Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गोरखगड गोरक्षगड्) ...

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » गोरखगड गोरक्षगड्) « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 22, 200535 12-22-05  8:56 pm

Dineshvs
Friday, December 23, 2005 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेक ऐतिहासिक कादंबर्‍यात अशी छान वर्णने आहेत. ती चित्ररुपाने बघायला मिळाली तर !

पाण्याबाबत मला आणखी एक मुद्दा लिहावासा वाटतोय. उंबराचे झाड आणि पाणी यांचा जवळचा संबंध आहे. उंबराचे झाड असेल तर त्याच्या मुळाशी पाणी लागतेच. आता पाण्याच्याच ठिकाणी उंबर वाढतो कि उंबराजवळ पाणी येते ते नाहि सांगता येणार मला.
उंबराची झाडे लावता आली तर किती छान. कारण उंबरे खाल्ली तर तहान आणि भुक दोन्ही भागते.
हि झाडे लावणे तसे सोपे नाही, कारण ती बिया लावुन ऊगवत नाहीत. त्यासाठी पक्ष्यांच्या पोटाची ऊब लागते. रोपे लावता आली तर बघायला हवीत.
मागे मला आणि गिर्‍याला चोर्ला घाटात एक फ़ळानी भरलेले झाड दिसले होते. खुप गोड होती ती फ़ळे, असा एखादा वाण निवडला पाहिजे.
उंबर, पिंपळ, आंबा वैगरे झाडे सगळी पाने कधीच गाळत नाहीत. त्यामुळे सावलीचीहि सोय होते


Bee
Friday, December 23, 2005 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

URLs are wonderful!!!! Millions n billions thanks Dhumketu! Moodi, to u too!


छायाचित्रांची ही कमाल फ़क्त खरच cameras ची आहे असे म्हणावे का? इतके सुंदर दृष्य आपल्याच राज्यात, आपल्याच आसपास आहेत ह्याची कल्पना यापूर्वी नव्हती! क्षणभर डोळ्याचे पारणे फ़िटले..

गोविंद आणि group तुम्ही सगळे आपला उत्साह कधीच ओसरू देऊ नका. दिवसेंदिवस हा group वृद्धींगत होवो अशी शुभेच्छा!


Limbutimbu
Friday, December 23, 2005 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतू, तुला थन्क्यू!
ह्यो अमित कुलकर्णी हिकड मायबोलीवर येतो का? :-)


Gs1
Friday, December 23, 2005 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूगल अर्थ चे काम चार पाच वेगवेगाळ्या लोकांनी हाती घेतले आहे. तेकडी, पुणे हे पण त्यातलेच एक...

पाणी : जवळ जवळ प्रत्येक गडावर पाण्याची टाकी असतातच. काही ठिकाणी तर खाली गावात पाणी नसते पण वर किल्ल्यावर पाणी असते. पण बर्‍याच ठिकाणी एखाद्याच टाक्यातले पाणी पिण्यास योग्य असते, बाकीचे खराब झालेले असते. काहींना जिवंत झरे असतात काही नुसतेच साठवलेले. कारणे, उपाय, पद्धत याबद्दल मार्गदर्शन मिळाल्यास काही करता येईल.

मुडी,तुमचे म्हणने पटते. पण सध्या तरी ज्या गडावर जाऊ तिथे दिनेश म्हणतात तसे आधी ठरवून स्वत : कां करावे असे वाटते. थोडा अनुभव आला की पुढचे ठरवता येईल.



Dineshvs
Friday, December 23, 2005 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाण्याबाबत गावकर्‍यांशी बोलायला पाहिजे. मी एका निवडुंगाबद्दल ऐकले आहे. त्याचा रस घातला कि कुठलेहि पाणी पिण्यायोग्य होते.
निवळी नावाचे एक क्षुप पण असेच काम करते.
ट्रॅव्हलर्स पाम म्हणुन एक झाड असते. खाली माडासारखे आणि वर केळ्यासारखी पाने असतात. याला केळफ़ुल पण लागते. याचे म्हणे एक पान तोडले कि त्यातुन पिण्यायोग्य पाणी ठिबकते. पण याचा मला अनुभव नाही.
बर्‍याच वेळ तहान थांबवणार्‍या काहि औषधी असतातच.
अर्थात हि माहिती आपल्याला वृद्ध गावकरीच देऊ शकतील.
GS1 एका ग्रुपने एखादा गड दत्तक घेतल्यासारखे तिथे सारखे जाऊन हे काम करायला हवे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators