे मार्गदर्शन!


Vaibhav_joshi
Monday, February 26, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी केलेचि पाहिजे

बडबड बडबड नुस्ती .. उगी ऐकून घेतोय आम्ही सगळे म्हणून वाट्टेल ते बोलत सुटलेत . स्वतःला येते का लिहायला ते बघा आधी ...

jokes apart मित्रांनो उदाहरण म्हणून एक गज़ल लिहीतोय .. तुम्हां सर्वांना मदत होईल अशी आशा आहे ..

कुठे न्याय मागावया वाव होता
सदा आपल्यांचा उरी घाव होता


मीटर आत सर्वांना कळलंय . आधी म्हट्ल्याप्रमाणे गज़लमधला प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते . त्या दोन ओळी वाचल्या की एक comprehensive अर्थ मिळून जातो . वरच्या शेर मध्ये अर्थ सोप्पा आहे . कुणाकडे न्याय मागणार ? सदैव आपल्यांचाच घाव उरी होता , माझ्या भोवताली सगळे आपलेच शत्रू बनून वावरत होते वगैरे वगैरे

उगा चेहरे पारखायास गेलो
जसा चोर होता तसा साव होता


मला माणसं कळली नाहीत हे तर आहेच पण मी चेहरी पारखायला तरी कशाला गेलो ? ज्यांना चांगले समजलो होतो ते ही चोरच निघाले . पुन्हा एकदा एक शेर , एक विषय संपल . नवीन शेर , नवीन विषय घ्यायला आपण मोकळे

उभी उंबर्‍याऐवजी भिंत होती
जरी तोरणांचा बडेजाव होत


कुठेच कधीच मनापासून स्वागत झाले नाही . सगळेच लोक आम्ही माणूसघाणे नाही आहोत असा बडेजाव आणत होते पण खुल्या दिलाने कुणीही जवळ केले नाही कारण मनात प्रवेश करण्यासाठी उंबर्‍याऐवजी भिंत होती . इथे त्यांची मने दगडी होती हा subtle अर्थ घेतला आहे जेथून दगडाचा देव ही संकल्पना आकार घेऊ लागते . आणि एकदा देव ह्या संकल्पनेला आकार आला की त्याचा दगड झालाच समजायचा , हो ना ?

तिथे मांडल्या सोंगट्या मी कशाला
जिथे खेळण्यालाच मज्जाव होता


ह्या शेर मध्ये सोंगट्या आल्याने डाव सुचणे अपेक्षित होते . आणि तो एक cliche अर्थ झाला असता . पण बराच वेळ मनात पहिली ओळ रुजवल्यानंतर , घोकल्यानंतर जेव्हा मज्जाव समोर आला तेव्हा प्रचंड समाधान मिळाले . ( पहा मज्जाव मधल्या " म " वरचा जोर . त्यामुळे " म " दीघ गणला जातो . ) ह्या एका शब्दाने शेराला वेगळा अर्थ लाभतो . डावतल्या हारजीतीपेक्षा जिथे जगूच देत नाहीत तिथे मी जन्म का घेतला हा अर्थ मला जास्त भावला .

तडीपार झालो पहाटे पहाटे
उशाशीच स्वप्नांतला गाव होता .


काल रात्रीच्या वाटचालीत पुन्हा तिच्या आठवणींचा गाव लागला . पुन्हा जरा वेशीवर रेंगाळलो आणि अर्थातच पहाटे सत्य उजेडात आले तेव्हा पुन्हा तिच्याया गावातून तडीपार व्हावे लागले .

मित्रांनो , खरंतर स्वतःच्याच गज़ल वर लिहीणे योग्य नव्हे पण ही process आपल्या सर्वांच्या लक्षात यावी म्हणून लिहीले आहे . कुठेही आढ्यता जाणवली असेल तर माफ करा .

शेवटी काय ...

इरादे भले ह्या प्रयत्नात होते ... ( पहा " प्रयत्नांत " ... य वरच्या जोराने दीर्घ आलाय )
लगागा लगागा लगागा लगागा

ऋतू येत होते ऋतू जात होतेPrincess
Monday, February 26, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरकार, तुम्ही माफी काय मागताय? हे एक बरेच केलस तु... कार्यशाळा सुरु केलीस ते. नुसते वाचुन कधी जाणवलेच नाही की गझल हा काही फक्त कागद आणि पेनाचा खेळ नव्हे. "तिथे हवेत जातिचे". कागद, कलम, भावना, डोके, शब्द संपत्ती हे सगळे काही (जागेवर) असले तरच गझल लिहिता येइल, हो ना?

माझ्या पुर्ण आयुष्यात मी इतके कागद नाही फाडले जे या दोन दिवसात फाडलेत.

तु खरच gr8 आहेस. पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुला गझल खुप छान लिहिता येते. आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे तुझे ज्ञान तुला share करावेसे वाटतेय.

गुरुजी महान आहात तुम्ही!!!Mayurlankeshwar
Monday, February 26, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच.. माझं तर 'लगागा' सोबत प्रचंड युद्ध चालू आहे!


Princess
Monday, February 26, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर
युद्ध चाललय म्हणतोस... मी तर शस्त्रे टाकलीत:-( भाइ ये अपने बस की बात नही...


Meenu
Monday, February 26, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं प्रिन्सेस असं नको करुस अगं गज़ल नाही तर नाही एखादी हज़ल तरी बनेल ना ... शस्त्र वगैरे अशी टाकु बिकु नकोस बाई ... माझं तर तेच होणार आहे केला गणपती आणि झाला मारुती सारखं ..

Psg
Monday, February 26, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हझल'वर एक प्रश्न.. गझल ही गंभीरच असली पाहिजे असाही नियम आहे का? मीटर मधे बसणारी, बाकी सर्व नियम पाळणारी, पण हलक्याफ़ुलक्या शब्दातली, किंवा चक्क विनोदी शैलीतली गझल, गझल न राहता एकदम 'हझल'च होते?
गुरुजी, सॉरी, मी गझल लिहिणार नाहिये, तरीपण प्रश्न विचारायचं धारिष्ट्य करत आहे..


Suvikask
Monday, February 26, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर, लिहीणे सोडाच... पण इतरांनी लिहिलेल्याचा अर्थ जरि समजला न तर मी धन्य होईल... याच माफक अपेक्षेने कर्यशाळेत भाग घेतला आहे.
पण.. गुरु ऊतम आहेत... मला अशी भिती वाटतेय की त्यांचे सहज सोपे स्पष्टिकरण वाचुन मीही लिहायला लागेल कि काय...........!!!!!


Vaibhav_joshi
Monday, February 26, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार पूनम .. सॉरी मी गुरुजी नाहीये तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय .. मला वाटतं तुझा हा प्रश्न वर झालेल्या चर्चेतून आला असावा .

माझ्यामते जसं ललित आणि विनोदी साहित्य असे वेगळे भाग आहेत ( मायबोलीवर नव्हे , एकूणच ) तसंच हे . मला वाटतं कुणीही मी ललित लिहीलंय म्हणून विनोदी लेख पुढे नाही करू शकणार ना ?

मूळ फ़ारसी भाषेतून आलेला गज़ल हा काव्यप्रकार prominently प्रेम व त्यातील वैफ़ल्य व्यक्त करण्यासाठी वापरला जायचा . नंतर नंतर सामाजिक विषय गज़ल मधून हाताळले जाऊ लागले आणि पूर्ण system बदलून टाकायची ताकद ह्याही काव्यप्रकारात आहे हे आढळून आले .

मराठीत गज़ल गुरुवर्य . कै . सुरेश भटांनी आणली . त्यांच्या काही संग्रहात विनोदाच्या अंगाने समाजव्यवस्थेवर ताशेरे ओढणार्‍या गज़ल आहेत ज्याला त्यांनी हज़ल म्हटले आहे . हे अश्यासाठीच असावे की त्यांच्या सर्व गज़ल म्हणजे नवीन शिकणार्‍यांसाठी गज़ल कशी लिहावी ह्याचा अभ्यासच होता तर त्यात ही विनोदी अंगाने जाणारी गज़ल आहे हे कळावे म्हणून त्याचे सोपे नामकरण केले गेले असावे . ( असा माझा कयास आहे )

शेवटी हज़ल ही विनोदी गज़ल आहे म्हणजेच ती " गज़ल " आहे हे मान्यच करणे नव्हे काय ?


Nandini2911
Monday, February 26, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस.. आम्हीपण आता शस्त्रे खाली ठेवणार बहुधा..
साधा सोपा उद्योग वाटत होता.. आता नसता उपद्व्याप झालाय...


Vaibhav_joshi
Monday, February 26, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून १ मार्च उजाडायला बराच वेळ आहे. शस्त्रे खाली टाकू नका. एक म्हणजे ही लढाई नाहीय. कुणाला ह्या पध्दतीचं काही सुचलं तर मदत म्हणून आम्ही सर्व लोक आहोत. मनात आलेल्या कल्पनांना घड्या घालून त्या मीटरच्या कप्प्यात बसवणं म्हणजे गज़ल नसून मनात विचार येतानाच त्या मीटर मध्ये यावेत त्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे. कवितेतील उत्स्फूर्तता गज़ल मुळे कधीच मारली जात नाही. उलट तिला एक झळाळ,एक नखरेल सौंदर्य प्राप्त होते. त्यासाठी जामानिमा नीट पहावा तरी लागणार ना?

मित्रांनो.. काहीही मदत लागली तर कळवा

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions